PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

फसवणूक करणारे तुमच्या ग्रुप चॅटमध्ये कसे शिरकाव करत आहेत आणि तुम्ही त्यांच्यापासून कसे सुरक्षित राहू शकता

PhonePe Regional|3 min read|11 June, 2026

URL copied to clipboard

आपल्या पालकांनी किंवा आजी-आजोबांनी आपल्याला त्यांच्या काळातील संवादाचे माध्यम म्हणून टेलिग्राम (तार) वापरल्याच्या गोष्टी सांगितल्या असतील. त्या काळी टेलिग्राफ ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागायचा आणि शब्दांच्या संख्येनुसार पैसे मोजावे लागायचे. आजच्या काळातील इन्स्टंट मेसेजिंगच्या  वेगाचा विचार करणेही त्या काळी एक दूरची आणि अकल्पनीय गोष्ट होती.

मेसेजिंग ॲप्स आणि पेमेंट ॲप्समधील चॅट फीचर हे संवादात सुलभता आणण्यासाठी तयार केले गेले आहेत. मग ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक मेसेजिंग, किंवा पेमेंट ॲपमध्ये ग्रुपच्या खर्चाबाबत चर्चा करणे असो, इन्स्टंट मेसेजिंगने आपल्या संवादाची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे.

फसवणूक करणारे लोक लोकांचे पैसे लुटण्यासाठी या मेसेजिंग आणि पेमेंट ॲप्समध्ये शिरकाव करतात. या ब्लॉगमध्ये, आम्ही हा घोटाळा कसा चालतो आणि तुम्ही अशा फसवणुकीच्या युक्त्यांपासून कसे सुरक्षित राहू शकता, याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

चॅट स्कॅम कसा चालतो

मेसेजिंग आणि पेमेंट ॲप्सच्या “चॅट” आणि “ग्रुप” फीचर्सद्वारे होणारा एक सामान्य घोटाळा खालीलप्रमाणे घडतो:

  1. तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून वैयक्तिक चॅटवर मेसेज येतो किंवा तुम्हाला एका मोठ्या ग्रुपमध्ये जोडले जाते.
  2. तो चॅट “लवकर श्रीमंत होण्याच्या” योजना, बेटिंग टिप्स (सट्टा लावण्याच्या टिप्स) किंवा विशिष्ट “गॅम्बलिंग ॲप” रिवॉर्ड्सनी भरलेला असतो.
  3. स्कॅमर्स अनेकदा रिवॉर्ड, कॅशबॅक किंवा गेमिंग लिंकच्या बहाण्याने एक लिंक शेअर करतात.
  4. त्या लिंकवर क्लिक केल्याने फोनमध्ये एक साईडलोड केलेले  APK ॲप इन्स्टॉल होते. एकदा इन्स्टॉल झाल्यावर, हे ॲप बॅकग्राउंडमध्ये काम करून खालील गोष्टी करते:
    • OTP फॉरवर्ड करणे: तुमचे SMS आणि OTP मध्येच रोखणे आणि ते फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पाठवणे.
    • दस्तऐवजांमध्ये प्रवेश मिळवणे: तुमच्या आधार, PAN कार्ड आणि इतर संवेदनशील फाईल्सचे फोटो चोरणे.
  5. तुमचे OTP आणि ओळखपत्रांचे दस्तऐवज मिळाल्यानंतर, फसवणूक करणारी व्यक्ती बँकेची सुरक्षा यंत्रणा मोडून तुमचे खाते रिकामे करते आणि पुढील गुन्हे करण्यासाठी ‘सिंथेटिक आयडेंटिटीज’ (तुमच्या खऱ्या डेटाचा वापर करून तयार केलेली खोटी ओळख) तयार करते.

ग्रुप चॅट स्कॅमपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

डिजिटल पेमेंट आणि ॲप्स खबरदारीने वापरल्यास पूर्णपणे सुरक्षित असतात. APK किंवा फेक ॲप्सवर आधारित बहुतांश फसवणुकीच्या घटना या भीती किंवा उत्साहापोटी, कोणतीही योग्य पडताळणी न करता घाईघाईने पावले उचलल्यामुळे घडतात. मोठ्या आर्थिक नुकसानीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी, आपण थोडा वेळ काढून ॲपचा स्रोत, डेव्हलपरचा ईमेल आयडी, मागितलेली परमिशन आणि कोणत्याही लिंकची सत्यता तपासणे आवश्यक आहे.

सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी येथे काही सोप्या टिप्स दिल्या आहेत:

  • चॅटमध्ये आलेल्या लिंक्सद्वारे कधीही कोणतेही ॲप डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका. हे मालवेअर असू शकतात जे तुमची संवेदनशील माहिती चोरू शकतात. ॲप्स फक्त Indus अ‍ॅपस्टोअर, Google प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपस्टोअर वरूनच डाउनलोड करा.
  • तुमच्या काँटॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या फोन नंबरवरून सुरू झालेल्या ग्रुप्स किंवा चॅट्सबाबत नेहमी सावध राहा.
  • तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन कोणत्या ॲप्सना “SMS रीड” किंवा “फाईल अ‍ॅक्सेस” ची परवानगी आहे, याचे वेळोवेळी रिव्ह्यू करा.
  • कोणताही अधिकृत प्लॅटफॉर्म किंवा बँकेचा अधिकारी तुम्हाला चॅट किंवा कॉलवर कधीही OTP मागणार नाही.
  • अनधिकृत प्रवेशापासून संरक्षणाचा आणखी एक स्तर जोडण्यासाठी तुमच्या पेमेंट ॲप्ससाठी फिंगरप्रिंट  किंवा फेस आयडी लॉकचा वापर करा.

जर तुम्ही एखादे फेक ॲप इन्स्टॉल केले असेल तर काय करावे

  1. ते ॲप त्वरित अनइन्स्टॉल करा.
  2. मोबाईल डेटा आणि Wi-Fi तात्पुरते बंद करा.
  3. बँकिंग, ईमेल आणि पेमेंट ॲप्सचे पासवर्ड बदला.
  4. तुमच्या बँकेशी किंवा पेमेंट सेवा प्रदात्याशी संपर्क साधून खात्यावर देखरेख ठेवण्यास सांगा किंवा खात्याचे व्यवहार फ्रीझ करा.

तक्रार कशी करावी

जर तुम्हाला संशय असेल की तुम्हाला स्कॅमचे लक्ष्य केले गेले आहे, तर त्वरित याची तक्रार करा:

PhonePe वर रिपोर्ट करणे:

  • PhonePe ग्रुप चॅट: जर तुम्हाला तो ग्रुप फसवणूक करणारा वाटत असेल, तर तुम्ही ग्रुप प्रोफाइलमधील बाहेर पडा आणि रिपोर्ट करा या पर्यायांवर क्लिक करू शकता.
  • PhonePe ॲप: मदत  सेक्शनमध्ये जा आणि तक्रार नोंदवा.
  • PhonePe कस्टमर केअर: 80-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
  • सोशल मीडिया रिपोर्टिंग:
  • तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा.

अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:

  • सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
  • दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम  फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधे द्वारे करा.

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading