PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

बनावट पेमेंट स्क्रीनशॉट्सला बळी पडू नये म्हणून काही मार्गदर्शक सूचना

PhonePe Regional|3 min read|23 August, 2023

URL copied to clipboard

स्क्रीनशॉट की स्कॅम शॉट? बनावट स्क्रीनशॉट फसवणूक ही व्यापार्‍यांची खरी डोकेदुखी आहे, खास करून भरपूर गर्दी असलेले फूड स्ट्रीट आणि जुना बाजार किंवा सारखी शेकडोंची गर्दी असलेली ठिकाणे. या ठिकाणांमध्ये पेमेंट मिळाल्याची खात्री करणे खूप आव्हानात्मक असू शकते, यामुळे भामट्या व्यक्तींना निष्पाप लोकांना फसवण्याची संधी मिळते.

बनावट स्क्रीनशॉट फसवणूक म्हणजे फसवणूक करणारा पेमेंट पाठवला गेल्याचा बनावट स्क्रीनशॉट तयार करतो. यामुळे पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि व्यापाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे असे दिसते.

ऑनलाइन पेमेंटचा अवलंब केल्याने रोख रक्कम हाताळणे, आर्थिक व्यवहार यासारख्या मोठ्या समस्यांवर लक्ष ठेवणे सोपे जाते. मात्र त्याचबरोबर, व्यवहारात फसवणूक व आर्थिक नुकसानीला देखील सामोरे जावे लागते. याचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अधिक जागरूक असणे आणि फसवणुकीला बळी पडू नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणे.

फसवणूक करणारे बनावट स्क्रीनशॉट कसे तयार करतात?

फसवणूक करणाऱ्यांना मूळ रक्कम प्राप्त झाल्याचा मेसेज/अ‍ॅप पेज एडिट करून बनावट स्क्रीनशॉट तयार करण्याची परवानगी देणार्‍या वेबसाईटस आणि ॲप्स शोधणे सोपे आहे. अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांना एक साधा गुगल सर्च करून अनेक पर्याय उपलब्ध होतात.

फसवणुकीच्या घटना

येथे काही ओळखीच्या घटना नमूद केल्या आहेत, जिथे रक्कम प्राप्त झाल्याचे तपशील देण्यासाठी बनावट स्क्रीनशॉट्स वापरले जातात. हे वाचा व लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही अशा प्रकारांना बळी पडणार नाही.

  • ऑफलाइन व्यापार्‍यांची दिशाभूल करणे: अनेकदा असे घडते, की एखादा व्यापारी पेमेंट मिळाल्याची खात्री करतेवेळी कामात खूप व्यग्र असतो किंवा त्याचे लक्ष नसते. अशावेळी फसवणूक करणारे व्यापाऱ्याकडून उत्पादने किंवा सेवा घेऊन बनावट स्क्रीनशॉट दाखवून या असुरक्षित परिस्थितीचा फायदा घेतात.
  • ऑनलाइन व्यवसायांची फसवणूक करणे: इतर बाबतीत, इन्स्टाग्रामवरील व्यवसाय करणाऱ्यांना पैसे प्राप्त झाल्यासा मेसेज आलेला नसला, तरीही `पेमेंट पाठवले’ असा स्क्रीनशॉट पाठवणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे भाग असते. ग्राहकांना जोडून ठेवणे आणि त्यांना चांगला अनुभव देत राहाणे यासाठी त्यांना हा विश्वास ठेवावा लागतो. पैसे नंतर मिळतीलच या आशेवर ते उत्पादन किंवा सेवा देतात. काही काळानंतर फसवणूक झालेल्या व्यावसायिकाला कळते की त्यांची फसवणूक झाली आहे.
  • पैसे ट्रान्सफर करण्याच्या बदल्यात रोख रक्कम: रोख रकमेची तातडीची गरज असल्याचे भासवून फसवणूक करणारे व्यापार्‍यांना ऑनलाइन पेमेंटच्या बदल्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी रोख देण्याची विनंती करतात. ते व्यापार्‍यांच्या खात्याचे तपशील घेतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी बनावट व्यवहाराचा स्क्रीनशॉट दाखवतात.
  • व्यक्ती ते व्यक्ती पैशांचा खोटा रोख व्यवहार
    एखाद्याला चुकून पैसे पाठवल्याचे सांगून त्यांना व्हॉट्सॲपवर स्क्रीनशॉट पाठवतात आणि सतत कॉल करत राहतात. जर रक्कम परत करण्यास नकार दिल्यास, पैसे परत न पाठवल्यास कायदेशीर कारवाईची धमकीही देतात आणि अशा प्रकारे फसवणूक करून त्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात.

बनावट स्क्रीनशॉट फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाय

  1. उत्पादन किंवा सेवा ट्रान्सफर करण्यापूर्वी पेमेंट मिळाल्याचा संदेश नेहमी तपासून घ्या. तुम्ही तुमचा व्यवहार इतिहासाचे तपशील बघून हे निश्चित करू शकता.
  2. फक्त स्क्रीनशॉट्सवर अवलंबून राहू नका. पेमेंटची पडताळणी करण्यासाठी स्क्रीनशॉट्स उपयुक्त ठरू शकतात परंतु ते फसवेही असू शकतात. त्याऐवजी, तुमच्या नोंदणीकृत बँकेकडून आलेला ई-मेल किंवा SMS याद्वारे पेमेंट प्राप्त झाल्याची खात्री करा.
  3. व्यापार्‍यांसाठी व्हॉईस मेसेजद्वारे पैसे प्राप्त झाल्याची माहिती देणारा स्मार्टस्पीकर हा योग्य पर्याय ठरतो.

तुम्ही बनावट स्क्रीनशॉट स्कॅमचे बळी ठरलात तर काय कराल?

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तुमची PhonePe वर फसवणूक केल्यास, तुम्ही खालील प्रकारे त्वरित समस्या मांडू शकता:

  • PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि “have an issue with the transaction/व्यवहारात समस्या आहे” या पर्यायाखाली समस्या मांडा.
  • PhonePe ग्राहक सेवा संपर्क: समस्या मांडण्यासाठी तुम्ही PhonePe च्या 80–68727374/022–68727374 या ग्राहक सेवा संपर्क नंबरवर फोन करू शकता, त्यानंतर ग्राहक सेवा प्रतिनिधी तुमची तक्रार नोंदवून घेईल आणि तुमच्या समस्येसाठी मदत करेल.
  • वेब फॉर्मच्या मदतीने तक्रार नोंदणी: तुम्ही https://support.phonepe.com/ हा PhonePe चा वेब फॉर्म भरून देखील आपली तक्रार नोंदवू शकता.
  • सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकता.
    Twitter — https://twitter.com/PhonePeSupport
    Facebook — https://www.facebook.com/OfficialPhonePe
  • तक्रार: तत्कालीन तक्रारीबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करू शकता आणि पूर्वी मिळालेल्या तक्रार नोंदणी नंबरचे तपशील देऊ शकता.
  • सायबर सेल : शेवटचा पर्याय म्हणून, तुम्ही जवळच्या सायबर गुन्हे शाखा (सायबर क्राइम सेल) येथे फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता अथवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर गुन्हे शाखेच्या 1930 या हेल्पलाईनवर देखील संपर्क साधू शकता.

महत्त्वाची नोंद — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. PhonePe.com डोमेनचे नसल्यास PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या सर्व मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading