Privacy Policy

को-ब्रँडेड क्रेडिट कार्डच्या अटी आणि शर्ती

Englishગુજરાતીதமிழ்తెలుగుमराठीമലയാളംঅসমীয়াবাংলাहिन्दीಕನ್ನಡଓଡ଼ିଆ
< Back

या नियम आणि अटी (“को-ब्रँडेड कार्ड नियम आणि अटी”) विविध कार्ड जारीकर्त्यांकडून (खालीलप्रमाणे परिभाषित) PhonePe लिमिटेड(पूर्वी ‘PhonePe प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणून ओळखले जात असे’) (“PhonePe”, “आम्ही”, “आमचे”, “आम्‍हाला”) यांच्याशी असलेल्या कराराच्या अधीनतेखाली जारी करण्यात येणाऱ्या विविध को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (“को-ब्रँडेड कार्ड”) वर लागू होतात, ज्या ठिकाणी आम्ही अशा को-ब्रँडेड कार्डांसाठी को-ब्रँडिंग भागीदार आहोत. येथे नमूद केलेल्या विशिष्ट नियम आणि अटी तुमच्‍या (“तुम्‍ही” / “तुमच्‍या“) “PhonePe” मोबाइल ॲप्लिकेशन (“PhonePe ॲप“) किंवा www.phonepe.com या वेबसाइट, जसे लागू असेल, यांच्या वापरावर, (एकत्रितपणे “PhonePe प्लॅटफॉर्म”) नियंत्रण ठेवतात ज्यामध्ये तुम्‍ही कोणत्याही को-ब्रँडेड कार्ड जारी करण्यासाठी कार्ड जारीकर्त्यांना अर्ज करू शकता आणि / किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही को-ब्रँडेड कार्डशी संबंधित कोणतीही वैशिष्ट्ये / पैलूंमध्‍ये प्रवेश करू शकता/ वापरु शकता. 

भाग A – सर्व को-ब्रँडेड कार्ड्सला लागू असलेले सामान्य नियम आणि अटी

कोणत्याही को-ब्रँडेड कार्डच्या संदर्भात PhonePe प्लॅटफॉर्म वापरण्यास पुढे जाऊन, तुम्ही खालील बाबींना बंधनकारक स्वरूपात मान्य करत असल्याचे स्पष्टपणे दर्शवता:(i) या को-ब्रँडेड कार्डच्‍या नियम आणि अटी; (ii) या को-ब्रँडेड कार्ड अटींमध्ये संदर्भाद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व नियम आणि अटी, ज्यामध्ये https://www.phonepe.com/terms-conditions/ येथे उपलब्ध असलेल्या PhonePe नियम आणि अटी आणि https://www.phonepe.com/privacy-policy/ येथे उपलब्ध असलेली PhonePe गोपनीयता धोरणांचा समावेश आहे.; आणि (iii) PhonePe ने वेळोवेळी जारी केलेल्या इतर सर्व लागू अटी, धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे ( एकत्रितपणे “अटी” म्हणून संदर्भित). तुम्‍ही अटींशी सहमत नसल्यास, तुम्‍हाला PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही को-ब्रँडेड कार्ड (कार्ड्स) किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही संबंधित किंवा पूरक सेवांचा वापर करता येणार नाही.

आम्ही नमूद करतो आणि तुम्ही हे समजता, मान्य करता व स्वीकारता की :

