PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

सोशल इंजिनियरींग फसवणूक पासून सुरक्षित रहा

PhonePe Regional|2 min read|10 May, 2021

URL copied to clipboard

सोशल मीडिया द्वारे ग्राहक सहाय्यता तुमच्या आणखी एक पाऊल जवळ आली आहे, तुम्ही आता सहजतेने लॉगिन करु शकता आणि ग्राहक साहाय्यता प्रतिनिधींशी थेट संवाद साधू शकता.

कधी कधी या संवादांच्या दरम्यान, तुम्ही कदाचित अजाणतेपणाने सुरक्षित साधनांचा वापर न करता सोशल मीडिया मंचावर तुमच्या वैयक्तिक माहितीचे तपशील पोस्ट करता. या तपशीलांचा फसवणूक करणाऱ्यांद्वारे सहजपणे दुरुपयोग केला जाऊ शकतो.

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीच गोपनीय किंवा वैयक्तिक तपशीलासाठी विचारत नाही. जर phonepe.com डोमेन वरून नसलेल्या पण PhonePe कडून आले असल्याचा दावा करणाऱ्या सर्व मेल कडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणूकीचा संशय आल्यास, कृपया तुमच्या बँकेशी ताबडतोब संपर्क साधा.

सोशल इंजिनियरींग म्हणजे काय?

जेव्हा फसवणूक करणारे तुमचा विश्वास संपादित करुन तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करतात तेव्हा त्यास सोशल इंजिनियरींग फसवणूक असे म्हणतात. फसवणूक करणारे भामटे नेहमी एखाद्या समस्येवर तुम्हाला मदत करण्याचा आव आणून तुमचा विश्वास संपादित करतात. प्रत्यक्षात, ते फक्त तुमच्या वैयक्तिक तपशीलांचा वापर करुन तुमचे पैसे लुटण्याचा प्रयत्न करत असतात.

सोशल इंजिनियरींग कसे काम करते?

  1. फसवणूक करणारे तुम्हाला फोन करुन, ते तुमच्या बँकेच्या ग्राहक सहाय्यता चे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात. तुम्ही सोशल मीडिया वर शेअर केलेल्या तपशीलांचा वापर करुन ते तुमचा विश्वास संपादित करतात आणि तुम्हाला तुमच्या डेबिट कार्ड चे तपशील शेअर करण्यास सांगतात.
  2. फसवणूक करणारे नंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला OTP प्रदान करण्यास सांगतात आणि तुमचे डेबिट कार्ड वापरून त्यांच्या वॉलेटचे टॉप-अप करतात.
  3. एकदा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फसवणूक करणारे त्यांच्या वॉलेट मधील पैसे त्यांच्या बँक खात्यात काढून घेतात.

कृपया लक्षात ठेवा: एक खराखुरा ग्राहक प्रतिनिधी तु्म्हाला तुमचे संपूर्ण क्रेडिट / डेबिट कार्ड तपशील किंवा OTP सामायिक करण्यासाठी कधीच विचारणार नाही ते तुमच्याशी अधिकृत लँडलाईन क्रमांकावरून संपर्क साधतील आणि मोबाइल नंबर वरून नाही. तुमच्या बँकेच्या अधिकारिक डोमेन वरून पाठवलेल्या नसलेल्या ई-मेल कडे दुर्लक्ष करा.

सुरक्षित राहण्यासाठीचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:

  • तुम्हाला SMS किंवा इतर माध्यमातून प्राप्त होणारे OTP, पिन नंबर किंवा इतर कोड कोणासही शेअर करू नका.
  • सार्वजनिक व्यासपीठावर कधीही तुमचा खाते क्रमांक किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील शेअर करू नका.
  • तुम्हाला बँकेकडून असल्याचा दावा करणाऱ्या अज्ञात नंबवरुन फोन आला आणि ते तुमची वैयक्तिक माहिती विचारत असतील, तर कॉल कडे लक्ष देऊ नका, फक्त डिस्कनेक्ट करा.
  • ई-मेल पाठविणाऱ्याच्या डोमेन ची तपासणी करा. जर तो [XYZ] @ gmail.com किंवा इतर कोणताही ई-मेल प्रदाता डोमेन असेल तर त्या मेल कडे दुर्लक्ष करा. ई-मेल डोमेन बँकेच्या खऱ्या डोमेन सोबत जुळत असल्याची खात्री करा. सर्व बँक ई-मेल फक्त एका सुरक्षित https डोमेन वरूनच येतात.

सुरक्षितपणे व्यवहार कसा करावा यासाठी पुढील व्हिडिओ पाहा: https://youtu.be/rHZ57O9X8kk

Keep Reading