Privacy Policy

मुदत ठेवींच्या वितरणाबाबतच्या अटी व शर्ती

Englishગુજરાતીதமிழ்తెలుగుमराठीമലയാളംঅসমীয়াবাংলাहिन्दीಕನ್ನಡଓଡ଼ିଆ
< Back

मुदत ठेव – अटी व शर्ती

मुदत ठेव – अटी आणि शर्ती (“अटी आणि शर्ती”)माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा, तसेच त्यासोबत वाचल्या जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 चा नियम 3 च्या सुधारित तरतुदींनुसार प्रकाशित केलेली ही एक संगणक-जनरेटेड इलेक्ट्रॉनिक नोंद आहे आणि यासाठी कोणत्याही भौतिक किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नाही.

येथे वापरलेल्या सर्व कॅपिटल शब्दांचा अर्थ खालील विभाग ब (व्याख्या) अंतर्गत दिलेल्या अर्थानुसारच असेल.

  1. परिचय
    1. PhonePe लिमिटेड (पूर्वीचे नाव ‘PhonePe Private Limited’) (“PhonePe”) तुम्हाला वित्तीय संस्थांकडून घेण्यास प्रस्तावित असलेल्या मुदत ठेवी आणि संबंधित उत्पादने/सेवांच्या संदर्भात Upswing प्लॅटफॉर्म ॲक्सेस करण्यास सक्षम करण्यासाठी सेवा प्रदान करते.
    2. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढील पावले उचलण्यापूर्वी यातील प्रत्येक अट आणि शर्त काळजीपूर्वक वाचा, कारण या अटी आणि शर्तींमध्ये तुमच्या कायदेशीर अधिकारांबद्दल, उपायांबद्दल आणि दायित्वांविषयी महत्त्वाची माहिती आहे. या अटी आणि शर्तींनी तुम्ही आणि PhonePe यांच्यात एक कायद्याने बंधनकारक करार तयार होतो आणि त्यानुसार तुमच्या या सेवेच्या ॲक्सेसचे आणि वापराचे नियमन होते. तुम्ही मान्य करता की ही सेवा Upswing आणि/किंवा संबंधित वित्तीय संस्थेच्या कोणत्याही अटी आणि शर्तींच्या पालनाच्या अधीन आहे. जर तुम्हाला या अटी आणि शर्ती समजत नसतील किंवा तुम्ही त्यांच्या कोणत्याही भागाशी सहमत नसाल, तर तुम्ही या सेवेचा वापर करण्यासाठी पुढे जाऊ नये. या सेवेमध्ये प्रवेश करून किंवा वापर करून, तुम्ही या अटी आणि शर्तींचे पालन करण्यास आणि त्यांच्याशी बांधील राहण्यास संमती देता आणि त्या स्वीकारता.
  2. व्याख्या
    1. “वित्तीय संस्था” म्हणजे Upswingच्या भागीदार बँका / वित्तीय सेवा प्रदाते;
    2. “मुदत ठेव” म्हणजे वित्तीय संस्थांद्वारे Upswing प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑफर केलेली मुदत ठेव आणि संबंधित उत्पादने/सेवा;
    3. “PhonePe प्लॅटफॉर्म” म्हणजे सॉफ्टवेअर/सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन/प्लॅटफॉर्म/वेबसाइट जी PhonePe आणि/किंवा त्याच्या संलग्न संस्थांकडून विकसित करण्यात आली आहे, मालकीची आहे आणि/किंवा ऑपरेट करण्यात येते;
    4. “सेवा” म्हणजे मुदत ठेवींचा लाभ घेण्यासाठी PhonePe प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला Upswing प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस सुलभ करण्याची PhonePeची सेवा;
    5. “Upswing” म्हणजे Upswing फायनान्शिअल टेक्नोलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड;
    6. “Upswing प्लॅटफॉर्म” म्हणजे मुदत ठेवींचे वितरण सक्षम करण्यासाठी वित्तीय संस्थांच्या नेटवर्कसह एकात्मिकरीत्या जोडलेले सॉफ्टवेअर/सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन/प्लॅटफॉर्म/वेबसाइट जी Upswingद्वारे विकसित करण्यात आली आहे, मालकीची आहे आणि/किंवा संचालित करण्यात येते आणि जी PhonePeद्वारे नियंत्रित/संचालित/देखभाल करण्यात येत नाही;
  3. अटी आणि शर्ती
    1. तुम्हाला मुदत ठेवींचा ॲक्सेस प्रदान करण्याच्या उद्देशाने, PhonePe प्लॅटफॉर्ममध्ये Upswing प्लॅटफॉर्मच्या लिंक्स किंवा रिडायरेक्शन कार्यक्षमता समाविष्ट आहेत.
    2. कोणत्याही मुदत ठेवी ॲक्सेस करणे निवडून, तुम्ही स्पष्टपणे मान्य करता आणि Upswing प्लॅटफॉर्मवर रिडायरेक्ट होण्यास संमती देता आणि हे समजून घेता की PhonePe कडे Upswing प्लॅटफॉर्मची मालकी नाही / ते संचालित करत नाही आणि कोणत्याही प्रकारे त्यासाठी जबाबदार नाही.
    3. PhonePe केवळ एक सुलभकर्ता म्हणून काम करत आहे आणि वित्तीय संस्थांकडून तुमच्याद्वारे घेण्यास प्रस्तावित असलेल्या मुदत ठेवींच्या संदर्भात तुम्हाला Upswingशी जोडण्यासाठी सेवा प्रदान करते.
    4. तुम्ही समजता, मान्य करता आणि सहमत आहात की संबंधित वित्तीय संस्थांद्वारे Upswing आणि अशा वित्तीय संस्थांमधील व्यवस्थेनुसार Upswingद्वारे मुदत ठेवी ऑफर करण्यात येतात.
    5. PhonePe प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेली मुदत ठेवींशी संबंधित कोणतीही माहिती संबंधित वित्तीय संस्थांनी अशा मुदत ठेवींविषयी शेअर केलेल्या माहितीच्या आधारे Upswing द्वारे प्रदान केली जाते. PhonePe अशी कोणतीही माहिती “आहे त्या स्वरूपात” तत्त्वावर प्रदर्शित करते.
    6. PhonePe वेळोवेळी Upswingद्वारे प्रदान केलेल्या माहितीच्या आधारे मुदत ठेवींच्या संदर्भात PhonePe प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेली कोणतीही माहिती तुम्हाला पूर्वसूचना न देता बदलू शकते.
    7. मुदत ठेवींच्या संदर्भात PhonePe प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्याचा पर्याय निवडून, तुम्ही समजता, सहमत आहात आणि मान्य करता की अशा माहितीवर तुमच्या विश्वास ठेवण्याच्या संदर्भात तुमचे PhonePeविरुद्ध असू शकणारे कोणतेही आणि सर्व दावे, कारवाईचे अधिकार आणि/किंवा उपाय स्पष्टपणे सोडून देता.
    8. मुदत ठेवींशी संबंधित कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता किंवा उपयुक्तता यामुळे किंवा त्यासंदर्भात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी PhonePe कोणतेही आणि सर्व दायित्व स्पष्टपणे नाकारते आणि त्याबाबत कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही.
    9. तुम्ही समजता, मान्य करता आणि सहमत आहात कि मुदत ठेवीसाठीचा अर्ज केवळ Upswingद्वारे व्यवस्थापित करण्यात येतो, ज्याला संबंधित वित्तीय संस्थांद्वारे रीतसर अधिकृत करण्यात आले आहे. कोणत्याही मुदत ठेवींसाठीचा अर्ज PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे Upswing प्लॅटफॉर्मवर अशा मुदत ठेवी प्रदान करणाऱ्या संबंधित वित्तीय संस्थेद्वारे मंजूर करण्यात येतो.
    10. तुम्ही समजता, मान्य करता आणि सहमत आहात कि Upswing प्लॅटफॉर्मवर कोणत्याही मुदत ठेवींचे बुकिंग हा तुम्ही, Upswing आणि संबंधित वित्तीय संस्थांमधील एक स्वतंत्र व्यवहार आहे आणि मुदत ठेव तयार करणे, मुदत ठेवींवरील व्याजाचे पेमेंट, मुदत ठेव रकमेची मुदतपूर्व काढणी आणि मुदत ठेवीशी संबंधित इतर कोणत्याही क्रियांमध्ये PhonePe सहभागी नाही आणि/किंवा त्यासाठी जबाबदार नाही.
    11. कोणत्याही मुदत ठेव संबंधित सेवांच्या पूर्ततेसाठी PhonePe जबाबदार असणार नाही, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे, परंतु त्यांपुरतेच मर्यादित नाही :
      1.  Upswing प्लॅटफॉर्मची उपलब्धता आणि/किंवा कार्यवैशिष्ट्ये;
      2. Upswing प्लॅटफॉर्मवर प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीची अचूकता आणि/किंवा पूर्णता;
      3. कोणतीही मुदत ठेव यशस्वीरित्या तयार होणे/बुक केली जाणे आणि कोणतीही मुदत ठेव बुक करताना उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या;
      4. मुदत ठेवींच्या संदर्भात कोणतीही माहिती / ग्राहक सपोर्ट;
      5. मुदत ठेवींच्या संदर्भात Upswing आणि/किंवा संबंधित वित्तीय संस्थांद्वारे कोणतीही सेवा रद्द केली जाणे;
      6. Upswing आणि/किंवा कोणत्याही वित्तीय संस्थांद्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही सेवांच्या कामगिरीची पद्धत, ज्यामध्ये अशा सेवांनी तुमच्या अपेक्षा पूर्ण न करणे याचाही समावेश आहे;
    12. तुमच्या मुदत ठेवींच्या वापराच्या संदर्भातील कोणत्याही शंका आणि/किंवा तक्रारी संबंधित वित्तीय संस्थेकडे पाठवणे आवश्यक आहे आणि त्या अशा वित्तीय संस्थेच्या तक्रार निवारण धोरणांद्वारे शासित केल्या जातील. PhonePeची भूमिका, असल्यास, Upswing आणि/किंवा वित्तीय संस्थेकडून प्राप्त झालेल्या उत्तरांना आहे त्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापुरती मर्यादित असेल.
    13. मुदत ठेवीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तुम्ही प्रदान केलेली कोणतीही माहिती/डॉक्युमेंट/तपशील तुमच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी Upswing आणि/किंवा संबंधित वित्तीय संस्थेसोबत शेअर करण्यासाठी तुम्ही याद्वारे PhonePe ला तुमची संमती देता.
    14. वित्तीय संस्था तुमची केवायसी आणि/किंवा इतर यथायोग्य कार्यासक्ती करण्यासाठी पूर्णपणे जबाबदार असेल आणि तुमच्या मुदत ठेवीच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त माहिती/दस्तऐवज/तपशील त्यांच्याशी शेअर करण्याची आवश्यकता असू शकते. आम्ही वित्तीय संस्थांना अशा डेटा/माहितीचे संकलन आणि सबमिशन सुलभ करून देऊ शकतो.
    15. लागू कायद्यानुसार परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत, तुम्ही सेवांचे अपडेट्स, माहिती/प्रचारात्मक ईमेल आणि/किंवा उत्पादन घोषणांबाबत PhonePe किंवा त्यांचे तृतीय-पक्ष विक्रेते/व्यावसायिक भागीदार/विपणन संलग्न संस्था किंवा वित्तीय संस्थांकडून ईमेल, टेलिफोन आणि/किंवा SMSद्वारे  संप्रेषण प्राप्त करण्यास सहमत आहात.
