Investments
तुमची गुंतवणूक शैली समजून घ्या: ही 20–20 आहे, ODI आहे कि टेस्ट मॅच आहे?
PhonePe Regional|2 min read|20 June, 2021
तुम्ही एक क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्ही हे समजू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची रणनीती ठरवावी लागते. तुमची गुंतवणूक रणनीती ठरवताना सुद्धा समान दृष्टीकोन बाळगण्याची गरज आहे.
चला असे समजू की तुम्ही एका टीमचे कप्तान आहात, तुम्ही टॉस जिंकून मॅच सुरू करता आहात आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेता. तर तुम्ही खेळत असलेल्या प्रत्येक प्रकारच्या मॅचसाठी, काही घटक आहेत जे इतरांपेक्षा तुमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहेत.
पुढे एक उदाहरण दिले आहे:
तुम्ही कोणत्या प्रकारचा सामना खेळत आहात यावर अवलंबून तुम्ही तुमच्या फलंदाजीची रणनीती ठरवाल. 20–20 सामन्यांसाठी फलंदाजी करताना विकेट गमावण्याची चिंता न करता जास्त धावांचा दर गाठायला तुमचे प्राधान्य असेल. तर एकदिवसीय सामन्यात (ODI) आपणास धावाचा दर आणि विकेट यांच्यामध्ये संतुलन राखण्याचे प्राधन्य असेल आणि कसोटी सामन्यादरम्यान तुम्ही उच्च धावांच्या दरावर नव्हे तर विकेट टिकवण्यावर अधिक लक्ष केंद्रित कराल.
पण हे तुम्हाला आधीच माहिती आहे. तर या सगळ्याचा संबंध तुमच्या गुंतवणूक शैलीच्या प्राथमिकतेशी कसा जोडता येईल?
जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये नवीन असाल,तर तुमच्या गुंतवणुकीसाठी योग्य प्रकारचा म्युच्युअल फंड निवडणे हे काहीसे यासारखेच शकते. तुम्ही कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी ते मोठ्याप्रमाणात तुमच्या गुंतवणूक गरजांवर अवलंबून असते.
उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही कमी कालावधीसाठी पैसे गुंतवता,तेव्हा तुमचे लक्ष कमी जोखीम असलेल्या आणि रिटर्नमध्ये सातत्य देणाऱ्या फंडवर केंद्रीत असायला हवे. तथापि, दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करताना, तुम्ही अशा फंडमध्ये पैसे गुंतवू शकता ज्यात कमी कालावधीत काही चढ उतार होत असतात परंतू त्यात तुम्हाला दीर्घ कालावधीत उच्च रिटर्न मिळवून देण्याची क्षमता आहे. सोप्या भाषेत, एक फलंदाज म्हणून, तुम्ही ज्या प्रकारचा सामना खेळत आहात त्यानुसार तुमच्या बॅटिंगची रणनीती बदला. तसेच, तुमच्या गुंतवणूक गरजांच्या आधारावर तुमची गुंतवणूक निवड करा.
अधिक समजण्यासाठी पुढे एक छोटेसे उदाहरण दिले आहे.
जसे की तुम्ही पाहू शकता, जसजसा तुमचा गुंतवणूकीचा कालावधी वाढत जातो किंवा जोखमीचे प्राधान्य बदलून कमी ते उच्च होते तुमचा संभाव्य रिटर्नमध्ये सुद्धा वाढ होते. हे दर्शवते की जर तुम्ही फंडच्या कार्यप्रदर्शनातील चढ उतारांसाठी तयार असाल, तर दीर्घ कालावधीत प्राप्त होणारा रिटर्न जास्त उच्च राहतील, आणि रिटर्नची संभाव्यता सुद्धा उच्च राहील.
म्हणून, जेव्हा तुम्ही तुमची पहिली गुंतवणूक कराल तेव्हा तुमच्या गुंतवणुकीच्या ध्येयाच्या अनुसार तुमची गुंतवणूक शैली निवडण्याची खात्री करा.
अस्वीकरण:म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे माहिती दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.