या क्रेडिट कार्ड वितरण अटी व शर्ती (“TOUs”) या PhonePe लिमिटेड (पूर्वीचे नाव ‘PhonePe प्रायव्हेट लिमिटेड’) आणि/किंवा त्याच्या सहयोगी संस्थांमार्फत मालकी असलेल्या किंवा चालवलेल्या वेबसाइट, मोबाइल ॲप्लिकेशन आणि/किंवा अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या वापर आणि ॲक्सेससाठी लागू असलेल्या अटी व शर्ती स्पष्ट करतात (यास पुढे एकत्रितपणे “PhonePe प्लॅटफॉर्म” असे संबोधले जाईल). कंपनी कायदा, 1956 अंतर्गत समाविष्ट केलेली PhonePe लिमिटेड (पूर्वीचे नाव ‘PhonePe प्रायव्हेट लिमिटेड’) ही कंपनी, पुढे “कंपनी” / “PhonePe” अशा स्वरूपात उल्लेखित केली जाईल.
या TOUs या माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत एक इलेक्ट्रॉनिक नोंदी आहेत आणि त्या संगणक प्रणालीद्वारे तयार केलेल्या असल्यामुळे कोणत्याही प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नाही.
PhonePe प्लॅटफॉर्म ॲक्सेस करून सेवा (खाली व्याख्या दिली आहे) घेणे किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवर तुमची माहिती नोंदणी करून सेवा घेणे, यामुळे तुम्ही (पुढे “तुम्ही” किंवा “तुमचे” म्हणून उल्लेखित) या TOUs शी बांधील राहण्यास सहमती देता. तसेच तुम्ही PhonePe च्या सर्वसाधारण अटी व शर्ती, PhonePe गोपनीयता धोरण आणि PhonePe तक्रार निवारण धोरण यांनाही बांधील राहण्यास सहमती देता. यापैकी प्रत्येक गोष्ट या TOUs मध्ये समाविष्ट मानली जाईल आणि या TOUs चा अविभाज्य भाग मानली जाईल (यांना एकत्रितपणे “करार” असे म्हटले जाईल).
कृपया TOUs ची अद्ययावत आवृत्ती पाहण्यासाठी वेळोवेळी या पेजवर परत या. आम्ही आमच्या एकमात्र निर्णयाधिकारानुसार, कोणत्याही वेळी, कोणतेही पूर्वसूचना न देता TOUs मध्ये बदल करण्याचा किंवा अन्यथा सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवतो. PhonePe प्लॅटफॉर्मचा तुमचा सातत्यपूर्ण वापर किंवा ॲक्सेस हा, वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांसह, TOUs स्वीकारल्याचे द्योतक आहे.
कृपया या TOUs काळजीपूर्वक वाचा. येथे समाविष्ट अटी तुम्ही स्वीकारल्या तर, खालीलप्रमाणे परिभाषित उद्देशासाठी तुमच्यात आणि कंपनीत करार मानला जाईल.
- सेवांचा तपशील आणि स्वीकृती
- PhonePe विविध बँका/नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या (“फायन्शिअल इन्स्टिट्यूशन”) यांनी जारी केलेल्या क्रेडिट कार्डांसाठी वितरण सेवा (“सेवा”) यांसह काही आर्थिक उत्पादने/सेवा ॲक्सेस करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
- या सेवा वाजवी शक्य तितक्या योग्य प्रयत्नांच्या आधारे पुरवल्या जातात आणि या सेवा घेण्यामध्ये तुमचा सहभाग हा पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या निर्णयावर आधारित आहे यास तुम्ही सहमती देता.
- क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रियेदरम्यान तुम्ही दिलेली कोणतीही माहिती/दस्तऐवज/तपशील फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडे तुमच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी शेअर करण्यास PhonePe ला तुम्ही संमती देता.
- तुमची KYC आणि/किंवा इतर आवश्यक तपासणी करणे हे फक्त संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनचे दायित्व आहे. त्यासाठी त्यांना तुमच्याकडून अतिरिक्त माहिती/दस्तऐवज/तपशील मागवावे लागू शकतात. अशा माहिती/डेटा संकलन व सादरीकरणामध्ये PhonePe मदत करू शकते.
- क्रेडिट कार्ड अर्जाचे मूल्यांकन करणे, मंजूर करणे आणि/किंवा नाकारणे ही जबाबदारी फक्त संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनची असेल.
- कार्ड जारी करण्यामध्ये किंवा जारी केल्यानंतर कोणतेही सहाय्य पुरविण्यामध्ये PhonePe क्रेडिट सहभागी नाही आणि त्याबद्दल जबाबदारही नाही.
- क्रेडिट कार्ड जारी करणे किंवा त्याचे देखभाल यासंबंधी कोणतीही फी किंवा शुल्क हे थेट संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडून, तुमच्यात आणि त्या फायनान्शिअल इनस्टिट्यूशनमधील ठरलेल्या अटींनुसार आकारले जाईल.
- तुम्हाला Rupay क्रेडिट कार्ड जारी केले असल्यास, अशा Rupay क्रेडिट कार्डाला येथे नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार तुम्ही तुमच्या UPI खात्याशी लिंक करू शकता.
