PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

सोशल मीडिया तोतयागिरी फसवणूक

PhonePe Regional|2 min read|09 December, 2022

URL copied to clipboard

आज सोशल मीडिया हा तुम्हाला जगभरातील लोकांशी जोडण्याचा एक मंच म्हणून उदयास आला आहे. तसेच तो माहिती आणि बातम्यांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे आणि तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा मोठा प्रभाव आहे.

सोशल मीडिया तोतयागिरी फसवणूक हा एक डिजिटल ओळख चोरीचा प्रकार आहे आणि तो सोशल इंजिनियरिंगच्या मोठ्या श्रेणीत मोडतो. यात तुमचा किंवा तुम्ही ओळखत असलेल्या कोणा व्यक्तीचा नकली प्रोफाइल तयार केला जातो आणि नंतर त्याचा वापर इतरांकडून पैशांची विनंती करण्यासाठी किंवा इतर संवेदनशील माहिती काढून घेण्यासाठी केला जातो.

सोशल मीडिया तोतयागिरी फसवणूक कशी घडते :

  1. फसवणूक करणारे चोरलेली माहिती वापरून सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करतात ज्यासाठी ते नकली ओळख तयार करण्यासाठी व्यक्तींच्या नाव आणि फोटोंचा वापर करतात. या भामट्या व्यक्ती बहुतेकदा काही विश्वासार्ह व्यावसायिक नावांचा प्रोफाइल सुद्धा तयार करतात जेणेकरून पीडित व्यक्ती त्यांच्यावर विश्वास ठेवतील.
  2. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना बनावट खाती वापरून विनंती पाठविली जाते आणि ग्राहकांना लक्ष्य केले जाते.
  3. फसवणूक करणारे नेहमी आपत्कालीन कारणांसाठी पैसे मागून निकडीची भावना निर्माण करतात आणि ग्राहक क्षणार्धात पैसे ट्रान्सफर करून त्यांच्या जाळ्यात अडकतात.
  4. काहीवेळा, फसवणूक करणारे तुमचे स्वतःचे खाते (उदा. Instagram किंवा Facebook) सुद्धा हॅक करू शकतात आणि तुमच्या फॉलोवरची यादीमधील लोकांना पैशांची विनंती पाठवून पैसे मागतात, असे केल्याने तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यास असे वाटू शकते की ही विनंती कायदेशीर खात्यातून आली आहे आणि ते त्यावर पैसे पाठवून त्यांचे पैसे गमावतात. असे करून खात्यावरील प्रवेश सुद्धा नाहीसा होतो आणि अनेक अनुसरक्षित ग्राहक त्यांचे पैसे गमावतात.

सोशल मीडिया फसवणूकपासून स्वतःचा बचाव कसा करायचा :

  1. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. अशा लिंकवर क्लिक करून तुम्ही तुम्ही तुमच्या सोशल मीडिया खात्यावरचा प्रवेश गमवाल.
  2. जेव्हा प्रोफाइल तपशील नकली दिसतात तेव्हा कोणत्याही खात्यावर तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका.
  3. कधीही तुमचे कार्डचे तपशील किंवा OTP कोणालाही फोनवर, ई-मेल किंवा इतर माध्यमाने शेअर करू नका.
  4. अधिकृत स्त्रोत आणि कंपनीच्या वेबसाइटवर माहितीची सत्यता नेहमी सत्यापित करा. व्यवसायाच्या साइटवरून विनंती प्राप्त झाल्यास त्यांच्या अधिकृत साइटवर जाऊन व्यवसायाचे नाव आणि वेबसाइट सत्यापित करा, कारण बनावट व्यवसाय प्रोफाइलच्या नावात किंवा वेबसाइटमध्ये थोडासा क्षुल्लक बदल केलेला असेल.(www.facebook.com आणि www.facebooks.com )

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीची गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. अशा सर्व ई-मेल्सकडे कडे दुर्लक्ष करा जी PhonePe कडून असल्याचा दावा करतात पणे ती phonepe.com डोमेनवरून आलेली नसतात. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास कृपया अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधा.

Keep Reading