PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

KYC फसवणुकीतून होणारी ओळख चोरी : स्वतःचं संरक्षण कसं कराल?

PhonePe Regional|5 min read|21 July, 2025

URL copied to clipboard

जेव्हा तुम्ही बँक किंवा आर्थिक संस्थांमध्ये खाते उघडता, तेव्हा तुमची ओळख व्हेरिफाय करण्यासाठी ‘KYC’ प्रक्रिया आवश्यक असते. या प्रक्रियेमध्ये आधार, PAN किंवा रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेली इतर कागदपत्रे सादर करावी लागतात.

आजकाल बहुतांश आर्थिक संस्था ही ओळख व्हेरिफिकेशन प्रक्रिया ‘डिजिटल KYC’द्वारे करतात. डिजिटल KYCमध्ये ग्राहकाचे लाइव्ह फोटो, त्यांची कागदपत्रे किंवा आधार कार्ड असल्याचा पुरावा घेण्यात येतो. विशेषतः, जेव्हा ऑफलाइन पडताळणी शक्य नसते, तेव्हा ही पद्धत वापरली जाते.

KYC प्रक्रियेतील फसवणुकीद्वारे ओळख चोरी आणि खाते बंद करण्याची भीती दाखवून केली जाणारी फसवणूक

KYC फसवणुकीत फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती चोरतात किंवा बनावट ओळखी तयार करतात आणि त्या माहितीचा वापर करून KYC प्रक्रिया बनावट पद्धतीने पूर्ण करतात. एकदा KYC पडताळणी झाली की, ते अनधिकृतरीत्या तुमच्या खात्यांमध्ये प्रवेश मिळवतात किंवा तुमच्या नावावर नवीन बँक खाती उघडतात, कर्ज घेतात, किंवा क्रेडिट कार्ड काढतात. यामुळे तुमचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण तुमच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसतो.

आजच्या डिजिटल युगात ओळख चोरी ही एक गंभीर समस्या बनली आहे, विशेषतः जेव्हा भामटे चोरलेली किंवा बनावट कागदपत्रं वापरून KYC प्रक्रिया पूर्ण करतात आणि तुमच्या खात्यांवर ताबा मिळवतात, तेव्हा हा धोका खूपच जास्त असतो.

याव्यतिरिक्त, हा धोका KYC संबंधित ‘अकाउंट सस्पेंशन’ (खाते स्थगित करणे) घोटाळ्यांपर्यंतही पसरला आहे. ही लोकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेणारी एक ‘सोशल इंजिनिअरिंग’ क्लृप्ती आहे; ज्यामध्ये फसवणूक करणारे जाणीवपूर्वक अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करतात. तुमचे KYC दस्तऐवज अपूर्ण आहेत किंवा त्यांची मुदत संपली आहे, आणि त्यामुळे तुमचे पेमेंट अकाउंट, बँक खाते किंवा डिजिटल वॉलेट अगदी कमी कालावधीत (उदा. 24 तासांच्या आत) कायमस्वरूपी ब्लॉक किंवा सस्पेंड केले जाईल, असा खोटा दावा करत हे स्कॅमर्स संपर्क साधतात. तुमच्या मनात घबराट निर्माण करणे हाच यामागील मुख्य हेतू असतो; जेणेकरून तुम्ही शांतपणे विचार न करता, घाईघाईत तुमची अत्यंत संवेदनशील आर्थिक माहिती त्यांच्या हाती सोपवाल किंवा त्यांना तुमच्या खात्याचा ॲक्सेस द्याल.

ओळख चोरी आणि KYC घोटाळे प्रामुख्याने खालील वेगवेगळ्या मार्गांनी घडू शकतात:

  • प्रसंग 1: फिशिंगच्या माध्यमातून वैयक्तिक माहितीची चोरी

अर्जुनशी एका भामट्याने संपर्क साधून त्याला गुंतवणुकीवर आकर्षक रिटर्नचे आमिष दाखवले. पुढे सुरू ठेवण्यासाठी अर्जुनला त्याचे वैयक्तिक तपशील व्हेरिफाय करण्यास सांगितले गेले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून, आपली गुंतवणूक सुरक्षितपणे हाताळली जाईल या समजुतीने अर्जुनने आपल्या खात्याचे क्रेडेंशियल्स आणि OTP शेअर केले. या चोरी केलेल्या माहितीचा वापर करून त्या भामट्याने अर्जुनच्या खात्यात थेट प्रवेश मिळवला आणि अनधिकृत व्यवहार केले.