- तुम्ही कंपनीला त्या कंपनीच्या समुहातील कंपन्या, फायनान्शिअल इनस्टिट्यूशन आणि इतर तृतीय पक्षांशी तुमची माहिती शेअर करण्यास सहमती व परवानगी देता, जेथे संयुक्त विपणन उद्देशासाठी/विविध सेवा देण्यासाठी/अहवाल तयार करण्यासाठी आणि/किंवा तुम्ही घेतलेल्या सेवा किंवा इतर कोणत्याही संदर्भात मूल्यवर्धित सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असेल.
- लागू कायद्याच्या परवानगीच्या मर्यादेत, तुम्ही PhonePe किंवा त्याचे तृतीय पक्ष विक्रेते/व्यवसाय भागीदार/मार्केटिंग सहयोगी किंवा फायनान्शिअल इनस्टिट्यूशन यांच्याकडून सेवांचे अपडेट्स, माहिती/प्रमोशनल ई-मेल्स आणि/किंवा उत्पादनासंदर्भातील घोषणा ई-मेल, दूरध्वनी आणि/किंवा SMS द्वारे मिळवण्यास सहमती देता.
- लागू कायद्याच्या परवानगीच्या मर्यादेत, तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर सर्व संप्रेषण प्राप्त करण्यास सहमती आणि संमती देता, जरी असा मोबाईल क्रमांक लागू कायद्यांतर्गत डू नॉट डिस्टर्ब (“DND”) / नॅशनल कस्टमर प्रेफरन्स रजिस्टर (“NCPR”) यादीमध्ये नोंदणीकृत असला तरी, ज्यामध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (“TRAI”) द्वारे जारी केलेले नियम आणि विनियम यांचा समावेश आहे. या उद्देशासाठी, तुम्ही कंपनीला तिच्या गटातील कंपन्या, कंपनीचे तृतीय पक्ष सेवा प्रदाते किंवा कोणतेही अधिकृत एजंट यांच्यासोबत तुमची माहिती शेअर/उघड करण्यास अधिकृत करता.
- PhonePe सर्व संप्रेषण योग्य प्रकारे पाठवले जावे यासाठी आवश्यक पावले उचलते. मात्र, संपर्क माहितीसंबंधी निर्बंध, मोबाईल क्रमांक DND यादीत नोंदलेला असणे, ई-मेल डेटा स्टोरेज अपुरा असणे, टेलिकॉम सेवा प्रदात्यांच्या चुका इत्यादी कारणांमुळे संप्रेषण पाठवण्यात अपयश येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, कोणतेही संप्रेषण न मिळाल्याबद्दल PhonePe जबाबदार किंवा उत्तरदायी राहणार नाही.
- संप्रेषणातील माहिती अचूक, पुरेशी, उपलब्ध, कायदेशीर, वैध, विश्वासार्ह किंवा पूर्ण असेल याची PhonePe सर्व संप्रेषण प्रामाणिक हेतूने करते, मात्र PhonePe कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हमी देत नाही. PhonePe कडून केलेल्या कोणत्याही संप्रेषणातील मजकूराचा वापर किंवा त्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे कोणत्याही व्यक्तीस झालेल्या तोटा किंवा नुकसानीबद्दल PhonePe कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही.
- सेवा पुरविण्यासाठी करण्यात आलेल्या करारांचे पालन करण्यासाठी, वाद सोडविण्यासाठी आणि आमच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी PhonePe तुमची माहिती आवश्यक तेवढ्या काळासाठी जतन करून ठेवेल आणि वापरेल.
- क्रेडिट कार्डे आणि त्यासंबंधित सर्व सेवा फक्त फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडून पुरवल्या जातात. अर्ज नाकारला जाणे, उत्पादन/सेवा जारी करण्यात नकार किंवा विलंब होणे, जारी केल्यानंतरची कामगिरी, वापर किंवा क्रेडिट कार्ड/क्रेडिट सुविधा यांचे सर्व्हिसिंग यासाठी PhonePe कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. तुम्ही आणि फायनान्शिअल इनस्टिट्यूशन यांच्यातील संबंध हे फक्त तुम्ही आणि संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशन यांच्यात मान्य झालेल्या अटी व शर्तींनुसार स्वतंत्रपणे नियंत्रित केले जातील, आणि त्यात PhonePe चा कोणत्याही प्रकारे सहभाग राहणार नाही.
- सेवा, ठेवी (Fixed Deposit) सुविधा किंवा FD-आधारित क्रेडिट कार्ड/सुविधा यासंबंधी PhonePe कोणतीही हमी किंवा गॅरंटी देत नाही. यात जारी करणे/ऑफर लागू होणे, जारी केल्यानंतरची कामगिरी इत्यादी बाबतीत कोणतेही बंधनकारक दायित्व समाविष्ट नाही.
- PhonePe प्लॅटफॉर्मचा परवाना आणि ॲक्सेस
तुम्ही याची कबुली देता आणि सहमती देता की PhonePe ला PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवांवरील सर्व कायदेशीर हक्क, मालकी हक्क आणि स्वारस्य आहे, ज्यामध्ये PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवांशी संबंधित बौद्धिक संपदा हक्क (हक्क नोंदणीकृत असो वा नसो) यांचा समावेश आहे. तसेच तुम्ही मान्य करता की सेवांमध्ये कंपनीकडून गोपनीय म्हणून नियुक्त केलेली माहिती असू शकते आणि कंपनीची पूर्वलिखित परवानगी न घेता तुम्ही अशी माहिती उघड करणार नाही. PhonePe प्लॅटफॉर्मवरील कंटेन्ट, ज्यामध्ये त्याचा “लुक अँड फील” (उदा. मजकूर, ग्राफिक्स, प्रतिमा, लोगो आणि बटण चिन्हे), छायाचित्रे, संपादकीय मजकूर, सूचना, सॉफ्टवेअर आणि इतर साहित्य यांचा समावेश आहे, हे कंपनीकडे आणि/किंवा तिच्या तृतीय पक्ष सेवा प्रदात्यांकडे/त्यांच्या परवानाधारकांकडे मालकी हक्कासह आहे आणि लागू असलेल्या कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि इतर कायद्यांनुसार संरक्षित आहे.
कंपनी तुम्हाला PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवा यांचा ॲक्सेस घेण्यासाठी आणि वापरण्यासाठी मर्यादित परवाना देते. या परवान्यात इतर कोणत्याही व्यक्ती, विक्रेता किंवा तृतीय पक्षाच्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती डाउनलोड करणे किंवा कॉपी करणे, डेरिव्हेटिव्ह वर्क तयार करणे, बदल करणे, रिव्हर्स इंजिनिअरिंग करणे, रिव्हर्स असेंबल करणे किंवा स्त्रोत कोड शोधण्याचा प्रयत्न करणे, विक्री करणे, हस्तांतरित करणे, सब-लायसन्स देणे, सुरक्षा हक्क निर्माण करणे किंवा सेवांवरील कोणतेही हक्क इतर मार्गाने हस्तांतरित करणे यांचा समावेश होत नाही. तुम्ही कोणताही अनधिकृत वापर केल्यास, तुम्हाला दिलेली परवानगी किंवा परवाना तत्काळ संपुष्टात येईल.
PhonePe प्लॅटफॉर्म वापरताना तुम्ही खालील गोष्टी करणार नाही यास सहमती देता: (i) PhonePe प्लॅटफॉर्म किंवा त्यातील कंटेन्ट कोणत्याही व्यावसायिक उद्देशासाठी वापरणे; (ii) अंदाजावर आधारित, खोटा किंवा फसवणुकीचा व्यवहार करणे; (iii) आमची पूर्वलिखित परवानगी न घेता कोणत्याही उद्देशासाठी PhonePe प्लॅटफॉर्मवरील कंटेन्ट किंवा माहिती ॲक्सेस करणे, मॉनिटर करणे किंवा रोबोट, स्पायडर, स्क्रॅपर किंवा इतर स्वयंचलित साधन किंवा कोणतीही मॅन्युअल प्रक्रिया वापरून कॉपी करणे; (iv) PhonePe प्लॅटफॉर्मवरील एक्सक्लुजन हेडरमधील निर्बंधांचे उल्लंघन करणे किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवरील ॲक्सेस रोखण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी वापरलेल्या इतर उपायांना बायपास करणे, मर्यादित करणे किंवा चुकवणे; (v) आमच्या निर्णयाधिकारानुसार आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अवाजवी किंवा असमान प्रमाणात मोठा भार टाकणारी कोणतीही कृती करणे; (vi) आमची पूर्वलिखित परवानगी न घेता कोणत्याही उद्देशासाठी PhonePe प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही भागाला (एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, कोणत्याही सेवेच्या खरेदी मार्गाचा समावेश करून) डीप-लिंक करणे; (vii) आमची पूर्वलिखित परवानगी न घेता PhonePe प्लॅटफॉर्मचा कोणताही भाग “फ्रेम”, “मिरर” किंवा अन्य कोणत्याही प्रकारे इतर वेबसाइटमध्ये समाविष्ट करणे; (viii) कोणताही फसवणुकीचा अर्ज सुरू करणे किंवा कंपनी/फायनान्शिअल इनस्टिट्यूशन किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षासोबत PhonePe प्लॅटफॉर्मचा वापर करून फसवणूक करणे; आणि (ix) PhonePe आणि/किंवा फायनान्शिअल इनस्टिट्यूशनला चुकीची, अपूर्ण किंवा खोटी माहिती/डेटा देणे.
- गोपनीयता धोरण
PhonePe प्लॅटफॉर्म वापरताना, PhonePe च्या गोपनीयता धोरणात नमूद केल्याप्रमाणे तुमची माहिती वापरण्यास तुम्ही संमती देता. हे गोपनीयता धोरण स्पष्ट करते की PhonePe प्लॅटफॉर्मवर ॲक्सेस करताना कंपनी तुमची वैयक्तिक माहिती कशी हाताळते.
- तुमची नोंदणी/खाते
PhonePe प्लॅटफॉर्म वापरताना, तुम्ही बंधनकारक करार करण्यास सक्षम आहात आणि भारतातील किंवा इतर कोणत्याही लागू न्यायक्षेत्रातील कायद्यांनुसार सेवा ॲक्सेस करण्यास/वापरण्यास तुम्हाला मनाई नाही याची पुष्टी करता. PhonePe प्लॅटफॉर्मचा तुमचा वापर हा फक्त तुमच्या स्वतःच्या खऱ्या वापरासाठीच आहे.
