PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

नकली ॲप पासून सुरक्षित राहा!

PhonePe Regional|1 min read|27 April, 2021

URL copied to clipboard

आजच्या तंत्रज्ञानच्या युगात, आपण आपल्या सोयीसाठी मोबाइल फोनचा वापर आपली सर्व वैयक्तिक आणि मौल्यवान माहिती साठवण्यासाठी करतो. तथापि, हॅकर आणि फसवणूक करणारे सतत आपल्या वैयक्तिक डिव्हाइसची सुरक्षा मोडण्यासाठी सतत नवीन मार्ग शोधत असतात.

सायबर अटॅक आणि तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता याबाबत अधिक जाणा.

अलीकडील सायबर-धोका अपडेट नुसार, तुमच्या मोबाइल फोनवर नियंत्रण आणि तुमच्या संवेदनशील माहितीचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने हॅकर्स नकली ॲपच्या स्वरूपात व्हायरस/ट्रोजन्स चा वापर करतात.

हे व्हायरस/ट्रोजन फोटो एडिटिंग, टेक्स्ट एडिटिंग, पेमेंट, बँकिंग आणि गेमिंग ॲपचा तुमची खात्री पटेल असा कायदेशीर छद्मी वेष घेतात.

एकदा इन्स्टॉल केल्यावर, हॅकर्स या संक्रमित ॲपचा वापर करून तुमच्या नकळत तुमच्या फोनवर अनेक फंक्शन करतात. ते इंटरनेटवर ॲक्सेस मिळवू शकतात, सिस्टम अलर्ट बदलू शकतात, अतिरिक्त पॅकेज इन्स्टॉल करू शकतात, रिबूट केल्यावर आपोआप चालू करू शकतात, संपर्क, मीडिया फाइल्स पाहू शकतात, फोटो घेतात, तुमचे वर्तमान लोकेशन शोधू शकतात, लॉक स्क्रीन कोड वाचतात, OTP तपशीलासह ॲपचे पिन आणि SMS वाचतात.

तुमचा डिव्हाइस आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पुढे दिलेल्या सूचनांचे पालन करा!

  1. विश्वासाच्या नसलेल्या स्त्रोतांवरून ॲप डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका. विश्वसनीय स्त्रोतांपासून जसे Google Play Store आणि App Store मधून ॲप इन्स्टॉल करा.
  2. ॲप परवानगींची पडताळणी करा आणि फक्त त्या परवानग्या द्या ज्या ॲपच्या उद्देशासाठी समर्पक आहेत.
  3. तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये “untrusted sources” (अविश्वासार्ह स्त्रोत) मधून ॲप इन्स्टॉल करण्याची परवानगी अक्षम करण्याचे लक्षात ठेवा.
  4. सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क वापरणे टाळा आणि गरज नसताना तुमचे वाय-फाय बंद करा. सार्वजनिक जागेत नकली वाय-फाय ॲक्सेस पॉइंट असू शकतात ज्यांचा वापर संक्रमित ॲपचे वितरण करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  5. प्रतिष्ठित प्रदात्याकडून सुरक्षा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि त्यास नियमित अपडेट करा.
  6. तुम्हाला ॲप डाउनलोड करायची असेल, तर ॲप इन्स्टॉल करण्यासाठी सुरक्षित असल्याची खात्री करा.
  7. अज्ञात स्त्रोतावरून ई-मेल मध्ये आलेल्या टेक्स्ट मॅसेज मधील लिंक किंवा झिप फाइल डाउनलोड करू नका.
  8. तुमच्या ब्राउजरवरील फाइल्स डाउनलोड करायचा प्रयत्न करत असलेले वेबपेज लगेच बंद करा.

Keep Reading