PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

फसवणुकीचा रिपोर्ट करण्यासाठीचे चॅनल्स — ज्याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे!

PhonePe Regional|2 min read|01 December, 2022

URL copied to clipboard

फसवणुकीची घटना घडल्यावर जेव्हा फसव्या संपर्काचे बळी PhonePe ग्राहक सेवेशी संपर्क साधतात तेव्हा फसवणूक विवाद उद्भवतो.

फसवणूक घडल्यास त्याबाबत विवाद दाखल करण्याचे विविध मार्ग PhonePe वर आहेत, यात समावेश आहे:

  1. PhonePe ॲप
  2. PhonePe चा ग्राहक साहाय्यता नंबर
  3. वेबफॉर्म सबमिशन
  4. सोशल मीडिया
  5. तक्रार

तुम्ही PhonePe ॲपद्वारे तक्रार कशी दाखल करू शकता याबाबत पुढे दिले आहे:

  • PhonePe ॲपवर लॉगिन करा
  • होम स्क्रीनवरील उजव्या कोपऱ्यातील ”?” चिन्हावर क्लिक करून मदत विभागात जा
  • “व्यवहाराबाबत काही समस्या आहे” पर्यायावर क्लिक करा
  • पुढील पेजवर जा आणि “तुमच्या समस्येचा रिपोर्ट करा” पर्यायावर क्लिक करा
  • ॲपवर नंतर तुमच्या सर्व अलीकडील व्यवहारांची यादी दिसेल
  • ज्या व्यवहाराबाबत तक्रार दाखल करायची आहे त्या व्यवहाराची ग्राहकांनी निवड करावी
  • पुढे, ग्राहक ”मला फसव्या व्यक्तीकडून पेमेंट विनंती प्राप्त झाली” किंवा “मला फसव्या व्यक्तीकडून कॉल आला” यापैकी एकाची निवड करू शकतात
  • एकदा संबंधित पर्याय निवडल्यावर, PhonePe वर एक तिकीट तयार केले जाईल आणि विश्वास आणि सुरक्षा टीम त्याचे पुनरावलोकन करेल आणि कारवाई करेल

PhonePe ग्राहक सेवेच्या माध्यमातून विवाद दाखल करणे:

  • ग्राहक पुढील 080–68727374 / 022–68727374 नंबरचा वापर करून PhonePe ग्राहक सेवेकडे संपर्क साधू शकतात. एकदा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधल्यावर, आमचे साहाय्यता एजंट त्यानुसार तिकीट दाखल करतील.

वेबफॉर्म सबमीट करून विवाद दाखल करणे :

  • ग्राहक आमच्या वेबफॉर्म लिंक –https://support.phonepe.com/ चा वापर करून विवाद दाखल करू शकतात लिंक नंतर त्यांना रजिस्टर्ड फोन नंबर आणि कॅप्चा टाकण्यास सूचित करेल
  • क्रेडेन्शियल सादर केल्यावर, तुमच्या रजिस्टर्ड फोन नंबरवर पाठवलेला OTP टाकण्यास तुम्हाला सांगितले जाईल
  • एकदा तुमचे लॉगिन यशस्वीपणे झाल्यावर, ग्राहक, “एक फसवणूक किंवा अनधिकृत कृतीचा रिपोर्ट” करू शकतात
  • ग्राहकांनी संबंधित फसवणूक अहवाल पर्याय निवडल्यानंतर, त्यांना संपर्क साहाय्यता पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे व्यवहाराचे तपशील आणि दस्तऐवजे ग्राहक शेअर करू शकतात
  • फसवणूक व्यवहाराचे तपशील एकदा भरून सादर केल्यानंतर, एक तिकीट तयार केले जाईल
  • ग्राहक त्यांनी दाखल केलेल्या तिकीटावरील अपडेट पाहण्यासाठी या पोर्टलचा वापर करू शकतात

सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाद दाखल करणे :

  • ग्राहक आमच्या पुढील सोशल मीडिया हँडलद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकतात

Twitter — https://twitter.com/PhonePeSupport

Facebook –https://www.facebook.com/OfficialPhonePe

तक्रारीच्या माध्यमातून विवाद दाखल करणे :

  • हे पोर्टल आधीच दाखल केलेल्या तिकीटांवर तक्रार नोंदवण्यासाठी वापरले जाते
  • ग्राहक https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करून, त्यांनी आधीच दाखल केलेल्या तिकीटाचे आयडी शेअर करू शकतात

सायबर क्राइम पोर्टलच्या माध्यमातून विवाद दाखल करणे:

  • ग्राहक त्यांच्या फसवणुकीच्या विवादाच्या विरुद्ध जवळच्या सायबर गुन्हे शाखेत संपर्क साधू शकतात
  • ग्राहक पुढील लिंकवर टॅप करून ऑनलाइन सायबर तक्रार सुद्धा करू शकतात- https://cybercrime.gov.in/
  • याशिवाय ग्राहक 1930 नंबरवर सायबर सेल पोलिसांशी सुद्धा संपर्क करू शकतात

Keep Reading