तुमच्या खात्याचा कोणताही अनधिकृत वापर किंवा सुरक्षेचा भंग झाल्यास तुम्ही तत्काळ कंपनीला कळवण्यास सहमती देता. तसेच तुम्ही हेही मान्य करता की असा अनधिकृत ॲक्सेस फक्त कंपनीकडून थेट कारणास्तव झालेला आहे हे सिद्ध झाल्याशिवाय, कोणत्याही अनधिकृत वापरासाठी किंवा ॲक्सेससाठी कंपनीला जबाबदार धरण्यात येणार नाही.
तुम्ही स्वतःबद्दल खरी, अचूक, अद्ययावत आणि संपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन देता आणि तुमच्या माहितीत (एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, संपर्क तपशीलांसह) कोणताही बदल झाल्यास ती तात्काळ कळवण्याचे/अपडेट करण्याचे वचन देता, तसेच ती नेहमी अद्ययावत आणि अचूक ठेवण्याचे आश्वासन देता, कारण याचा कंपनीकडून किंवा कंपनीमार्फत सेवा पुरविण्यावर थेट परिणाम होतो. तुम्ही तुमची ओळख चुकीची सादर करणार नाही किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर ॲक्सेस करण्याचा किंवा सेवांचा वापर करण्याचा प्रयत्न करणार नाही, यास सहमती देता. तुम्ही निवडलेल्या सेवांची खरेदी/घेणे यासंबंधी अतिरिक्त अटी व शर्ती लागू होतील, ज्यामध्ये फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच्या अटींचाही समावेश असेल. कृपया या अतिरिक्त अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
- ग्राहकाची यथायोग्य कार्यासक्ती आवश्यकता
तुम्ही सहमती देता आणि मान्य करता की PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी आमची फायनान्शिअल इनस्टिट्यूशन ग्राहक/क्लायंट यथायोग्य कार्यासक्ती उपाययोजना करेल आणि KYC साठी आवश्यक अनिवार्य माहिती मागवेल, जी ग्राहक म्हणून तुम्ही देणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडून तुमचा क्रेडिट कार्ड किंवा इतर आर्थिक उत्पादनासाठी केलेला विनंती अर्ज सुलभ करण्यासाठी, लागू असलेल्या मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (“PMLA”) आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियम व नियमनांनुसार केली जाईल. फायनान्शिअल इनस्टिट्यूशन तुमची ओळख त्याच्या समाधानकारक पातळीवर निश्चित करण्यासाठी आणि तुमच्या व त्या फायनान्शिअल इनस्टिट्यूशनमधील संबंधाचे स्वरूप समजून घेण्यासाठी आवश्यक तेवढी माहिती मिळवू शकते. कंपनी अशा प्रक्रियेस सुलभ करू शकते आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त योग्य परिश्रम उपाययोजना (यामध्ये आवश्यक कागदपत्रे समाविष्ट आहेत) घेऊ शकते, जेणेकरून लागू असलेल्या कायद्यांनुसार, PMLA सह, ग्राहक योग्य परिश्रम आवश्यकतांची पूर्तता करता येईल. तुम्ही कंपनीकडून तुमची माहिती/डेटा/तपशील फायनान्शिअल इनस्टिट्यूशनसोबत शेअर करण्यास स्पष्ट संमती देता. तसेच तुम्ही मान्य करता की जर तुम्ही फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच्या समाधानकारक पातळीवर माहिती/डेटा/तपशील उपलब्ध करून दिले नाहीत, तर तुम्हाला फायनान्शिअल इनस्टिट्यूशनची उत्पादने/सेवा/ऑफर घेता येणार नाहीत. KYC आणि ग्राहक योग्य परिश्रम हे फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच्या एकतर्फी निर्णयानुसार केले जातात आणि त्यासाठी कंपनी जबाबदार आणि/किंवा उत्तरदायी राहणार नाही.
- पात्रता
कंपनीकडून ऑफर केल्या जाणाऱ्या सेवा घेताना, तुम्ही भारतात वास्तव्यास आहात, तुमचे वय 18 (अठरा) वर्षांपेक्षा जास्त आहे आणि भारतीय संविदा अधिनियम, 1872 नुसार करार करण्याची क्षमता तुमच्यात आहे, अशी तुम्ही घोषणा करता आणि पुष्टी देता.
- सबमिट केलेला कंटेन्ट
जेव्हा तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मवर कोणतीही कंटेन्ट, डेटा किंवा माहिती शेअर करता किंवा सबमिट करता, तेव्हा तुम्ही त्या सर्व कंटेन्टसाठी पूर्णपणे जबाबदार आहात हे मान्य करता. PhonePe प्लॅटफॉर्मवर किंवा त्याद्वारे तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही कंटेन्टसाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. कंपनीच्या स्वेच्छाधिकाराने, अशा कंटेन्टचा (संपूर्ण, अंशतः किंवा बदललेल्या स्वरूपात) सेवांमध्ये समावेश केला जाऊ शकतो. PhonePe प्लॅटफॉर्मवर तुम्ही सबमिट केलेल्या किंवा उपलब्ध करून दिलेल्या अशा कंटेन्टसंदर्भात, तुम्ही कंपनीला अशा कंटेन्टचा वापर करणे, कॉपी करणे, वितरित करणे, सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे, बदल करणे, डेरिव्हेटिव्ह वर्क तयार करणे आणि सब-लायसन्स देणे यासाठी कायमस्वरूपी, अपरिवर्तनीय, न संपणारा, जागतिक स्तरावर लागू, रॉयल्टी-फ्री आणि नॉन-एक्सक्लुझिव्ह परवाना देता. तुम्ही सबमिट केलेल्या कंटेन्टसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात यास तुम्ही सहमती देता. PhonePe प्लॅटफॉर्मवर खालील प्रकारची कंटेन्ट पोस्ट किंवा ट्रान्समिट करणे तुम्हाला मनाई आहे: (i) कोणताही बेकायदेशीर, धमकी देणारी, बदनामीकारक, अपमानास्पद, अश्लील, अशोभनीय किंवा इतर कोणताही कंटेन्ट जो प्रसिद्धी/गोपनीयतेच्या हक्कांचे उल्लंघन करतो किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करतो; (ii) कोणताही व्यावसायिक कंटेन्ट (यामध्ये, एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, निधीची मागणी, जाहिरात किंवा कोणत्याही वस्तू/सेवेचे मार्केटिंग यांचा समावेश आहे); आणि (iii) कोणताही कंटेन्ट जो तृतीय पक्षाच्या कॉपीराइट, ट्रेडमार्क, पेटंट हक्क किंवा इतर मालकी हक्कांचे उल्लंघन, गैरवापर किंवा भंग करते. PhonePe प्लॅटफॉर्मवर कंटेन्ट पोस्ट करण्यामुळे वरील निर्बंधांचे उल्लंघन झाल्यास किंवा इतर कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार असाल.
- तृतीय पक्ष लिंक/ऑफर
PhonePe प्लॅटफॉर्ममध्ये इतर वेबसाइट किंवा स्त्रोतांकडे नेणारे दुवे असू शकतात. तुम्ही मान्य करता आणि सहमती देता की या बाह्य साइट्स किंवा स्त्रोतांची उपलब्धता यासाठी कंपनी जबाबदार नाही. कंपनी अशा साइट्स किंवा स्त्रोतांवर आढळणाऱ्या किंवा त्याद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही सामग्री, जाहिरात, उत्पादने किंवा इतर साहित्याचे समर्थन करत नाही आणि त्यासाठी जबाबदार किंवा उत्तरदायी राहणार नाही. तसेच तुम्ही हेही मान्य करता की अशा साइट्स किंवा स्त्रोतांद्वारे उपलब्ध कोणत्याही कंटेन्ट, वस्तू किंवा सेवांच्या वापरामुळे किंवा त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे थेट किंवा अप्रत्यक्षपणे झालेल्या किंवा झाल्याचा दावा केलेल्या कोणत्याही नुकसानासाठी किंवा तोट्यासाठी कंपनी जबाबदार किंवा उत्तरदायी राहणार नाही.
- हमीचा अस्वीकार
तुम्ही स्पष्टपणे समजता आणि सहमती देता की PhonePe प्लॅटफॉर्मवरील किंवा त्याद्वारे ॲक्सेस होणाऱ्या सेवा आणि इतर कंटेन्ट (तृतीय पक्षांचा कंटेन्ट यासह) वापरणे हे पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या जोखमीवर आहे. सेवा “जशा आहेत” आणि “जशा उपलब्ध आहेत” या स्वरूपात दिल्या जातात. कंपनी PhonePe प्लॅटफॉर्मवरील किंवा सेवांमधील कंटेन्टची (तृतीय पक्ष सेवा प्रदात्यांद्वारे स्पॉन्सर केलेली असो वा नसो) अचूकता, विश्वासार्हता किंवा पूर्णता यासंदर्भात कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतिपादन, हमी किंवा गॅरंटी देत नाही आणि कोणत्याही उल्लंघन न होणे किंवा विशिष्ट उद्देशासाठी उपयुक्तता याबाबतची हमी स्पष्टपणे नाकारते.
कंपनीतर्फे सेवा तसेच सेवांमधील किंवा सेवांद्वारे ॲक्सेस होणाऱ्या सर्व माहिती, उत्पादने, सेवा आणि इतर कंटेन्ट (तृतीय पक्षांचा कंटेन्ट यासह) यांसंबंधी कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हमी स्पष्टपणे नाकारण्यात येत आहेत. यामध्ये व्यापारीकरणासाठी उपयुक्तता, विशिष्ट उद्देशासाठी उपयुक्तता आणि उल्लंघन न होणे या अप्रत्यक्ष हमींचाही (एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता) समावेश आहे.
कंपनी, तिचे सेवा प्रदाते, सहयोगी संस्था आणि फायनान्शिअल इनस्टिट्यूशन कोणतीही हमी देत नाहीत की: (i) तुम्ही सेवांसाठी पात्र आहात; (ii) सेवा तुमच्या आवश्यकता पूर्ण करतील; (iii) सेवा अखंडित, वेळेवर, सुरक्षित किंवा त्रुटीविरहित असतील; (iv) सेवांचा वापर करून मिळालेले परिणाम अचूक किंवा विश्वासार्ह असतील; (v) सेवांद्वारे तुम्ही खरेदी केलेली किंवा मिळवलेली कोणतीही उत्पादने, सेवा, माहिती किंवा इतर साहित्य तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल; आणि (vi) तंत्रज्ञानातील कोणत्याही चुका सुधारल्या जातील.
