PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड: भामटे नकली ओळख कशी तयार करतात?

PhonePe Regional|3 min read|26 May, 2026

URL copied to clipboard

कल्पना करा, एक दिवस तुम्हाला अचानक वेगवेगळ्या बँकांमधून फोन यायला लागतात. समोरून सांगितले जाते की, तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा संपली आहे आणि तुमची बिले थकीत आहेत तुम्हाला पक्की खात्री असते की तुम्ही या महिन्यात एवढा खर्च केलेलाच नाही. वारंवार येणाऱ्या फोनमुळे जेव्हा तुम्ही बँकेकडे अधिक चौकशी करता, तेव्हा तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट समजते—तुमचा फोन नंबर आणि PAN कार्डची माहिती दुसऱ्याच एका व्यक्तीच्या नावाशी जोडून एक खोटी ओळख तयार करण्यात आली आहे आणि त्याद्वारे हजारो रुपयांचे अनधिकृत व्यवहार झाले आहेत. यालाच म्हणतात ‘सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड.

तुमची ओळख ही तुमची सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे. याच ओळखीच्या जोरावर तुम्ही मतदान करता, गाडी चालवता, आर्थिक व्यवहार करता, प्रवास करता आणि कर भरता. म्हणूनच, इतर मौल्यवान वस्तूंप्रमाणेच या ओळखीचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या ब्लॉगमध्ये आपण अशाच एका फसवणुकीबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे भामटे तुमच्या ओळखीचा गैरवापर करून तुमचे कष्टाचे पैसे चोरतात.

सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड म्हणजे काय?

साध्या आयडेंटिटी थेफ्ट (ओळख चोरी) मध्ये फ्रॉड करणारी व्यक्ती थेट तुमच्या नावाचा वापर करून तुम्ही असल्याचा खोटा आव आणते. पण, सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉड हा त्याहूनही पुढचा आणि अत्यंत हुशार मार्ग आहे. यामध्ये गुन्हेगार काही खरी आणि काही खोट्या माहितीची सरमिसळ करून एका पूर्णपणे नवीन आणि काल्पनिक व्यक्तीची ओळख तयार करतात.

हे भामटे तुमच्या PAN किंवा आधार सारख्या खऱ्या ओळखपत्रांचे नंबर चोरतात आणि ते दुसऱ्याच एखाद्या खोट्या नावाशी किंवा चुकीच्या पत्त्याशी जोडतात. याचा परिणाम असा होतो की, कागदोपत्री एक अशी व्यक्ती तयार होते जी प्रत्यक्षात या जगात अस्तित्वातच नसते; पण बँकिंग सिस्टमला मात्र ती खरीखुरी व्यक्ती वाटते.

हा फ्रॉड नेमका कसा चालतो?

एकदा का भामट्यांनी ही खोटी ओळख तयार केली, की ते ती लगेच वापरत नाहीत. उलट, ती ओळख खरी वाटावी म्हणून ते बराच काळ मेहनत घेतात. बघा ते हे कसे करतात:

  1. ते एखाद्याचे चोरलेले PAN किंवा आधार नंबर वापरून सुरुवात करतात. यासाठी सहसा ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जाते, कारण ते आपल्या क्रेडिट हिस्टरीवर जास्त लक्ष ठेवून नसतात.
  2. या खोट्या ओळखीवर ते छोट्या कर्जासाठी किंवा स्टोअर कार्ड्ससाठी अप्लाय करतात. अर्ज रिजेक्ट झाला तरीही बँकिंग सिस्टममध्ये त्या खोट्या नावाचे एक ‘क्रेडिट प्रोफाइल’ तयार होते.
  3. विश्वास निर्माण करण्यासाठी ते लहान-सहान बिले वेळेवर भरतात, ज्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअर (CFO/CIBIL) खूप चांगला होतो.
  4. एकदा का क्रेडिट मर्यादा चांगल्या पातळीवर पोहोचली, की ते त्या खात्यांमधून पूर्ण पैसे काढून घेतात आणि गायब होतात.

ज्या “व्यक्तीने” हे व्यवहार केले ती प्रत्यक्षात कधी अस्तित्वातच नसल्यामुळे, बँका एका अदृश्य सावलीचा पाठलाग करत राहतात.

या फसवणुकीचा खरा फटका त्या मूळ व्यक्तीला बसतो ज्याचा आयडी चोरला गेला होता. बऱ्याचदा लोकांना वर्षानुवर्षे याची माहितीच मिळत नाही. जेव्हा ते स्वतः एखाद्या कार लोन किंवा एज्युकेशन लोनसाठी अप्लाय करतात आणि त्यांचा अर्ज फेटाळला जातो, तेव्हा त्यांना समजते की त्यांच्या PAN कार्डवर आधीच मोठे ‘गोस्ट डेब’’ दाखवले जात आहे.

PhonePe तुमचे रक्षण कसे करते?

PhonePe अशा फसवणुकीचा शोध घेण्यासाठी मानवी कौशल्य आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) या दोन्हीचा वापर करते. खोट्या ओळखी या बहुदा मशीनसारख्या काम करतात—त्यांची एकच ठराविक पद्धत आणि रचना असते, जी आमची सिस्टम सहज ओळखते. खऱ्या युझर्सचे खाते त्यांचे मित्र, कुटुंब आणि व्यापाऱ्यांशी जोडलेले असते. जेव्हा आम्हाला एखाद्या खात्याचा बाह्य जगाशी कोणताही संबंध दिसत नाही, तेव्हा तिथे संशयाची पहिली घंटा वाजते. आमची KYC व्हेरिफिकेशन सिस्टम केवळ तुमचे आयडी वाचत नाही, तर त्या दस्तऐवजावरील एखादा अंक किंवा फोटो डिजिटली बदलला आहे का, हे देखील बारकाईने तपासते.

स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल?

सिंथेटिक आयडेंटिटी फ्रॉडपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा:

  • क्रेडिट हेल्थवर लक्ष ठेवा: तुमचा क्रेडिट स्कोअर नियमितपणे तपासा. जर तुम्हाला तिथे एखादे अनोळखी लोन किंवा चौकशी दिसली, तर समजा तुमचा आयडी कुठे तरी गैरवापरात आहे.
  • कागदपत्रे सुरक्षित ठेवा: तुमचे आधार आणि पॅन कार्ड खूप काळजीपूर्वक वापरा. अनोळखी किंवा अनव्हेरिफाइड सोशल मीडिया ग्रुप्सवर तुमच्या आयडीचे फोटो कधीही शेअर करू नका.
  • बायोमेट्रिक लॉक सुरू करा: तुमच्या PhonePe सेटिंग्जमध्ये जा आणि फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी नेहमी सुरू ठेवा. यामुळे तुमच्या सुरक्षेला एक मजबूत कवच मिळते.

तुम्ही फ्रॉडचे बळी ठरल्यास काय करावे?

जर तुम्हाला शंका असेल की तुम्ही कोणत्याही स्कॅमचे शिकार झाला आहात, तर लगेच त्याची तक्रार नोंदवा. येथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो!

PhonePe वर रिपोर्ट करणे:

  • PhonePe ॲप: मदत  सेक्शनमध्ये जा आणि तक्रार नोंदवा.
  • PhonePe कस्टमर केअर: 80-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
  • सोशल मीडिया रिपोर्टिंग:
  • तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा..

अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:

  • सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
  • दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम  फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधेद्वारे करा.

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading