PhonePe Blogs Main Featured Image

Investments

जोखीम आणि रिटर्न — एकाच नाण्याच्या दोन बाजू

PhonePe Regional|3 min read|26 May, 2021

URL copied to clipboard

गुंतवणूक करताना गणना केलेली जोखीम घेऊन तुम्ही तुमच्या संपत्ती निर्माणाच्या प्रवासात मोठी मजल मारू शकता.

अनेक लोकप्रिय सामाजिक संदर्भ जसे सिनेमा आणि पुस्तकांचा, आयुष्यातील जोखीमीच्या भुमिकेचे नाटकीय रुपांतर करण्याचा कल असतो. तथापि गुंतवणूकीत त्याची भूमिका निर्विवाद आहे. तुम्ही गुंतवणूक करताना गणना केलेली जोखीम घेतल्यास संपत्ती निर्माणाच्या तुमच्या प्रवासात लांबपर्यंत जाऊ शकता. खरं तर, फक्त “सुरक्षित” उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे दीर्घकालीन दृष्टीकोनातून प्रत्यक्षात अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

सुरक्षित गुंतवणूक खरोखर एक सुरक्षित पर्याय आहे?

बरेच गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक बचत खात्यात किंवा फिक्स डिपॉझिट स्वरूपात करतात कारण तो एक सुरक्षित पर्याय समजला जातो आणि त्याद्वारे एक निश्चित रिटर्न प्राप्त होतो. तथापि, या सुरक्षित गुंतवणूकांमध्ये समाविष्ट असलेली एक जोखीम आहे : चलनवाढीची जोखीम

चलनवाढीच्या जोखीम अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण घेऊया : असे म्हणूया की 5 वर्षापूर्वी, तुम्ही मसाला डोसा खाण्यासाठी ₹30 रुपये देत होता पण आता तुम्हाला त्याच समान मसाला डोस्यासाठी ₹45 द्यावे लागतात. याचा अर्थ 5 वर्षात, मसाला डोशाची किंमत 8% पेक्षा जास्त वाढली आहे. ही कालांतराने होणारी चलनवाढ किंवा किंमतीतील वाढ आहे.

गुंतवणूकीच्या तुल्यभावाने याचे स्पष्टीकरण करताना असे म्हणूया की तुम्ही 5 वर्षापूर्वी तुम्हाला 6% प्रति वर्ष दराने रिटर्न देणाऱ्या एक खूप सुरक्षित गुंतवणूक पर्यायामध्ये ₹30 गुंतवले. आज त्याचे मुल्य ₹40 आहे. जरी तुम्हाला ₹10 चा नफा झाला असला तरी तुम्हाला ₹5 कमी पडत आहेत. ही तुमच्या गुंतवणूकीवर असलेली चलनवाढीची जोखीम आहे.

जरी प्रत्येक गुंतवणूकदाराने काही गुंतवणूका सुरक्षित गुंतवणूक उत्पादनांमध्ये करणे गरजेचे असले, तरी तुमची सर्व गुंतवणूक अशा उत्पादनांमध्ये केल्यास गुंतवणूक केलेल्या पैशाचे खरे मुल्य कमी होण्याची नेहमी शक्यता असते. दीर्घकाळातील संपत्ती निर्माणासाठी, मोजणी केलेल्या जोखीम घेणे महत्वाचे असते अन्यथा तुम्हाला भविष्यात तुमच्या आर्थिक लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांपेक्षा कमी पैसे प्राप्त होऊ शकतात. तुमचे दिर्घकालीन आर्थिक लक्ष्य प्राप्त करण्यासाठी फक्त “सुरक्षित” उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे फलंदाजाने चौकार किंवा षटकार मारण्याची जोखीम न उचलता शतक बनवण्याची आशा करण्यासारखे आहे.

चला उच्च जोखीम आणि उच्च रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये काही पैसे टाकून गुंतवणूकदार कसे लाभ मिळवू शकतात ते पाहूया.