  • प्रसंग 2: दुसऱ्याच्या खात्यासाठी फसवून तुमच्याकडून KYC पूर्ण करून घेणे

डेव्हिडला सहज लोन मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका भामट्याने त्याच्याशी संपर्क साधला. त्या भामट्याने डेव्हिडला एका खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले; जे खाते प्रत्यक्षात डेव्हिडचे नसून आधीच त्या भामट्याच्या नावावर तयार केलेले होते. लोन मंजुरीच्या प्रक्रियेचाच हा एक अधिकृत भाग आहे असा समज झाल्याने डेव्हिडने ते मान्य केले. त्याने KYC साठी आपले वैयक्तिक तपशील सादर केले आणि नकळत त्या खात्याचे पूर्ण नियंत्रण त्या भामट्याकडे गेले. त्यानंतर भामट्याने फसव्या लोन व्यवहारांसाठी त्या खात्याचा गैरवापर केला, ज्यामुळे डेव्हिड पूर्णपणे अनभिज्ञ राहिला आणि नकळत एका मोठ्या आर्थिक संकटात सापडला.

  • प्रसंग 3: बनावट बँक किंवा ॲप अलर्ट पाठवून लॉगिन तपशील मिळवणे

निशाच्या फोनवर रात्री उशिरा “PP-ALERT” अशा नावाने एक भीतीदायक SMS येतो. एक खोटी आणीबाणी निर्माण करत, त्या मेसेजमध्ये एक शॉर्ट लिंक दिलेली असते आणि त्यात लिहिले असते: “तात्काळ: तुमचे KYC अपूर्ण आहे. पुढील 15 मिनिटांत तुमचे आधार व्हेरिफाय करण्यासाठी येथे क्लिक करा, अन्यथा तुमचे खाते कायमस्वरूपी ब्लॉक केले जाईल आणि तुमचे पैसे जप्त केले जातील.” घाबरून निशा त्या लिंकवर क्लिक करते, एका बनावट वेबपेजवर पोहोचते आणि तिथे तिचा नंबर व आलेला OTP एंटर करते. परंतु, जेव्हा स्कॅमर्स त्या चोरीच्या क्रेडेंशियल्सचा वापर करून दुसऱ्या शहरातून तिच्या खात्यात लॉगिन करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा PhonePe ची बॅकएंड सुरक्षा यंत्रणा तत्काळ सक्रिय होते. PhonePe प्रोटेक्ट त्या अनोळखी डिव्हाइसची आणि संशयास्पद लोकेशन बदलाची तात्काळ नोंद घेते. ते लॉगिनचा हा प्रयत्न पूर्णपणे ब्लॉक करते आणि निशाच्या खऱ्या फोनवर लगेच एक इन-ॲप नोटिफिकेशन पाठवते: “संशयास्पद लॉगिन प्रयत्न ब्लॉक केला. तुमचे खाते सुरक्षित करा.” 

  • प्रसंग 4: कंप्लायन्स अधिकारी भासवून स्क्रीन-शेअरिंग ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडणे

विक्रमला स्वतःची ओळख “KYC कंप्लायन्स डेस्कवरून अंजली” अशी सांगणाऱ्या एका कॉलरचा फोन येतो. एका अनिवार्य ऑडिटमुळे त्याचे वॉलेट सस्पेंड करण्यात आले आहे, असा ती इशारा देते. सहकार्य केल्यास अवघ्या दोन मिनिटांत ही समस्या सुटेल असे सांगत, ती त्याला एक रिमोट-ॲक्सेस ॲप डाउनलोड करायला सांगते: “QuickVerify टूल इन्स्टॉल करा आणि मी कॉलवर असतानाच तुमचे PhonePe ॲप ओपन करा. आमची सिस्टीम सुरक्षितपणे तुमचे तपशील सिंक करेल आणि तुमचे वॉलेट अनफ्रीझ करेल.” विक्रम तिच्या सांगण्याप्रमाणे करतो आणि बॅकग्राउंडमध्ये स्क्रीन-शेअर ॲप सुरू असतानाच PhonePe ओपन करतो. त्याच क्षणी ॲपची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा तात्काळ ॲक्टिव्हेट होते. डिव्हाईस गार्ड चालू असलेले स्क्रीन-मिररिंग सेशन शोधून काढतो, तर सिस्टीम सोशल इंजिनिअरिंगची ठराविक संशयास्पद लक्षणे ओळखते. स्कॅमरला कोणताही संवेदनशील तपशील दिसू नये म्हणून PhonePe त्वरित स्क्रीन ब्लॅकआउट (काळी) करते आणि इंटरफेस फ्रीझ करून एक स्पष्ट चेतावणी देते: “संभाव्य फसवणूक (स्कॅम) आढळली आहे.”

