PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

नोकरीच्या फसव्या जाहिराती ओळखण्याचे 5 मार्ग

PhonePe Regional|3 min read|12 June, 2023

URL copied to clipboard

कल्पना करा की तुम्ही एका नोकरीच्या शोधात आहात आणि एका नोकरी भरती करणाऱ्या रिक्रुटरने तुम्हाला कॉल करून तुम्ही नेहमी करू इच्छित असलेल्या तुमच्या स्वप्नातल्या नोकरीबाबत तुम्हाला सांगीतले ज्यात आकर्षक पगार, विदेशात प्रवासाच्या संधी सुद्धा आहेत तर अशी ऑफर तुम्ही कधीच नाकारू शकणार नाही. काहीवेळ बोलल्यानंतर रिक्रुटर तुम्हाला एक लिंक पाठवून तुमचे वैयक्तिक तपशील भरण्यास सांगेल. नंतर रिक्रुटर तुम्हाला पुष्टीकरणाचा कॉल करेल आणि तुम्हाला विमान प्रवासाचा एक भाग आणि रीलोकेशन शुल्काची रक्कम म्हणून ₹50,000 भरण्यास सांगेल. यावर तुम्ही पेमेंट करण्याचा निर्णय घेता आणि पुढील सूचनांसाठी आतुरतेने वाट पाहाता. पण अचानक, तुम्हाला आढळते की त्या भरती करणाऱ्या रिक्रुटरशी तुम्ही संपर्क साधण्यात असमर्थ होत आहात, आणि तुमच्या हातात नोकरी पण नाही. अशा घटना देशातील हजारो लोकांसोबत* घडत आहेत.

दूरस्थ नोकऱ्यांमधील वाढीसोबत उच्च बेरोजगारी दरामुळे नोकरी घोटाळ्याच्या मामल्यांची संख्या वाढते आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सरासरी बेरोजगारीचा दर 7.85% आहे. यामुळे फसवणूक करणाऱ्यांना निष्पाप नोकरी शोधणारे सापडतात ज्यांचे नोकरीच्या नितांत गरजेमुळे पिळवणूक केली जाऊ शकते.

फसवणूक करणारे आकर्षक पद आणि पगार असलेल्या नोकऱ्यांची जाहिरात करून किंवा SMS किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे नकली अर्ध-वेळ नोकरीच्या लिंक शेअर करून पैसे कमवतात. एकदा तुम्ही नोकरीसाठी साइन अप केल्यावर, तुम्हाला पहिले काम पूर्ण झाल्यावर जास्त रक्कम देण्याचे वचन देऊन पेमेंट करण्यास सांगितले जाते. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी ते तुमच्या खात्यात लहान रक्कम देखील क्रेडिट करू शकतात. अखेरीस, काम झाल्यावर ते स्वतःला तुमच्यापासून दूर ठेवतील आणि तुम्ही त्यांच्याशी पुन्हा कधीही संपर्क साधू शकणार नाही.

व्यक्ती नोकरीसाठी तुमची फसवणूक करू पाहत आहे हे सांगणारे 5 संकेत:

इथे काही 5 सर्वात सामान्य प्रकार दिले आहेत ज्याद्वारे फसवणूक करणारे निष्पाप नोकरी शोधणाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर या संकेताकडे लक्ष द्या आणि खोट्या नोकरीच्या जाहिरात सूचीपासून सुरक्षित रहा.

