PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

ऑनलाइन खरेदी करताना राहा सावध : बनावट वेबसाईट्स आणि फसवणूक करणाऱ्या जाहिराती ओळखण्याचे मार्ग

PhonePe Regional|3 min read|18 September, 2025

URL copied to clipboard

ऑनलाइन खरेदीमुळे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी उद्दिष्टे साध्य होतात. कुणासाठी ती थेरपी असे, एखाद्या बिझी एक्झिक्युटिव्हसाठी ऑफलाइन खरेदीसाठीचा तो एक जलद पर्याय असतो, शाळेत लागणारे विविध प्रकारचे पेहेराव आणि वस्तूंसाठीचे सोल्यूशन असते, मित्रासाठी ऐनवेळी गिफ्ट घेण्यासाठीची जागा असते आणि अशा अनेक प्रकारच्या गरजा ऑनलाइन खरेदीमुळे भागल्या जातात. आपण स्वतःसाठी व आपल्या प्रियजनांसाठी प्रॉडक्ट खरेदी करण्याच्या पद्धतीत ऑनलाइन खरेदीमुळे खऱ्या अर्थाने बदल घडून आले आहे. पण या सुविधेची एक काळी बाजूसुद्धा आहे. ऑनलाइन खरेदीत होणारी फसवणूक.

सायबर गुन्हेगार बनावट ऑनलाइन स्टोअर तयार करतात आणि सोशल मीडियावरील जाहिरातींचा वापर करून युजरकडून वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी किंवा अस्तित्वातच नसलेल्या वस्तूंसाठी पेमेंट करवून घेण्यासाठी युजरची फसवणूक करतात. या प्रकारचे स्कॅम दिसायला इतके खरे वाटतात की पहिल्यांदा पाहताना यात काही काळे-बेरे असू शकेल, असे वाटतच नाही.

ऑनलाइन फसवणुकीमध्ये काही शे किंवा काही हजार रुपये गमावण्याची भीती असतेच, त्याचप्रमाणे त्याचे इतरही काही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात :

  • आर्थिक नुकसान : एकदा रक्कम ट्रान्सफरल झाली की, ती परत मिळवणे जवळपास अशक्य असते.
  • डेटाची चोरी : स्कॅम वेबसाइट्सकडून तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो, यात तुमच्या क्रेडिट कार्डच्या माहितीचाही समावेश आहे.
  • ब्रँड इमेज : अशा स्कॅममध्ये फसविल्या गेलेल्या व्यक्ती पुन्हा तोच ब्रँड किंवा पेमेंट गेटवे वापरण्यास कचरतात, मग तो अधिकृत व्यवहार असला तरी त्या साशंक असतात.

लोकांचा विश्वास, घाई आणि चांगल्या डील्स प्राप्त करण्याची इच्छा या वृत्तीचा भामटे फायदा घेतात. हे स्कॅम कशा प्रकारे होतात आणि तुम्ही स्वतःचे संरक्षण कशा प्रकारे करू शकता हे जाणून घेऊ या.

ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणूक कशी होते

1. सोशल मीडियावरील फेक अकाउंट्स

भामटे सोशल मीडियावर बनावट किंवा फेक प्रोफाइल तयार करतात. ते सामान्यपणे :

  • प्रतिष्ठित विक्रेते किंवा ब्रँड असल्याचे भासवतात
  • एक्स्क्लुझिव्ह डिस्काउंट देतात, जे जवळपास अशक्यप्राय वाटतात
  • प्रॉडक्टच्या  चोरी केलेल्या इमेज वा टेस्टिमोनियल वापरतात
  • UPI किंवा बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून ॲडव्हान्स पेमेंटसाठी आग्रह करतात आणि त्यानंतर अदृश्य होतात

उदा. फेक सोशल मीडिया पेजवर लोकप्रिय ब्रँडच्या कपड्यांच्या किमतीच्या अर्ध्या किमतीत ट्रेंड कपडे उपलब्ध असतात. पेमेंट झाले की, त्या अकाउंटकडून खरेदीदाराला ब्लॉक करण्यात येते किंवा एका रात्रीत ते अकाउंट अदृश्य होते.

2. बनावट ऑनलाइन वेबसाइट

बनावट वेबसाईट्स बहुतांशी खऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्ससारख्या दिसतील अशा पद्धतीने तयार केल्या जातात. त्या पुढील गोष्टी करू शकतात :

  • खऱ्या साइटसारखीच दिसणारे डोमेन नेम वापरणे (उदा. xyz.in ऐवजी xYz.in)
  • ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंमत खूप कमी दाखवणे
  • असुरक्षित पेमेंट गेटवेमुळे तुमच्या बँक डिटेल्स धोक्यात आणणे
  • बनावट प्रॉडक्ट पोहोचवणे किंवा काहीही न पोहोचवणे

वेबसाइटची खरी ओळख, रिटर्न पॉलिसी किंवा संपर्क तपशील याची शहानिशा न करण्याच्या ग्राहकांच्या वृत्तीचा या वेबसाइटकडून फायदा घेण्यात येतो.

