Privacy Policy

वापर अटी – स्टोअर्स

Englishગુજરાતીதமிழ்తెలుగుमराठीമലയാളംঅসমীয়াবাংলাहिन्दीಕನ್ನಡଓଡ଼ିଆ
< Back

हे दस्तऐवज म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000, यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि त्याखालील लागू असलेले नियम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 द्वारे सुधारित केलेल्या विविध कायद्यांमधील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधित सुधारित तरतुदी यानुसार एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कॉम्प्युटर यंत्रणेद्वारे तयार केला जातो आणि यासाठी कोणत्याही भौतिक किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नसते.

या वापराच्या अटी – स्टोअर्स (“अटी”) PhonePe मोबाईल ॲप्लिकेशन (“माहिती”) वरील ‘स्टोअर्स’ टॅबवर दिलेल्या माहितीचे नियंत्रण करतात. हे PhonePe मोबाईल ॲप्लिकेशन (“PhonePe ॲप”) PhonePe प्रायव्हेट लिमिटेड (“PhonePe”), कंपनी कायदा, 1956 अंतर्गत समावेश असलेल्या कंपनीने ऑफर केले आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे, ऑफिस-2, मजला 4,5,6,7, विंग ए, ब्लॉक ए, सलारपुरिया सॉफ्टझोन, सर्विस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलांदूर, बंगलोर, साउथ बंगलोर, कर्नाटक-560103, भारत येथे आहे.

 
PhonePe ॲप (“स्टोअर्स”) वरील ‘स्टोअर्स’ टॅब ॲक्सेस करून, तुम्ही या अटींशी बांधील राहण्यासाठी सहमती देता. PhonePe वेबसाईट आणि/किंवा PhonePe ॲपवर अपडेट केलेली आवृत्ती पोस्ट करून आम्ही या अटींमध्ये कधीही सुधारणा करू शकतो. या अटींची अपडेट झालेली आवृत्ती पोस्ट केल्यापासून लगेच लागू होईल. काही अपडेट/बदल असल्यास या अटींचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. तुम्ही बदल पोस्ट केल्यानंतर PhonePe ॲपचा वापर करत राहिल्यास त्याचा अर्थ असा होईल की तुम्ही पुनरावृत्ती/सुधारणा स्वीकारता आणि त्यांच्याशी सहमत आहात.

स्टोअर्सची माहिती

तुमच्या स्थानावर आधारित (साधारणपणे PhonePe ॲप ॲक्सेस करताना किंवा खास करून तुम्ही सूचित केल्यानुसार स्टोअरमध्ये असताना) PhonePe, स्टोअर्सवर तुम्हाला किराणा, आरोग्यसेवा, वेलनेस, खाद्य आणि पेय पदार्थ, रिटेल, खरेदी, करमणूक, हॉटेल्स, लॉजिंग इत्यांदी श्रेणींमधील जवळच्या सेवा प्रदात्यांची (यात दुकाने, आउटलेट्स, आस्थापने आणि वैयक्तिक सेवा आणि अशा सेवांना यापुढे “सेवा संस्था” म्हणून संबोधले जाईल) माहिती देते. 

येथे स्पष्ट दिल्याशिवाय आणि कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, सेवा संस्थांबद्दलची माहिती (त्यांचे उत्पादन/सेवा ऑफर, चालू/बंद स्थिती, संपर्क माहिती, पत्ता, दिशा, प्राप्तकर्ता तपशील, छायाचित्रे इत्यादींसह), सेवा संस्थांनी PhonePe वर घोषित/सबमिट केल्याप्रमाणे आणि पुनरावलोकने/सरासरी मोबाइल युजरद्वारे सादर केलेल्या सेवा, मोबाइल ॲप्लिकेशनच्या संदर्भात सादर केलेली रेटिंग्स आहेत. PhonePe स्टोअर्सवर “जसे आहे तसे”, “जसे उपलब्ध आहे” आणि “सर्व दोषांसह” आणि फक्त तुमच्या संदर्भासाठी आहेत.

स्टोअर्सवर अशी माहिती ॲक्सेस करताना/वापरताना तुम्ही पुरेशी सावधगिरी बाळगणे आणि पुढील गोष्टी करण्यापूर्वीच योग्य परिश्रम घेणे आवश्यक आहे (अ) संवाद साधणे किंवा तुमची माहिती (स्वतंत्रपणे किंवा स्टोअर्सवरील चॅट फीचरद्वारे) देणे (ब) यासारख्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून कोणतीही उत्पादने/सेवा (PhonePe ATM सेवेसह) खरेदी/उपलब्ध करणे

अस्वीकरण

तुम्ही सहमती दर्शवता, की स्टोअर्सवरील माहितीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या सर्व धोक्यांची तुम्ही जबाबदारी घ्याल आणि तुम्ही PhonePe ला कोणत्याही प्रकारे जबाबदार धरणार नाही. तसेच गुणवत्ता, व्यापार, कमतरता, डिलिव्हरी न होणे, उत्पादन/सेवा यांच्या डिलिव्हरीमध्ये विलंब लागणे यासंबंधीचे सर्व विवाद तुम्ही आणि सेवा संस्था यांच्यात थेट सोडवले जातील आणि PhonePe ला अशा कोणत्याही विवादांमध्ये पक्षकार बनवले जाणार नाही.