  1. PhonePe ने या को-ब्रँडेड कार्ड नियम आणि अटींच्‍या (विशिष्ट नियम आणि अटी)  (एकत्रितपणे, “कार्ड जारीकर्ते”) च्‍या भाग B अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक बँक/नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसोबत, विविध को-ब्रँडेड कार्ड कार्यक्रम सुरू करण्यासाठी आणि को-ब्रँडेड कार्ड्सचे विपणन आणि प्रचार करण्‍याच्या उद्देशाने करार केला आहे.
  1. आम्ही स्पष्टपणे घोषित करतो आणि तुम्ही हे पूर्णपणे समजून, मान्य करून व स्वीकारून घेतले आहे की:
  1. या को-ब्रँडेड कार्ड नियम आणि अटींच्‍या भाग B अंतर्गत सूचीबद्ध संबंधित बँका/नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या संबंधित को-ब्रँडेड कार्डचे जारीकर्ता आहेत आणि PhonePe कोणत्याही को-ब्रँडेड कार्डचे जारीकर्ता नाहीत;
  2. कार्ड जारीकर्ते आणि PhonePe द्वारे को-ब्रँडेड कार्डचे विपणन आणि प्रचार केला जातो;
  3. प्रत्येक कार्ड जारीकर्त्याच्या को-ब्रँडेड कार्डसंदर्भात PhonePe ची भूमिका केवळ को-ब्रँडिंग भागीदार या नात्याने त्या को-ब्रँडेड कार्डचे विपणन व वितरण करण्यापुरती मर्यादित आहे; आणि
  4. कोणत्याही को-ब्रँडेड कार्डद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांशी संबंधित माहिती PhonePe कडे कधीही शेअर केली जात नाही आणि भविष्यातही केली जाणार नाही; तथापि, परवानगीच्या अधीन राहून, ती माहिती PhonePe प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध करून दिली जाऊ शकते.
  1. मूलभूत पात्रता
  1. को-ब्रँडेड कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कायद्याने पात्र असणे आवश्यक आहे. तुमचे वय अठरा (18) वर्षांपेक्षा जास्‍त असावे, तुम्‍ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ असावे, भारताचे निवासी असावे आणि लागू असलेल्या कायद्याने तुम्हाला को-ब्रँडेड कार्डसाठी अर्ज करण्यापासून प्रतिबंधित केलेले नसावे. 
  1. तुम्‍ही समजून घेता, मान्‍य करता आणि सहमत आहात की तुम्‍ही कार्ड जारीकर्ताद्वारे विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि प्रत्येक कार्ड जारीकर्त्यांला  अतिरिक्त पात्रता अटी लागू करण्याचा अधिकार राखीव आहे.या संदर्भात कार्ड जारीकर्त्याचा निर्णय अंतिम असेल.
  1. को-ब्रँडेड कार्ड्ससाठी लागू असलेल्या सर्वसाधारण नियम आणि अटी
  1. प्रत्येक को-ब्रँडेड कार्ड संबंधित कार्ड जारीकर्त्याद्वारे जारी केले जाते आणि संबंधित कार्ड जारीकर्त्याला तुमची पात्रता, क्रेडिट पात्रता इत्यादी तपासून, तुम्हाला विशिष्ट को-ब्रँडेड कार्ड जारी करण्यास मंजुरी देण्याचा/नकार देण्याचा, तसेच विशिष्ट को-ब्रँडेड कार्डसाठी लागू असलेली मर्यादा निश्चित करण्याचा आणि को-ब्रँडेड कार्ड जारी करणे व वापराशी संबंधित इतर सर्व बाबींचा अधिकार राखीव आहे.
  1. कोणत्याही को-ब्रँडेड कार्डचा वापर संबंधित कार्ड जारीकर्त्याद्वारे तुम्‍हाला वेळोवेळी कळविलेल्या नियम आणि अटींद्वारे नियंत्रित केला जाईल. प्रत्येक को-ब्रँडेड कार्ड नियंत्रित करणार्‍या कार्ड जारीकर्त्याच्या नियम आणि अटी या को-ब्रँडेड कार्ड नियम आणि अटींच्या भाग B मध्ये खाली नमूद केलेल्या हायपरलिंकवर उपलब्ध आहेत.
