
Trust & Safety
फसव्या सबस्क्रिप्शन मँडेट्स कसे ओळखावे?
PhonePe Regional|2 min read|19 May, 2026
सबस्क्रिप्शन मँडेट किंवा ‘ऑटोपे’ ही एक स्वयंचलित सूचना असते, जी तुम्ही तुमच्या बँकेला देता. याद्वारे तुमच्या खात्यातून ठराविक काळाने होणारे पेमेंट, जसे की OTT सबस्क्रिप्शन, लाइट बिल किंवा EMI चे पैसे आपोआप वजा केले जातात. सबस्क्रिप्शन मँडेट्समुळे आता मॅन्युअली पेमेंट लक्षात ठेवण्याची गरज उरलेली नाही आणि आवर्ती देयके भरणे अतिशय सोपे झाले आहे. मात्र, या डिजिटल सुविधेसोबतच सायबर सुरक्षेचे काही धोकेही निर्माण झाले आहेत.
सायबर चोरटे या ‘ऑटोपे’ सुविधेचा गैरफायदा घेतात. तुम्ही घाईघाईत क्लिक कराल या आशेने ते तुम्हाला अचानक ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ किंवा ‘मँडेट अप्रूव्हल’ पाठवतात. हे चोरटे एखाद्या अनोळखी नंबरवरून “वीज बिल प्रलंबित आहे“, “लॉटरी टॅक्स प्रोसेसिंग” किंवा “KYC अपडेट फी” अशा नावाखाली या फसव्या विनंत्या पाठवू शकतात.
फसवा मँडेट कसा ओळखावा?
फसवी मँडेट विनंती ओळखण्यासाठी नेहमीच काही ठराविक खुणा असतात. तुम्ही खालील गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे:
- एकवेळचे पेमेंट की रिकरिंग पेमेंट : जर तुम्ही वीज बिलासारखे एकवेळचे पेमेंट करत असाल, तर ‘अप्रूव्हल रिक्वेस्ट’वर कधीही “रिकरिंग” हा शब्द नसावा. विनंती मान्य करण्यापूर्वी मेसेज काळजीपूर्वक वाचा. तसेच, ही विनंती एखाद्या अधिकृत बिलरकडून (उदा. BESCOM किंवा Jio) आली आहे की एखाद्या अनोळखी मोबाईल नंबरवरून, हे तपासा. PhonePe वर अधिकृत बिलरच्या नावापुढे ग्रीन टिक असते.
- पडताळणी : एखादा मँडेट खरा आहे की फसवा, याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुमच्या PhonePe प्रोफाइल मध्ये जा > ‘ऑटोपे सेटिंग’ वर क्लिक करा. तिथे तुम्हाला न ओळखणारा एखादा मँडेट दिसल्यास, तो लगेच डिलीट करा.
- स्त्रोत : खरे मँडेट्स साधारणपणे मर्चंटच्या अॅपमधून सुरू होतात (उदा. तुम्ही Netflix अॅपमध्ये ऑटोपेसाठी PhonePe निवडता). याउलट, स्कॅम मँडेट्स हे सहसा एखाद्या अचानक आलेल्या SMS मधील लिंक किंवा पॉप-अप स्वरूपात असतात.
लक्षात ठेवा, पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कधीही तुमचा UPI पिन टाकण्याची गरज नसते. जर कोणी तुम्हाला “रिफंड मिळवण्यासाठी हा QR स्कॅन करा” असे सांगत असेल, तर तो तुमची फसवणूक करत आहे.
PhonePe ची ‘प्री-डेबिट नोटिफिकेशन’ सुविधा
PhonePe वर आमचा असा विश्वास आहे की, तुमच्या खात्यातून पैसे वजा झाल्याचे पाहून तुम्हाला कधीही धक्का बसू नये. म्हणूनच आम्ही सुरक्षेचा एक स्तर तयार केला आहे: ’24-तास रिमाइंडर’ हे कसे कार्य करते ते पहा:
- पूर्वसूचना : PhonePe वर सेट केलेल्या कोणत्याही रिकरिंग ऑटोपेसाठी, आम्ही पैसे वजा होण्याच्या 24 तास आधी तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवतो.
- संधी : जर तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळाले आणि तुम्हाला वाटले की, “अरे बापरे, मी तर हे अॅप आता वापरतच नाही!”, तर तुमच्याकडे तो ऑटोपे डिलीट करण्यासाठी 24 तास असतात. फक्त तुमच्या PhonePe प्रोफाइलमध्ये जा > ‘ऑटोपे सेटिंग ‘ वर जा आणि तो मँडेट डिलीट करा.
PhonePe सेफ्टी टिप: तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ऑटोपे ‘पॉज’ देखील करू शकता? जर तुम्ही सुट्टीवर जात असाल किंवा तुम्हाला एखादी सेवा तात्पुरती बंद करायची असेल, तर ती पूर्णपणे कॅन्सल करण्याची गरज नाही. पैसे वजा होणे तात्पुरते थांबवण्यासाठी तुमच्या ऑटोपे सेटिंग्समध्ये फक्त ‘पॉज’ वर क्लिक करा.
जर तुम्ही सबस्क्रिप्शन मँडेट स्कॅमचे बळी ठरलात तर काय करावे?
तुम्हाला तुमची फसवणूक झाल्याचा संशय आल्यास, त्वरित तुमच्या PhonePe अॅपमधील “ऑटोपे सेटिंग” तपासा आणि तो मँडेट कॅन्सल करा. या घटनेची त्वरित तक्रार करा. अशा वेळी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो
PhonePe वर रिपोर्ट करणे:
- PhonePe ॲप: मदत सेक्शनमध्ये जा आणि तक्रार नोंदवा.
- PhonePe कस्टमर केअर: 80-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
- सोशल मीडिया रिपोर्टिंग:
- Twitter: PhonePe Support
- Facebook: PhonePe Official
- तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा..
अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:
- सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
- दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधेद्वारे करा.
महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
