
Trust & Safety
तुमचा मोबाइल फोन सिम टेकओव्हर फसवणुकीपासून सुरक्षित ठेवा
PhonePe Regional|3 min read|01 May, 2025
तुमच्या तंत्रज्ञानाच्या प्रवासामध्ये तुमचा स्मार्टफोन आणि तुमचा मोबाइल सिम हे दोन प्रमुख घटक आहेत. फोन कॉल करण्यापासून ते बँकिंग आणि गुंतवणूक व्यवस्थापित करण्यापर्यंत, मोबाइल डिव्हाइसेसवरील निर्भरता वाढत आहे. UPI चे उदाहरण घ्या, तुमच्या बँक खात्यासह नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवरून SMS पाठवणे ही तुमचे UPI खाते प्रमाणित करण्याची पहिली पायरी आहे यामुळे तुमच्या मोबाइल सिमला मोठा धोका निर्माण होतो आणि तो सिम टेकओव्हर फसवणुकीचे लक्ष्य बनू शकतो.
सिम टेकओव्हर फसवणूक म्हणजे काय?
या प्रकारच्या फसवणुकीसाठी तुमचे डिव्हाइस प्रत्यक्ष ॲक्सेस करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, फसवणूक करणारे लोक मोबाइल कॅरिअरना तुमचा फोन नंबर त्यांच्याकडे असलेल्या सिम कार्डवर ट्रान्सफर करण्यासाठी फसवतात. ते प्रथम फिशिंग तंत्रांद्वारे तुमची वैयक्तिक माहिती संकलित करून आणि नंतर तुमच्या मोबाइल कॅरिअरकडे “सिम कार्ड हरवले” अशी तक्रार करून ही फसवणूक करतात. ते तुमच्याविषयी संकलित केलेली सर्व वैयक्तिक माहिती पडताळणीसाठी वापरतात आणि तुमचे सिम त्यांच्याकडे असलेल्या सिम कार्डवर पोर्ट करतात, ज्यामुळे त्यांना तुमच्यासाठी येणारे कॉल, टेक्स्ट मेसेज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँकिंग आणि पेमेंट ॲप्ससाठी असलेल्या पडताळणी कोडचा ॲक्सेस मिळतो. त्याचे परिणाम आर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरू शकतात.
या ब्लॉगमध्ये, सिम टेकओव्हर फसवणुकीचा पुढील बळी होण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे टप्पे सांगू.
सिम टेकओव्हर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे:
सिम टेकओव्हर या प्रकारच्या फसवणुकीशी संबंधित वाढते धोके लक्षात घेता, तुमच्या मोबाइल खात्यांचे संरक्षण करण्यासाठी सक्रियपणे पावले उचलणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाइल सिमचे संरक्षण करण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत:
1. सिम पिन/पासवर्ड सक्षम करा
प्रमुख टेलिकॉम कंपन्या आणि स्मार्टफोन प्रदाते अतिरिक्त सुरक्षेसाठी खाते पिन किंवा पासवर्ड सेट करण्याचा पर्याय देतात. यामुळे फसवणूक करणाऱ्यांना तुमच्या संमतीशिवाय तुमचे खाते बदलणे खूपच कठीण होते. हे वैशिष्ट्य कसे ॲक्टिव्हेट करावे याबाबत तुमच्या मोबाइल कॅरिअरशी संपर्क साधा आणि असे करताना, एक मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड निवडा.
2. वैयक्तिक माहितीबाबत सावधगिरी बाळगा
तुमची वैयक्तिक माहिती (जसे की, सिम कार्ड नंबर, पिन आणि पासवर्ड) कधीही फोन, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजवर शेअर करू नका. फसवणूक करणारे लोक अनेकदा संवेदनशील तपशील उघड करण्यासाठी व्यक्तींना फसवण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या युक्त्या वापरतात.
3. मजबूत प्रमाणीकरण पद्धती वापरा
शक्य असेल तेव्हा, फक्त SMS वर अवलंबून न राहता टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) पद्धती निवडा. SMS आधारित 2FA मोठ्या प्रमाणावर वापरले जात असले तरी, ते सिम टेकओव्हर फसवणुकीसाठी संवेदनशील आहे. SMS प्रमाणीकरणासह इतर सुरक्षित पर्याय वापरण्याचा विचार करा.
4. तुमच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेवा
अचानक नेटवर्क सिग्नल गमावणे किंवा अनपेक्षित पडताळणी कोड येणे यासारख्या कोणत्याही असामान्य वर्तनासाठी तुमच्या फोनचा वापर आणि कृती नियमितपणे तपासा. तुम्हाला काही संशयास्पद आढळल्यास किंवा तुमचा फोन नंबर हॅक झाल्याचा संशय आल्यास, त्वरित तुमच्या नेटवर्क प्रदात्याशी संपर्क साधा. ते तुमच्या खात्याची चौकशी करण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी मदत करू शकतात जेणेकरून पुढील फसवणूक रोखता येईल.