जोखीम विरुद्ध रिटर्न : योग्य समतोल राखणे

जोखीम आणि रिटर्न बहुतेकवेळा एकाच दिशेने जातात, म्हणजे जितकी जास्त जोखीम, तितकी जास्त रिटर्नची क्षमता, पण आपण बोलत असलेली ही जोखीम काय आहे? आपण बाजारपेठीतील हालचालींनुसार तुमच्या गुंतवणूकीत होणारे चढ उतार या जोखीम बाबत बोलतो आहोत. कमी कालावधीत, हे चढ आणि उतार जास्त वरचेवर असू शकतात पण दीर्घकालावधीत तुमच्या गुंतवणूकीत उच्च दराने वाढ होण्याची क्षमता असते.

तुम्ही सहन करू शकत असलेली जोखीम, तुमचे लक्ष्य आणि गुंतवणूक कालावधी या आधारावर गणना केलेली जोखीम घेणे महत्त्वाचे आहे. या घटकांचा वापर करून तुम्ही जोखीम आणि रिटर्न यांच्यामध्ये योग्य समतोल राखू शकता.

उच्च रिटर्नची क्षमता असलेली गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक पर्यायाच्या तुलनेत संपत्ती निर्माणामध्ये तुम्हाला कशी मदत करू शकते यासाठी एक उदाहरण पाहूया:

चला असे म्हणूया की तुम्ही वयाच्या 25 वर्षापासून गुंतवणूक करणे सुरू केले आणि तुम्हाला वयाच्या 50 वर्षांपर्यंत 1 कोटीची संपत्ती जमवायची आहे. तुम्ही हे लक्ष्य मिळवण्यासाठी अनेक मार्गांनी जाऊ शकता : उदारहरणार्थ, तुम्ही सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता जो तुम्हाला 6% चा रिटर्न देऊ करतो किंवा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता जो तुम्हाला समजा 12% चा (यात अल्प कालावधीचे चढ उतार यात येतात) उच्च रिटर्न देऊ शकतो. दोन्ही प्रकारात तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल हे पुढे दिले आहे:

निरीक्षणे:

  • या उदाहरणातून असे समजते की सुरक्षित गुंतवणूक पर्याय जो तुम्हाला 6% प्रति वर्ष दराने रिटर्न देतो, त्याद्वारे वयाच्या 50 व्या वर्षी ₹1कोटी मिळवण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला ₹15,000 रुपये गुंतवावे लागतील.
  • जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता जो तुम्हाला 12% प्रति वर्ष दराने रिटर्न देतो, तर तुम्हाला ₹1 कोटी रकमेचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रति महिना फक्त ₹6,000 रुपये गुंतवावे लागतील. ही रक्कम तुमचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक पर्यायामध्ये टाकाव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा लक्षणीय स्वरूपात कमी आहे

आता तुम्हाला कळले आहे की काही जोखीम उचलल्याने तुम्हाला दीर्घकाळात कसा फायदा होऊ शकतो. पुढे काही महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत जे गुंतवणूक करताना तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे:

  • दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा — दीर्घकालावधीत, इक्विटी फंड सारख्या काही जोखीम असलेल्या गुंतवणूका पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत अधिक चांगला रिटर्न देतात. म्हणून जितकी दीर्घकाळासाठी गुंतवणूक कराल तितकी ती चांगली राहील.
  • सातत्य महत्त्वाची आहे — मासिक SIP च्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करणे चालू ठेवा, कारण हा दीर्घकालावधीत संपत्ती निर्माणाचा सोयीचा पर्याय तर आहेच तसेच यामुळे अल्प कालावधीतील बाजारपेठेच्या उतार आणि चढावाची जोखीम सुद्धा कमी करण्यात मदत होते.
  • गुंतवणूकीत विविधता ठेवा — तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स जसे इक्विटी फंड डेब्ट फंड मध्ये तुमची गुंतवणूक विभाजित करून, तुमच्या गुंतवणूकीस तुम्ही सहन करू शकणाऱ्या जोखीम बरोबर आणू शकता याबाबत अधिक माहिती इथे पाहा.

मोजमाप केलेल्या जोखीम घेण्यापासून स्वतःला रोखू नका कारण दीर्घकालावधीत तुमच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी त्या तुम्हाला मदत करतील.

म्युच्युअल फंड्स बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन असतात. कृपया गुंतवणूकीपूर्वी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

Keep Reading