PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

कोव्हिड-19 च्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकबद्दल जागरुक आणि सुरक्षित कसे राहाल

PhonePe Regional|4 min read|09 August, 2021

URL copied to clipboard

भारतात कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेचा तडाखा किती होता, तो आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. या दरम्यान आणखी एका गोष्टीचं पेव फुटलं ते म्हणजे फसवणुकीचं. लोकांच्या मदतीच्या सबबीखाली कितीतरी अज्ञात खाती आणि फोन क्रमांक तयार झाले याची गणतीच नाही. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन सिलिंडर आणि लसी पुरवतो अशी माहिती दिली गेली आणि कितीतरी लोकांची फसवणूक चालूच राहिली.

तुम्ही अशा फसव्या गोष्टींना बळी पडू नये यासाठी PhonePe एक मार्गदर्शक सादर करत आहे.

कोव्हिड-19 लस नोंदणी

पहिली लस मिळवा किंवा सरकारदप्तरी तुमचा डेटा अपडेट करा अशी मदत देऊ करणाऱ्यांनी कितीतरी लोकांना पैशांना लुबाडलं आहे. असे अनेक सायबर गुन्हे घडल्याचं समोर आलं आहे.

  • लोकांना, खास करून 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना फोन करून लसीच्या पहिल्या डोससाठी विचारणा करणे
  • लस घेतली असेल तर त्याची खात्री करणे आणि डेटाबेस अपडेट करण्यासाठी मोबाइलवर आलेला OTP मागणे
  • लसीचा पहिला डोस घेण्यासाठी नकार देणाऱ्या व्यक्तींनाही OTP पाठवून पूर्वनोंदणी करण्यासाठी आग्रह करणे

वरवर पाहता ही माहिती संशयास्पद वाटणार नाही; परंतु, तुमच्या मोबाइलवर आलेला OTP शेअर केल्यामुळे तुमच्या फोनमधल्या अ‍ॅपचा महत्त्वाच्या माहितीचा अ‍ॅक्सेस गुन्हेगारांना मिळू शकतो.

पडताळणी न करता सोशल मीडियावर शेअर केलेली माहिती

महामारीच्या दुसऱ्या लाटेत आपल्या सोशल मीडियावर मदतीची आणखी एक लाट आली होती. सोशल मीडियावर देण्यात आलेल्या माहितीद्वारे, पडताळणी केलेले विक्रेते लसी आणि अन्य उपचार साहित्यासाठी लोकांच्या संपर्कात येत होते. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठीही अनेक क्रमांक देण्यात आले होते.

अनेक तोतयांनी पुन्हा या स्थितीचा फायदा घेतला. ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात किंवा अन्य उपचार उपलब्ध करून देतो, असे सांगून भरमसाठ शुल्क घेऊन पोबारा केला.

मोफत कोव्हिड लसीसाठी WhatsApp आणि SMS वरून अनेक खोटे मेसेज फिरू लागले. यामध्ये एक लिंक समाविष्ट करण्यात आली होती. या लिंकच्या माध्यमातून अनेकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेली. या लिंकमुळे तुमचे डिव्हाइस आणि त्याच्याशी संबंधित अनेक खात्यांची माहिती लुबाडणाऱ्यांपर्यंत पोचली.

लस आणि अन्य अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा तुटवडा किंवा अशीच खोटी माहिती जाहिरातींच्या स्वरूपात सोशल मीडियावरून दिसत राहिली. यामुळे आधीच तणावाखाली असलेली कुटुंबं असहाय्य होत होती.

इतकेच नाही, तर अनेक लोक “पडताळणी केलेली माहिती’’ अशा टॅगखाली खोट्या डॉक्टरांच्या प्रोफाइललाही बळी पडले. औषधोपचार आणि ऑक्सिजन सिलिंडर मिळावे यासाठी फेसबुक आणि इन्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर अशी माहिती दिली जात असल्यामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसला.

गुन्हेगारांनी लसी आणि दुर्मीळ औषधांसाठी लोकांकडून आगाऊ पैसे घेतले आणि नंतर जाहीर केलेले मोबाइल क्रमांक बंद केले किंवा बदलले.