KYC फसवणूक आणि खाते दुसऱ्याच्या ताब्यात गेल्याचे सामान्य संकेत

  • तुम्ही कधीच अर्ज न केलेल्या खात्यांसंदर्भात अचानक येणारे फोन किंवा ईमेल
  • तुमच्या परवानगीशिवाय झालेल्या व्यवहारांची देणारे अलर्ट्स किंवा एसएमएस सूचना
  • तुम्ही अर्ज न केलेली बिले किंवा क्रेडिट कार्ड घरी येणे
  • तुमच्या बँक किंवा आर्थिक खात्यांमध्ये लॉगिन करण्यात अडचणी येणे
  • अतिशय आकर्षक वाटणाऱ्या, पण प्रत्यक्षात ओळख चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑफर्स
  • SMS, WhatsApp किंवा ईमेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या तातडीच्या लिंक्स (URLs); ज्यांमध्ये तुम्ही तुमचे KYC अपडेट न केल्यास तुमचे खाते ब्लॉक किंवा सस्पेंड केले जाईल असा दावा केला जातो.

ओळख चोरी आणि KYC फसवणुकीपासून आपले संरक्षण कसे करावे

  • तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा : आधार, PAN, OTP अशा संवेदनशील कागदपत्रांची माहिती फोन, ईमेल किंवा मेसेजिंग अ‍ॅप्सवर शेअर करू नका.
  • फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध राहा: संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे किंवा अविश्वसनीय वेबसाइट्सवर माहिती शेअर करणे टाळा. तुमचे खाते ब्लॉक किंवा सस्पेंड केले जाईल असा दावा करत SMS, WhatsApp किंवा ईमेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या लिंक्सवर (URLs) क्लिक करू नका. 
  • खात्यांची नियमितपणे तपासणी करा : बँक स्टेटमेंट्स, क्रेडिट रिपोर्ट्स आणि खात्यांमध्ये होणारे व्यवहार तपासा, अनधिकृत ॲक्सेस केलेला तर नाही ना याची खात्री करा.
  • भक्कम ओळख पडताळणी वापरा : शक्य असल्यास टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू करा.
  • संवादाची पडताळणी करा: जर वित्तीय संस्थांकडून तुमच्याशी अनपेक्षितपणे संपर्क साधला गेला, तर अधिकृत संपर्क माध्यमांद्वारे त्यांची ओळख पडताळून पहा. कोणत्याही अनोळखी SMS इशाऱ्यांमध्ये दिलेल्या क्रमांकांवरून नव्हे, तर केवळ व्हेरिफाय केलेल्या ॲपमध्ये नमूद केलेल्या अधिकृत क्रमांकांवरूनच ग्राहक सपोर्टशी संपर्क साधा. खाते सस्पेंड होण्याबाबतचा असा कोणताही तातडीचा मेसेज बंद करा आणि अधिकृत नोटिफिकेशन्स तपासण्यासाठी थेट तुमच्या फोनच्या मेनूमधून अधिकृत ॲप उघडा.
  • स्क्रीन-शेअरिंग ॲप्सपासून सावध राहा: अधिकृत कस्टमर केअर टीम्स तुम्हाला कधीही थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन्स (विशेषतः रिमोट डेस्कटॉप किंवा स्क्रीन-शेअरिंग ॲप्स) इन्स्टॉल करण्यास सांगणार नाहीत.
  • ओळखपत्रांचा गैरवापर झाल्यास त्वरित कळवा : तुमची वैयक्तिक कागदपत्रे गैरवापरात आल्यास, संबंधित संस्थांना आणि अधिकाऱ्यांना लगेच कळवा.
  • KYC फक्त अधिकृत माध्यमातूनच करा : KYC प्रक्रिया नेहमी अधिकृत वेबसाइट्सवर किंवा खात्रीशीर प्रतिनिधीमार्फतच पूर्ण करा.

