PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

QR कोड द्वारे फसवणूक पासून सुरक्षित राहा!

PhonePe Regional|2 min read|12 May, 2021

URL copied to clipboard

डिजिटल पेमेंटने कोट्यावधी भारतीयांचे आयुष्य सोपे केले आहे. तथापि, पेमेंट फसवणूकच्या घटनेत सुद्धा वाढ होत आहे. तुम्ही तुमचे कार्ड किंवा बँक खात्याचे तपशील नाही दिले तरी फसवणूक करणारे तुम्हाला फसवू शकतात याबाबत तुम्ही जाणता का? अशाच प्रकारची एक फसवणूक आहे QR कोड द्वारे फसवणूक.

QR कोड च्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते हे पुढे पाहा:
फसवणूक करणारे तुम्हाला एका QR कोड चा फोटो WhatsApp किंवा कोणत्याही इतर फोटो शेअर करता येणाऱ्या ॲप वर पाठवतात. या मॅसेजमध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यात रोख रकमेचे बक्षीस प्राप्त करण्यासाठी कोड स्कॅन करून रक्कम टाकण्यास, तुमचा UPI पिन टाकण्यास सांगितले जाते. वैकल्पिकरित्या, फसवणूक करणारे अशा ॲपचा वापर करतात ज्या त्यांना आधीच भरलेल्या रकमेसोबतचा QR कोड पाठवण्यास मंजूरी देतात, आणि तुम्हाला फक्त UPI पिन टाकण्यास सांगितले जाते. तुम्ही असे केल्यास लगेच पैसे तुमच्या खात्यातून डेबिट होतात.

फसवणूक करणाऱ्यांद्वारे पाठवल्या जाणाऱ्या मॅसेजचे एक उदाहरण पुढे दिले आहे:

कृपया लक्षात ठेवा: PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कधीच ‘पेमेंट करा’ वर क्लिक करावे किंवा तुमचा UPI पिन टाकावा लागत नाही. एका खऱ्या प्रेषकास तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी फक्त तुमच्या फोन नंबरची गरज असते. तुम्हाला अशाप्रकारचे मॅसेज आल्यास, त्यावर प्रतिसाद देऊ नका. त्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांचा फोन नंबर आणि इतर तपशीलांचा रिपोर्ट करण्यासाठी PhonePe सहाय्यता सोबत संपर्क करा.

फसवणूकीपासून सुरक्षित राहाण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
PhonePe कधीच तुमचे गोपनीय तपशील विचारत नाही. PhonePe प्रतिनिधी असल्याची बतावणी करून तुमच्याकडे कोणी अशा तपशीलांची विचारणा केल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. फक्त @phonepe.com डोमेन वरून आलेल्या ई-मेल्सला प्रतिसाद द्या.

  • PhonePe ग्राहक सहाय्यता नंबरसाठी Google, Twitter, FB इत्यादी वर शोध घेऊ नका. PhonePe ग्राहक सहाय्यता सोबत संपर्क साधण्यासाठी support.phonepe.com हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे.
  • PhonePe सहाय्यता असल्याचा दावा करणाऱ्या, सत्यापित नसलेल्या मोबाइल नंबरवर कधीही कॉल करू/प्रतिसाद देऊ नका.
  • विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील केवळ आमच्या अधिकृत खात्यावरून आमच्याशी संपर्क करा.
    Twitter हँडल्स: https://twitter.com/PhonePe
    https://twitter.com/PhonePeSupport
    – Facebook खाते: https://www.facebook.com/OfficialPhonePe/
  • तुमच्या कार्ड किंवा खात्याचे तपशीलांसोबत तडजोड झाल्याची आढळल्यास:
    – support.phonepe.com वर रिपोर्ट करा
    – तुमच्या जवळच्या सायबर-सेल सोबत संपर्क करा आणि पोलिस तक्रार दाखल करा.

Keep Reading