PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

फसवणूक करणाऱ्यांची योजना हाणून पाडा: वीज बील भरण्यातील फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना

PhonePe Regional|3 min read|25 September, 2023

URL copied to clipboard

डिजिटल प्रगती होत असताना, बिले आणि खर्च भागवण्यासाठी ऑनलाइन पेमेंट ही सर्वात सोपी पद्धत झाली आहे. मात्र, तंत्रज्ञान विकसित होतंय त्याबरोबरच सायबर गुन्हेगारीही वाढते आहे.

या ब्लॉगमधून भारतातील ऑनलाइन वीज भरण्यातील वेगवेगळ्या वाढत असलेल्या फसवणुकींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. फसवणूक कोणत्या स्वरूपात होते, त्याचे संभाव्य परिणाम काय आहेत आणि या डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी काय काय उपाय करता येतात यावर चर्चा करण्यात आली आहे.

डिजिटल पेमेंटचा उदय:

भारताच्या डिजिटल परिवर्तनामुळे वीज बिल भरणासह ऑनलाइन व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे आपले काम सोपे झाले आहे, त्यांना गती प्राप्त झाली आहे आणि व्यवहार अधिक सक्षम झाले आहेत. या सुविधेमुळे ग्राहक आपली बिले अगदी सहजपणे घरबसल्या भरू शकत आहेत.

ऑनलाइन वीज बिल भरणा फसवणुकांची ओळख आणि प्रकार:

घोटाळे करणारे सामान्यत: लोकांचे फोन हॅक करून एक टेक्स्ट मेसेज करतात. या मेसेजमध्ये लिहिलेले असते की ग्राहकांनी त्यांचे वीज बिल भरलेले नाही आणि त्यांनी ते त्वरित भरावे. असे मेसेज वीज विभागाकडून पाठवल्याचा ते दावा करतात आणि प्राप्तकर्त्याला चेतावणी देतात की, गेल्या महिन्याचे बिल न भरल्यास त्यांच्या घरची वीज आज रात्रीच बंद केली जाईल.

नमुना:

प्रिय ग्राहक, तुमची वीज आज रात्री 8:30 वाजता विद्युत कार्यालयाद्वारे खंडित केली जाईल. तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट केलेले नाही, कृपया आमच्या वीज अधिकाऱ्याशी 824*****59 यावर तात्काळ संपर्क साधा. धन्यवाद.

प्रकार:

फिशिंग फसवणूक:

सायबर गुन्हेगार फसवे ई-मेल, टेक्स्ट मेसेज किंवा बनावट वेबसाइट युजरना त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती उघड करण्यासाठी फसवतात. संशय न आल्याने पीडित व्यक्ती अशा फसवणुकीला बळी पडून खोटी बिले भरू शकतात.

मालवेअर हल्ले:

खोट्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने तुमच्या डिव्हाइसमध्ये शिरून पेमेंट तपशीलांसह संवेदनशील डेटा चोरता येऊ शकतो. हॅकर्स ऑनलाइन व्यवहार रोखू शकतात आणि पेमेंट प्रक्रियेत फेरफार करू शकतात.

बनावट पेमेंट पोर्टल:

फसवणूक करणारे काल्पनिक वीज बिलांची देयके गोळा करण्यासाठी अगदी खरी वाटावीत अशी पेमेंट पोर्टल तयार करतात. युजरना कायदेशीर पेमेंट करत असल्याचा भास होतो आणि ते अशा घोटाळ्यांना बळी पडतात.

सेवा प्रदात्यांची तोतयागिरी:

तोतया व्यक्ती फोन कॉल किंवा ई-मेलद्वारे वीज पुरवठादार असल्याचे भासवू शकतात. ते असा दावा करतात, की युजरची बिले थकित आहेत. त्यानंतर ते युजरना फसव्या चॅनेलद्वारे त्वरित पेमेंट करण्याचे निर्देश देतात.

ऑनलाइन वीज बिल भरणा फसवणुकीचे परिणाम:

आर्थिक नुकसान:

पीडित व्यक्ती नकळतपणे सायबर गुन्हेगारांना पैसे ट्रान्सफर करते, परिणामी त्यांचे त्वरित आर्थिक नुकसान होते.

ओळख चोरणे: वैयक्तिक आणि आर्थिक ओळख चोरल्यामुळे ओळख चोरीबरोबरच आर्थिक नुकसानही होते.

चोरी केलेली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती ओळख चोरी आणि त्यानंतरचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

गोपनीयता भंग:

संवेदनशील डेटा जर चुकीच्या हाती लागला तर गोपनीयतेचा भंग होऊ शकतो आणि युजरना फसवणुकीच्या अनेक प्रकारांना सामोरे जावे लागू शकते.

प्रतिबंधात्मक उपाय:

स्त्रोतांची पडताळणी करणे:

ऑनलाइन पेमेंटसाठी केवळ वैध वीज पुरवठादारांच्या अधिकृत वेबसाइट आणि ॲप वापरा.