कंपनीला नोंदणी/मेंबरशिप किंवा ब्राउझिंग फी कोणत्याही वेळी आकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. कंपनीकडून आकारली जाणारी अशी सर्व फी तुम्हाला कळविण्यात येईल आणि ती प्रकाशित/पोस्ट केल्यानंतर लगेच लागू होईल. कंपनीकडून आकारली जाणारी अशी सर्व फी, असल्यास, भारतीय रुपयांमध्येच असेल.
PhonePe प्लॅटफॉर्मवरील कोणतीही पेमेंट पद्धत वापरताना, येथे नमूद केलेल्या सेवांअंतर्गत फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडून मिळालेल्या क्रेडिट कार्डाचा वापर केल्यास, कोणत्याही कारणास्तव (एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता) तुम्हाला थेट किंवा अप्रत्यक्षपणे झालेला कोणताही तोटा किंवा नुकसान याबाबत कंपनी जबाबदार राहणार नाही किंवा कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही :
- कोणत्याही व्यवहारासाठी अधिप्रमाणन नसणे, किंवा
- व्यवहारातून उद्भवणाऱ्या कोणत्याही पेमेंट समस्या, किंवा
- तुम्ही वापरत असलेल्या पेमेंट पद्धतींची बेकायदेशीरता (क्रेडिट/डेबिट कार्ड फसवणूक इत्यादी), किंवा
- इतर कोणत्याही कारणास्तव व्यवहार नाकारला जाणे
येथे नमूद केलेल्या कोणत्याही तरतुदींवर परिणाम न होता, PhonePe प्लॅटफॉर्मला तुमच्या/तुमच्या व्यवहाराच्या विश्वासार्हतेबाबत समाधान न झाल्यास, सुरक्षेच्या किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अतिरिक्त पडताळणी करण्याचा अधिकार PhonePeने राखून ठेवला आहे.
कंपनीच्या फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडून उत्पादने किंवा सेवा वितरीत करण्यात अपयश आल्यास किंवा विलंब झाल्यास, तसेच अशा विलंबामुळे तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसान किंवा तोट्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही आणि कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही. उत्पादने/सेवा यांची डिलिव्हरी भारताच्या प्रादेशिक सीमांबाहेर केली जाणार नाही.
- दायित्वाची मर्यादा
तुम्ही सहमती देता आणि समजता की संपूर्ण प्रक्रियेमध्ये कंपनीची भूमिका मर्यादित आहे आणि ती फक्त तुमच्यात आणि फायनान्शिअल इनस्टिट्यूशनमध्ये एक सुलभकर्ता म्हणून कार्य करते. फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच्या क्रेडिट कार्ड/क्रेडिट सुविधेबाबत कोणतीही अडचण आल्यास, तुमचे हक्क हे लागू कायदे आणि तुम्ही व फायनान्शिअल इनस्टिट्यूशन यांच्यात स्वीकारलेल्या/कार्यान्वित केलेल्या क्रेडिट कार्ड दस्तऐवज किंवा अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जातील. तुम्ही पुढे सहमती देता आणि आश्वासन देता की कोणत्याही वादामध्ये कंपनी आणि/किंवा कंपनीच्या समूहातील संस्थांना पक्ष बनवणार नाही आणि कंपनी व/किंवा कंपनीच्या गटातील संस्थांविरुद्ध कोणताही दावा करणार नाही.
वरील परिच्छेदातील सर्वसाधारण तरतुदींमध्ये बाधा न आणता, कोणत्याही परिस्थितीत कंपनी आणि/किंवा कंपनीच्या समूहातील संस्था, तिची उपकंपन्या, सहयोगी संस्था, संचालक आणि अधिकारी, कर्मचारी, एजंट, भागीदार आणि परवानाधारक यांना थेट, अप्रत्यक्ष, परिणामस्वरूप, आकस्मिक, विशेष किंवा दंडात्मक नुकसानासाठी जबाबदार धरले जाणार नाही. यामध्ये, एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, नफा किंवा महसुलाचा तोटा, सद्भावनेचा तोटा, व्यवसायात व्यत्यय, व्यवसायाच्या संधींचा तोटा, डेटाचा तोटा किंवा इतर आर्थिक हितसंबंधांचा तोटा यांचा समावेश आहे, मग ते करार, निष्काळजीपणा, अपकृत्य किंवा इतर कोणत्याही कारणामुळे झाले असो.
- क्षतिपूर्ती
तुम्ही TOUs चे उल्लंघन केले असता, कोणताही कायदा किंवा तृतीय पक्षाचे हक्क भंग केला तर, किंवा PhonePe प्लॅटफॉर्म/सेवा आणि फायनान्शिअल इनस्टिट्यूशन्सकडून ऑफर करण्यात आलेली क्रेडिट कार्डे, क्रेडिट सुविधा वा इतर उत्पादने वापरता, त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या किंवा संबंधित कोणत्याही दावे, कारवाईची कारणं, मागण्या, वसुली, नुकसान, हानी, दंड, शुल्क, वकिलांच्या योग्य फी यासह इतर कोणत्याही स्वरूपाचे खर्च यांपासून — कंपनी, तिचे अधिकारी, संचालक, एजंट, सहयोगी संस्था, उपकंपन्या, संयुक्त उपक्रम आणि कर्मचारी यांचं क्षतिपूरण करणे, त्यांचं संरक्षण करणे आणि त्यांना कोणतीही जबाबदारी येऊ न देणे, ही तुमची पूर्ण जबाबदारी राहील.