    16. लागू कायद्यानुसार परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत, तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर सर्व संप्रेषण प्राप्त करण्यास सहमत आहात आणि संमती देता, जरी असा मोबाइल क्रमांक लागू कायद्यांतर्गत डू नॉट डिस्टर्ब / नॅशनल कस्टमर प्रेफरन्स रजिस्टर लिस्ट अंतर्गत नोंदणीकृत असला तरीही, ज्यामध्ये टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने तयार केलेले नियम आणि विनियमांचा समावेश आहे. या उद्देशासाठी, तुम्ही कंपनीला तुमची माहिती तिच्या समूह कंपन्या, कंपनीचे तृतीय-पक्ष सेवा प्रदाते किंवा कोणत्याही अधिकृत एजंट्सना शेअर/उघड करण्यासाठी अधिकृत करता.
    17. सर्व संप्रेषण व्यवस्थित पाठवले जाईल याची खात्री करण्यासाठी PhonePe वाजवी पावले उचलत असताना, संपर्काच्या माहितीवरील कोणतेही निर्बंध, DND लिस्ट अंतर्गत फोन नंबर नोंदणीकृत असणे, ईमेल डेटा स्टोरेजची कमतरता, टेलिकॉम सेवा प्रदात्यांमधील त्रुटी इत्यादी समस्यांमुळे संप्रेषणास अपयश येऊ शकते. वरील गोष्टींचा विचार करता, संप्रेषण प्राप्त न झाल्याबद्दल PhonePeला जबाबदार किंवा बांधील धरले जाणार नाही.
    18. Upswing आणि संबंधित वित्तीय संस्थांसोबतचे तुमचे संबंध तुम्ही आणि वित्तीय संस्थांमध्ये मान्य केलेल्या त्यांच्या संबंधित अटी आणि शर्तींनुसार स्वतंत्रपणे शासित करण्यात येतील, ज्यामध्ये PhonePe कोणत्याही प्रकारे सहभागी असणार नाही.
    19. PhonePe प्लॅटफॉर्मचा परवाना आणि ॲक्सेस
      1. तुम्ही मान्य करता आणि सहमत आहात कि PhonePe कडे PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवांचे सर्व कायदेशीर अधिकार, मालकी आणि स्वारस्ये आहेत, ज्यामध्ये PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवांमध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्याही बौद्धिक संपदा अधिकारांचा समावेश आहे (ते अधिकार नोंदणीकृत असोत वा नसोत). तुम्ही पुढे मान्य करता की सेवांमध्ये अशी माहिती असू शकते जी कंपनीद्वारे गोपनीय म्हणून घोषित करण्यात आली आहे आणि तुम्ही कंपनीच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय अशी माहिती उघड करणार नाही. PhonePe प्लॅटफॉर्मचा कंन्टेन्ट, ज्यामध्ये त्याचे स्वरूप आणि मांडणी (उदा. मजकूर, ग्राफिक्स, प्रतिमा, लोगो आणि बटण आयकॉन), छायाचित्रे, संपादकीय कंटेन्ट, नोटिसा, सॉफ्टवेअर आणि इतर साहित्य समाविष्ट आहे, यांची मालकी कंपनी आणि/किंवा तिचे तृतीय-पक्ष सेवा प्रदाते/त्यांचे परवानाधारक, लागू असेल त्याप्रमाणे, यांच्याकडे आहे किंवा त्यांना वापरण्यासाठी परवाना देण्यात आलेला आहे आणि लागू कॉपीराइट, ट्रेडमार्क तसेच इतर कायद्यांअंतर्गत ते त्यांच्याद्वारे योग्य प्रकारे संरक्षित केलेले आहेत.
