PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

EMI फसवणूक काय आहे आणि पासून सुरक्षित कसे राहायचे

PhonePe Regional|2 min read|04 May, 2021

URL copied to clipboard

RBI ने अलीकडेच अधिस्थगन जारी करून कर्जदारांना त्यांचे EMI/क्रेडिट कार्डचे पेमेंट तीन महिने स्थगित करण्याची परवानगी दिली. परतफेडच्या वेळापत्रकातील बदलामुळे ग्राहकांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तात्पुरता आराम मिळाला आहे.

फसवणूक करणाऱ्यांनी लगेच या घडामोडीचा वापर त्यांचा फायदा करून घेण्यासाठी घेतला. EMI फसवणूक च्या घटना वाढल्या आहेत कारण हे लोक स्वतःस बँकेचे प्रतिनिधी सांगून कर्जदारांना अधिस्थगनाचा लाभ घेण्यात मदत करणारे म्हणून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे कशाप्रकारे फसवणूक करतात याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत:

दृश्य 1: तुमच्या बँकेकडून बोलत असल्याचा दावा करणारा एक कॉल तुम्हाला येतो. बँकेचा प्रतिनिधी तुमचा कर्जाचा EMI पुढे ढकलण्यासाठी तुम्हाला तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्ड चा नंबर, CVV शेअर करण्यास सांगतो. तुम्ही एकदा हे तपशील शेअर केल्यावर, फसवणूक करणारी व्यक्ती एक व्यवहार आरंभ करते आणि तुम्हाला तुमच्या फोनवर प्राप्त झालेला OTP विचारते. तुम्ही OTP शेअर केल्यावर, तुमच्या खात्यातील पैसे नाहीसे होतात.

दृश्य 2: फसवणूक करणारी व्यक्ती स्वतःस बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून तुम्हाला फोन करते आणि तुमचा EMI देण्याचा कालावधी पुढे ढकलला गेल्याचे सांगते आणि या एक्स्टेंशनचा स्वीकार करण्यासाठी तुम्हाला एका लिंक वर क्लिक करण्यास सांगते किंवा थेट PhonePe ॲप उघडण्यास सांगते. तसेच तुमचा UPI पिन टाकून तुम्हाला अधिसूचना आयकॉन वर प्राप्त झालेली विनंती मंजूर करण्यास सुद्धा सांगितले जाते. काही मामल्यात,फसवणूक करणारी व्यक्ती बँकांचा लोगो आणि नावांचा वापर करण्यासोबत, “कर्जाचा EMI पुढे ढकलण्यासाठी विनंती मंजूर करा.” यासारखा मॅसेज सुद्धा पाठवते. तुम्ही एकदा विनंती मंजूर केल्यावर तुमच्या बँक खात्याताली पैसे जातात.

दृश्य 3: भामट्या व्यक्तीकडून एक ‘बँक अधिकृत’ व्यक्ती असल्याची बतावणी करणारा कॉल तुम्हाला येतो, ज्यावर तुम्ही EMI भरला नसल्यामुळे तुम्हाला दंड आकारला जाईल असे सांगितले जाते. व्यक्तीकडून तुम्हाला मदतीचा प्रस्ताव दिला जातो, आणि त्यात AnyDesk ॲप किंवा कोणतीही इतर स्क्रीन-शेअर करणारी ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. तुमच्या डिव्हाइसवर दुरस्थपणे प्रवेश मिळवून, फसवणूक करणारी व्यक्ती, तुमच्या मोबाइल बँकिंग ॲपच्या पिन आणि पासवर्ड वर प्रवेश मिळवते, अशाप्रकारे तुमच्या खात्याच्या तपशीलांशी तजडजोड केली जाते. तुमचे पैसे आता फसवणूक करणाऱ्याच्या हातात येतात.

कृपया बँक प्रतिनिधी असण्याचा दावा करणाऱ्या आणि वर वर्णन केलेल्या प्रसंगांचा वापर करून सेवा देणाऱ्या कोणत्याही अज्ञात फोनकॉलपासून सावध राहा. लक्षात ठेवा तुमची बँक PhonePe च्या माध्यमातून तुमच्या EMI पुढे ढकलू शकत नाही. तसेच, तुम्हाला EMI चे पेमेंट पुढे ढकलण्यासाठी तुमचा OTP किंवा तुमचा UPI पिन शेअर करण्याची आवश्यकता नसते.

तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता ते पुढे दिले आहे:

  • गोपनीय तपशील जसे, कार्ड नंबर, CVV, एक्सपायरी दिनांक, पिन किंवा OTP कोणाहीसोबत शेअर करू नका. PhonePe प्रतिनिधी असल्याची बतावणी करून तुमच्याकडे कोणी अशा तपशीलांची विचारणा केल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. फक्त @phonepe.com डोमेन वरून आलेल्या ई-मेल्सला प्रतिसाद द्या.
  • सर्व बँक ई-मेल फक्त सुरक्षित https डोमेन वरूनच येतात. [XYZ]@gmail.com किंवा कोणत्याही इतर ई-मेल प्रदाता डोमेन वरून पाठवलेल्या ई-मेल कडे दुर्लक्ष करा.
  • नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी कधीच ‘पेमेंट’ करावे लागत नाही किंवा तुमचा UPI पिन टाकावा लागत नाही.
  • कृपया ‘पेमेंट करा’ बटन दाबण्यापूर्वी किंवा तुमचा UPI पिन टाकण्यापूर्वी तुमच्या PhonePe ॲप दाखवलेला मॅसेज काळजीपूर्वक वाचा
  • AnyDesk किंवा TeamViewer सारख्या तृतीय-पक्षाच्या ॲप डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका.
  • PhonePe ग्राहक सहाय्यता नंबरसाठी Google, Twitter, FB, इत्यादी वर शोध घेऊ नका. PhonePe ग्राहक सहाय्यता सोबत संपर्क साधण्यासाठी https://phonepe.com/en/contact_us.html हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे.
  • PhonePe सहाय्यता असल्याचा दावा करणाऱ्या, सत्यापित नसलेल्या मोबाइल नंबरवर कधीही कॉल करू/प्रतिसाद देऊ नका.

फसवणूक करणाऱ्याद्वारे संपर्क केला गेल्यास तुम्ही काय करायला हवे?

  • तात्काळ तुमच्या जवळच्या सायबर-सेल गुन्हा केंद्रावर रिपोर्ट करा आणि संबंधित तपशील (फोन नंबर, व्यवहार तपशील, कार्ड नंबर, बँक खाते, इ.) देऊन FIR दाखल करा.
  • तुमच्या PhonePe ॲप वर लॉगिन करा आणि ‘मदत’ विभागात जा. तुम्ही ‘Account security issue/ Report fraudulent activity’ अंतर्गत फसवणूकच्या घटनेचा रिपोर्ट करू शकता.
  • विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील केवळ आमच्या अधिकृत खात्यावरून आमच्याशी संपर्क करा.

Twitter हँडल: https://twitter.com/PhonePe https://twitter.com/PhonePeSupport

Facebook खाते: https://www.facebook.com/OfficialPhonePe/

वेबसाइट: support.phonepe.com

Keep Reading