PhonePe Blogs Main Featured Image

Life @ PhonePe

PhonePe ची काँम्पेनसेशन फिलॉसॉफी

PhonePe Regional|2 min read|29 April, 2021

URL copied to clipboard

जानेवारी 2021, मध्ये, आम्ही PhonePe स्टॉक ऑप्शन योजना लाँच केली, ज्याने PhonePe कर्मचारीस कंपनीच्या काही भागांचा मालक होण्याची संधी दिली. PhonePe वर 200 मिलियन डॉलरच्या प्लॅनद्वारे सर्व 2,200 कर्मचारींना स्टॉक पर्यायाचे वाटप करून कंपनीतील प्रत्येकास त्यांच्या यशाचा लाभ दिला.

PhonePe ची स्टॉक पर्याय योजना कर्मचाऱ्यांचा सहयोग, दीर्घकालीन लक्ष्य आणि संघटनेचा विचार प्रथम करण्याच्या वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेल्या आमच्या परतफेड तत्वज्ञानाचा (काँम्पेनसेशन पॉलिसीचा) एक महत्वाचा घटक आहे. PhonePe तंत्रज्ञानाचा वापर परिवर्तनात्मक शक्ती म्हणून करण्याच्या मिशनवर आहे जे प्रत्येक भारतीयासाठी वित्तीय समावेश प्रत्यक्षात आणत आहे. आम्ही मानतो की जेव्हा पैसे आणि सेवा मुक्तपणे उपलब्ध असतात, तेव्हा प्रत्येकाची प्रगती होते. एक मूलभूत मूल्य जे या समावेशास सक्षम करते ते आहे सकारात्मक विघटन — कल्पना ही आहे की जस जसे मूल्य वाढेल आणि बाजारपेठ विस्तारीत होईल, आम्ही प्रत्येकासाठी संधी विस्तारीत करू, यशाचे एक सकारात्मक चक्र तयार करू. हेच मूलभूत तत्व आपल्या कंपनी अंतर्गत वापरतो आहोत.

आम्ही समावेश आणि विपुलतेच्या मानसिकतेवर आधारित संस्कृती कंपनीत तयार करण्यास वचनबद्ध आहोत, जिथे प्रत्येक संवाद सकारात्मक निकाल घेऊन येईल. संस्थेचे यश कंपनीमधील प्रत्येक व्यक्तीच्या यशावर आधारित आहे. जसजसा व्यक्तीचा विकास होतो आणि ते अधिक प्रभाव तयार करतात तसतशी ती संस्थेच्या अतिरिक्त मूल्यामध्ये भाषांतरित होते. जसजशी संस्था अधिक मूल्य निर्माण करते, तसतशी ती प्रत्येक कर्मचार्‍यासाठी अधिक फायद्यामध्ये भाषांतरित होते. त्यामुळे प्रत्येकासाठी बरेच काही असल्यामुळे अंतर्गत स्पर्धां करण्याची गरज राहत नाही.

आमची काँम्पेनसेशन यंत्रणा या दृष्टीकोनाशी संरेखीत आहे, त्यामुळे त्याने बहुतेक पोस्टसाठी असलेल्या वैयक्तिक कामगिरीनुसार वेतन हा प्रघात मोडीत काढला आहे. त्याऐवजी, प्रत्येकाला दीर्घकालीन संघटनात्मक वाढीसाठी गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ESOP वापरतो. सर्व स्तरांकरिता किमान 5000 डॉलर्सवर ESOP करून आम्ही संस्थेतील प्रत्येक कर्मचार्‍यास संपत्ती निर्मितीच्या संधीमध्ये भाग घेण्यास सक्षम केले आहे ज्याने त्यांना — करत रहा पुढे जात रहा या घोषवाक्याप्रमाणे काम करण्यात मदत केली आहे. तुमची भूमिका अधिक वरिष्ठ झाल्यावर, ESOP कर्मचार्‍यांच्या वार्षिक प्रतिपूर्तीचा एक भाग आहेत, त्यांच्या प्रतिपूर्तीचा एक मोठा भाग कंपनीच्या यशाशी जोडलेला आहे. हे सर्वांना कंपनीस प्रथम स्थान देण्यास प्रोत्साहित करते. कंपनीचे यश हे त्यांचे यश आहे.

आमच्या लोकांना आम्ही देत असलेला शेअर्सचा प्रस्ताव एक शिकण्याची, वाढण्याची आणि प्रभाव पाडण्याची संधी आहे. आम्ही लोकांना हुशार लोकांसोबत जवळून काम करण्याची संधी ऑफर करतो जे त्यांच्या कामाप्रति अत्यंत समर्पित असतात आणि आजकालच्या काही जटिल समस्यांचे निराकरण करण्यासाठी भागीदार होऊ शकतात. आम्ही एक अनौपचारिक वातावरण, पारदर्शकता आणि सोपी संस्थेची रचना ऑफर करतो जे प्रत्येकास चांगले काम करण्यासाठी आणि चांगला परिणाम देण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करते. स्टॉक पर्याय योजना हे सुनिश्चित करते की येथे संपत्ती निर्माण करण्याची आणि PhonePe च्या विकासाच्या कथेत सहभागी होण्याची देखील संधी आहे!

द्वारा मनमीत संधू, HR प्रमुख

Keep Reading