
Trust & Safety
नवा सायबर फ्रॉड ट्रेंड: निष्पाप नागरिकांना फसवण्यासाठी लष्करी अधिकारी असल्याचा बनाव!
PhonePe Regional|3 min read|29 July, 2026
आमच्या ‘ट्रस्ट अँड सेफ्टी’ टीमला निष्पाप नागरिकांना लुटण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे अधिकारी किंवा जवान असल्याचा बनाव करणाऱ्या भामट्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लोकांच्या मनात सैन्याबद्दल असणारा अपार आदर आणि विश्वास याचा गैरफायदा घेऊन, हे स्कॅमर्स मानसिक दबाव निर्माण करतात आणि नकळत नागरिकांकडून पैसे उकळतात. संपूर्ण भारतामध्ये फसवणुकीची ही पद्धत वेगाने समोर येत आहे, त्यामुळे ही फसवणूक नेमकी कशी घडते हे समजून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
एक नेहमी घडणारे उदाहरण
हा प्रकार किती वेगाने घडतो हे समजून घेण्यासाठी, खाली दिलेल्या एका नेहमीच्या उदाहरणावर नजर टाका. यामध्ये भामटा ऑनलाइन टाकलेल्या फर्निचर विक्रीच्या जाहिरातीमध्ये रस असलेला लष्करी अधिकारी असल्याचा आव आणतो. तो त्याच्या या बनावट ओळखीचा वापर करून विक्रेत्यावर दबाव टाकतो, तिला घाई करायला लावतो आणि गोंधळात पाडतो – ज्यामुळे शेवटी पैसे मिळण्याऐवजी ती विक्रेता स्वतःच भामट्याला पैसे देऊन बसते.

हा ब्लॉग सोशल इंजिनिअरिंगचा हा हल्ला कसा काम करतो हे समजावून सांगतो आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी PhonePe द्वारे वापरल्या जाणाऱ्या प्रगत सुरक्षा साधनांची सविस्तर माहिती देतो.
हा घोटाळा कसा काम करतो?
हा एक क्लासिक ‘सोशल इंजिनिअरिंग’ हल्ला आहे. भामटे संभाव्य बळींशी व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधतात आणि लोकांवर तीव्र मानसिक दबाव आणतात, जेणेकरून त्यांनी तार्किक विचार करण्यापूर्वीच घाईघाईत निर्णय घ्यावेत. वरील उदाहरणात पाहिल्याप्रमाणे, जेव्हा लोक तथाकथित लष्करी अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून आणि पैसे मिळणार या अपेक्षेने नकळत त्यांचा UPI PIN एंटर करतात, तेव्हा अवघ्या काही सेकंदांत त्यांचे आर्थिक नुकसान होते.
लष्करी अधिकारी बनून फसवणूक करण्याची पद्धत
1. वैयक्तिक व्यक्तींना लक्ष्य करणारा पेमेंट ट्रॅप
- लक्ष्य : हे स्कॅमर्स दररोजचे डिजिटल विक्रेते, भाडेकरू शोधणारे घरमालक, डॉक्टर, स्थानिक ट्युटर्स आणि सेवा पुरवठादारांना लक्ष्य करतात.
- जाळे : ते लष्करी अधिकारी किंवा जवान (उदा. वरील उदाहरणातील “कॅप्टन कुमार”) असल्याचा आव आणतात, ज्यांना तुमची सेवा किंवा वस्तू तातडीने हवी आहे; परंतु “लष्करी कॅम्पच्या कडक नियमांचे” कारण देऊन ते प्रत्यक्ष भेटू शकत नाहीत.
- मानसिक जाळे: विश्वास संपादन करण्यासाठी, ते बनावट आधार, बनावट आर्मी आयडी आणि स्वतःचे बनावट फोटो शेअर करतात. त्यानंतर, ते तुम्हाला अधिकृत “गव्हर्नमेंट मर्चंट वॉलेट” द्वारे ॲडव्हान्स पेमेंट मिळत आहे असा भ्रम निर्माण करतात.