  1. PhonePe तुमच्‍या आणि संबंधित कार्ड जारीकर्त्यादरम्यान कोणत्याही व्यवहारात किंवा करारात पक्षकार नाही आणि असू शकत नाही. वरील बाबींचा विचार करता, तुम्ही येथे कोणत्याही अटीशिवाय आणि अप्रतिबंधितपणे PhonePe ला कोणत्याही आणि सर्व दावा, क्रिया, जबाबदाऱ्या यापासून मुक्त करता जे तुमच्या कोणत्याही को-ब्रँडेड कार्डच्या वापरामुळे उद्भवतात (त्यात कोणत्याही फसवणूक किंवा त्याचा दुरुपयोग यामुळे होणारे नुकसान देखील समाविष्ट आहे) आणि तुम्ही समजता की असे सर्व दावे, क्रिया आणि जबाबदाऱ्या फक्त कार्ड जारीकर्त्यावरच राहतील.
  1. को-ब्रँडेड कार्डसाठी अर्ज करणे
  1. को-ब्रँडेड कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्‍ही  PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अशा को-ब्रँडेड कार्डसाठी संबंधित लँडिंग पेजला भेट देऊ शकता, ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करू शकता आणि अशा को-ब्रँडेड कार्डसाठी अर्जामध्ये कार्ड जारीकर्त्याने मागितलेली माहिती प्रदान करू शकता.
  1. तुम्‍ही कन्‍फर्म करता की या अर्जामध्ये प्रदान केलेली सर्व माहिती सत्य, पूर्ण, अचूक आणि अद्ययावत आहे. तुम्ही याची जाणीव ठेवता की तुम्ही को-ब्रँडेड कार्डशी संबंधित सर्व माहितीची अचूकता आणि योग्यतेसाठी पूर्णपणे जबाबदार असाल. तुम्ही अर्जामध्‍ये दिलेली सर्व माहिती संबंधित कार्ड जारीकर्त्यास ‘जशी आहे तशी’ शेअर केली जाईल आणि PhonePe या माहितीबाबत कोणतीही जबाबदारी नाकारते.
  1. तुम्ही कोणत्याही अटीशिवाय आणि अप्रतिबंधितपणे PhonePe ला तुमच्याकडून दिलेल्या चुकीच्या, अपूर्ण किंवा अयोग्य माहितीकडून होणाऱ्या कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त करता. को-ब्रँडेड कार्डशी संबंधित तुम्‍ही दिलेल्या माहितीमध्ये कोणतीही चूक झाल्यास, तुम्हाला त्वरित PhonePe आणि संबंधित कार्ड जारीकर्त्याला सूचित करणे आवश्यक आहे.
  1. कार्ड जारीकर्ते आणि PhonePe (ज्या प्रमाणात लागू असेल) तुमची माहिती/डेटा (त्यात वैयक्तिक किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे) को-ब्रँडेड कार्डसंबंधी सेवा प्रदान करण्याच्या दृष्टीने वापरू शकतात.
  1. तुम्‍ही कबूल करता आणि सहमत आहात की कार्ड जारीकर्ता आपल्या निर्णयाधिकारानुसार, तुम्‍हाला को-ब्रँडेड कार्ड जारी करण्यास स्वीकारू किंवा नकार देऊ शकतो. PhonePe केवळ एक विपणन आणि वितरण सुविधा आहे आणि जसे की, PhonePe तुम्‍हाला कोणतेही को-ब्रँडेड कार्ड दिले जाईल याची हमी देत नाही. 
  1. तुमच्या कोणत्याही को-ब्रँडेड कार्डसाठीच्या अर्जास मंजुरी/नकार देण्यासंदर्भातील कार्ड जारीकर्त्याच्या निर्णयाधिकारात PhonePe चा कोणताही सहभाग नाही आणि PhonePe कडून अशा निर्णयासंबंधी कोणतेही स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व, हमी किंवा गॅरंटी दिली जात नाही; आणि अशा बाबी तुमच्यामध्ये व कार्ड जारीकर्त्यामधील करारानुसार लागू असलेल्या अटींद्वारे नियंत्रित केल्या जातील.
  1. संप्रेषण
