
Trust & Safety
KYC फसवणुकीतून होणारी ओळख चोरी : स्वतःचं संरक्षण कसं कराल?
PhonePe Regional|3 min read|21 July, 2025
जेव्हा तुम्ही बँक किंवा आर्थिक संस्थांमध्ये खाते उघडता, तेव्हा तुमची ओळख व्हेरिफाय करण्यासाठी ‘KYC’ प्रक्रिया आवश्यक असते. या प्रक्रियेमध्ये आधार, पॅन किंवा रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेली इतर कागदपत्रे सादर करावी लागतात.
आजकाल बहुतांश आर्थिक संस्था ही ओळख व्हेरिफिकेशन प्रक्रिया ‘डिजिटल KYC’द्वारे करतात. डिजिटल KYCमध्ये ग्राहकाचे लाइव्ह फोटो, त्यांची कागदपत्रे किंवा आधार कार्ड असल्याचा पुरावा घेण्यात येतो. विशेषतः, जेव्हा ऑफलाइन पडताळणी शक्य नसते, तेव्हा ही पद्धत वापरली जाते.
KYC फसवणुकीद्वारे ओळख चोरी म्हणजे काय?
KYC फसवणुकीत फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती चोरतात किंवा बनावट ओळखी तयार करतात आणि त्या माहितीचा वापर करून KYC प्रक्रिया बनावट पद्धतीने पूर्ण करतात. एकदा KYC पडताळणी झाली की, ते अनधिकृतरीत्या तुमच्या खात्यांमध्ये प्रवेश मिळवतात किंवा तुमच्या नावावर नवीन बँक खाती उघडतात, कर्ज घेतात, किंवा क्रेडिट कार्ड काढतात. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण तुमच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसतो.
आजच्या डिजिटल युगात ओळख चोरी ही एक गंभीर समस्या बनली आहे, विशेषतः जेव्हा भामटे चोरलेली किंवा बनावट कागदपत्रं वापरून KYC प्रक्रिया पूर्ण करतात आणि तुमच्या खात्यांवर ताबा मिळवतात, तेव्हा हा धोका खूपच जास्त असतो.
ओळख चोरी अनेक प्रकारे होऊ शकते
परिस्थिती 1: फिशिंगच्या विविध क्लृप्त्यांद्वारे भामटे तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. ही माहिती मिळवल्यानंतर ते तुमच्या खात्यात अनधिकृत प्रवेश करतात आणि आर्थिक व्यवहार करतात.
अर्जुनला एका व्यक्तीने आकर्षक गुंतवणूक परताव्याचं आमिष दाखवलं. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जुनकडे त्याच्या वैयक्तिक तपशीलांची खात्री करण्यास सांगण्यात आलं. आपली गुंतवणूक सुरक्षितपणे हाताळली जाईल असे वाटून भामट्यावर विश्वास ठेवून अर्जुनने आपली खात्याची माहिती आणि OTP शेअर केला. मात्र, ही माहिती मिळताच भामट्याने अर्जुनचं खातं उघडून त्यातून अनधिकृत व्यवहार केले.
परिस्थिती 2: भामटे तुमच्या खात्याचा ॲक्सेस मिळविण्यासाठी तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगू शकतात. एकदा त्यांच्याकडे तुमची माहिती आली, की ते खात्यावर पूर्ण ताबा मिळवून त्याचा गैरवापर करतात.
रोहिणीशी एका भामट्याने संपर्क साधला आणि सांगितलं की सरकारच्या सबसिडी योजनेत लाभ मिळवून देण्यासाठी तो मदत करू शकतो. त्यासाठी तिने एक खाते तयार करून KYC पडताळणी पूर्ण करावी. सबसिडी मिळवण्याच्या आशेने रोहिणीने तिची वैयक्तिक माहिती दिली. KYCची माहिती भामट्याच्या हाती लागल्यावर, त्यानं तिचं खाते पूर्णपणे ताब्यात घेऊन त्याचा गैरवापर केला आणि अनधिकृत व्यवहारांमुळे रोहिणीला आर्थिक नुकसान सोसावं लागलं.
परिस्थिती 3: भामटे कधीकधी तुमच्याकडून अशा खात्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करून घेतात जे तुमचं नसतं. त्यानंतर ते हे खाते फसवणुकीसाठी वापरतात आणि तुम्हाला त्याचा थांगपत्ताही नसतो.