  1. PhonePe स्टोअर्सवर उपलब्ध केलेल्या माहितीची अचूकता आणि खरेपणा यासंबंधीची व्यक्त केलेली किंवा नमूद केलेली सर्व प्रकारची हमी अस्वीकृत करते. PhonePe कोणालाही त्याच्या वतीने कोणतीही हमी देण्यास अधिकृत करत नाही आणि तुम्ही अशा कोणत्याही विधानावर अवलंबून राहू नये. स्टोअर्सवर उपलब्ध केलेल्या माहितीची अचूकता, पूर्णता आणि उपयुक्तता यांचे मूल्यांकन करणे ही तुमची जबाबदारी आहे.
  2. सेवा संस्थांना PhonePe चे प्रतिनिधित्व करणारी कंपनी मानले जाणार नाही आणि अशा सेवा संस्थांद्वारे दिलेले उत्पादन/सेवा हे कोणत्याही प्रकारे PhonePe च्या मालकीचे/दिलेले/उपलब्ध केलेले उत्पादन/सेवा असे मानले जाणार नाही.
  3. PhonePe ATM सेवेच्या संदर्भात PhonePe तुमच्या आणि संबंधित सेवा संस्थांमधील कोणत्याही विवादासाठी जबाबदार असणार नाही. यामध्ये सेवा घटकाद्वारे रक्कम न भरणे, भरलेल्या रकमेतील फरक, संप्रदाय संबंधित समस्या बनावट चलन यांचा समावेश आहे, परंतु हे इतकेच मर्यादित नाही. तुम्ही केवळ तुमच्या स्वतःच्या जोखमीवर याचा लाभ घ्याल.

संकीर्ण

  1. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या अटींचे उल्लंघन केल्यामुळे आणि/किंवा वापरामुळे, होस्ट केलेल्या ॲपसहच्या परस्परसंवादामुळे किंवा खरेदी/उत्पादने/सेवांचे लाभ घेतल्यामुळे, कोणत्याही प्रकारे PhonePe चे सहयोगी, कर्मचारी, संचालक, अधिकारी, एजंट आणि प्रतिनिधी हे कोणतेही नुकसान, कृती, दावे आणि जबाबदाऱ्या (कायदेशीर खर्चासह) यातून निरपराध ठेवणे, नुकसानभरपाईतून मुक्त करणे यासाठी तुम्ही सहमत आहात.
    PhonePe कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अप्रत्यक्ष, परिणामकारक, आनुषंगिक, ठरावीक किंवा दंडात्मक हानीसाठी जबाबदार राहणार नाही. यामध्ये नफा किंवा महसुलाच्या तोट्यातील अमर्यादित नुकसान, व्यवसायातील व्यत्यय, व्यवसाय संधी गमावणे, डेटा गमावणे किंवा अन्य आर्थिक संधी गमावणे, करारात असले तरीही, निष्काळजीपणा, टॉर्ट (नुकसानभरपाईची शिक्षा ठरवलेला दिवाणी गुन्हा) किंवा दिलेल्या माहितीच्या वापरामुळे किंवा वापराच्या अक्षमतेमुळे उद्भवलेली हानीकारक किंवा तत्सम कृती, तथापि कारणीभूत होणे आणि कोणत्याही परिस्थितीत करारात उद्भवणारी हानीकारक कृती, टॉर्ट, निष्काळजीपणा, वॉरंटी किंवा तत्सम बाबी यांचा समावेश आहे.
    तुमचा सेवा संस्थांसह वाद असल्यास तुम्ही PhonePe ला (त्याचे संलग्न आणि अधिकारी, संचालक, एजंट आणि कर्मचारी यांच्या समावेशासह) सर्व दावे, मागण्या आणि नुकसान (वास्तविक आणि परिणामी) प्रत्येक प्रकारचे आणि स्वरूपाचे, ज्ञात आणि अज्ञात अशा विवादांमुळे निर्माण झालेल्या किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही प्रकारांमधून मुक्त करता.
  2. या अटी त्यांच्या कायद्यांच्या तत्त्वांचा विरोध न करता भारताच्या कायद्यांद्वारे शासित केल्या जातील. या अटींच्या संबंधात तुम्ही आणि PhonePe मधील कोणताही दावा किंवा वाद जो संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात उद्भवला असेल तर त्याचा निर्णय बंगलोर येथील सक्षम अधिकारक्षेत्राच्या न्यायालयाद्वारे घेतला जाईल.
  3. PhonePe वापराच्या अटी आणि PhonePe गोपनीयता धोरण या अटींमध्ये संदर्भाद्वारे अंतर्भूत केले आहे असे मानले जाईल.