  1. तुम्ही हे मान्य करता आणि स्वीकारता की खालील बाबींसंदर्भातील माहिती देण्यासाठी PhonePe तुमच्‍याशी संपर्क साधू शकते:(a) को-ब्रँडेड कार्ड्स; (b) को-ब्रँडेड कार्डच्या संदर्भात तुम्‍ही PhonePe प्लॅटफॉर्मवर हाती घेतलेले उपक्रम; (c) PhonePe, कार्ड जारीकर्ता आणि त्यांची उत्पादने किंवा सेवांबद्दल माहिती; (d) को-ब्रँडेड कार्डचे विपणन आणि प्रोत्साहन, को-ब्रँडेड कार्डशी संबंधित फायदे, कोणत्याही तृतीय पक्षाने देऊ केलेली उत्पादने किंवा सेवा; (e) को-ब्रँडेड कार्डशी संबंधित कोणत्याही ऑफर, विपणन मोहिमा किंवा स्वागत लाभ किंवा बक्षीस कार्यक्रम आणि (f) को-ब्रँडेड कार्ड किंवा त्याच्याशी संबंधित बाबींच्या संदर्भात इतर कोणतीही बाब. 
  1. तुम्ही जर तृतीय पक्षाच्या वतीने PhonePe प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असाल, तर तुम्ही हे मान्य करता आणि स्वीकारता की तुम्ही ज्यांची माहिती PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली आहे अशा तृतीय पक्षांना वरीलपैकी कोणतेही किंवा सर्व संप्रेषण पाठविण्यास PhonePe ला परवानगी आहे. आम्हाला असे संप्रेषण पाठविण्यासाठी अशा तृतीय पक्षांकडून सर्व संमती प्राप्त झाल्या आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्‍ही जबाबदार असाल.
  1. तुम्‍ही कबूल करता आणि सहमत आहात की PhonePe संप्रेषण PhonePe प्लॅटफॉर्म, अलर्ट, ईमेल, संदेश, फोन कॉल किंवा संप्रेषणाच्या इतर व्यवहार्य पद्धतींवरील सूचनांच्या स्वरूपात असू शकते.
  1. वरील कलम 6.3 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही चॅनेलद्वारे येथे नमूद केलेल्या कोणत्याही उद्देशांसाठी तुम्‍ही PhonePe, कार्ड जारीकर्ता आणि PhonePe च्या तृतीय-पक्ष सेवा प्रदात्यांना तुमच्‍याशी संवाद साधण्यास अधिकृत करता. तुम्ही लागू असलेल्या कायद्यांअंतर्गत, तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (“TRAI”) यांनी केलेल्या नियमांनुसार डू नॉट डिस्टर्ब (“DND”) / राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (“NCPR”) यादीत केलेली कोणतीही प्रतिकूल प्राधान्य नोंद स्पष्टपणे मागे घेत आहात. तुम्ही TRAI कडून विचारलेल्या कोणत्याही चौकशीस उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त अधिकृतता किंवा कागदपत्रे PhonePe ला प्रदान करण्यास सहमती देता.
  1. PhonePe कडून संप्रेषण योग्य प्रकारे पाठवले जावे यासाठी आवश्यक ती योग्य ती पावले उचलली जातात, तरीसुद्धा संपर्क माहितीवरील निर्बंध, फोन नंबर DND यादीत नोंदणीकृत असणे, ईमेल डेटा संग्रहणातील अपुरेपणा, दूरसंचार सेवा पुरवठादारांकडील त्रुटी इत्यादी कारणांमुळे संप्रेषण पाठवण्यात अपयश येऊ शकते.  वरील बाबींच्या अनुषंगाने, कोणतेही संप्रेषण न मिळाल्यास त्यासाठी PhonePe जबाबदार धरले जाणार नाही किंवा त्याच्यावर कोणतेही दायित्व येणार नाही.
  1. PhonePe सर्व संप्रेषण प्रामाणिक हेतूने करत असले तरी, कोणतेही संप्रेषण अचूक आहे, पर्याप्त आहे, उपलब्ध आहे, कायदेशीर आहे, वैध आहे, विश्वासार्ह आहे किंवा पूर्ण आहे याबाबत PhonePe कोणतेही स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व किंवा हमी देत नाही, याची कृपया नोंद घ्यावी. PhonePe ने केलेल्या कोणत्याही संप्रेषणाच्या सामग्रीचा वापर किंवा त्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा हानीसाठी PhonePe ला जबाबदार किंवा उत्तरदायी धरले जाणार नाही.
  1. संमती व्यक्त करा
