
Trust & Safety
गिफ्ट कार्ड स्कॅम: माहिती शेअर करण्याची योग्य वेळ ओळखा
PhonePe Regional|2 min read|20 May, 2025
जर तुम्हाला पैसे भरण्याची गरज असेल, तर तुम्ही काय कराल? सर्वसामान्यपणे UPI किंवा बँक ट्रान्सफरद्वारे पैसे भरले जातात. पण जर एखाद्या अनोळखी नंबरवरून फोन आला आणि गिफ्ट कार्डद्वारे पैसे भरण्याची मागणी केली गेली, तर काय कराल?
आढावा:
गिफ्ट कार्ड – विशेषतः ई-गिफ्ट कार्ड – आता वाढदिवस, लग्न किंवा तत्काळ भेटवस्तूंसाठी एक लोकप्रिय पर्याय झाले आहेत. कारण गिफ्ट कार्ड अॅनॉनिमस असतात, त्यांचा मागोवा घेता येत नाही आणि ते कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीशी जोडलेले नसतात. हीच गोष्ट स्कॅमर्ससाठी संधी बनली आहे – अशा माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते.
गिफ्ट कार्ड स्कॅम्स वाढत चालले आहेत आणि त्यामुळे अशा फसवणुकीपासून स्वत:ला आणि आपल्या आर्थिक व वैयक्तिक माहितीला कशी सुरक्षा द्यावी हे समजून घेणे गरजेचे आहे.
चला पाहूया, गिफ्ट कार्ड फसवणूक म्हणजे काय, ती कशी केली जाते आणि तिच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे.
गिफ्ट कार्ड स्कॅम म्हणजे काय?
गिफ्ट कार्ड स्कॅममध्ये, स्कॅमर (फसवणूक करणारा) पीडिताला गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडतो. कार्ड खरेदी झाल्यावर, फसवणूक करणारा गिफ्ट कार्ड क्रमांक, कोड, PIN इत्यादी माहिती लबाडीने मिळवतो. ही माहिती मिळाल्यावर ते लगेच कार्डचा वापर करून त्याची रक्कम वापरतात, आणि पीडिताला आपले पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते.
गिफ्ट कार्ड स्कॅम कसा चालतो?
गिफ्ट कार्ड स्कॅमसाठी एक ठरलेली पद्धत असते. खाली त्याचे टप्पे दिले आहेत:
1. स्कॅमर विश्वासू व्यक्तीचे रूप घेतो
फसवणूक फोन कॉल, ईमेल, मेसेज किंवा सोशल मीडियावरून सुरू होते. स्कॅमर पुढीलपैकी कोणी तरी असल्याचे भासवतो:
- तुमचा मॅनेजर किंवा सहकारी
- अडचणीत असलेला नातेवाईक
- सरकारी संस्था
- टेक्निकल सपोर्ट एजंट
- नोकरी देणारा भरती अधिकारी
2. स्कॅमर घाई निर्माण करतात
स्कॅमर दबाव टाकतो किंवा घाबरवतो. काही सामान्य कारणे:
- “मी मीटिंगमध्ये आहे, तात्काळ गिफ्ट कार्ड पाठवा.”
- “तुमचे अकाउंट सस्पेंड होईल जर लगेच अॅक्शन घेतली नाही.”
- “कायदेशीर अडचण आहे, गिफ्ट कार्डद्वारे पैसे द्या.”
- “तुमच्या जॉब किटसाठी हे आवश्यक आहे.”
3. गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास सांगतात
PhonePeEGC, QWIKCILVERGC, Amazon, Apple, Google Play यांसारखी विशिष्ट गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास सांगतात, आणि अनेकदा जास्त रक्कम असलेली कार्ड मागतात.
4. कार्डची माहिती मागतात
खरेदी केल्यावर, ते पुढील माहिती मागतात:
- 16 अंकी गिफ्ट कार्ड क्रमांक
- गिफ्ट कार्ड PIN
- कार्डचे तपशील किंवा पावती
5. गिफ्ट कार्ड त्वरित वापरतात
माहिती मिळाल्यावर, स्कॅमर लगेच कार्ड वापरतो किंवा ऑनलाईन विकतो. एकदा पैसे वापरले की, स्कॅमर गायब होतो.
सामान्य चेतावणी संकेत:
- गिफ्ट कार्डद्वारे पेमेंटची मागणी
- घाई, भावना किंवा गुप्ततेचा सुर
- तुम्हाला गोष्ट कुणालाही सांगू नका असे सांगितले जाते
- वैयक्तिक ईमेल/चॅटवरून संवाद
- व्याकरण, शब्दरचना किंवा टोन विचित्र वाटतो
स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल?
- अनोळखी किंवा अविश्वसनीय व्यक्तींसह गिफ्ट कार्ड कोड शेअर करू नका
- गिफ्ट कार्डसंबंधित मागण्या पडताळा, विशेषतः त्या वेगळ्या वाटल्यास
- सहकारी किंवा कुटुंबीयांकडून असलेल्या घाईच्या मागण्या तपासा
- केवळ अधिकृत स्त्रोतांकडूनच गिफ्ट कार्ड खरेदी करा आणि वैयक्तिक वापरासाठीच ठेवा
- मित्र, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना जागरूक करा – स्कॅमर अनेकदा तंत्रज्ञानाशी कमी परिचित असलेल्या व्यक्तींना लक्ष्य करतात
गिफ्ट कार्ड स्कॅमचा बळी झाल्यास काय करावे?
जर PhonePe द्वारे फसवणूक झाली असेल, तर खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून तक्रार नोंदवा:
- PhonePe अॅप: मदत सेक्शनमध्ये जाऊन “व्यवहारात समस्या आहे” या पर्यायाखाली तक्रार नोंदवा
- PhonePe ग्राहक सेवा क्रमांक: 80–68727374 / 022–68727374 वर कॉल करून तक्रार नोंदवा
- वेबफॉर्म सबमिशन: https://support.phonepe.com/ येथे फॉर्म भरून तक्रार करा
- सोशल मीडिया – PhonePe च्या सोशल मीडिया हँडल्सद्वारे तक्रार नोंदवता येऊ शकते
- Twitter — https://twitter.com/PhonePeSupport
- Facebook — https://www.facebook.com/OfficialPhonePe
- ग्रेसिव्हन्स पोर्टल: https://grievance.phonepe.com/ येथे लॉगिन करून आधीच्या तक्रारीसंदर्भात तक्रार नोंदवा
- सायबर क्राईम: जवळच्या सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करा किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन नोंदणी करा किंवा हेल्पलाइन 1930 वर कॉल करा
महत्त्वापूर्ण रिमाइंडर्स — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक माहिती विचारत नाही. असे ईमेल जे PhonePe कडून असल्याचा दावा करणारे पण phonepe.com डोमेन वरून आलेले नसतात त्यांच्याकडे दुर्लक्षित करा. तुम्हाला फसवणूक झाल्याचा संशय आल्यास, कृपया त्वरित प्राधिकरणांशी संपर्क साधा.