PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट फसवणूक

PhonePe Regional|2 min read|19 December, 2022

URL copied to clipboard

क्रेडिट कार्ड बिल पेमेंटचा समावेश असलेले पेमेंट फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. जे ग्राहकांचा डिजिटल व्यवहाराचा अनुभव आणि विश्वास प्रभावित करत आहे. तथापि, तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागरूकता बाळगल्यास, अशा फसवणूक शोधून आणि प्रतिबंधित केल्या जाऊ शकतात.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट फसवणुकीत, फसवणूक करणारे भामटे त्यांच्या खात्यावर पीडित व्यक्तीस बँक खात्यातील पैशांचा वापर करून क्रेडिट कार्ड पेमेंट करण्यासाठी भुलवतात. फसवणूक करणारे पीडित व्यक्तींना त्यांच्या क्रेडिट कार्डचे तपशील त्यांनी पाठवलेल्या लिंकवर जोडण्यास सांगतात आणि नंतर त्यांच्या क्रेडिट कार्डचे तपशील वापरून फसवणूक करतात.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट फसवणुकीचे अनेक सामान्य संकेत आहेत ज्याच्याद्वारे पीडितास फसवले जाते.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंट फसवणुकीचे सामान्य संकेत

प्रसंग 1: फसवणूक करणारे स्वतःला लष्कराचे जवान असल्याचे सांगतात आणि त्यांना मेडिकल, हॉटेल आणि इन्श्युरन्स सेक्टरमधील सेवा हव्या आहेत असे ते सांगतात आणि एकदा सावज अडकल्यावर ते ग्राहकांना ताबडतोब पेमेंट पद्धत सेट करण्यास सांगतात. विशेषकरून सांगायची गोष्ट म्हणजे, काही प्रकरणात ग्राहकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी लष्कराचे जवान असल्याचे सांगणारी फसवी व्यक्ती लष्कराच्या वेषात व्हिडिओ कॉलवर सुद्धा असते. अशाप्रकारे लक्ष्य केले जाणारे ग्राहक सामान्यतः व्यावसायिक व्यक्ती असतात.

प्रसंग 2: फसवणूक करणारे स्वत:ला दूरचे नातेवाईक/कुटुंब मित्र किंवा व्यावसायिक असल्याचे म्हणून चित्रित करतात आणि ग्राहकांना त्यांच्या कार्डचे तपशील फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यावर जोडण्यासाठी पटवून देतात. तसेच ते फोन कॉलवर ग्राहकांना प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्याचे नाटक देखील करतात. या परिस्थितीत लक्ष्यित केलेले ग्राहक हे बहुतेक असे लोक असतात जे वरचेवर PhonePe वापरत नाहीत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे संपूर्ण संभाषण आणि पेमेंट Whatsapp कॉल / व्हिडिओ कॉलद्वारे होते आणि हे फसवणूक करणारे सर्वकाही अस्सल असल्याचे भासवतात त्यासाठी ते अनेक कॉल्सद्वारे युजरचा विश्वास संपादन करतात.

क्रेडिट कार्ड बिल फसवणुकपासून सुरक्षित कसे राहायचे:

  • नेहमी लक्षात ठेवा PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कधीच ‘पेमेंट’ करावे किंवा तुमचा UPI पिन टाकावा लागत नाही. कृपया ‘Pay/पेमेंट करा’ बटन दाबण्यापूर्वी किंवा तुमचा UPI पिन टाकण्यापूर्वी तुमच्या PhonePe ॲपवर दर्शवलेला व्यवहाराचा मॅसेज काळजीपूर्वक वाचा.
  • कोणीतरी तुम्हाला कोणत्याही नवीन पेमेंट “पद्धती/प्रक्रिया” बाबत सांगत असेल तर सावध व्हा आणि हे लक्षात घ्या की एक लष्करी व्यक्तीची पेमेंट यंत्रणा भारतातील कोणत्याही इतर पेमेंट पद्धतीप्रमाणेच समानरित्या काम करते.

फसवणूक करणाऱ्याने तुम्हाला संपर्क केल्यास काय करायला हवे?

  • ताबडतोब तुमच्या जवळच्या सायबर-सेल गुन्हा शाखेकडे याची नोंद करा आणि पोलिसांना संबंधित तपशील (फोन नंबर, व्यवहार तपशील, कार्ड नंबर, बँक नंबर, बँक खाते इ.) देऊन FIR दाखल करा. याशिवाय, तुम्ही ऑनलाइन सायबर तक्रार दाखल करण्यासाठी पुढील लिंकवर- https://cybercrime.gov.in/ टॅप करू शकता किंवा 1930 वर सायबर सेल पोलीसकडे तक्रार करू शकता.
  • तुम्हाला PhonePe द्वारे संपर्क केला गेला होता तर तुमच्या PhonePe ॲपवर लॉगिन करा आणि ‘Help/मदत’ विभागावर जा. तुम्ही फसवणुकीच्या घटनेचा रिपोर्ट ‘Account security issue/ Report fraudulent activity’ अंतर्गत करू शकता. याशिवाय तुम्ही support.phonepe.com वर लॉगिन करू शकता.

Keep Reading