- अतिरिक्त अटी व शर्ती
PhonePe कंपनीला PhonePe प्लॅटफॉर्म, या TOUs, करार आणि/किंवा संबंधित इतर धोरणे व करार यामध्ये कोणतेही बदल करण्याचा अधिकार आहे आणि हे बदल कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही केले जाऊ शकतात. या TOUs आणि/किंवा कराराचे अद्ययावत रूप जसेच पोस्ट केले जाईल, त्याक्षणी लागू होईल. तुम्ही या TOUs आणि/किंवा करारामध्ये वेळोवेळी होणारे बदल/अद्ययावत माहिती तपासत राहावी, ही तुमची जबाबदारी आहे. PhonePe प्लॅटफॉर्म किंवा सेवा सतत वापरणे हे अशा बदलांना तुमची संमती असून, बदललेले अटी व शर्ती स्वीकारल्या, असे समजण्यात येईल. जर तुम्ही या बदलांशी सहमत नसाल, तर तुम्ही सेवा वापरणे थांबवावे.
कंपनीला कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी बंद/स्थगित करण्याचा अधिकार आहे. तुम्ही मान्य करता की, सेवा बंद केल्यामुळे किंवा बदलांसाठी कंपनीचे तुमच्याप्रती दायित्व असणार नाही.
तसेच, तुम्ही सेवा बेकायदेशीर उद्देशासाठी किंवा असा कोणताही मजकूर पाठवण्यासाठी वापरणार नाही, जो कायद्याविरुद्ध आहे, त्रासदायक आहे, खोटा आणि इतरांच्या नावे अपकीर्त करणारा आहे, गोपनीयतेचा भंग करणारा आहे, शिवीगाळ करणारा, धमकी देणारा किंवा अश्लील आहे, इतरांच्या हक्कांचे उल्लंघन करणारा आहे, किंवा जो मजकूर तुमचा स्वतःचा नाही — याची तुम्ही स्पष्टपणे सहमती देता.
- सामान्य
या अटींपैकी कोणतीही अट अग्राह्य, निरर्थक किंवा अंमलबजावणीस अयोग्य ठरल्यास, संबंधित न्यायालयाने त्या अटीतून दिसून येणाऱ्या दोन्ही पक्षांच्या हेतूंचा प्रभावीपणे विचार करावा, आणि अशी अंमलबजावणीस अयोग्य अट इतर अटींपासून विभाज्य मानली जाईल, ज्याचा उर्वरित अटींच्या वैधतेवर कोणताही परिणाम होणार नाही. मथळे हे केवळ संदर्भासाठी असून, संबंधित विभागांच्या व्याप्तीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. PhonePe प्लॅटफॉर्मचा उपयोग केवळ भारतातील वापरकर्त्यांसाठी आहे. या TOUs, करार, तसेच तुमचं आणि कंपनीमधील नातं यांचं संचालन भारताच्या कायद्यांनुसार केले जाईल आणि या TOUs मधून उद्भवणाऱ्या कोणत्याही दावे किंवा वादासाठी केवळ बंगळुरू न्यायालयांचीच अधिकारिता राहील. तुमच्याकडून किंवा इतर कोणाकडून उल्लंघन झाल्यावर कंपनीने तत्काळ कारवाई न केल्यास, भविष्यातील किंवा तत्सम उल्लंघनांवर कारवाई करण्याचा कंपनीचा हक्क त्यामुळे नष्ट होणार नाही. हे TOUs आणि करार एकत्र वाचल्यास, तेच तुमचे आणि कंपनीमधील संपूर्ण करार दर्शवतात आणि PhonePe प्लॅटफॉर्म व सेवांचा तुमचा वापर नियंत्रित करतात.
- फिक्स्ड डिपॉझिट-बॅक्ड क्रेडिट कार्डांवर लागू असलेल्या अटी व शर्ती
- वरील अटी व शर्तींसोबतच, तुम्ही जेव्हा फिक्स्ड डिपॉझिट (“FD”) आधारित क्रेडिट कार्ड वापरता किंवा त्यासाठी अर्ज करता, तेव्हा खालील अटी व शर्ती देखील लागू असतात, याची तुम्हाला संपूर्ण जाणीव आहे.
- कंपनी अपस्विंग फायनान्शिअल टेक्नोलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड (“अपस्विंग”) या संस्थेच्या मालकीच्या तांत्रिक प्लॅटफॉर्मद्वारे (“अपस्विंग प्लॅटफॉर्म”) खाली नमूद केलेल्या FD-बॅक्ड क्रेडिट कार्डांपर्यंत ॲक्सेस उपलब्ध करून देते:
- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक – WISH क्रेडिट कार्ड.
- FD-बॅक्ड क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी, PhonePe प्लॅटफॉर्मवर अपस्विंग प्लॅटफॉर्मशी लिंक किंवा रीडायरेक्ट करणारे फंक्शनलिटीज उपलब्ध आहेत.