कोव्हिडशी संबंधित मदतीसाठी जाहीर होणाऱ्या वेबसाइटची पडताळणी कशी करावी

कोरोना व्हायरसच्या लढाईत भारत देशाने एकत्र येऊन लढा दिला, अनेक लोक मदतीसाठी पुढे सरसावले आणि मदत करणाऱ्या हातांची एक मोठी साखळीच तयार झाली. तुम्हाला कोणत्या संस्थेद्वारे कोरोनाग्रस्त कुटुंबांसाठी किंवा व्यक्तींना मदत करायची असेल तर तुम्ही त्या संस्थेची वेबसाइट तपशिलात जाऊन पाहणे अत्यावश्यक आहे. ते कोव्हिडसाठी नेमकी काय मदत करत आहेत, यासंदर्भात त्यांच्या साइटवर काय मजकूर उपलब्ध आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

वैध साइटची सुरुवात ‘HTTPS’ किंवा ‘HTTP’ ने होत आहे का ते तपासा. ‘HTTPS’ ने सुरुवात होणाऱ्या साइटकडे SSL प्रमाणपत्र असते आणि अशी साइट ‘HTTP’ पासून सुरुवात होणाऱ्या साइटपेक्षाही कितीतरी पटींनी जास्त सुरक्षित असते. तुम्हाला यावरून संस्था योग्य किंवा वैध आहे असे वाटत नसल्यास आणि अशा संस्थेद्वारे तुमचे पैसे योग्य कारणासाठी वापरले जातील याची खात्री नसल्यास, तुम्ही PhonePe अ‍ॅप वापरू शकता. यासाठी ‘Donations’ टॅबवर टॅप करा.

PhonePe अ‍ॅप वापरून देणगी देऊन मदत कशी कराल?

PhonePe तुम्हाला खात्री देते, की तुम्ही केलेली मदत अ‍ॅपवरील यादीत असलेल्या आणि पडताळणी केलेल्या NGOना मिळेल. PhonePe वरून तुम्ही पुढील पायऱ्यांच्या साहाय्याने मदत करू शकता.

PhonePe तुम्हाला खात्री देते, की तुम्ही केलेली मदत अ‍ॅपवरील यादीत असलेल्या आणि पडताळणी केलेल्या NGOना मिळेल. PhonePe वरून तुम्ही पुढील पायऱ्यांच्या साहाय्याने मदत करू शकता.

पहिली पायरी: तुमच्या PhonePe च्या होम स्क्रीनवर ‘Donate’ टॅबअंतर्गत ‘रिचार्ज आणि बिल पेमेंट’ टॅबवर टॅप करा.

दुसरी पायरी: तुम्हाला कोणत्या NGOना मदत करायची आहे ते यादीतून निवडा.

तिसरी पायरी: तुमचे नाव आणि ईमेल पत्ता लिहा.

चौथी पायरी: तुम्हाला किती रकमेची मदत करायची आहे ते लिहा.

पाचवी पायरी: समाविष्ट असलेल्या पेमेंट पद्धतींमधून तुमची पेमेंट पद्धत निवडा. तुम्ही UPI, तुमचे डेबिट कार्ड किंवा तुमचे PhonePe वॉलेट वापरूनही पेमेंट करू शकता.

सहावी पायरी: ‘Donate’ टॅबवर टॅप करा आणि तुमचे पेमेंट अधिकृत करा.

खोटे फोन नंबर ओळखण्यासाठी तुम्ही PhonePe ची कशाप्रकारे मदत घेऊ शकता

तुमचे तपशील जाणून घेण्यासाठी आलेले किंवा कसलीही खात्री नसलेली रिवॉर्ड्स देण्यासंबंधित आलेले खोटे किंवा फसवे फोन ओळखणे आणि इतरांनाही त्यासाठी मदत करणे यासाठी तुम्ही दक्ष राहायला हवे. तुम्हाला वैद्यकीय सुविधा आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा यांबाबतीत पडताळणी न झालेल्या नंबरवरून फोन येत असतील आणि अशा नंबरबाबत तुम्हाला खात्री वाटत नसेल,तर तुम्ही https://www.phonepe.com/security/covid-frauds/ येथे लॉगिन करू शकता आणि किती लोकांना असे फसवे फोन आले आहेत ते तपासू शकता. तसेच, तुम्हाला येणारे फोन क्रमांक तुम्ही येथे अपडेट करू शकता, यामुळे अन्य लोक अशा फसवणुकीपासून आधीच सावध होतील.