  1. तुम्ही स्पष्टपणे PhonePe ला अधिकृतता प्रदान करता आणि तुमची संमती देत आहात:
  1. अर्जात समाविष्ट असलेली सर्व माहिती/डेटा (वैयक्तिक किंवा संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहितीसह) संबंधित कार्ड जारीकर्त्यासह शेअर करण्यासाठी; आणि
  1. तुम्ही यापूर्वी PhonePe प्लॅटफॉर्मवर प्रदान केलेली कोणतीही माहिती/डेटा (वैयक्तिक किंवा संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहितीसह) संबंधित कार्ड जारीकर्त्यांना शेअर करण्यासाठी.
  1. तुम्ही याची जाणीव ठेवता की, संबंधित कार्ड जारीकर्त्यांसोबत शेअर केलेली कोणतीही माहिती/डेटा (वैयक्तिक किंवा संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहितीसह) कार्ड जारीकर्ता पुढल उद्देशांसाठी वापरेल:
  1. तुमची माहिती/डेटा क्रेडिट निर्णय घेण्यासाठी, क्रेडिट मूल्यांकन, क्रेडिट जोखीम विश्लेषण आणि फसवणूक व मनी लाँड्रिंग विरोधी तपासणी करण्यासाठी प्रक्रिया करण्‍यासाठी;
  1. क्रेडिट स्कोअर, क्रेडिट माहिती आणि / किंवा क्रेडिट मूल्यांकन अहवाल मिळविण्याच्या उद्देशाने क्रेडिट माहिती कंपनी (कंपण्‍या)शी तुमची माहिती / डेटा शेअर करण्‍यासाठी; आणि
  1. नवीन उत्पादने आणि/किंवा सेवा ऑफर करण्‍यासाठी विविध संप्रेषण चॅनेलद्वारे तुमच्‍याशी संपर्क साधण्यासाठी.
  1. तुम्‍ही PhonePe ला अधिकृत करता आणि लाभ व्यवस्थापनाच्या उद्देशाने संबंधित को-ब्रँडेड कार्ड आणि / किंवा इतर कोणत्याही संस्थेसाठी तुमच्‍या अर्जावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने संबंधित कार्ड जारीकर्त्यास तुमची माहिती / डेटा (वैयक्तिक किंवा संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहितीसह) उघड करण्यासाठी PhonePe ला तुमची संमती प्रदान करता.
  1. तुम्ही PhonePe ला तुमच्या संमती नोंदवून ठेवण्यासाठी व स्टोअर करण्यासाठी आणि ती संमती नोंदी ठेवण्यासाठी व पुरावा म्हणून कायद्याच्या न्यायालयात, कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा लवादामध्‍ये वापरण्याची स्पष्ट अधिकृतता व संमती देता.
  1. फायदे
  1. वेळोवेळी, PhonePe को-ब्रँडेड कार्ड्स संदर्भात बक्षिसे, सवलती, कॅशबॅक आणि इतर ऑफर्स प्रदान करू शकते/त्यांची सुविधा उपलब्ध करून देऊ शकते (एकत्रितपणे “फायदे” म्हणून संबोधले जाईल). कोणत्‍याही फायद्यांचा लाभ मिळविण्यासाठी, तुम्हाला निर्धारित पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि अशा फायद्यांवर लागू असलेल्या विशिष्ट नियम आणि अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.
  1. कोणत्याही फायद्यासाठी लागू असलेल्या अटींची पूर्तता करण्यात तुम्ही अपयशी ठरलात तर PhonePe तुम्हाला अपात्र ठरवण्याचा अधिकार राखून ठेवते, तसेच कोणताही फायदा किंवा ऑफर कोणत्याही वेळी कोणतीही जबाबदारी न घेता रद्द किंवा बदलण्याचा अधिकार सुद्धा राखून ठेवते.
  1. कृपया लक्षात घ्या की, जर तुमच्या राज्यातील किंवा क्षेत्रातील लागू कायदे तुम्हाला अशा फायद्यांमध्ये सहभाग घेण्यास किंवा ते मिळविण्यास प्रतिबंध करत असतील, तर तुम्हाला असे फायदे मिळविण्याचा अथवा त्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार राहणार नाही.
  1. कार्ड जारीकर्ता नियम आणि अटी

