PhonePe Blogs Main Featured Image

Investments

जास्त रिटर्न मिळवण्याचा सोपा मंत्र!

PhonePe Regional|1 min read|26 July, 2021

URL copied to clipboard

शेयर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यान गुंतवणूक कायम ठेवा

शेयर बाजाराचा अंदाज बांधणे अशक्य आहे पण धैर्य राखल्यास आणि दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केलेली राहू दिल्यास हा चांगला रिटर्न मिळवण्याचा आणि तुमची संपत्ती वाढविण्याचा मंत्र आहे.

जेव्हा तुम्ही वाढ देणारे फंडात जसे इक्विटी किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवता, तुमचे गुंतवणुकीनंतरचे वर्तन गुंतवणुकीतून तुम्हाला मिळणारे रिटर्न निश्चित करण्यात एक महत्वपूर्ण भूमिका निभावते. कमी कालावधीत होणाऱ्या चढउतारांमुळे स्वतःस प्रभावित होण्यापासून कसे वाचवायचे ते शिका आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेली राहू द्या.

जगातील चौथी सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि एक अमेरिकन गुंतवणूकदार, वॉरेन बफेटच्या शब्दात,“शेयर बाजार एक साधन आहे जे एका अधीर व्यक्तीचे रुपांतर एका धैर्यवान व्यक्तीत करते.”

पुढे एका उदाहरणाद्वारे तुम्हाला दीर्घकालावधीच्या गुंतवणुकीचे लाभ स्पष्ट करून सांगितले आहेत.

चला असे म्हणूया की इक्विटी फंड गुंतवणूकदारांचे 4 गट आहेत.

  • गट 1: 3 महिन्यांसाठी गुंतवणूक
  • गट 2: 1 वर्षासाठी गुंतवणूक
  • गट 3: 5 वर्षांसाठी गुंतवणूक
  • गट 4: 10 वर्षांसाठी गुंतवणूक

या सर्व गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या कालावधीत 10,000 गुंतवले. आता, गुंतवणूक कालावधीच्या शेवटी त्यांच्या या 10,000 च्या गुंतवणुकीत सरासरीत किती वाढ झाली हे पुढे दाखवले आहे.

या विश्लेषणातून स्पष्ट होणारे अतिरिक्त मुद्दे:

10 वर्ष गुंतवणूक केलेल्या 50% पेक्षा जास्त गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत चौपटीपेक्षा जास्त वाढ झालेली पाहिली आणि 98% गुंतवूकदारांचे पैसे 10 वर्षाच्या कालावधीत कमीत कमी दुप्पट झालेत.

ज्या गुंतवणूकदारांनी फक्त 3 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली, त्यातील एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांना तोटा झाला आणि फक्त 10% गुंतवणूकदारांना 20% पेक्षा अधिक नफा मिळाला.

शिकवण: तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक कराल, तेवढीच तुमची जास्त चांगले रिटर्न मिळवण्याची शक्यता वाढेल.

इक्विटी किंवा हायब्रिड फंडसारख्या वाढ देणाऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करा आणि दीर्घकालावधीसाठी (कमीत कमी 5 वर्षे) गुंतवणूक केलेली राहू द्या. दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुमच्या गुंतवणुकीत अधिक निश्चिततेसोबत भरीव वाढ होण्यास मदत होईल.

म्युच्युअल फंड गुंतवणूका बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन आहेत. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजना संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

PhonePe Wealth Broking Private Limited | AMFI — रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर ARN- 187821

Keep Reading