5. अलर्ट्स आणि नोटिफिकेशन्स वापरा
अनेक बँक आणि वित्तीय संस्था व्यवहार किंवा खात्यातील बदलांसाठी अलर्ट सेट करण्याचा पर्याय देतात. तुमच्या खात्यांमधील कोणत्याही अनधिकृत कृतींना त्वरित ओळखण्यासाठी या नोटिफिकेशन्स ॲक्टिव्हेट करा.
सिम टेकओव्हर फसवणूक धोकादायक का आहे?
सिम टेकओव्हर फसवणुकीचे पुढीलप्रमाणे गंभीर परिणाम होऊ शकतात:
- संवेदनशील माहितीचा ॲक्सेस: फसवणूक करणाऱ्यांनी व्यक्ती पीडिताच्या फोन नंबरवर नियंत्रण मिळवला की, ते 2FA सारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांना बायपास करू शकतात, ज्यामुळे आर्थिक खाती, ईमेल, सोशल मीडिया आणि इतर महत्त्वाच्या सेवांचा ॲक्सेस मिळू शकतो.
- आर्थिक नुकसान: फसवणूक करणाऱ्या व्यक्ती या बँक खात्यांमखून पैसे काढणे किंवा पीडिताच्या फोन नंबरसह लिंक असलेली क्रेडिट कार्ड वापरणे यासारखे अनधिकृत आर्थिक व्यवहार करू शकतात.
- गोपनीयतेचे उल्लंघन: फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कॉल आणि मेसेजेस इंटरसेप्ट करू शकतात आणि ओळख चोरीसाठी वापरली जाऊ शकणारी वैयक्तिक माहिती मिळवू शकतात.
आजच्या मोबाइल-केंद्रित जगामध्ये, सिम टेकओव्हर फसवणूक हा एक गंभीर सुरक्षा धोका आहे. फसवणूक करणारे नेहमीच मोबाइल नेटवर्कमधील कमकुवतपणाचा फायदा घेण्यासाठी नवीन मार्ग शोधत असतात, ज्यामुळे वैयक्तिक माहिती आणि आर्थिक सुरक्षितता धोक्यात येते. मात्र, सतर्क राहून, सक्षम सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करून आणि वर नमूद केलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करून, तुम्ही सिम फसवणुकीचे बळी होण्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता.
लक्षात ठेवा, फसवणूक रोखण्यासाठी आणि तुमचा मोबाइल नंबर आणि संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय पावले उचलणे ही गुरुकिल्ली आहे.
जागरूक रहा, सुरक्षित रहा आणि तुमच्या मोबाइल सुरक्षेशी तडजोड होणार नाही याची खात्री करा.
सिम टेकओव्हर फसवणुकीच्या घटनांची तक्रार कशी करावी
तुम्ही एखाद्या घोटाळ्याचे लक्ष्य झाला असल्याचा तुम्हाला संशय आला असल्यास, त्वरित तक्रार नोंदवा:
PhonePe वर तक्रार करणे
- PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि तक्रार नोंदवा.
- PhonePe ग्राहक सेवा: 80-68727374 / 022-68727374 या क्रमांकावर कॉल करा.
- वेबफॉर्म सबमिशन: PhonePe सपोर्टला भेट द्या
- सोशल मीडिया रिपोर्टिंग :
- ट्विटर: PhonePe सपोर्ट
- फेसबुक: PhonePe ऑफिशिअल
- तक्रार निवारण : PhonePe Grievance Portal वर तक्रार नोंदवा.
अधिकृत संस्थांमध्ये तक्रार नोंदवणे
- सायबर क्राइम सेल: ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी सायबर क्राइम पोर्टलला भेट द्या किंवा 1930 वर कॉल करा.
- दूरसंचार विभाग (DOT): संशयास्पद संदेश, कॉल किंवा व्हॉट्सअॅप फसवणुकीची माहिती संचार साथी पोर्टलवरील चक्षु सुविधेद्वारे नोंदवा.
महत्त्वापूर्ण रिमाइंडर्स — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक माहिती विचारत नाही. असे ईमेल जे PhonePe कडून असल्याचा दावा करणारे पण phonepe.com डोमेन वरून आलेले नसतात त्यांच्याकडे दुर्लक्षित करा. तुम्हाला फसवणूक झाल्याचा संशय आल्यास, कृपया त्वरित प्राधिकरणांशी संपर्क साधा.