तुम्‍ही संबंधित को-ब्रँडेड कार्डच्या संदर्भात संबंधित कार्ड जारीकर्त्याने निर्धारित केलेल्या सर्व नियम आणि अटींचे पालन कराल आणि बंधनकारक असाल, ज्यात या सह-ब्रँडेड कार्ड नियम आणि अटींच्या भाग B मध्ये नमूद केलेल्या नियम आणि अटींचा समावेश आहे.कृपया अधिक माहितीसाठी कार्ड जारीकर्ता प्लॅटफॉर्म / संप्रेषणाचा संदर्भ घ्या.

  1. PhonePe प्लॅटफॉर्म

कार्ड जारीकर्त्याचा एक को-ब्रँडिंग भागीदार म्हणून, PhonePe तुमच्‍या कोणत्याही को-ब्रँडेड कार्डच्‍या माहितीमध्ये प्रवेश करत नाही. तुम्‍ही कबूल करता आणि सहमत आहात की को-ब्रँडेड कार्डसंदर्भातील सर्व माहिती जी तुम्हाला PhonePe प्लॅटफॉर्मवर दर्शवली जाते, ती संबंधित कार्ड जारीकर्त्याद्वारे थेट तुम्हाला प्रदान केली जाते आणि तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे केलेली कोणतीही आणि सर्व कार्ड-संबंधित कृती तांत्रिक एकत्रीकरणाद्वारे संबंधित कार्ड जारीकर्त्याच्या तांत्रिक पायाभूत सुविधेकडे प्रेषित केली जाते.

  1. तक्रार निवारण
  1. PhonePe प्लॅटफॉर्मशी संबंधित कोणत्याही तक्रारी https://www.phonepe.com/grievance-policy/वर उपलब्ध असलेल्या PhonePe तक्रार धोरणाद्वारे नियंत्रित केल्या जातील.
  1. को-ब्रँडेड कार्डच्या वापराशी संबंधित कोणत्याही तक्रारी संबंधित कार्ड जारीकर्त्याच्या तक्रार निवारण धोरणाद्वारे नियंत्रित केल्या जातील. PhonePe च्या निदर्शनास आणलेल्या अशा कोणत्याही तक्रारी संबंधित कार्ड जारीकर्त्याकडे पुनर्निर्देशित केल्या जातील आणि तुम्‍ही याद्वारे सहमत आहात आणि मान्य करता की PhonePe को-ब्रँडेड कार्डच्या वापराशी संबंधित कोणत्याही तक्रारींचे निराकरण करण्यास जबाबदार राहणार नाही.
  1. नुकसान भरपाई

तुम्ही PhonePe, त्याच्या संलग्न संस्था, संबंधित कार्ड जारीकर्ता(र्ते), तसेच PhonePe व कार्ड जारीकर्त्यांचे भागीदार, तृतीय पक्ष सेवा प्रदाते, कंत्राटदार, परवानाधारक, संचालक, व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी व एजंट यांना कोणतेही किंवा सर्व नुकसान, दंड, खर्च, शुल्‍क (त्यात कायदेशीर सल्लागारांचे शुल्कही समाविष्ट आहे), किंवा तृतीय पक्षांचे दावे, जे खालीलप्रमाणे कारणांमुळे उत्पन्न होतात, यापासून संरक्षण देण्याचे व त्यांची भरपाई करण्याचे तुम्ही मान्य करता:

  1. या अटींमध्ये समाविष्ट केलेल्या अथवा ज्यामध्ये या अटींचा समावेश आहे अशा कोणत्याही अटींचे तुमच्याकडून झालेले उल्लंघन; 
  2. तुमच्याकडून कोणत्याही लागू कायद्याचे उल्लंघन किंवा त्याच्या पालनामध्ये डीफॉल्ट होणे;
  3. फसवणूक, हेतुपुरस्सर गैरवर्तन किंवा तुम्‍ही केलेला घोर निष्काळजीपणा;
  4. तुमच्याकडून प्रदान केलेली कोणतीही खोटी, चुकीची, दिशाभूल करणारी किंवा अपूर्ण माहिती;
  5. तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मचा वापर किंवा प्रवेश केल्यामुळे कोणत्याही कायदेशीर, नियामक, सरकारी अथवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून लावलेले दंड, शिक्षा आणि शुल्क.
  6. PhonePe प्लॅटफॉर्मचा वापर करत असताना तुमच्याकडून झालेल्या कृती किंवा अनवधान.  
  1. वगळलेले दायित्‍व