      2. PhonePe याद्वारे तुम्हाला PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवांचा ॲक्सेस घेण्यासाठी व त्यांचा वापर करण्यासाठी मर्यादित परवाना प्रदान करते. या परवान्यामध्ये इतर कोणतीही व्यक्ती, विक्रेता किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती डाउनलोड करणे किंवा तिची प्रत तयार करणे, सेवांवर आधारित नवीन कृती तयार करणे, त्यामध्ये बदल करणे, रिव्हर्स इंजिनिअरिंग करणे, रिव्हर्स असेंबल करणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही स्रोत कोड शोधण्याचा प्रयत्न करणे, सेवांची विक्री करणे, त्यांचे हस्तांतरण करणे, उपपरवाना देणे, त्यांच्यावर कोणताही सुरक्षा हक्क निर्माण करणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे सेवांमधील कोणताही अधिकार हस्तांतरित करणे यांचा समावेश नाही. तुमच्याकडून कोणताही अनधिकृत वापर झाल्यास तुम्हाला प्रदान करण्यात आलेली परवानगी किंवा परवाना समाप्त होईल.
      3. PhonePe प्लॅटफॉर्म वापरून, तुम्ही खालील गोष्टी न करण्यास सहमत आहात: (i) PhonePe प्लॅटफॉर्म किंवा त्यातील कंटेन्टचा कोणत्याही व्यावसायिक उद्देशासाठी वापर करणे; (ii) कोणताही सट्ट्याचा, खोटा किंवा फसवणुकीचा व्यवहार किंवा संभाव्य मागणीच्या अपेक्षेने कोणताही व्यवहार करणे; (iii) PhonePeच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय कोणत्याही उद्देशासाठी रोबो, स्पायडर, स्क्रॅपर किंवा इतर स्वयंचलित साधनांचा किंवा कोणत्याही मॅन्युअल प्रक्रियेचा वापर करून PhonePe प्लॅटफॉर्मच्या कोणताही कंटेन्ट ॲक्सेस करणे, त्यावर लक्ष ठेवणे करणे किंवा कॉपी करणे; (iv) PhonePe प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही अपवर्जनात्मक सूचनांमधील निर्बंधांचे उल्लंघन करणे किंवा PhonePe प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस रोखण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या इतर उपाययोजनांना बगल देणे, त्यांवर निर्बंध आणणे किंवा त्यांना निष्प्रभ करणे; (v) PhonePeच्या विवेकबुद्धीनुसार PhonePeच्या पायाभूत सुविधांवर अवाजवी किंवा प्रमाणापेक्षा मोठा भार टाकणारी कोणतीही कृती करणे; (vi) PhonePeच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय कोणत्याही उद्देशासाठी PhonePe प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही भागाशी (ज्यामध्ये मर्यादांशिवाय, कोणत्याही उत्पादनाच्या/सेवेच्या खरेदी प्रवासाचा समावेश आहे) डीप-लिंक करणे; किंवा (vii) PhonePeच्या पूर्व लेखी अधिकृततेशिवाय PhonePe प्लॅटफॉर्मचा कोणताही भाग इतर कोणत्याही वेबसाइटमध्ये समाविष्ट करणे; किंवा (viii) फसवणुकीच्या उद्देशाने कोणताही वापर करणे किंवा कंपनी/वित्तीय संस्था किंवा कोणत्याही तृतीय पक्षासोबत कोणतीही फसवणूक करण्यासाठी PhonePe प्लॅटफॉर्मचा वापर करणे; आणि (ix) PhonePe आणि/किंवा वित्तीय संस्थांना कोणतीही चुकीची, अपूर्ण किंवा खोटी माहिती/डेटा प्रदान करणे.
    20. गोपनीयता धोरण: PhonePe प्लॅटफॉर्म वापरून, तुम्ही याद्वारे PhonePe च्या गोपनीयता धोरणामध्ये नमूद केल्यानुसार तुमच्या माहितीच्या वापरास संमती देता. तुम्ही PhonePe प्लॅटफॉ ॲक्सेस करता तेव्हा PhonePe तुमच्या वैयक्तिक माहितीचे व्यवस्थापन कसे करते, हे या गोपनीयता धोरणातून स्पष्ट होते.