- फसवणूक: ते तुम्हाला “येणारे पैसे स्वीकारण्यासाठी” तुमचा UPI पिन टाकणे आवश्यक असलेली ‘पेमेंट रिक्वेस्ट’ किंवा ‘QR कोड’ पाठवतात. प्रत्यक्षात, तुमचा UPI पिन एंटर केल्याने पैसे जमा होण्याऐवजी तुमच्या खात्यातून ते कापले जातात आणि तुमचे खाते रिकामे होते.
2. व्यापाऱ्यांना लक्ष्य करणारा ॲडव्हान्स ट्रॅप
- लक्ष्य : घाऊक व्यापारी आणि छोटे-मध्यम उद्योग.
- आमिष : लष्करी अधिकारी बनलेला भामटा आर्मी कॅम्पच्या वतीने मोठी खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दाखवतो.
- मानसिक जाळे : त्यानंतर, लष्कराच्या कडक खरेदी नियमांचा दाखला देत, भामटा असा दावा करतो की व्यापाऱ्याला “व्यापारी नोंदणी शुल्क” किंवा “किमान सिक्युरिटी डिपॉजिट” भरणे आवश्यक आहे.
- फसवणूक : एकदा का हे शुल्क भरले की, भामटा गायब होतो आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग उरत नाही.
PhonePe चे ऑटोमेटेड सिक्युरिटी टूल
वर वर्णन केलेल्या फसवणुकीच्या प्रकारांना रोखण्यासाठी PhonePe कडे मजबूत सायबर सुरक्षा उपाय आहेत. यामध्ये ‘PhonePe प्रोटेक्ट’ हे एक महत्त्वाचे रिअल-टाइम सुरक्षा वैशिष्ट्य आहे – ही एक AI-आधारित सुरक्षा प्रणाली आहे जी थेट दूरसंचार विभागाशी (DoT) जोडलेली आहे. ही सिस्टीम नोंदणीकृत फसवणूक करणाऱ्यांच्या थेट राष्ट्रीय डेटाबेसशी प्राप्तकर्त्याच्या फोन नंबरची पडताळणी करते. हे खालीलप्रमाणे काम करते:
- झटपट ब्लॉक: जर PhonePe प्रोटेक्ट ने एखाद्या फोन नंबरला जास्त धोकादायक म्हणून फ्लॅग केले, तर PhonePe तो व्यवहार त्वरित स्वयंचलितपणे ब्लॉक आणि नाकारते.
- सक्रिय सुरक्षा अलर्ट : जर PhonePe ने एखादा व्यवहार संशयास्पद म्हणून चिन्हांकित केला, तर ती जाणीवपूर्वक व्यवहार थांबवते आणि स्क्रीनवर एक सुरक्षा अलर्ट प्रदर्शित करते. युजरला पिन एंटर करू देण्यापूर्वी, कॉलवर त्यांची दिशाभूल केली जात नाही आहे याची खात्री करण्याची मागणी ही सिस्टीम करते. हे खालीलप्रमाणे दिसते:

तक्रार कशी करावी
जर तुम्हाला संशय असेल की तुम्हाला स्कॅमचे लक्ष्य केले गेले आहे, तर त्वरित याची तक्रार करा:
PhonePe वर रिपोर्ट करणे:
- PhonePe ग्रुप चॅट: जर तुम्हाला तो ग्रुप फसवणूक करणारा वाटत असेल, तर तुम्ही ग्रुप प्रोफाइलमधील बाहेर पडा आणि रिपोर्ट करा या पर्यायांवर क्लिक करू शकता.
- PhonePe ॲप: मदत सेक्शन मध्ये जा आणि तक्रार नोंदवा.
- PhonePe कस्टमर केअर: 80-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
- सोशल मीडिया रिपोर्टिंग:
- Twitter: PhonePe Support
- Facebook: PhonePe Official
- तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा..
अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:
- सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
- दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधे द्वारे करा.
महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