लक्षात असू द्या: PhonePe तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी येणाऱ्या कोणत्याही फोनचे किंवा OTP/CVV किंवा UPI MPIN अशा प्रकारच्या संवेदनशील माहिती शेअर करण्याचे समर्थन करत नाही.

फसवणूक होऊ नये म्हणून काय करावे आणि काय टाळावे

काय कराल: खोटे फोन ओळखणे तसे अवघड नाही. त्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी ‘करा’

  • अज्ञात व्यक्तीला पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे तपशील तपासा
  • पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याच्या तपशीलांतील खातेधारकाचे नाव, बँक खाते तपशील आणि संपर्क तपशील जरूर तपासा
  • कुणी सांगितले म्हणून कुठल्याही तृतीय पक्षाचे अ‍ॅप इन्स्टॉल करू नका. केवळ प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरमधूनच पडताळणी झालेले आणि विश्वासार्ह अ‍ॅप डाउनलोड करा
  • तुमच्याकडून अज्ञात व्यक्तीला पैसे पाठवले गेल्यास तातडीने तुमच्या बँकेला किंवा सायबर सेलला कळवा
  • तुमच्या फोनमध्ये आणि PhonePe प्लॅटफॉर्मवरून प्राप्तकर्त्याचा क्रमांक ब्लॉक करा, यामुळे भविष्यात त्याच्याकडून पैशांची विनंती येऊ शकणार नाही.
  • तुमच्या PhonePe अ‍ॅपवरील “मदत” विभागातील “खात्याची सुरक्षितता आणि फसवणुकींच्या गतिविधींचा रिपोर्ट करणे” द्वारे फसवणुकीची घटना नोंदवा. तसेच support.phonepe.com वरही लॉग ऑन करा.
  • तसेच कायम लक्षात असू द्या, पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला UPI अ‍ॅपवर कधीही UPI PIN एंटर करण्याची गरज नाही.

हे टाळा: तुमच्या पैशांचा गुन्हेगारांकडून गैरवापर होणे टाळण्यासाठी हे टाळाच

  • तुमचा UPI PIN आणि OTP कधीही कोणाहीबरोबर शेअर करू नका. PhonePe चे कर्मचारी कधीही तुम्हाला वैयक्तिक तपशील विचारणार नाहीत.
  • तुमचे Twitter, Facebook, LinkedIn आणि Instagram यांसारख्या सोशल मीडियाचे तपशील कधीही शेअर करू नका.
  • अज्ञात व्यापाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या सेवा किंवा उत्पादने कितीही आकर्षक असली तरी त्यांपासून स्वतःला परावृत्त करा.
  • तुमचे बँक तपशील मागणारे कोणतेही फॉर्म भरू नका.
  • पैसे पाठवण्यासाठी तुमची स्क्रीन शेअर करायला सांगतील, Anydesk, Teamviewer साठी परवानगी मागतील अशी कोणतीही तृतीय पक्षाची अ‍ॅप डाउनलोड करू नका.
  • सर्च इंजीन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेल्या कोणत्याही हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधू नका. त्याऐवजी त्यांची अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइन तपशील तपासा.
  • अज्ञात पत्त्यावरून आलेले मेसेज किंवा ईमेल यांना कधीही प्रतिसाद देऊ नका, त्यांनी पाठवलेल्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.

PhonePe कस्टमर सपोर्टसाठी https://support.phonepe.com/ ही एकमेव अधिकृत लिंक आहे किंवा 0806–8727–374 or 0226–8727–374 या अधिकृत क्रमांकावर तुम्ही कस्टमर केअरसाठी 24*7 संपर्क साधू शकता.

आम्हाला तुमची मदत करू द्या

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या आमच्या अधिकृत खात्यांवर संपर्क साधा.

Keep Reading