  1. संवेदनशील माहितीची विचारणा: जर एखादा नोकरी भरतीसाठीचा रिक्रूटर तुमचे नाव, जन्मतारीख किंवा घराचा पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती विचारत असेल, तर तुम्ही खात्री बाळगू शकता की तो तुमचे बँक खाते/क्रेडिट कार्डमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणारा फसवा व्यक्ती आहे. सामान्यतः, रिक्रूटर तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी आणि व्यावसायिक अनुभवाविषयी मूलभूत माहिती विचारतात आणि नंतर नियोक्त्यासोबत मुलाखती सेट करतात, त्यानंतर ऑफर लेटर जारी केले जाते. सहसा नोकरीत रुजू होण्याच्या वेळी कंपनी सत्यापन आणि रेकॉर्डसाठी पार्श्वभूमीच्या माहितीची विनंती करते.
  2. उद्योग मानकांशी सुसंगत नसलेल्या अत्यंत उच्च पगाराची ऑफर: नोकरी जाहिरातसूची अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि तुम्हाला घोटाळ्यात आकर्षित करण्यासाठी थोड्या कामासाठी उच्च पगाराची ऑफर दिली जाते. यामध्ये मालवेअर असलेली लिंक असू शकते जी तुमच्या डिव्हाइसवरील गोपनीय माहितीमध्ये प्रवेश करू शकते. वैकल्पिकरित्या, करप्ट लिंकच्या जागी, फसवणूक करणारे वैयक्तिक तपशीलांची विनंती करू शकतात आणि संवेदनशील माहिती सामायिक करण्यासाठी तुम्हाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात.
  3. नोकरीच्या वर्णनात त्रुटी: खोट्या जॉब पोस्टिंगमध्ये काही सहज नजर चुकवल्या जाणाऱ्या व्याकरणाच्या किंवा शब्दलेखनाच्या चुका असू शकतात जसे की कंपनीचे नाव PhonePe.com च्या ऐवजी Phonepay.com असेल. तसेच, कंपनीचा बॅकअप घेण्यासाठी कोणतीही कायदेशीर वेबसाइट नसलेली अस्पष्ट जॉब वर्णने हे सूचित करतात की तुम्ही खोटी नोकरीची जाहिरात सूची वाचत आहात.
  4. तत्काळ नोकरीची ऑफर: जर रिक्रूटरने तुमची पार्श्वभूमी पडताळणी किंवा मुलाखतीशिवाय कॉल केल्यानंतर काही मिनिटांतच नोकरी ऑफर केली, तर संपर्क करणारी व्यक्ती फसवणूक करणारी असण्याची दाट शक्यता असते. एक अस्सल भर्ती करणारा रिक्रूटर उमेदवार कंपनीतील भूमिकेत बसतो याची खात्री करेल आणि त्याउलट, मुलाखती घेऊन आणि उद्योग मानकांनुसार पगार ऑफर करून योग्य परिश्रम घेईल.
  5. कमीशनची मागणी: फसवणूक करणारा कधीकधी संस्थेतील कायदेशीर व्यक्ती किंवा नोकरी सल्लागार असल्याचे म्हणून नोकरी ऑफर करण्यासाठी कमिशन म्हणून पैसे मागतो. तुम्ही नोकरीच्या अपेक्षेने रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर, फसवणूक करणारे सर्व संप्रेषण वाहिन्या तोडतील आणि नोकरी किंवा पैसे कधीच परत मिळणार नाहीत. लक्षात ठेवा, तुम्हाला नोकरीसाठी भरती करणाऱ्या रिक्रूटरला कधीही पैसे द्यावे लागत नाहीत.

नोकरीतील फसवणूक कसे टाळावे

  • संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका, विशेषत: जेव्हा त्या लिंक त्यावर कोणतीही चेतावणी चिन्हे किंवा काही प्रकारच्या फायद्यांसह — आर्थिक किंवा अन्यथा येतात.
  • नोकरी कायदेशीर आहे याची खात्री नसल्यास कॉलबॅक घेऊ नका.
  • क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, कार्ड एक्सपायरी डेट, CVV, OTP, इत्यादी गोपनीय माहिती PhonePe अधिकार्‍यांसह, कधीही कोणाशीही शेअर करू नका.
  • शेवटी, तक्रार करा आणि ब्लॉक करा. लक्षात ठेवा, या नंबरची तक्रार करणे आणि ब्लॉक करणे सर्वात योग्य आहे.

तुम्ही नोकरी घोटाळ्याचे बळी ठरल्यास तुम्ही काय करावे

जर तुम्हाला PhonePe वर नोकरीसाठी एखाद्या घोटाळेबाजाने फसवले असेल तर, तुम्ही पुढील मार्गांनी ताबडतोब तक्रार दाखल करू शकता:

  1. PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि “have an issue with the transaction/व्यवहारात समस्या आहे” पर्यायाच्या अंतर्गत एक समस्या दाखल करा.
  2. PhonePe ग्राहक सेवा संपर्क क्रमांक: तुम्ही समस्येचा रिपोर्ट करण्यासाठी PhonePe च्या ग्राहक सेवेशी 80–68727374 / 022–68727374 वर फोन करून संपर्क साधू शकता, यानंतर ग्राहक सेवा प्रतिनिधी एक तिकीट दाखल करतील आणि तुमच्या समस्येसाठी मदत करतील.
  3. वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चा वेबफॉर्म, https://support.phonepe.com/ वापरून एक तिकीट सुद्धा दाखल करू शकता
  4. सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून फसवणूकीच्या घटनांचा रिपोर्ट करू शकता

Twitter — https://twitter.com/PhonePeSupport

Facebook — https://www.facebook.com/OfficialPhonePe

5. तक्रार: विद्यमान गाऱ्हाण्यावरील तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉग इन करू शकता आणि आधी दाखल केलेला तिकीट आयडी शेअर करा.

6. सायबर सेल: शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ येथे ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राईम सेल हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधा.

महत्त्वाची सूचना — PhonePe तुम्हाला कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. ज्या ई-मेल phonepe.com डोमेन वरून आलेल्या नाहीत अशा सर्व PhonePe पासून असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

*स्त्रोत: https://www.hindustantimes.com/technology/how-to-detect-fake-job-offers-modi-govt-shares-checklist-you-must-follow-101665639723089.html

#स्त्रोत: https://www.outlookindia.com/national/robbed-of-money-hope-and-hard-work-online-job-scams-is-trapping-the-indian-youth-amidst-job-dearth-news-253665

Keep Reading