Trust & Safety
टॉप-अप फसवणूक पासून स्वतःचे संरक्षण करा
PhonePe Regional|2 min read|08 May, 2021
टॉप-अप फसवणूक पासून स्वतःचे संरक्षण करा
तुम्हाला कोणाकडून तरी एक कॉल येतो, जे स्वतःला तुमच्या बँकेचे चे प्रतिनिधी असल्याचा, RBI, इ-कॉमर्स साइट, किंवा अगदी एका लॉटरी स्कीम कडून बोलत असल्याचा दावा करतात. काही तपशील गोळा केल्यानंतर ते तुमचा 16 अंकी कार्ड नंबर आणि CVV विचारतात. तुम्ही कॉल वर विश्वास ठेवून त्यांना ही माहिती देता.
तुम्हाला नंतर एका कोड नंबर सोबत एक SMS प्राप्त होतो. बँकेचा प्रतिनिधी तुम्हाला पुन्हा कॉल करतो आणि हा कोड सत्यापनाच्या उद्देशासाठी शेयर करायला सांगतो. एकदा तुम्ही हे केल्यावर, फसवणूक करणाऱ्याचे वॉलेट तुमच्या बँक खात्यातील पैशांनी टॉप-अप केले जाते. त्यानंतर लगेच, हा बॅलेन्स नाहीसा होतो आणि तुम्हाला समजते की तुमची फसवणूक आणि तुमच्या पैशांची चोरी झाली आहे.
महत्त्वाची सूचना — PhonePe कधीच गोपनीय किंवा वैयक्तिक तपशीलासाठी विचारत नाही. जर phone.com डोमेन वरून नसलेल्या, पण PhonePe कडून आले असल्याचा दावा करणाऱ्या सर्व ई-मेल कडे दुर्लक्ष करा . तुम्हाला फसवणूकीचा संशय आल्यास, कृपया तुमच्या बँकेशी ताबडतोब संपर्क साधा.
वरील घटनेत काय घडले?
- तुम्हाला ‘बँक कर्मचारी’ असल्याची बतावणी करणारी व्यक्ती ठग होती. तुम्ही त्यांना दिलेल्या तपशीलामुळे त्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून त्यांच्या वॉलेटचे टॉप-अप करणे शक्य झाले.
- फसवणूक करणाऱ्या ठगांना व्यवहार अधिकृत करण्यासाठी तुम्हाला प्राप्त होणारा OTP कळणे आवश्यक असते. आणि एकदा तुम्ही तो त्यांना सांगितल्यावर, ते पुढे जाऊन टॉप-अप करतात.
- तुमच्या खात्यातील पैशांनी ठगांच्या वॉलेट चे टॉप-अप केले जाते, आणि ते त्यांच्या वॉलेट मधील या रक्कमेस लगेच वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात.
- तुमच्या पैशांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठविण्याद्वारे, फसवणूक करणारे संबंधित अधिकारींना चोरीस गेलेली रकम परत मिळविणे कठीण करतात.
तुम्ही फसवणूकीपासून सुरक्षित राहण्यासाठी पुढील मार्गांचा अवलंब करु शकता:
- तुमचे बँक खात्याचे तपशील (कार्ड नंबर, कालबाह्यता तारीख, पिन) कधीच कोणाला सांगू नका.
- तुम्हाला एसएमएस किंवा इतर माध्यमातून प्राप्त होणारे OTP, पिन नंबर किंवा इतर कोड कोणासही शेअर करु नका.
- तुम्हाला बँकेकडून असल्याचा दावा करणाऱ्या अज्ञात नंबवरुन फोन आल्यास आणि ते तुमची वैयक्तिक माहिती विचारत असल्यास, अशा कॉल कडे लक्ष देऊ नका, त्यास फक्त डिस्कनेक्ट करा.
- तुम्हाला फोन वर दिलेल्या सुचनांचे पालन करु नका. कॉल करणाऱ्याला त्याऐवजी सूचनांसोबत एक ई-मेल पाठविण्यास सांगा.
- ई-मेल पाठविणाऱ्याच्या डोमेन ची तपासणी करा. जर तो [XYZ] @ gmail.com किंवा इतर कोणताही ई-मेल प्रदाता डोमेन असेल तर त्या मेल कडे दुर्लक्ष करा. ई-मेल डोमेन बँकेच्या प्रत्यक्ष डोमेन शी जुळत असल्याची खात्री करा. सर्व बँकेचे ई-मेल केवळ एका सुरक्षित https डोमेन वरूनच येतात.
सुरक्षितपणे व्यवहार कसा करावा यासाठी पुढील व्हिडिओ पाहा: https://youtu.be/4mXbF_r5K5A