PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

PhonePe वर बिझनेस करता आहात?

PhonePe Regional|3 min read|17 July, 2020

URL copied to clipboard

तुमची कमाई सुरक्षित ठेवा. व्यापारी फसवणूक पासून सावध राहा.

व्यवहारात डिजिटल पेमेंट माध्यमांच्या प्रसारामुळे आर्थिक व्यवहार करणे खूपच सोपे झाले आहे. पैसे पाठवणे आणि स्विकारणे, बिलांचे पेमेंट करणे, मोबाइल/DTH रिचार्ज, ऑनलाइन शॉपिंग, तसेच किराणा मागवणे आणि इतर दुकानांमध्ये तात्काळ ऑनलाइन पेमेंट करता येणे इत्यादींसाठी पेमेंट ॲप वापरण्यास उपलब्ध असल्यामुळे आता आपले रोख रकमेवर अवलंबून राहायचे दिवस खरोखर संपले आहेत.

लोक डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर करण्यास पसंती देत आहेत, पण काही भामटे लोक लोकांच्या अज्ञानाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन केवळ ग्राहकच नाही तर किरकोळ व्यापारींना सुद्धा नकली व्यवहारांद्वारे फसविण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात.

खाली काही उदाहरणे दिली आहेत जिथे किराणा स्टोर व्यापारींना फसवणूक करणाऱ्यांद्वारे पद्धतशीरपणे फसवले जाते.

स्क्रीन-शेअरींग ॲपच्या माध्यमातून फसवणूक

पेमेंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती व्यापाऱ्यांची दैनिक विक्री तपासायची असल्याचा बहाणा करतात. त्यांच्या संवादादरम्यान, ते व्यापारींच्या कार्ड किंवा बँक खात्याचे तपशील मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा व्यापारींचा फोन ताब्यात घेतात आणि त्यांची कष्टाची कमाई लुटतात.

उदाहरण:

फसवणूक करणारी व्यक्ती पुढीलप्रकारे फोन करते : नमस्कार, मी सेल्स सपोर्ट टीम कडून बोलत आहे, काही तांत्रिक समस्येमुळे आम्ही गेल्या काही दिवसांतील तुमच्या ग्राहकांच्या व्यवहारांना रेकॉर्ड करू शकलो नाहीत. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, या समस्येचेचे निवारण करण्यासाठी मी हा फोन केला आहे. तुम्हाला पुढीलप्रमाणे करावे लागेल:

  1. तुमचे बँक खात्याचे तपशील/डेबिट/क्रेडिट कार्ड तपशील/ BHIM UPI पिन द्या
  2. ही ॲप इन्स्टॉल करण्यासाठी, दिलेल्या लिंकवर क्लिक करा जेणेकरून आम्हाला तुमच्या समस्येचे निवारण करता येईल <फसवणूक करणारी व्यक्ती व्यापाऱ्यास Anydesk / ScreenShare सारख्या स्क्रीन शेअरिंग ॲपच्या लिंक इन्स्टॉल करण्यासाठी पाठवतात.>

व्यापारी त्यांच्या विनंतीस बळी पडून, आपले तपशील शेअर करतात आणि ॲप इन्स्टॉल करतात. जसे व्यापारी ॲप इन्स्टॉल करतात फसवणूक करणारी व्यक्ती व्यापारीच्या फोनवर नियंत्रण मिळवते आणि त्यांचे पैसे चोरी करते.

कॅशबॅक किंवा ऑफर स्कीम द्वारे फसवणूक

अशाही काही घटना घडल्या आहेत जिथे हे भामटे लोक व्यापारींच्या पेमेंट भागीदाराचे व्यापारी प्रतिनिधी असल्याचे सांगून व्यापारींना आकर्षक कॅशबॅक ऑफर्सची लालुच दाखवून त्यांची दिशाभूल करून त्यांचे पैसे चोरतात.

घटना 1

फसवणूक करणारी व्यक्ती म्हणते — मी व्यापारी सहाय्यता टीम कडून बोलत आहे. या आठवड्यात विशेष कॅशबॅक ऑफर चालू आहे. या लिंकचा वापर करून पेमेंट करा आणि थेट तुमच्या बँक खात्यात कॅशबॅकची रक्कम मिळवा.

  • ₹500 चे पेमेंट करा आणि ₹1000 कॅशबॅक मिळवा
  • ₹10,000 चे पेमेंट करा आणि ₹15,000 कॅशबॅक मिळवा

व्यापारी ऑफरला भुलतो आणि पहिला व्यवहार करतो आणि त्याला फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडून ₹1000 प्राप्त होतात. नंतर त्यांच्याकडून मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. जास्त कॅशबॅक मिळेल या आशेने व्यापारी जेव्हा ₹10,000 ट्रान्सफर करतो तेव्हा कॉल कट होतो आणि फसवणूक करून व्यक्ती नाहीशी होते.