- FD-बॅक्ड क्रेडिट कार्ड निवडून तुम्ही त्या सेवा घेण्याचा निर्णय घेतल्यावर, अपस्विंग प्लॅटफॉर्मवर रिडायरेक्ट केले जाणे तुम्ही स्पष्टपणे मान्य करता आणि त्यासाठी सहमती देता. तसेच, अपस्विंग प्लॅटफॉर्म PhonePe चे मालकीचा किंवा नियंत्रणाखाली नसून, त्याबद्दल PhonePe कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही, हे तुम्ही पूर्णपणे समजता.
- FD-बॅक्ड क्रेडिट कार्डे संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशन्सकडून अपस्विंगच्या माध्यमातून, अपस्विंग आणि त्या फायनान्शिअल इनस्टिट्यूशन्समधील परस्पर करारानुसार दिली जातात, याची तुम्ही संपूर्ण जाणीव ठेवता, मान्यता देता आणि त्यास सहमती देता.
- तुम्ही हे समजता, मान्य करता आणि सहमती देता की अपस्विंग प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस आणि वापर अपस्विंगच्या अतिरिक्त अटी व शर्तींनुसार होईल, आणि अशा कोणत्याही अटी व शर्तींमध्ये वेळोवेळी होणारे बदल/अद्ययावत माहिती नियमितपणे तपासण्याची जबाबदारी केवळ तुमचीच राहील.
- तुम्ही हे समजता, मान्य करता आणि सहमती देता की FD-बॅक्ड क्रेडिट कार्डांसाठीचा अर्ज अपस्विंगकडून पूर्णपणे व्यवस्थापित केला जातो आणि त्यासाठी संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनने अधिकृतता दिलेली आहे. PhonePe प्लॅटफॉर्मवरून FD-बॅक्ड क्रेडिट कार्डासाठी अर्ज करण्याचा पर्याय निवडल्यावर, तुम्हाला अपस्विंग प्लॅटफॉर्मवर रिडायरेक्ट करण्यात येईल.
- तुम्ही FD-बॅक्ड क्रेडिट कार्डाशी संबंधित जी कोणतीही माहिती/दस्तऐवज/तपशील देता, ती माहिती अपस्विंगकडून संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच्या वतीने संकलित केली जाते.
- तुम्ही अपस्विंग प्लॅटफॉर्मवर किंवा कोणत्याही फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडे डेटा, माहिती किंवा इतर कोणतीही कंटेन्ट शेअर करता किंवा सबमिट करता, तेव्हा त्या संपूर्ण माहितीच्या अचूकतेसाठी आणि पूर्णतेसाठी पूर्णपणे तुम्हीच जबाबदार असता, हे तुम्ही मान्य करता. अपस्विंग प्लॅटफॉर्मवर किंवा कोणत्याही फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडे तुम्ही दिलेल्या कोणत्याही माहितीबाबत कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार ठरणार नाही.
- तुम्ही हे समजता, मान्य करता आणि सहमती देता की संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडून FD-बॅक्ड क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या संदर्भात सुरक्षारूप ठेव निर्माण करण्यासाठी तुमच्याकडून निश्चित ठेव (FD) तयार करण्याची आवश्यकता असू शकते आणि ही प्रक्रिया संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच्या अटी व शर्तींनुसारच होईल, ज्या तुमच्यावर बंधनकारक असतील. कंपनी FD तयार करणे, FD वर व्याज भरणे, FD मधील रक्कम आगाऊ काढून घेणे किंवा FD शी संबंधित इतर कोणत्याही क्रियांमध्ये सहभागी नाही आणि त्यासाठी जबाबदारही नाही. FD संदर्भातील सर्व बाबींसाठी संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच एकहाती जबाबदार असतील आणि FD-बॅक्ड क्रेडिट कार्ड संदर्भात तुम्ही कोणत्याही फायनान्शिअल इनस्टिट्यूशनची FD सेवा वापरत असाल, तर ती सेवा तुम्ही आणि संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशन यांच्यातील करारात नमूद अटी व शर्तींनुसारच नियंत्रित केली जाईल.
- तुम्ही हे समजता आणि सहमती देता की संपूर्ण प्रक्रियेमध्ये कंपनीची भूमिका मर्यादित आहे आणि ती केवळ तुमच्यात व फायनान्शिअल इनस्टिट्यूशन्समध्ये एक सुलभकर्ता म्हणून कार्य करत आहे. FD किंवा फायनान्शिअल इनस्टिट्यूशन्सच्या क्रेडिट कार्ड सुविधांशी संबंधित कोणत्याही अडचणी आल्यास, तुमचे हक्क हे लागू कायदे, FD व क्रेडिट कार्ड दस्तऐवज, आणि/किंवा तुम्ही व फायनान्शिअल इनस्टिट्यूशन्स यांच्यात लागू असलेल्या अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जातील.
- तुम्ही FD-बॅक्ड क्रेडिट कार्डांचा जो वापर करता, त्यासंदर्भातील कोणत्याही शंका आणि/किंवा तक्रारी या संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडेच नोंदवाव्यात आणि त्या त्या फायनान्शिअल इनस्टिट्यूशनच्या तक्रार निवारण धोरणांनुसार हाताळल्या जातील. अशा प्रकरणांमध्ये, PhonePeची भूमिका, असल्यास, केवळ अपस्विंग आणि/किंवा संबंधित फायनान्शिअल इनस्टिट्यूशनकडून मिळालेली उत्तरे ‘जशीच्या तशी’ तुम्हाला कळवण्यापुरतीच मर्यादित असेल.