PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

PhonePe द्वारे सुरक्षित डिजिटल पेमेंट करा

PhonePe Regional|3 min read|05 May, 2021

URL copied to clipboard

कोविड -19 माहामारीने भारतातील लोकांचा डिजिटल पेमेंटचा वापर अभूतपूर्व वाढला. PhonePe सारख्या डिजिटल पेमेंट ॲपने लोकांचे आयुष्य सोपे केले आहे कारण त्यांना घराबाहेर पडण्याची गरज नाही किंवा पेमेंट करण्यासाठी लांब रांगेत उभे राहाण्याची गरज नाही. PhonePe चा वापर करून युजर पैसे पाठवू किंवा प्राप्त, मोबाइल, DTH, डेटा कार्ड रिचार्ज, युटिलिटी बिलांचे पेमेंट, सोने खरेदी करू शकतात आणि तसेच ऑनलाइन खरेदीचे पेमेंट सुद्धा दुरस्थपणे करू शकतात.

जेव्हा प्रश्न सुरक्षेचा असतो, PhonePe तुम्हाला तीनपट सुरक्षा आवरण देते, आणि कोणताही व्यवहार अयशस्वी न होता दैनिक आधारावर कोट्यावधी व्यवहार करणे सक्षम करते. या तीनपट सुरक्षा आवरणात समावेश आहे:

  • लॉगिन पासवर्ड: ॲपसाठी पहिले सरुक्षा आवरण लॉगिन पासवर्ड आहे. तुमची ॲप एका विशिष्ट फोन आणि नंबरशी मॅप केली आहे. तुम्ही तुमचा फोन किंवा तुमचा नंबर बदलला, तर तुम्हाला ॲपला पुन्हा अधिकृत करावे लागेल.
  • PhonePe ॲप लॉक: तुम्हाला दरवेळा PhonePe ॲप वापरणे सुरू करण्यासाठी, त्यांस तुमच्या बोटाच्या ठश्याचा आयडी, चेहऱ्याचा आयडी, किंवा नंबर लॉक वापरून अनलॉक करावे लागते.
  • UPI पिन: PhonePe वरील सर्व पेमेंटसाठी, मग ते 1 रुपयाचे असो किंवा 1 लाखाचे, कोणतेही पेमेंट UPI पिन टाकल्याशिवाय होऊ शकत नाही.

डिजिटल पेमेंट सुरक्षित आणि सोयीचे असले तरी सध्याच्या काळात सुरक्षितपणे व्यवहार करणे महत्वाचे आहे, तसेच आपल्याला फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारांबाबत आणि वापरकर्त्यांचे कष्टाचे पैसे लुटण्यासाठी फसवणूक करणारे कसे सतत नवनवीन मार्ग शोधत असतात याचे ज्ञान असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

विविध प्रकारच्या फसवणूक प्रकारांबाबत आणि सुरक्षितपणे व्यवहार करण्यासाठी तुम्ही काय करणे आवश्यक आहे याबाबतची पुढे माहिती दिली आहे:

  1. कर्जाच्या नावाखाली फसवणूक: कर्ज घोटाळेबाज कर्जाची निकड असलेल्या गरजू लोकांना फसवण्याच्या उद्देशाने कर्ज ऑफर करून त्यांच्या पैशांच्या गरजेचा फायदा घेतात. ते सिक्युरिटी म्हणून आगाऊ रकमेची मागणी करतात — जी कधीही परत केली जाणार नसते किंवा प्रक्रिया शुल्क, विलंब शुल्क, व्याज इत्यादी नावाने एकरकमी पैसे मागतात, परिणामी पीडिताचे मोठे नुकसान होते.
  2. क्रेडिट कार्ड बिल पेमेंट फसवणूक: अशा प्रकरणात फसवणूक करणारे भामटे त्यांच्या क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यासाठी पिडितांना त्यांच्या बँक खात्याची माहिती शेअर करण्यासाठी अमिष देतात जेणेकरून ते पिडितांच्या बँक खात्यातील बॅलेन्सचा वापर करून त्यांच्या बिलाचे पेमेंट करतात. ते स्वतःला दूरचे नातेवाईक/कुटुंब मित्र/पैशाची गरज असलेले व्यावसायिक असल्याचे चित्रण करून अजाण लोकांची क्रेडिट कार्ड माहिती चोरतात.
  3. सोशल मीडिया तोतयागिरी फसवणूक: फसवणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर अलीकडे एक सामान्य गोष्ट बनली आहे जो सहजपणे डिजिटल ओळख चोरीचा मार्ग बनतो आहे. घोटाळेबाज तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्याचे बनावट प्रोफाइल तयार करतात आणि तुमच्या नेटवर्कमधील लोकांकडून पैसे किंवा संवेदनशील माहितीची विनंती करण्यासाठी त्याचा वापर करतात. काही प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे तुमचे खाते हॅक करून तुमच्या यादीतील लोकांना अशा तत्परतेने विनंत्या पाठवतात ज्यामुळे याबाबत अजाण असलेल्या लोकांना यांस नकार देणे अशक्य होते.
  4. पैसे दुप्पट करण्याचे सांगून फसवणूक: पैसे दुप्पट करण्याचे सांगून केल्या जाणाऱ्या फसवणुकीत लोकांमध्ये खोटा विश्वास निर्माण केला जातो की ते रातोरात पैसे दुप्पट करू शकतात. हे एकतर एखाद्याचे पैसे दुप्पट करण्यासाठी मर्यादित कालावधीच्या ऑफरसह येणारी बनावट लिंक तयार करून किंवा पीडिताचे पैसे सुरुवातीला दुप्पट करून विश्वास निर्माण करून आणि शेवटी जेव्हा ते मोठी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांना लुबाडून केले जाते.
  5. नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक: नोकऱ्या शोधणाऱ्यांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या वाढीमुळे नोकरीच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात घोटाळेबाज केवळ तुमची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी किंवा तुमच्या डिव्हाइसवर सुरक्षा भंग करणाऱ्या बनावट लिंक्स तयार करण्यासाठी बनावट नोकरीच्या ऑफर ऑनलाइन पोस्ट करतात.