घटना 2

फसवणूक करणारी व्यक्ती व्यापाऱ्यास फोन करून विशेष ऑफर किंवा स्कीम बाबत सांगून QR कोड द्वारे पेमेंट करण्यास सांगून पैसे चोरते.

उदाहरण:

फसवणूक करणारी व्यक्ती सांगते या आठवड्यात आमची विशेष कॅशबॅक स्कीम चालू आहे. तुमचे पैसे दुप्पट करण्यासाठी दिलेला QR कोड वापरून पेमेंट करा.

₹100 रकमेचा व्यवहार करा आणि ₹200 कॅशबॅक थेट तुमच्या बँक खात्यात मिळवा.

₹10,000 रकमेच्या व्यवहारासाठी, बंपर ₹20,000 कॅशबॅक थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. लगेच पेमेंट करा!

व्यापारी या ऑफरला भुलून QR कोड च्या माध्यमातून पेमेंट करतात आणि त्यांना ₹200 कॅशबॅक मिळते. जसे ते मोठ्या रकमेचे पेमेंट करतात, तेव्हा फसवणूक करणारी व्यक्ती कॉल डिस्कनेक्ट करते आणि पैसे परत पाठवत नाही.

गुगल फॉर्मच्या माध्यमातून फसवणूक

इथे, फसवणूक करणाऱ्या व्यक्ती गुगल फॉर्म पाठवते आणि वेगवेगळी कारणे सांगून व्यापाऱ्यांना त्यांची संवेदनशील माहिती देण्यास सांगतात आणि त्यांच्या पैशांची चोरी करतात.

उदाहरण:

फसवणूक करणारी व्यक्ती फोन करून, ते व्यापारी टीम कडून फोन करत असल्याचे सांगतात आणि तुमचे काही तपशील त्यांच्या सिस्टमध्ये अपडेट केलेले नसल्यामुळे तुमचे खाते आम्हाला काही दिवसांसाठी सस्पेंड करावे लागेल असे सांगतात. हे टाळण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल असे सांगून या लिंक वर क्लिक करून पुढील गुगल फॉर्म मध्ये तुमचे तपशील लगेच भरा असे सांगतात.

व्यापारी त्यांच्यावर विश्वास ठेवून तो फॉर्म भरतो ज्यात त्यांची वैयक्तिक आणि संवदेनशील माहिती जसे, बँक खाते नंबर, UPI पिन, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी असते. फसवणूक करणारे या माहितीचा गैरवापर करतात आणि व्यापारीचे पैसे लुटतात.

लक्षात ठेवायचे मुद्दे:

  1. कधीही तुमचे पिन आणि OTP शेअर करू नका किंवा अज्ञात कलेक्ट विनंतीचा स्विकार करू नका.
  2. अज्ञात स्त्रोतावरून आलेल्या कलेक्ट विनंतीवर पेमेंट करू/स्विकारू नका किंवा पेमेंट पाठवू नका.
  3. अज्ञात स्त्रोतांवरून आलेल्या आकर्षक ऑफर्स किंवा विनामुल्य मिळणाऱ्या वस्तुंकडे दुर्लक्ष करा
  4. तुमची संवेदनशील माहिती जसे बँक तपशील, पिन, इ. मागणारा आणि अपडेट करण्यास सांगणारा कोणताही फॉर्म भरू नका.
  5. अज्ञात व्यक्ती/व्यापारीकडून आलेल्या कलेक्ट विनंतीचा स्वीकार करण्यापूर्वी किंवा त्यांना पैसे पाठवण्यापूर्वी पाठवणाऱ्या व्यक्तीचे तपशील तपासा.
  6. पैसे प्राप्त करण्यासाठी कधीच तुमचा UPI पिन देऊ किंवा टाकू नका.
  7. सामाजिक माध्यमे जसे Twitter, Facebook सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ओळखता येईल अशी माहिती कधीच शेअर करू नका कारण फसवणूक करणाऱ्यांद्वारे त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.
  8. तुम्ही अज्ञात स्त्रोत कडून आलेल्या कोणत्याही कलेक्ट विनंतीचा स्वीकार केला असेल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यातून वजा झाले असतील तर ताबडतोब सायबर सेल/बँकेला सूचित करा
  9. फसवणूक करणाऱ्याचा नंबर PhonePe ॲपवर ब्लॉक करा.
  10. PhonePe ॲपवर फसवणूकीच्या घटनांचा रिपोर्ट करा. फसवणूकीच्या व्यवहारावर क्लिक करा, “PhonePe सहाय्यता सोबत संपर्क साधा” ची निवड करा आणि तिकीट दाखल करा.

Keep Reading