माहिती मिळवा: सायबरसुरक्षा ट्रेंड्सवर लक्ष ठेवा आणि सामान्य घोटाळ्यांची माहिती करून घ्या.

URL तपासा:

वेबसाइटची URL “https://” ने सुरू होत असल्याची खात्री करा आणि यामध्ये सुरक्षित कनेक्शन दर्शवणारे पॅडलॉक चिन्ह आहे हेही जरूर पाहा.

पेमेंट विनंत्यांची पडताळणी करा:

कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी पेमेंट विनंत्यांची सत्यता आणि पाठवणाऱ्याची माहिती नेहमी दोनदा तपासा.

सुरक्षित संभाषण चॅनेल:

कोणत्याही पेमेंट-संबंधित शंका किंवा समस्यांसाठी तुम्ही फक्त वैध ग्राहक समर्थन चॅनेलशी संवाद साधत आहात याची खात्री करा.

अधिकृत ॲप वापरा:

UPI ॲप फक्त अधिकृत ॲप स्टोअर आणि पडताळणी केलेल्या स्रोतांमधून डाउनलोड करा.

URL तपासा: वैधता आणि सुरक्षिततेसाठी वेबसाइट URL ची पडताळणी करा. (“https” आणि पॅडलॉक चिन्ह पाहा).

टू-फॅक्टर प्रमाणीकरण (2FA):

तुमच्या ऑनलाइन खात्यांमध्ये अतिरिक्त सुरक्षा स्तर जोडणे शक्य असेल, तर 2FA सुरू करा.

माहिती शेअर करणे टाळा: ई-मेल किंवा फोनद्वारे वैयक्तिक, आर्थिक किंवा पासवर्ड-संबंधित माहिती कधीही शेअर करू नका.

घटना नोंदवा:

तुम्हाला ऑनलाइन वीज बिल भरणा फसवणूक होत असल्याचा संशय आला, तर तुमच्या वीज पुरवठादाराला आणि स्थानिक पोलीस किंवा सायबर क्राईम हेल्पलाइन यांसारख्या योग्य अधिकाऱ्यांना त्वरित कळवा.

UPI-आधारित फसवणुकीचा सामना करण्यासाठी प्रयत्न:

जनजागृती मोहीम:

UPI-संबंधित फसवणूक आणि सुरक्षित पद्धतींबद्दल युजरना शिक्षित करण्यासाठी सरकार, वित्तीय संस्था आणि सायबर सुरक्षा एजन्सी मोहिमा चालवतात.

ॲप सुरक्षा: पेमेंट ॲपमधील अनधिकृत प्रवेश आणि फसवणूक टाळण्यासाठी त्यांचे सुरक्षा उपाय सतत वाढवत असतात.

निष्कर्ष:

वीज बिलांसाठी ऑनलाइन पेमेंट करण्याच्या सुविधेमुळे ग्राहकांचे जीवन सुसह्य झाले आहे, परंतु त्यासाठी अधिक दक्षताही घ्यावी लागणार आहे. सायबर गुन्हेगार आर्थिक फायद्यासाठी डिजिटल मार्गांचा गैरफायदा घेत आहेत. नियमित विविध प्रकारची माहिती मिळवून, त्यांचे पालन करून आणि सावधनता बाळगून भारताच्या विकसित होत असलेल्या डिजिटल लँडस्केपमध्ये ऑनलाइन वीज बिल भरणा फसवणुकीच्या तावडीतून तुमची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यास तुम्ही मदत करू शकता.

तुम्ही वीज बिलात फसवणुकीचे पीडित असाल तर तुम्ही काय करावे:

तुम्ही वीज बिल भरण्यातील घोटाळा किंवा फसवणुकीला बळी पडल्याची तुम्हाला शंका येत असेल, तर संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी तत्काळ कारवाई करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही पुढील पायऱ्यांवर विचार करू शकता:

  1. PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि ““have an issue with the transaction/व्यवहारात समस्या आहे” पर्यायाखाली समस्या मांडा.
  2. PhonePe कस्टमर केअर नंबर: एखादी समस्या मांडण्यासाठी तुम्ही PhonePe कस्टमर केअरला 80–68727374/022–68727374 वर कॉल करू शकता, त्यानंतर कस्टमर केअर एजंट तिकीट तयार करेल आणि तुमच्या समस्येसंदर्भात मदत करेल.
  3. वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चे वेबफॉर्म वापरून तिकीटसुद्धा तयार करू शकता, https://support.phonepe.com/
  4. सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसव्या घटनांची तक्रार करू शकता
    Twitter — https://twitter.com/PhonePeSupport
    Facebook — https://www.facebook.com/OfficialPhonePe
  5. तक्रार: सध्याच्या तक्रारीचा रिपोर्ट नोंदवण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करू शकता आणि पूर्वी तयार केलेले तिकीट आयडी शेअर करू शकता.
  6. सायबर सेल: शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेलच्या 1930 या हेल्पलाइनवर वर संपर्क साधू शकता.

महत्त्वाचा रिमाइंडर — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. phonepe.com डोमेनकडून न आलेल्या परंतु PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या सर्व ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading