PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

नवीन फसवणूक अलर्ट: ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम

johncy|3 min read|30 January, 2024

URL copied to clipboard

मुंबईच्या टाऊन हॉलसमोरील वडाच्या झाडाखाली स्टॉक ब्रोकर्सने 1850 च्या दशकात स्टॉक एक्सचेंज सुरू केले. ते सुरू करताना, 2023 साली म्हणजेच तब्बल दीड शतकानंतर 17% पेक्षा जास्त भारतीय कुटुंब त्यांच्या गुंतवणुकीसाठी ऑनलाइन ट्रेडिंग हा पर्याय निवडतील याची त्यांना कल्पनाही नव्हती.*

डिजिटल लाटेमुळे निश्चितच बँकिंग, व्यवहार आणि गुंतवणूक कालानुरूप सोपे झाले आहे. परंतु त्यात अनेक धोकेही येतात. स्कॅम करणाऱ्यांना ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणुकीची संधी मिळते आणि ते अनेक निर्दोष लोकांना फसवण्याचे विविध कल्पक मार्ग शोधून काढतात. लोकांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो, यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर नवनवीन स्कॅम्सबद्दलची माहिती शेअर करतो. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅमवर प्रकाश टाकला आहे.

ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम म्हणजे काय?

एखादा घोटाळेबाज खोटी माहिती देऊन ब्रोकर म्हणून काम करतो किंवा बनावट वेबसाइटवर लोकांना फसवतो तेव्हा ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम होतो. अशी गुंतवणूक स्टॉक, बाँड, म्युच्युअल फंड, मालमत्ता इत्यादी स्वरूपात असू शकते.

स्कॅम करणारे कसे काम करतात?

हे घोटाळेबाज गुंतवणुकदारांना सातत्याने कमी किंवा कोणतीही जोखीम न घेता अकल्पनीय नफा देतात. तसेच इतर लोक ज्या संधीचा फायदा घेत आहेत ते तुम्ही गमवाल अशी भीती तुमच्या मनामध्ये निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असतो. या प्रकारचे घोटाळे करणारे सहसा सोशल मीडिया आणि वेबसाइट्सद्वारे ऑनलाइन जाहिरात करतात. हे लोक खरे, अधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा गुंतवणूक व्यवसायांची नक्कल करतात. अशा स्कॅममधील गुन्हेगार सतत सूचित करतात की त्यांना स्थानिक किंवा राष्ट्रीय आर्थिक कायद्यांमधून सूट आहे. ते निधी रोखून ठेवू शकतात आणि बनावट कर आकारणी, फी किंवा इतर शुल्कांसाठी देयकांची मागणी करून तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात..

बहुतेक ट्रेडिंग स्कॅम सोशल मीडियावर किंवा मेसेजिंग ॲप्लिकेशन्सद्वारे सुरू होतात. जर तुम्हाला अचानक एखाद्या व्यक्तीकडून फोन आला किंवा तुम्ही  अशा एखाद्या व्यक्तीला ऑनलाइन भेटलात आणि ही व्यक्ती तुम्हाला कधीही न ऐकलेल्या ट्रेडिंग वेबसाइटबद्दल माहिती देत असेल, तर हा नक्कीच स्कॅम असण्याची शक्यता असते.  तुम्ही अशा स्कॅमच्या ट्रेडिंग वेबसाइटवर पाठवलेले कोणतेही पैसे तुम्ही गमावाल, तुम्ही किती पैसे कमवू शकता, ते किती सोपे आणि जोखीममुक्त असेल असे ते सांगत राहतात. संभाव्य पीडितांसाठी सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्लिकेशन्स शोधण्याव्यतिरिक्त, खालील पाच निर्देशक संभाव्य ट्रेडिंग स्कॅम सूचित करतात:

 1. फसवणूक करणारे दलाल अकल्पनीय नफा मिळविण्यासाठी लहान गुंतवणूक करण्याच्या कल्पनेला जास्त प्रोत्साहन देतात.
 1. जसजसा नफा वाढतो आणि व्यक्ती पैसे काढू इच्छिते तेव्हा कथित कमाई काढता येत नाही. जेव्हा उत्तरे मागितली जातात तेव्हा कर आणि कमिशनच्या नावाखाली अवास्तव सबबी पुढे केली जातात.
 1. कालांतराने पीडिताला हे लक्षात येते की कोणतेही कर आणि कमिशन पैसे काढण्यासाठी ॲक्सेस मिळत नाहीये, तेव्हा हे सिद्ध होते की स्कॅम करणाऱ्याचा पैसे परत करण्याचा कोणताही हेतू नाही.
 1. फसवणूक करणारे जाणकार उत्तम संधी आणि लवकरच पैसे काढता येण्याचे आश्वासन देऊन सतत पैसे मागतात. 
 2. घोटाळेबाज प्रतिसाद देत नाहीत, नेहमी उपलब्ध राहात नाहीत आणि मोठ्या प्रमाणात पैसे काढल्यानंतर उत्तर देणे पूर्णपणे थांबवतात

या काही सांगण्यासारख्या खुणा आहेत, त्या लक्षात ठेवून तुम्ही ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम सहज ओळखू शकता.

तुम्ही ट्रेडिंग स्कॅमचे बळी असाल तर तक्रार कशी करावी

तुम्ही ट्रेडिंग घोटाळ्याला बळी पडल्याची तुम्हाला शंका असल्यास, संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही या पायऱ्यांचा नक्की विचार करावा:

 • PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि Others/इतर अंतर्गत समस्या मांडा. Account Security & Reporting Fraudulent Activity/खाते सुरक्षा आणि फसवणूक ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट करणे  निवडा आणि घटनेची तक्रार करण्यासाठी तुम्हाला  सर्वात योग्य वाटणारा पर्याय निवडा.
 • PhonePe कस्टमर केअर नंबर: समस्या मांडण्यासाठी तुम्ही PhonePe कस्टमर केअरला 80–68727374/022–68727374 वर कॉल करू शकता, त्यानंतर कस्टमर केअर एजंट तिकीट तयार करेल आणि तुमच्या समस्येसाठी मदत करेल.
 • वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चे वेबफॉर्म वापरून तिकीट देखील तयार करू शकता, https://support.phonepe.com/
 • सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसव्या घटनांची तक्रार करू शकता
  • Twitter — https://twitter.com/PhonePeSupport
  • Facebook — https://www.facebook.com/OfficialPhonePe
 • तक्रार: सध्याच्या बाबीवर तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करू शकता आणि पूर्वी तयार केलेला तिकीट आयडी शेअर करू शकता.
 • सायबर सेल: सर्वात शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेलच्या हेल्पलाइनवर 1930 वर संपर्क साधू शकता.

महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही.  phonepe.com डोमेनच्या नसलेल्या परंतु PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या सर्व मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

*स्रोत:

https://www.livemint.com/news/india/india75-history-of-stocks-in-india-11660492412764.htm,https://inc42.com/features/online-stock-trading-platforms-in-india-whos-thriving-whos-striving/#:~:text=As%20of%20September%202023%2C%20India,in%20shares%20and%20mutual%20funds

Keep Reading