सुरक्षित डिजिटल पेमेंटचे लाभ घेणे चालू ठेवण्यासोबत तुम्ही पुढील आचरणाचा अवलंब करून सुरक्षित राहू शकता आणि फसवणूक होणे रोखू शकता.

फसवणूक होणे रोखण्यासाठी काय करावे आणि काय नाही याबाबत सूचना:

  • कार्ड नंबर, एक्सपायरी दिनांक, पिन, OTP, इत्यादी सारखे गोपनीय तपशील कोणालाही देऊ नका. PhonePe प्रतिनिधी असल्याची बतावणी करून तुमच्याकडे कोणी अशा तपशीलांची विचारणा केल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. फक्त @phonepe.com डोमेन वरून आलेल्या ई-मेल्सला प्रतिसाद द्या.
  • नेहमी लक्षात ठेवा PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कधीच ‘पेमेंट’ करण्याची किंवा तुमचा UPI पिन टाकण्याची आवश्यकता नाही.
  • नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची गरज नसते.
  • कृपया ‘पेमेंट करा’ बटन दाबण्यापूर्वी किंवा तुमचा UPI पिन टाकण्यापूर्वी तुमच्या PhonePe ॲपवर दर्शवलेला व्यवहाराचा मॅसेज काळजीपूर्वक वाचा.
  • Screenshare, Anydesk, Teamviewer, इ. सारख्या स्क्रीन शेअर करणाऱ्या तृतीय-पक्षाच्या ॲप्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका.
  • PhonePe ग्राहक सहाय्यता नंबरसाठी Google, Twitter, FB इत्यादी वर शोध घेऊ नका. PhonePe ग्राहक सहाय्यता सोबत संपर्क साधण्यासाठी https://phonepe.com/en/contact_us.html हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे.
  • विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील केवळ आमच्या अधिकृत खात्यावरून आमच्याशी संपर्क करा.
    Twitter हँडल: https://twitter.com/PhonePe_ https://twitter.com/PhonePeSupport
  • Facebook खाते: https://www.facebook.com/OfficialPhonePe/
  • वेबसाइट: support.phonepe.com
  • PhonePe सहाय्यता असल्याचा दावा करणाऱ्या असत्यापित मोबाइल नंबरवर कधीही कॉल करू/प्रतिसाद देऊ नका.
  • पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही SMS किंवा ई-मेल संदेशातील वेबसाइट लिंकवर क्लिक करू नका.
  • कोणत्याही यादृच्छिक कॉलरच्या सल्ल्यानुसार कोणतेही ॲप इन्स्टॉल करू नका.
  • पडताळणीशिवाय किरकोळ व्यवहारांनासुद्धा सहमती देऊ नका.
  • KYC पडताळणीसाठी असल्याचा दावा करणाऱ्या SMS द्वारे पाठवलेल्या नंबरवर कॉल करू नका.
  • अनोळखी नंबरचे कॉल घेऊ नका जे स्वतःला बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे म्हणून सांगतात.
  • तुमची सरकारी ओळख, तुमचा UPI आयडी, तुमचा बँक खाते क्रमांक, तुमचा पिन, तुमचा वन-टाइम पासवर्ड किंवा तुमचा नियमित पासवर्ड यासह वैयक्तिक माहिती मजकूरावर शेअर करू नका.

फसवणूक करणाऱ्याने तुम्हाला संपर्क केल्यास काय करायला हवे?

ग्राहकास फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी PhonePe वर अनेक मार्ग आहेत. यात समवेश आहे:

  1. PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि “व्यवहारासोबत एक समस्या आहे” पर्याय अंतर्गत फसवणूकचा रिपोर्ट करा.
  2. PhonePe ग्राहक सेवा नंबर: तुम्ही समस्येचा रिपोर्ट करण्यासाठी PhonePe ग्राहक सेवाकडे 80–68727374 / 022–68727374 वर संपर्क साधू शकता, ज्याच्यानंतर ग्राहक सेवा प्रतिनिधी एक तिकीट दाखल करून घेईल आणि तुमच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करेल.
  3. वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चा वेबफॉर्म वापरून — https://support.phonepe.com/ एक तिकीट सुद्धा दाखल करू शकता.
  4. सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकता:
    Twitter — https://twitter.com/PhonePeSupport
    Facebook –https://www.facebook.com/OfficialPhonePe
  5. तक्रार: विद्यमान तक्रारीवर तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलवर https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करू शकता, आणि याआधी दाखल केलेला तिकीट आयडी शेअर करा.
  6. सायबर सेल: याशिवाय, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये जाऊन फसवणूकीची तक्रार दाखल करू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवा किंवा 1930 वर सायबर क्राइम सेलकडे कॉल करू शकता.

Keep Reading