PhonePe Blogs Main Featured Image

Investments

इमर्जन्सी फंडसह कोणत्याही आर्थिक अनिश्चिततेसाठी नियोजन करा

PhonePe Regional|2 min read|28 June, 2021

URL copied to clipboard

कोव्हीड-19 महामारीने आपल्याला अनेक प्रकारे प्रभावित केले आहे. या विषाणुने आपल्या वैयक्तिक आयुष्याला अमर्यादितपणे प्रभावित केले आहे, आपले आर्थिक आयुष्य सुद्धा या अनिश्चिततेमुळे प्रभावित झाले आहे. आपण अशा घटनांचे भाकित करू शकत नाही, पण आपण त्यासोबत येणाऱ्या अनिश्चिततेसाठी आर्थिक नियोजन नक्कीच करून ठेवू शकतो. हे करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे इमर्जन्सी फंड तयार करणे.

इमर्जन्सी फंड काय आहे?

आपल्याला भविष्यात आर्थिकदृष्ट्या प्रभावित करू शकणाऱ्या आकस्मिक घटनांसाठी आपल्या उत्पन्नामधील काही भाग वेगळा काढून ठेवण्याला इमर्जन्सी फंड म्हणता येईल. तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट का घालता किंवा कार चालवताना सीट बेल्ट का लावता कारण हे तुमचे गंभीररित्या दुखापत होण्यापासून संरक्षण करते. त्याचप्रकारे इमर्जन्सी फंड तुमचा आर्थिक संकटांत सरंक्षण करतो.

समजा आज तुम्ही तुमची भविष्यातील ध्येय जसे घर खरेदी करणे, तुमच्या अपत्याचे शिक्षण, इत्यादींसाठी गुंतवणूक करत आहात. अशावेळी महामारीसारखी एखादी स्थिती उद्भवल्यास तुम्हाला आर्थिक आणीबाणीच्या स्थितीची हाताळणी करण्यासाठी तुमच्या भविष्यातील ध्येयांसोबत तडजोड करावी लागण्याची मोठी शक्यता उद्भवू शकते. पण तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असल्यास, तुम्ही अशाप्रसंगी सुरक्षित राहू शकता कारण हा निधी तुमच्या भविष्यातील योजनांना प्रभावित न करता तुम्हाला अनियोजित खर्चांची हाताळणी करण्यासाठी मदत करेल.

पुढे काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्हाला तुमचा इमर्जन्सी फंड तयार करण्याची सुरुवात करण्यासाठी मदत करतील:

  • तुमचा कमीत कमी 6 महिन्याचा खर्च इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवा. उदाहरणार्थ, जर तुमचा महिन्याचा खर्च ₹10,000 असेल, तर इमर्जन्सी फंड म्हणून किमान ₹60,000 बाजूला काढून ठेवा.
  • आपल्यापैकी बहुतेक लोकांना एवढी रक्कम एकाच वेळी गुंतवणे कदाचित शक्य होणार नाही, म्हणून तुम्ही मासिक SIP चा पर्याय घेऊ शकता आणि दर महिन्याला पैसे गुंतवून तुम्हाला हवी असलेली रक्कम जमा करू शकता.
  • तुम्हाला कोणतीही आर्थिक आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी हा इमर्जन्सी फंड वापरावा लागल्यास त्यास पुन्हा भरुन काढण्याची खात्री करा.
  • दर वर्षाला तुमच्या खर्चाचे निरीक्षण करा आणि तुमच्या वाढणाऱ्या खर्चाप्रमाणे तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये वाढ करा.

आता आपण समजला असाल की इमर्जन्सी फंड काय आहे, आता आपण पाहूया की ही रक्कम तुम्ही कुठे पैसे गुंतवू शकता.

लिक्विड फंड — आर्थिक आणीबाणीच्या स्थिती हाताळण्याचा एक मार्ग

आता आपल्याला समजले आहे की इमर्जन्सी फंड आपल्याला आर्थिक अनिश्चिततेची स्थिती हाताळण्यात कसा मदतीचा ठरू शकतो. पण ही रक्कम तुमच्या बचत खात्यात ठेवण्याऐवजी त्यास वेगळे ठेवणे इतके का महत्वाचे आहे? याचे उत्तर आहे कारण जर तुम्ही काही जास्तीचे पैसे तुमच्या बचत खात्यात ठेवले तर त्याचा वापर काही इतर खर्चासाठी केला जाऊ शकतो. म्हणून त्यास वेगळे इमर्जन्सी फंड म्हणून गुतंवल्यास तुम्ही त्यास फक्त आर्थिक आणीबाणीच्या स्थितीसाठी म्हणून निराळे ठेवू शकता आणि त्यास कोणत्याही इतर खर्चासाठी काढणार नाही.

इमर्जन्सी फंड तयार करण्याचा अजून एक मार्ग आहे लिक्विड फंड्स मध्ये गुंतवणूक करणे. लिक्विड फंड्स हा म्युच्युअल फंडचा एक प्रकार आहे जो कमी कालावधीच्या गुंतवणुकीसाठी बनला आहे आणि हे तुमच्या बचत खात्यासाठीचा पर्याय म्हणून कार्य करू शकतात. हे फंड्स शेयर बाजारात गुंतवणूक करत नाहीत पण तुमचे पैसे सुरक्षित साधनांमध्ये जसे सरकारी आणि बँक सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जातात.

लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे पुढीलप्रमाणे फायदे आहेत:

  • बचत खात्यापेक्षा संभाव्य जास्त चांगला रिटर्न
  • कोणताही लॉकिंग कालावधी नाही^
  • कोणत्याही किमान बॅलेन्सची आवश्यकता नाही
  • ₹100 इतक्या कमी रकमेपासून गुंतवणूक करा
  • ₹50,000* पर्यंत रकमेचे तत्काळ पैसे काढणे

लिक्विड फंड्समधील तुमचे पैसे सहजपणे उपलब्ध होतात आणि त्याद्वारे बचत खात्यापेक्षा संभाव्यतः चांगले रिटर्न मिळवता येऊ शकतात, त्यामुळे त्याचा वापर इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो

आर्थिक अनिश्चिततेपासून तुमच्या भविष्याच्या ध्येयांच्या संरक्षणासाठी आजच तुमचा इमर्जन्सी फंड तयार करा.

अस्वीकरण:

^ लिक्विड फंडमध्ये कोणताही लॉक-इन कालावधी नसतो पण तुम्ही तुमचे पैसे 1 दिवसात, 2 दिवसांत, 3 दिवसांत, 4 दिवसांत, 5 दिवसांत आणि 6 दिवसांत काढले तर अगदी अल्प अनुक्रमे 0.007%, 0.0065%, 0.006%, 0.0055%, 0.005% आणि 0.0045% चे एक्झिट लोड लागू होते.

* एका दिवसात तुम्ही तुमच्या गुंतवणूक रक्कमेमधून 90% पर्यंत रक्कम किंवा ₹50,000, जे काही कमी असेल, काढू शकता.

म्युच्युअल फंड गुंतवणूका बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजना संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

Keep Reading