PhonePe तुमचे सक्रियपणे कसे संरक्षण करते:

  • इंटेलिजंट रिस्क स्कोरिंग इंजिन्स: PhonePe ची बॅकएंड सिस्टीम प्रत्येक व्यवहार आणि लॉगिन प्रयत्नाचे रिअल-टाइममध्ये मूल्यांकन करण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर करते. संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेचच एखाद्या अनोळखी डिव्हाइसवरून लॉगिनचा प्रयत्न झाल्यास, सिस्टीम ही हालचाल फ्लॅग (संशयास्पद म्हणून चिन्हांकित) करू शकते किंवा ब्लॉक करू शकते.
  • इन-ॲप सेंट्रिक प्रक्रिया: PhonePe हे सुनिश्चित करते की अस्सल KYC विनंत्या आणि खाते अपडेट्सवर केवळ अधिकृत ॲप्लिकेशनच्या सुरक्षित वातावरणातच थेट प्रक्रिया केली जाईल. ते युजर्सना टेक्स्ट मेसेजमध्ये पाठवलेल्या एक्सटर्नल वेब लिंक्सद्वारे KYC पूर्ण करण्याची सक्ती कधीही करत नाहीत.
  • ॲपवरील वॉर्निंग: जेव्हा युजर नवीन डिव्हाइसवरून लॉगिन मंजूर करणे किंवा पैसे ट्रान्सफर करणे यासारखी उच्च-जोखीम असलेली कोणतीही कृती करणार असतो, तेव्हा PhonePe ॲप ठळक आणि सहज नजरेत येणारे वॉर्निंग दाखवण्यासाठी तयार केले आहे; ज्यामुळे स्कॅमर्सनी निर्माण केलेल्या कृत्रिम घाईगडबडीचा आणि तातडीचा दबाव नाहीसा होण्यास मदत होते.

जर तुमची ओळख संबंधित माहितीचा वापर कोणत्याही PhonePe अकाउंटवर चुकीच्या पद्धतीने झाला असेल, तर काय करावे:

जर तुम्हाला PhonePe द्वारे फसवणुकीचा संशय आला असेल किंवा फसवणूक झाली असल्याचं लक्षात आलं असेल, तर तात्काळ खालीलपैकी कोणत्याही माध्यमातून तक्रार नोंदवा :

  • PhonePe ग्राहक सेवा क्रमांक: PhonePe ग्राहक सेवा यांना 80–68727374 किंवा 022–68727374 या क्रमांकांवर कॉल करा. ग्राहक सेवा प्रतिनिधी तुमच्यासाठी तिकीट तयार करेल आणि पुढील मदत करेल.
  • सोशल मीडिया: फसवणुकीच्या घटना PhonePe च्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर कळवा:
  • तक्रार निवारण: तुमच्याकडे कम्प्लेंट तिकीट असेल तर तुम्ही तुमचा तिकीट आयडी वापरून https://grievance.PhonePe.com/ या वेबसाइटवर तुमची तक्रार नोंदवू शकता.

संबंधित प्राधिकरणांमध्ये तक्रार करणे

  • सायबर क्राईम सेल : सायबर क्राइम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करा किंवा 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.
  • दूरसंचार विभाग (DOT) : संशयास्पद मेसेज, कॉल किंवा फसवणुकीच्या विनंत्यांची माहिती संचार साथी पोर्टलवरील चक्षु सुविधेमार्फत द्या

अस्वीकरण : हा मजकूर मूळतः जुलै 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता आणि प्रस्तुतता तसेच सध्याच्या नियामक मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगततेसाठी ऑक्टोबर 2026 मध्ये त्याचे सखोल पुनरावलोकन करून तो अपडेट करण्यात आला आहे. 

Keep Reading