खालील बाबींपासून सावध राहा

सामान्य इशाऱ्यांची जाणीव असल्यास ऑनलाइन खरेदीतील फसवणूक होण्यापासून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. काही ठळक इशारे असे असतात :

  1. अविश्वसनीय सवलती – जर एखादी ऑफर खूपच चांगली वाटत असेल, तर ती बहुधा खरी नसते.
  2. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय नसणे – भामट्यांकडून बहुधा ॲडव्हान्स पेमेंटचा आग्रह धरला जातो.
  3. संशयास्पद वेबसाइट डिझाइन – चुकीचे व्याकरण, धूसर फोटो किंवा ब्रोकन लिंक (अशी वेब लिंक जी क्लिक केल्यावर काम करत नाही किंवा अपेक्षित पेज उघडण्याऐवजी ‘पेज नॉट फाऊंड’ सारखा एरर दाखवते.) हे मोठे इशारे असतात.
  4. व्हेरिफाय नसलेली सोशल मीडिया हँडल – निळा टिकमार्क आहे का, खरे फॉलोअर्स किती आहेत हे तपासणे आवश्यक.
  5. ग्राहकसेवा उपलब्ध नसणे – खरी व्यवसायिक संस्था रिफंड/एक्सचेंजची स्पष्ट पॉलिसी आणि प्रतिसाद देणारी ग्राहकसेवा नेहमी पुरवते.

स्वतःचा बचाव कसा करावा

फसवणूक करणारे अधिकाधिक चलाख होत असले तरी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता :

  1. खरेदी करण्याआधी खात्री करून घ्या : विक्रेता किंवा वेबसाइटबद्दल विस्तृत माहिती घ्या. गुगल सर्च केल्याने अनेकदा स्कॅम उघडकीस येतात.
  2. वेबसाइटची सुरक्षा तपासा : पेमेंट डिटेल्स एंटर करण्याआधी URL मध्ये https:// आणि पॅडलॉक चिन्ह आहे का ते पाहा.
  3. विश्वसनीय प्लॅटफॉर्म वापरा : नावाजलेल्या आणि विश्वासार्ह ई-कॉमर्स अ‍ॅप्स व वेबसाइटवरूनच खरेदी करा.
  4. सोशल मीडियावर सावध रहा : प्रत्येक पेज किंवा जाहिरात खरी मानू नका. अकाउंटची ओळख खरी आहे का ते तपासा.
  5. संशयास्पद कृतीची तक्रार करा : बनावट पेजेसची तक्रार संबंधित डोमेनकडे करा आणि सरकारी सायबरक्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा.

लक्षात ठेवा, विश्वासार्ह व्यवसाय पारदर्शकतेला महत्त्व देतात, सुरक्षित पेमेंटचे पर्याय देतात आणि कधीही घाईने पेमेंट करण्यासाठी दबाव टाकत नाहीत.

पुढच्या वेळी सोशल मीडियावर किंवा कधीही न ऐकलेल्या एखाद्या वेबसाइटवर अविश्वसनीय वाटेल अशी ऑफर दिसली तर थांबा, तपासा आणि “खरेदी करा”वर क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करा.

फोनपेवर स्कॅमची तक्रार कशी करावी

तुम्हाला फोनपेच्या माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न झाला असेल, तर तक्रार नोंदवण्यासाठी खालील मार्ग आहेत :

1. फोनपे ॲप : हेल्प विभागात जा आणि “या व्यवहाराबद्दल समस्या आहे” या पर्यायाखाली तक्रार नोंदवा.

2. फोनपे ग्राहक सेवा क्रमांक : 80–68727374 / 022–68727374 या क्रमांकावर कॉल करून ग्राहक सेवेशी संपर्क साधा. येथे कस्टमर केअर एजंट तुमची तक्रार नोंदवतील आणि मदत करतील.

3. सोशल मीडिया : तुम्ही सोशल मीडियावरूनही फसवणुकीची माहिती देऊ शकता.

Twitter — https://twitter.com/PhonePeSupport

Facebook — https://www.facebook.com/OfficialPhonePe

4. तक्रार निवारण : आधीच नोंदवलेल्या कम्प्लेंटसंदर्भात तक्रार करण्यासाठी https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करा आणि पूर्वी दिलेला तिकीट आयडी शेअर करा.

5. सायबर सेल : शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राईम सेलमध्ये फसवणुकीची तक्रार करू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा 1930 या सायबर क्राईम सेल हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता.

महत्त्वाची सूचना — फोनपे कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक माहिती विचारत नाही. जर फोनपेच्या नावाने आलेले ईमेल phonepe.com या डोमेनवरून नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा. फसवणुकीचा संशय आला, तर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading