PhonePe Blogs Main Featured Image

Investments

पैसे कमवण्याचा आणि कोट्याधीश बनण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या

PhonePe Regional|2 min read|02 August, 2021

URL copied to clipboard

लहान रकमेने का होईना लवकर गुंतवणूक करणे सुरु करा आणि कालांतराने मोठी संपत्ती जमा करा

प्रत्येकाचे श्रीमंत होण्याचे स्वप्न असते परंतु ते कसे पूर्ण करायचे याचा मार्ग बहुतेकांना माहिती नसतो. श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट्स नक्कीच नसले तरी नियमित गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे धैर्य व शिस्त असेल तर श्रीमंत बनणे नक्कीच शक्य आहे.

लहान लहान रकमेसोबत संयमाने गुंतवणूक करणे आणि चक्रवाढ व्याजाने पैसे मिळवण्यासाठी प्रयास करणे या साठीचा जादूचा मंत्र आहे.

चक्रवाढ व्याज म्हणजे काय?

हे अगदी सोपे आहे. कल्पना करा की तुम्ही प्रति वर्ष 8% दराने 100 रुपये गुंतवले, तर तुम्हाला वर्षाच्या अखेरीस आठ रुपये मिळतील. जर तुम्ही पुन्हा दुसर्‍या वर्षासाठी 100 रुपये पुन्हा त्याच 8% व्याज दरावर गुंतवल्यास तुम्हाला 8.64 रुपये मिळतील.अतिरिक्त 64 पैसे व्याज हे तुम्हाला मिळाले कारण तुम्ही व्याजावर व्याज मिळवले — म्हणून हे चक्रवाढ व्याज आहे.

तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक ठेवाल, तितके जास्त तुम्ही ‘चक्रवाढ व्याज’ कमवाल आणि दीर्घकालावधीनंतर, हे मोठ्या रकमेत जमा होईल — तुम्ही गुंतवणूक केलेल्या मुळ रकमेपेक्षा खूप मोठी रक्कम जमा होईल.

तुम्हाला किती किती बचत करणे आवश्यक आहे आणि तुम्ही सुरुवात कशी करू शकता?

तुमचा 30 वर्षाचा गुंतवणूक प्लान असेल (लवकर सुरुवात करण्याद्वारे), तर तुम्हाला दर महिन्याला फक्त 1300 रुपयांने गुंतवणूक सूरु करू शकता ज्यात दर वर्षी 10% द्वारे वाढ होईल.

जर तुम्ही 30 वर्षापेक्षा कमी कालावधीत कोट्याधीश होऊ इच्छिता तर तुम्ही जास्त गुंतवणूक करण्याची निवड करू शकता.

तुमचा कोट्याधीश होण्याचा प्रवास सुरु करण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असलेली महिन्याची गुंतवणूक रक्कम खालील सारणीत दाखवली आहे.

म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकींमधून 10% वार्षिक परतावा अपेक्षित असेल तर तुम्हाला 25 वर्षात 1 कोटी जमा करण्याचे ध्येय गाठायचे असले तर तुम्हाला दरमहा 3,200 रुपये गुंतवून सुरुवात करावी लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला गुंतवणुकीवर 12% रिटर्न हवा असेल आणि तुम्हाला 20 वर्षांत हा टप्पा गाठायचा असेल तर तुम्हाला दरमहा 5,400 रुपयांनी सुरुवात करावी लागेल.

तुमच्या कोट्याधीश होण्याचा प्रवास सुरु करण्यासाठी तयार आहात?

तुम्ही सुरुवात करण्याआधी कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे हे पुढे दिले आहे:

योग्य गुंतवणूक उत्पादने निवडा: तुमची किती जोखीम पत्करू इच्छिता त्याच्या आधारावर तुम्ही इक्विटी आणि डेब्ट या सारख्या मालमत्ता वर्गांमधील उत्पादनांमध्ये योग्य संयोजनासोबत गुंतवणूक सुरु करणे आवश्यक आहे आणि हे कठीण वाटल्यास, तुम्हाला अनुकूल असलेल्या जोखीमेनुसार तुम्ही आमच्या गुंतवणूक पर्याय मधून एकाची निवड करू शकता.

महिन्याची गुंतवणूक रक्कम ठरवा: तुम्ही निवड केलेले गुंतवणूक उत्पादन किंवा उत्पादनांच्या संयोजनाच्या (ॲग्रेसिव्ह, मॉडरेट, कंझर्व्हेटिव्ह) आधारावर आणि तुम्ही जितक्या वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छिता त्यानुसार तुम्ही तुमची सुरु करावयाची असलेली महिन्याची गुंतवणूक रक्कम ठरवू शकता.

एक शिस्तबद्ध दृष्टिकोण बाळगा: तुम्हाला (a) दर महिन्याला गुंतवणूक करण्याचा आणि (b) तुमच्या गुंतवणुकीत दर वर्षी 10% वाढ करण्याचा शिस्तबद्ध दृष्टिकोण बाळगणे आवश्यक आहे.

संयम ठेवा: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कितीही चढ-उतार आले तरी तुम्हाला तुमची गुंतवणूक तशीच ठेवायला हवी.

आता अजिबात वेळ दवडू नका! तुमच्या वैयक्तिक गुंतवणूक प्लॅनवर काम करा आणि कोट्याधीश बनण्याचा तुमचा प्रवास आजच सुरु करा.

*म्युच्युअल फंड गुंतवणूका बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजना संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

PhonePe Wealth Broking Private Limited | AMFI — रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर ARN- 187821

Keep Reading