डेव्हिडशी एका भामट्याने संपर्क साधला आणि त्याला कर्ज मिळवून देण्याची हमी दिली. त्यासाठी भामट्याने आधीच आपल्या नावाने तयार केलेल्या खात्यावर KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास डेव्हिडला सांगितलं. कर्ज अर्जाच्या प्रक्रियेचा भाग समजून डेव्हिडने आपली वैयक्तिक माहिती दिली. त्याला माहिती नसताना त्याच्या माहितीचा वापर करून भामट्याने त्या खात्यावर पूर्ण ताबा मिळवला आणि त्याचा कर्जाच्या व्यवहारांसाठी गैरवापर केला. डेव्हिडला या संदर्भात काहीच माहिती नव्हती आणि त्याच्या आर्थिक आयुष्याला धोका निर्माण झाला.
KYC फसवणूक आणि खाते दुसऱ्याच्या ताब्यात गेल्याचे सामान्य संकेत
- तुम्ही कधीच अर्ज न केलेल्या खात्यांसंदर्भात अचानक येणारे फोन किंवा ईमेल
- तुमच्या परवानगीशिवाय झालेल्या व्यवहारांची देणारे अलर्ट्स किंवा एसएमएस सूचना
- तुम्ही अर्ज न केलेली बिले किंवा क्रेडिट कार्ड घरी येणे
- तुमच्या बँक किंवा आर्थिक खात्यांमध्ये लॉगिन करण्यात अडचणी येणे
- अतिशय आकर्षक वाटणाऱ्या, पण प्रत्यक्षात ओळख चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑफर्स
ओळख चोरी आणि KYC फसवणुकीपासून आपले संरक्षण कसे करावे
- तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा : आधार, पॅन, OTP अशा संवेदनशील कागदपत्रांची माहिती फोन, ईमेल किंवा मेसेजिंग अॅप्सवर शेअर करू नका.
- फिशिंगपासून सतर्क रहा : संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा अविश्वसनीय वेबसाइट्सवर माहिती भरू नका.
- खात्यांची नियमितपणे तपासणी करा : बँक स्टेटमेंट्स, क्रेडिट रिपोर्ट्स आणि खात्यांमध्ये होणारे व्यवहार तपासा, अनधिकृत ॲक्सेस केलेला तर नाही ना याची खात्री करा.
- भक्कम ओळख पडताळणी वापरा : शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू करा.
- संवादाची पडताळणी करा : बँक किंवा आर्थिक संस्थांकडून अचानक संपर्क करण्यात आल्यास, अधिकृत स्रोतावरून त्यांची खात्री करा.
- ओळखपत्रांचा गैरवापर झाल्यास त्वरित कळवा : तुमची वैयक्तिक कागदपत्रे गैरवापरात आल्यास, संबंधित संस्थांना आणि अधिकाऱ्यांना लगेच कळवा.
- KYC फक्त अधिकृत माध्यमातूनच करा : KYC प्रक्रिया नेहमी अधिकृत वेबसाइट्सवर किंवा खात्रीशीर प्रतिनिधीमार्फतच पूर्ण करा.
जर तुमची ओळख संबंधित माहितीचा वापर कोणत्याही PhonePe अकाउंटवर चुकीच्या पद्धतीने झाला असेल, तर काय करावे:
जर तुम्हाला PhonePe द्वारे फसवणुकीचा संशय आला असेल किंवा फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं असेल, तर तात्काळ खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून तक्रार नोंदवा :
- PhonePe ग्राहक सेवा क्रमांक PhonePe कस्टमर केअरला 80–68727374 किंवा 022–68727374 या क्रमांकांवर कॉल करा. ग्राहक सेवा प्रतिनिधी तुमच्यासाठी तिकीट तयार करेल आणि पुढील मदत करेल.
- सोशल मीडिया फसवणुकीच्या घटना PhonePe च्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर कळवा :
- Twitter: https://twitter.com/PhonePeSupport
- Facebook: https://www.facebook.com/OfficialPhonePe
- Twitter: https://twitter.com/PhonePeSupport
- तक्रार निवारण तुमच्याकडे कम्प्लेंट तिकीट असेल तर तुम्ही तुमचा तिकीट आयडी वापरून https://grievance.PhonePe.com/ या वेबसाइटवर तुमची तक्रार नोंदवू शकता.
संबंधित प्राधिकरणांमध्ये तक्रार करणे
- सायबर क्राईम सेल : सायबर क्राइम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करा किंवा 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.
- दूरसंचार विभाग (DOT) : संशयास्पद मेसेज, कॉल किंवा फसवणुकीच्या विनंत्यांची माहिती संचार साथी पोर्टलवरील चक्षु सुविधेमार्फत द्या.