PhonePe Blogs Main Featured Image

Investments

लिक्विड फंडसोबत तुमच्या रिटर्नच्या स्कोर बोर्डवरील वाढ कायम ठेवा

PhonePe Regional|2 min read|19 July, 2021

URL copied to clipboard

क्रिकेटमध्ये जेव्हा कठीण गोलंदाजीचा सामाना फलंदाजास करावा लागतो, तेव्हा त्यांना विकेट गमावण्याच्या जोखमीमुळे चौकार आणि षटकार मारणे कठीण होते. पण अशा स्थितींमध्ये एक अनुभवी फलंदाज शेवटी दबाव वाढणार नाही याची खात्री करण्यासाठी स्कोर बोर्डवरील धावसंख्येत वाढ करण्यासाठी शक्य होईल तेवढ्या एक एक धावा घेण्याचा प्रयत्न करतो.

स्मार्ट आणि सशक्त फलंदाज एका धावेऐवजी दोन धावा घेऊन त्यांच्या विकेटदरम्यानच्या धावांमध्ये सुधार करण्याच्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्याचे सुद्धा सुनिश्चित करतात. त्यांचा एकंदर हेतू कठीण फलंदाजीच्या स्थितीत उच्च जोखीम न पत्करता तुम्हाला शक्य होईल तितका स्कोर करण्याचा असतो, कारण प्रतिस्पर्धी टीमसाठी मोठे लक्ष्य ठेवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धी टीमने तुम्हाला दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात हे शेवटी मदतच करते.

तुमच्या बचतीच्या ध्येयांचा पाठपुरावा करणे

आता क्रिकेटची तुलना तुमचे वित्त आणि गुंतवणूका व्यवस्थापित करण्याच्या दिशेत करून पाहा. जसे फलंदाजास विशिष्ट लक्ष्य स्कोर तयार करायचा असतो किंवा स्कोरचा पाठलाग करायचा असतो, त्याचप्रकारे तुम्हाला सुद्धा आयुष्यात काही विशिष्ट आर्थिक ध्येय किंवा लक्ष्य प्राप्त करायचे असतात मग ते महागाई पेक्षा जास्त रिटर्न कमवणे असो किंवा कार खरेदी करणे, घर खरेदी करणे किंवा विशिष्ट कालावधीत विशिष्ट रक्कम जमा करणे असो. पण तुम्ही तुमच्या जीवनातील घ्येयाच्या जवळ पोहचू शकाल अशाप्रकारे तुमच्याकडे असलेल्या पैशांवर शक्य असेल तो सर्वोत्तम रिटर्न मिळवण्याचा सर्व प्रयत्न करत आहात का?

जास्त रिटर्न मिळवण्याच्या उद्दीष्टात जास्त उच्च जोखीम घेण्याचा समावेश असू शकतो किंवा त्यात तुमचे पैसे जास्त काळासाठी अडकवणे आवश्यक असते. आणि तुम्हाला नेहमीच कोणत्याही वेळी काही पैशांची गरज पडू शकते त्यामुळे बहुतेकवेळा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सर्व पैशांवर खूप उच्च रिटर्न कमवण्याचे ध्येय ठरवू शकत नाही.

लिक्विड फंडसोबत योग्य गुंतवणूक करा

गुंतवणूकदार सामान्यतः पैसे कुठे ठेवतात? सर्वात सामान्य उत्तर बँक बचत खाते हे आहे. तर एक अनुभवी फलंदाज जो कठीण गोलंदाजीत सुद्धा स्कोर बोर्ड हलता ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसेच एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही बचत खात्यात तुमच्या पैशांवर फक्त 2–3% रिटर्न कमावण्याऐवजी तुमच्या पैशांवर थोडासा जास्त रिटर्न मिळवू इच्छिता? ते सुद्धा कोणतेही जास्त जोखीम न घेता किंवा तुमचे पैसे जास्त कालावधीसाठी न अडकवता?

तर लिक्विड फंड तुमच्यासाठी त्याचे उत्तर आहे.

लिक्विड फंड सर्व म्युच्युअल फंडमध्ये सर्वात सुरक्षित आहेत कारण ते बँकांद्वारे जारी केल्या जाणाऱ्या निश्चित उत्पन्न सिक्युरिटिज आणि मोठ्या नामांकित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. आणि ते शेयर बाजारात गुंतवणूक करत नाहीत.

लिक्विड फंड बँक बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतात. पुढील तक्त्यात बचत खाते आणि लिक्विड फंडद्वारे देऊ केल्या जाणाऱ्या सरासरी रिटर्नची एक वार्षिक तुलना दिली आहे.

लिक्विड फंडमध्ये कोणताही लॉकिंग कालावधी नसतो आणि त्वरित पैसे काढण्याची सुविधा दिली जाते ज्यात काढलेली रक्कम तत्काळ ( तुमच्या गुंतवणूक मूल्याचे कमाल 50,000 रुपये किंवा 90%, जे काही कमी असेल) तुमच्या खात्यात जमा केली जाते आणि उर्वरित रक्कम 2 कामकाजाच्या दिवसांत जमा केली जाते.

तसेच तुम्हाला तुमच्या लिक्विड फंडमध्ये किमान बॅलेन्स ठेवण्याची सुद्धा गरज नसते. लिक्विड फंड उच्च पातळीची पारदर्शकता देऊ करते म्हणजेच तुम्ही तुमच्या गुंतवणूकीच्या मूल्याचा दररोज माग घेऊ शकता आणि सर्वात उत्तम बाब ही आहे की तुम्ही अगदी 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करू शकता.

म्हणून क्रिकेटच्या एक महान फलंदाजाप्रमाणे, जो जास्त जोखीम न घेता स्कोर बोर्ड हलता ठेवण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही सुद्धा जास्त जोखीम न घेता किंवा तुमचे पैसे न अडकवता तुमच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करा. लक्षात ठेवा,तुमच्या पैशांवर तुम्ही कमावणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त टक्क्याच्या संख्येसोबत तुम्ही तुमच्या जीवनाच्या लक्ष्याच्या प्राप्तीकडे एक योगदान देता.

म्युच्युअल फंड गुंतवणूका बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजना संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

PhonePe Wealth Broking Private Limited | AMFI — रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर ARN- 187821

Keep Reading