PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

KYC फसवणूक: काय आहे आणि त्यापासून सुरक्षित कसे राहायचे

PhonePe Regional|2 min read|30 April, 2021

URL copied to clipboard

KYC लवकर पूर्ण करून घेण्याच्या नादात, अनेक ग्राहक KYC फसवणूकीचे बळी ठरतात. ही फसवणूक कशी केली जाते हे पुढे पाहा.

रोहनला त्याने त्याचे KYC केले का असे विचारणारा एक फोन येतो आणि फोन करणाऱ्या व्यक्तीद्वारे KYC किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याने त्यासाठी उशीर का करू नये याबाबत सुद्धा त्याला माहिती दिली जाते. नंतर त्या व्यक्तीद्वारे रोहनला KYC थेट फोनवर थोडेसे शुल्क देऊन पूर्ण करता येते असे सांगितले जाते.

पुढे, फोन करणारी व्यक्ती रोहनला त्याचे पूर्ण नाव आणि इतर वैयक्तिक तपशील शेअर करण्यास सांगते, जेणेकरून ती KYC प्रक्रिया सुरू करु शकेल. त्यामुळे रोहनला सुद्धा असे वाटते की त्याचे KYC लवकर करून मिळते आहे. या कॉलच्या दरम्यान फसवणूक करणारी व्यक्ती रोहनला ‘Anydesk’ ॲप डाउनलोड करण्यास सांगते, जेणेकरून ते दुरस्थपणे प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

यानंतर, रोहनला फसवणूक करणाऱ्या व्यक्ती द्वारे फी म्हणून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगीतले जाते. रोहन द्वारे ही प्रक्रिया केल्यावर त्याला वाटते आता त्याला KYC चे लवकरच पुष्टीकरण प्राप्त होईल. परंतू जेव्हा रोहन कॉल बंद करतो, तेव्हा त्याला त्याच्या फोनवर दोन नवीन मॅसेज दिसतात. एक त्याच्या डेबिट कार्डवर व्यवहारासाठीचा OTP असतो आणि दुसरा त्याच्या खात्यातून 30,000 रुपये पैसे डेबिट झाल्याची अधिसूचना असते!

ही फसवणूक कशी घडली हे पाहा:
फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने रोहनला जी ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगितली होते ती एक स्क्रीन-शेअरींग ॲप होती. ही ॲप फसवणूक करणाऱ्यास रोहनच्या फोनच्या स्क्रीनवरील सर्व गतिविधी पाहण्याची अनुमती देते.
जेव्हा रोहनने शुल्क देण्यासाठी पैसे ट्रान्सफरचा व्यवहार केला, तेव्हा फसवणूक करणारी व्यक्तीने रोहनचा पिन आणि पासवर्ड तपशीलांसोबत, वापरलेले बँक खाते आणि कार्ड नंबर पाहून घेतले. नंतर त्याने या तपशीलांचा वापर करून त्याच्या स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेतले. यासाठी आवश्यक असलेला OTP सुद्धा त्या व्यक्तीने रोहनच्या फोनवरील Anydesk ॲपमुळे पाहून घेतला.

कृपया नेहमी लक्षात ठेवा: KYC हे फोनवर किंवा तृतीय-पक्षीय ॲप डाऊनलोड करण्याद्वारे केले जाऊ शकत नाही. तुम्हाला फसवण्यासाठी, भामटे लोक तुम्हाला तुमचे विद्यमान बँकेचे KYC किंवा डिजिटल वॉलेट अवैध झाले असल्याचे आणि ते ऑनलाइनच त्यास पुन्हा वैध करू शकतात असे सुद्धा सांगू शकतात. पण असे सुद्धा करणे शक्य नाही.

  • फोन करणाऱ्यांना कधीही तुमचे बँक खाते, कार्ड किंवा कोणतेही अशा प्रकारचे तपशील शेअर करू नका.
  • कोणत्याही फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले तरी Screenshare, Anydesk, Teamviewer यासारख्या ॲप्स डाउनलोड करू नका. या ॲप्स फसवणूक करणाऱ्यांना तुमचे सर्व पासवर्ड, पिन आणि इतर महत्त्वाचे तपशील पाहाण्याची अनुमती देतात.
  • खरे PhonePe प्रतिनिधी कधीही तुम्हाला फोन करून तुमचे KYC फोन वर करण्यास किंवा तुम्हाला तृतीय-पक्षाच्या ॲप डाउनलोड करण्यास सांगणार नाहीत.

फसवणूक पासून सुरक्षित राहाण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
PhonePe कधीच तुमचे गोपनीय तपशील विचारत नाही. PhonePe प्रतिनिधी असल्याची बतावणी करून तुमच्याकडे कोणी अशा तपशीलांची विचारणा केल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. फक्त @phonepe.com डोमेन वरून आलेल्या ई-मेल्सला प्रतिसाद द्या.

  • PhonePe ग्राहक सहाय्यता नंबरसाठी Google, Twitter, FB इत्यादी वर शोध घेऊ नका. PhonePe ग्राहक सहाय्यता सोबत संपर्क साधण्यासाठी support.phonepe.com हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे.
  • PhonePe सहाय्यता असल्याचा दावा करणाऱ्या, सत्यापित नसलेल्या मोबाइल नंबरवर कधीही कॉल करू/प्रतिसाद देऊ नका.
  • विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील केवळ आमच्या अधिकृत खात्यावरून आमच्याशी संपर्क करा.
    Twitter हँडल्स: https://twitter.com/PhonePe
    https://twitter.com/PhonePeSupport
    – Facebook खाते: https://www.facebook.com/OfficialPhonePe/
  • तुमच्या कार्ड किंवा खात्याचे तपशीलांसोबत तडजोड झाल्याची आढळल्यास:
    – support.phonepe.com वर रिपोर्ट करा
    – तुमच्या जवळच्या सायबर-सेल सोबत संपर्क करा आणि पोलिस तक्रार दाखल करा.

सुरक्षितपणे व्यवहार कसा करावा याबाबत व्हिडिओ पाहा:: https://youtu.be/VbfhRK23BQU

Keep Reading