Trust & Safety
प्रत्येक व्यापाऱ्याला नवीन फसवणुकीच्या ट्रेंडबद्दल काय माहित असले पाहिजे
PhonePe Regional|2 min read|06 September, 2024
महेश, एक लहान शहरातील दुकानदार, एक अनोख्या मसाल्याचे स्टोअर चालवितो. परिसरातील एक नवीन रहिवासी दुकानात वारंवार येऊ लागला, रोज छोट्या छोट्या वस्तू खरेदी करू लागला आणि हळूहळू महेशचा विश्वास संपादन करू लागला. एके दिवशी, त्या रहिवाशाने सांगितले की तो गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे आणि वस्तूंची खरेदी करण्यासाठी यादी बनविण्यात महेशच्या मदतीची आवश्यकता आहे. एकूण खर्च रू.10,000 पर्यंत आला. माल मिळाल्यानंतर, तो रहिवासी काउंटरवर महेशच्या बाजूला उभा राहिला, QR कोड स्कॅन केला आणि त्याने पेमेंट करत असल्याचे भासवले. महेशने, त्या रहिवाशाच्या फोनवरील संपूर्ण व्यवहार पाहून विश्वास ठेवला की पेमेंट यशस्वी झाले आहे. परंतु, तो रहिवासी प्रत्यक्षात एक फसवणूक करणारा होता ज्याने अस्सल ॲप सारखे भासणारे एका बनावटी पेमेंट ॲप वापरले आणि महेशला असे दाखवले की पैसे ट्रान्सफर झाले, प्रत्यक्षात मात्र कोणतेही पेमेंट केलेच नव्हते.
जर तुम्ही व्यापारी असाल तर बनावट पेमेंट ॲप्सशी संबंधित या धोकादायक फसवणुकीच्या ट्रेंडबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. अधिक माहितीसाठी वाचा!
बनावट पेमेंट ॲप्स काय आहेत?
बनावट पेमेंट ॲप्स हे वैध पेमेंट ॲप्लिकेशनची नक्कल आहेत. ते UI, कलर स्कीम आणि लोकप्रिय पेमेंट ॲप्सच्या एकंदर स्वरूपाशी जवळून साधर्म्य साधतात, बऱ्याचदा संपूर्ण पेमेंट प्रक्रियेची नक्कल करतात – ज्यामुळे त्यांना एका नजरेत ओळखणे कठीण होते. यापैकी काही फसवे ॲप्स पेमेंट नोटिफिकेशन, जसे की बीप किंवा चाइमच्या आवाजाची नक्कल करून पेमेंट मिळाले आहे असे खोटे दर्शवून भ्रम आणखी वाढवतात. तसेच, यशस्वी व्यवहार दर्शविण्यासाठी ते खात्रीशीर पेमेंट सूचना तयार करू शकतात, जे एका दृष्टिक्षेपात ओळखणे आव्हानात्मक आहे.
बनावटी पेमेंट ॲप्सपासून सुरक्षित राहण्यासाठी टिप्स
तुमच्या व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी, सतर्क रहा आणि सुरक्षित राहण्यासाठी या टिप्सचे अनुसरण करा:
- व्यवहाराचा इतिहास तपासा: नेहमी आपल्या पेमेंट ॲप किंवा बँक खात्याद्वारे व्यवहार सत्यापित करा. केवळ स्क्रीनशॉट किंवा सूचनांवर अवलंबून राहू नका.
- विसंगत सूचना: व्यवहाराच्या तपशीलांमध्ये विसंगती आहे का ते पहा. बनावट ॲप्समध्ये सूक्ष्म त्रुटी किंवा विसंगती असू शकतात जे तुम्हाला घोटाळ्याबद्दल सतर्क करू शकतात.
- दबाव युक्त्या: योग्य व्हेरिफिकेशनसाठी वेळ न देता व्यवहार पूर्ण करण्यासाठी घाई करणाऱ्या ग्राहकांपासून सावध रहा.
- अज्ञात ॲप्स: आपल्या प्रदेशात सामान्यत: वापरल्या जाणाऱ्या वैध पेमेंट ॲप्सशी स्वत:ला परिचित करा. जर एखाद्या ग्राहकाने अपरिचित ॲपद्वारे पेमेंट सादर केले तर सावधगिरीने पुढे जा.
व्यापाऱ्यांसाठी सर्वोत्तम पद्धती
बनावटी पेमेंट ॲप घोटाळ्यांपासून तुमच्या व्यवसायाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही ही काही पावले उचलू शकता:
- तुमच्या कर्मचार्यांना शिक्षित करा: सर्व कर्मचार्यांना या घोटाळ्याची माहिती आहे आणि फसवणुकीचे व्यवहार कसे शोधायचे हे माहित आहे याची खात्री करा.
- व्हेरिफिकेशन प्रक्रिया अंमलात आणणे: वस्तू किंवा सेवा प्रदान करण्यापूर्वी पेमेंट सत्यापित करण्यासाठी एक मानक प्रक्रिया विकसित करा. यात व्यवहार ID तपासणे किंवा तुमच्या पेमेंट प्रोसेसरकडून कन्फर्मेशनची प्रतीक्षा करणे समाविष्ट असू शकते.
- संशयास्पद क्रियाकलाप रिपोर्ट करा: तुम्हाला संशयास्पद बनावटी पेमेंट ॲप आढळल्यास, संबंधित अधिकारी आणि तुमच्या पेमेंट प्रोसेसरकडे त्वरित रिपोर्ट करा.
जर तुम्हाला फसवले गेले असेल किंवा बनावटी पेमेंट ॲप सापडले असेल तर तुम्ही तत्काळ खालील प्रकारे समस्या मांडू शकता:
- PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि ”व्यवहारासह समस्या आहे“ या पर्यायांतर्गत समस्या दाखल करा.
- PhonePe कस्टमर केअर नंबर: तुम्ही समस्या मांडण्यासाठी 80-68727374 / 022-68727374 वर PhonePe कस्टमर केअरला कॉल करू शकता, ज्यानंतर कस्टमर केअर एजंट तिकीट तयार करेल आणि तुम्हाला समस्येबाबत मदत करेल.
- वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चा वेबफॉर्म, https://support.phonepe.com/ वापरून तिकीट तयार करू शकता
- सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसव्या घटनांबद्दल रिपोर्ट करू शकता:
- Twitter: https://twitter.com/PhonePeSupport
- Facebook: https://www.facebook.com/OfficialPhonePe
- तक्रार: विद्यमान तक्रारीबाबत तक्रार नोंदविण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.comवर लॉग इन करू शकता/ आणि पूर्वी दाखल केलेला तिकीट ID शेअर करू शकता.
- सायबर सेल: शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी रिपोर्ट करू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा 1930 वर सायबर क्राइम सेल हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता.
सुरक्षित रहा, सावध रहा आणि तुमचा व्यवसाय सुरक्षित ठेवा.