    21. PhonePe सेवेच्या गुणवत्तेबाबत कोणतीही हमी, व्यक्त वा गर्भित, देत नाही, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे परंतु तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही की:
      • सेवा तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल; सेवा विनाव्यत्यय, वेळेवर किंवा त्रुटीमुक्त असेल;
      • सेवेच्या संदर्भात तुमच्याद्वारे प्राप्त केलेले कोणतेही उत्पादन, 
      • माहिती किंवा साहित्य तुमच्या आवश्यकता पूर्ण करेल.
    22. तुम्ही सहमत आहात आणि समजून घेता की संपूर्ण प्रक्रियेत कंपनीची मर्यादित भूमिका आहे आणि ती केवळ तुम्ही, Upswing आणि वित्तीय संस्थांमध्ये एक सुलभकर्ता म्हणून काम करत आहे. तुम्ही सहमत आहात आणि समजून घेता की वित्तीय संस्थांद्वारे ऑफर केलेल्या मुदत ठेवींच्या संदर्भातील कोणत्याही समस्येच्या बाबतीत, तुमचे अधिकार लागू कायद्यांनुसार आणि Upswing आणि संबंधित वित्तीय संस्थांच्या अटी आणि शर्तींनुसार शासित करण्यात येतील. तुम्ही पुढे सहमत आहात आणि हमी देता की मुदत ठेवींच्या संदर्भातील कोणत्याही विवादात PhonePe आणि/किंवा PhonePeच्या समूहातील संस्थांना पक्ष करणार नाही आणि/किंवा PhonePe आणि/किंवा PhonePeच्या समूह संस्थांवर कोणताही दावा करणार नाही.
    23. ही सेवा “आहे त्या स्वरूपात”, “उपलब्धतेनुसार” तत्त्वावर प्रदान केली जाते आणि PhonePeतर्फे विक्रीयोग्यता, विशिष्ट उद्देशासाठी योग्यता आणि नियमांचे उल्लंघन न करणे यासह सर्व हमी स्पष्टपणे नाकारते. PhonePe कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही, ज्यामध्ये थेट, अप्रत्यक्ष, विशेष किंवा परिणामामुळे झालेले नुकसान, गमावलेला नफा, वापराचे नुकसान, व्यवसायात अडथळा किंवा इतर आर्थिक नुकसान, प्रोग्राम किंवा इतर डेटा गमावणे समाविष्ट आहे परंतु तेवढ्यापुरतेच मर्यादित नाही, मग ते कराराशी संबंधित दावे असोत, निष्काळजीपणामुळे असो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असो, जरी तुम्हाला सेवेच्या, PhonePe प्लॅटफॉर्मच्या, Upswing प्लॅटफॉर्मच्या किंवा कोणत्याही लिंक केलेल्या वेबसाइटच्या वापरामुळे किंवा वापराच्या असमर्थतेमुळे उद्भवणाऱ्या अशा नुकसानीच्या शक्यतेबद्दल सल्ला दिला गेला असेल, किंवा Upswing आणि/किंवा वित्तीय संस्थांच्या उत्पादनांमुळे/सेवांमुळे किंवा Upswing आणि/किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेच्या इतर कोणत्याही कारवाईमुळे किंवा सेवा प्रदान केल्यामुळे / न केल्यामुळे किंवा PhonePeच्या संलग्नांच्या किंवा व्यावसायिक भागीदारांच्या इतर कोणत्याही कृतीमुळे  उद्भवलेले असो.
    24. तुम्ही बिनशर्त आणि स्पष्टपणे सहमत आहात की Upswing आणि/किंवा वित्तीय संस्थांसोबत आवश्यक वैयक्तिक माहितीसह वरील माहिती शेअर केल्यामुळे आणि/किंवा उघड केल्यामुळे किंवा तुमच्याद्वारे या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवणारे अथवा त्या संदर्भात PhonePe, त्याच्या संलग्न संस्था आणि त्यांचे संबंधित संचालक, शेअरहोल्डर्स, अधिकारी, कर्मचारी व एजंट यांना सहन करावे लागणारे, भोगावे लागणारे किंवा ज्यांचा सामना करावा लागणारे कोणतेही आणि सर्व दावे, दायित्वे, मागण्या, तोटा, खर्च, फी (वाजवी वकिलांच्या फीसह), नियामक कारवाया, दंड, शास्ती किंवा नुकसान यांपासून त्यांना क्षतिपूरित ठेवण्यास तुम्ही सहमत आहात.