तुम्‍ही मान्य करता आणि सहमत आहात की PhonePe यासाठी जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही:

  1. तुम्ही कोणत्याही को-ब्रँडेड कार्डचा ताबा/वापर केल्यामुळे झालेला कोणताही तोटा किंवा नुकसान, ज्यात तृतीय पक्षाद्वारे को-ब्रँडेड कार्डचा वापर किंवा त्यासंबंधी केलेल्या फसवणूक किंवा दुरुपयोगामुळे होणारे नुकसान समाविष्ट आहे;
  1. कोणत्याही को-ब्रँडेड कार्डसाठी पात्रतेसंबंधी, किंवा तुमच्याकडून कोणत्याही को-ब्रँडेड कार्डचा ताबा घेणे/वापरणे यासंबंधी उद्भवणारा कोणताही वाद;
  1. कोणत्याही व्यक्ती/व्यापारी संस्थेने कोणत्याही को-ब्रँडेड कार्डला सन्मान देण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिला किंवा त्यात अपयश आले;
  1. तुमच्या को-ब्रँडेड कार्डसंदर्भात कार्ड जारीकर्त्याच्या कोणत्याही कृती किंवा दुर्लक्ष, तसेच कोणत्याही को-ब्रँडेड कार्डसंबंधी किंवा कार्ड जारीकर्त्याद्वारे ऑफर केलेले बक्षिसे/फायदे अथवा इतर कोणत्याही फायद्यांबाबत तुमच्यात आणि कार्ड जारीकर्त्यात उद्भवणारा कोणताही वाद; आणि
  1. तुमच्या को-ब्रँडेड कार्डच्या वापरासंदर्भात लावलेले कोणतेही शुल्क.

याउलट काहीही असले तरीही: (i) PhonePe विशेष, प्रासंगिक, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही (यामध्ये, परंतु इतकेच मर्यादित नसून, डाउनटाइम खर्च, डेटा गमावणे, गमावलेला नफा किंवा बँका, तृतीय पक्ष, तृतीय पक्ष सेवा प्रदाते, कंत्राटदार, आमचे परवानाधारक यांच्या कृतींमुळे होणारे नुकसान) हे दावे करार, गैरकृत्य, हमी किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कारणावर आधारित असले तरीही. (ii) PhonePe ची आणि आमच्या संबद्ध कंपन्या, अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांचे एकत्रित कमाल दायित्व शंभर रूपयांपेक्षा जास्‍त राहणार नाही; आणि (iii) तुमच्या नुकसानीसाठी ही उपाययोजना पुरेशी भरपाई देत नसेल किंवा तिचा मुख्य उद्देश पूर्ण होत नसेल, तरीही या मर्यादा आणि अपवाद लागू राहतील.

  1. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड

या नियम व अटी भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्याअंतर्गत वेळोवेळी लागू होणारे व सुधारित नियमांनुसार इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे(“IT कायदा”). हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कंप्युटर सिस्टमद्वारे जनरेट केला जातो आणि कोणत्याही प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नसते. या अटी माहिती तंत्रज्ञान कायदा (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांनुसार प्रकाशित केल्या जातात. या अटी एक बंधनकारक व कायदेशीररित्या अंमलबजावणीयोग्य करार निर्माण करतात.

  1. प्रश्न 

कोणत्याही प्रश्नांसाठी, तुम्‍ही PhonePe प्लॅटफॉर्मवरील संबंधित को-ब्रँडेड कार्डच्या विशिष्ट पृष्ठावरील समर्पित ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ विभागाचा संदर्भ घेऊ शकता. जर ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ विभागामधून तुमच्‍या शंकेचे समाधान झाले नसेल, तर तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मवर तिकिट दाखल करून आमच्या सहाय्यता पथकाकडे तुमच्या शंका निरसनासाठी पाठवू शकता.