    25. या अटी आणि शर्ती भारताच्या कायद्यांद्वारे शासित केल्या जातील आणि यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विवादाच्या संदर्भात बंगळुरू येथे असलेल्या न्यायालयांच्या अनन्य अधिकार क्षेत्राच्या अधीन असतील.
    26. PhonePe तुमची लेखी पूर्वसंमती न घेता आपले अधिकार कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यास पात्र आहे. तुम्ही PhonePeच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय या अटी आणि शर्ती अंतर्गत तुमचे अधिकार आणि/किंवा दायित्वे कोणत्याही व्यक्तीला / संस्थेला हस्तांतरित करू शकत नाही.
    27. तुम्ही समजता, सहमत आहात आणि मान्य करता की या अटी आणि शर्तींमधील कोणतीही तरतूद लागू कायद्यांअंतर्गत विसंगत, बेकायदेशीर, अवैध किंवा अंमलात आणण्यायोग्य नसल्यास, अशा विसंगती, बेकायदेशीरपणा, अवैधता किंवा अंमलबजावणीयोग्यतेच्या अभावामुळे संपूर्ण अटी आणि शर्ती अवैध ठरणार नाहीत. अशी तरतूद वैध, कायदेशीर आणि अंमलात आणण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक त्या मर्यादेपर्यंत सुधारित करण्यात आल्याचे मानले जाईल आणि जर अशा कोणत्याही सुधारणेमुळे ती वैध, कायदेशीर आणि अंमलात आणण्यायोग्य होत नसेल, तर ती अवैध ठरलेली तरतूद त्यामध्ये समाविष्ट नसल्याप्रमाणे या अटी आणि शर्तींचा अर्थ लावला जाईल. या अटी आणि शर्तींमधील उर्वरित तरतुदी किंवा करारांची वैधता, कायदेशीरता आणि अंमलबजावणीयोग्यता यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आणि पक्षांचे अधिकार व दायित्वे यांचा अर्थ तसेच त्यांची अंमलबजावणी त्यानुसार केली जाईल.
    28. तुम्ही सहमत आहात आणि मान्य करता की PhonePe प्लॅटफॉर्मवर आणि/किंवा PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध करून दिलेल्या Upswing प्लॅटफॉर्मवर प्रदान करण्यात आलेली माहिती आणि कंटेन्ट, ज्यामध्ये सेवेशी संबंधित कोणतीही माहिती समाविष्ट आहे परंतु तेवढ्यापुरती मर्यादित नाही, यामुळे तुम्ही आणि PhonePe यांच्यात कोणताही सल्लागार किंवा इतर कोणताही व्यावसायिक संबंध निर्माण होत नाही. PhonePe द्वारे प्रदान करण्यात येणाऱ्या सेवेचा अर्थ तुम्हाला किंवा इतर कोणत्याही पक्षाला कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर, लेखांकन, कर, सल्लागार, गुंतवणूक किंवा इतर सल्लागार सेवा प्रदान करणे असा होत नाही.
    29. 29. सेवेच्या संदर्भात काही शंका असल्यास, कृपया तक्रार निवारण धोरणाचा संदर्भ घ्या.
    30. PhonePe तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, तात्पुरती किंवा कायमची, सेवा बंद किंवा स्थगित करण्याचा अधिकार राखून ठेवते. तुम्ही सहमत आहात की सेवेच्या कोणत्याही सुधारणेसाठी किंवा समाप्तीसाठी PhonePe तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.
    31. या अटी आणि शर्तींमध्ये PhonePeद्वारे वेळोवेळी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार बदल करण्यात येऊ शकतात.