  1. इतर अटी
    1. संबंधित कार्ड जारीकर्त्याच्या अटी व शर्तींमध्ये कोणताही पूर्वग्रह न ठेवता, PhonePe कोणत्याही वेळी अटींमध्ये बदल करण्याचा आणि नवीन किंवा अतिरिक्त अटी किंवा शर्ती जोडण्याचा अधिकार राखून ठेवते. अटींमध्ये किंवा अटींमध्ये संदर्भित केलेल्या URL मध्ये केलेले कोणतेही बदल संबंधित URL वर उपलब्ध होतील (किंवा वेगळ्या URL वर, जे आम्ही वेळोवेळी प्रदान करू शकतो). अटींमध्ये केलेले कोणतेही बदल PhonePe प्लॅटफॉर्मवर सूचित केले जातील आणि अशा प्रकाशनास तुमच्यापर्यंत पुरेशी सूचना मानली जाईल. तुम्ही अटींमध्ये केलेल्या कोणतेही अपडेट, दुरुस्त्या किंवा बदलांबाबत अद्ययावत राहण्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहात. 
    2. इतर सर्व अटी, ज्या मध्ये वापरकर्ता नोंदणी, गोपनीयता, वापरकर्त्याची जबाबदाऱ्या,  लागू कायदा, जबाबदारी, बौद्धिक मालमत्ता, गोपनीयता आणि सामान्य तरतुदी इत्यादी समाविष्ट आहेत, त्या या को-ब्रँडेड कार्डच्या नियम आणि अटींमध्ये PhonePe च्या अटी आणि शर्तींना संदर्भ देऊन समाविष्ट मानल्या जातात, ज्या https://www.phonepe.com/terms-conditions/येथे उपलब्ध आहेत.
    3. येथे परिभाषित न केलेले पूरक शब्द, त्यांना वर नमूद केलेल्या PhonePe च्या अटी आणि शर्तींमध्ये दिलेली अर्थव्याख्या मानली जातील.

भाग B – विशिष्ट नियम आणि अटी

  1. PhonePe ULTIMO HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि PhonePe UNO HDFC बँक क्रेडिट कार्ड
  1. PhonePe ULTIMO HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि PhonePe UNO HDFC बँक क्रेडिट कार्डचा वापर https://www.hdfcbank.com/content/bbp/repositories/723fb80a-2dde-42a3-9793-7ae1be57c87f/?path=/Personal/Pay/Cards/Credit%20Card/Credit%20Card%20Landing%20Page/Manage%20Your%20Credit%20Cards%20PDFs/MITC%201.64.pdf येथे उपलब्ध असलेल्या HDFC बँकेच्या नियम आणि अटी व https://www.hdfcbank.com/content/bbp/repositories/723fb80a-2dde-42a3-9793-7ae1be57c87f/?path=/Personal/Borrow/Loan%20Against%20Asset%20Landing/LoanAgainst%20Property/KFS%20-%20APR%20Form/KFS-APR-English.pdf येथे उपलब्ध असलेल्या की फॅक्ट्स स्टेटमेंट च्या अधीन असेल.
  1. PhonePe SBI कार्ड PURPLE आणि PhonePe SBI कार्ड SELECT BLACK
  1. PhonePe SBI कार्ड PURPLE आणि PhonePe SBI कार्ड SELECT BLACKचा वापर, https://www.sbicard.com/en/most-important-terms-and-conditions.page वर उपलब्ध असलेल्या SBI कार्डस आणि पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड (“SBICPSL”) च्या अटी व शर्ती आणि https://www.sbicard.com/sbi-card-en/assets/docs/pdf/key-fact-statement.pdf वर उपलब्ध असलेल्या की फॅक्ट्स स्टेटमेंटच्या अधीन राहील.
  1. PhonePe SBI कार्ड PURPLE / PhonePe SBI कार्ड SELECT BLACK, लागू असल्यास, जारी झाल्याची पुष्टी मिळाल्यानंतर आणि SBICPSL कडे लागलेले वार्षिक शुल्‍काचे यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला SBICPSL च्या अटी व शर्तींनुसार PhonePe eGV प्राप्त करण्याचा अधिकार मिळेल. PhonePe eGV https://www.phonepe.com/terms-conditions/wallet/वर नमूद केलेल्या नियम आणि अटींद्वारे शासित असेल.