PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

जनगणना 2026 फ्रॉड अलर्ट: तुमची ओळख आणि बँक खाते सुरक्षित कसे ठेवावे?

PhonePe Regional|2 min read|23 June, 2026

URL copied to clipboard

भारताची 16 वी जनगणना सध्या सुरू आहे, जी जगातील पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना ठरत आहे. घरनोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, नागरिकांची सामाजिक, लोकसंख्याशास्त्रीय आणि आर्थिक माहिती गोळा करण्याचा दुसरा टप्पा या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला आहे.

पण, याच संधीचा फायदा घेऊन काही सायबर चोर जनगणनेच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना लुटत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरकारी अधिकारी बनून हे लोक नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरत आहेत. अशा तोतया लोकांपासून स्वतःचे कष्टाचे पैसे आणि ओळख कशी सुरक्षित ठेवायची, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे स्कॅमर्स नेमकी कशी फसवणूक करतात?

जनगणनेचा वापर हे चोरटे आर्थिक चोरी आणि आयडेंटिटी थेफ्ट करण्यासाठी करत आहेत. त्यासाठी ते खालील पद्धती वापरतात:

  • तोतयागिरी: हे फ्रॉड लोक थेट तुमच्या घरी येतात किंवा WhatsApp आणि फोन कॉलद्वारे संपर्क साधतात. आपण सरकारी अधिकारी असल्याचे भासवून ते आधार, PAN कार्ड आणि बँकेचे तपशील यांसारखी अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा करतात. एकदा ही माहिती मिळाल्यानंतर, ते तुमच्या ओळखीचा गैरवापर गुन्हेगारी कृत्यांमध्ये करतात, ज्यामुळे तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बनावट कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ते या वैयक्तिक माहितीचा वापर करून सिंथेटिक आयडेंटिटी देखील तयार करू शकतात.
  • फिशिंग लिंक्स : तुम्हाला SMS द्वारे काही खोट्या लिंक्स पाठवल्या जातात आणि जनगणनेची माहिती अपडेट करण्यास सांगितले जाते. या लिंक्सवर क्लिक करताच तुमची खाजगी माहिती चोरली जाते. तसेच, OTP किंवा QR कोड स्कॅमद्वारे तुमचे बँक खाते आणि UPI वॉलेट रिकामे केले जाऊ शकते.
  • धोकादायक ॲप्स: स्कॅमर्स तुम्हाला एखादे बनावट APK फाईल डाउनलोड करायला भाग पाडतात. हे ॲप तुमच्या फोनमधील मेसेज, पासवर्ड आणि खाजगी माहिती चोरून त्याचा ॲक्सेस थेट चोरांना देते.

तोतया जनगणना अधिकाऱ्यांना कसे ओळखाल?

  1. खरे सरकारी अधिकारी तुमच्याकडे कधीही OTP, CVV, PIN किंवा बँक खाते क्रमांक मागणार नाहीत.
  2. जर एखादी व्यक्ती तुमच्या आधार किंवा PAN कार्डचा फोटो काढण्याचा आग्रह धरत असेल, तर सावध व्हा. या फोटोंचा नंतर गैरवापर होऊ शकतो.
  3. स्कॅमर्स अनेकदा Gmail किंवा Yahoo आयडी वापरतात. लक्षात ठेवा, अधिकृत सरकारी संपर्कासाठी नेहमी शेवटी .gov.in असलेले डोमेनच वापरले जाते.
  4. खऱ्या अधिकृत अधिकाऱ्यांकडे सरकारकडून दिलेले ओळखपत्र  आणि अधिकृतता प्रमाणपत्र असते. ते सरकारच्या विशिष्ट मोबाईल डिव्हाइसचाच वापर करतात.
  5. जर कोणी जनगणनेसाठी “नोंदणी शुल्क” किंवा “सुविधा शुल्क” मागत असेल, तर तो 100% फ्रॉड आहे.

दुर्दैवाने फसवणूक झाल्यास काय करावे?

  • बँक खाते फ्रीज करा, तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपवरून किंवा शाखेत जाऊन तुमचे बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि UPI ॲक्सेस त्वरित ब्लॉक करा.
  • जर तुम्ही कोणतेही संशयास्पद ॲप डाउनलोड केले असेल, तर फोनमधील मालवेअर किंवा स्पायवेअर पूर्णपणे काढून टाकण्यासाठी फोन त्वरित ‘फॅक्टरी रीसेट’ करा.
  • जर कोणी तोतया अधिकारी तुमच्या घरी आला असेल, तर स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर त्याची माहिती द्या, जेणेकरून तुमच्या शेजाऱ्यांना फसवणुकीपासून वाचवता येईल.

तक्रार कशी करावी

जर तुम्हाला संशय असेल की तुम्हाला स्कॅमचे लक्ष्य केले गेले आहे, तर त्वरित याची तक्रार करा:

PhonePe वर रिपोर्ट करणे:

  • PhonePe ग्रुप चॅट: जर तुम्हाला तो ग्रुप फसवणूक करणारा वाटत असेल, तर तुम्ही ग्रुप प्रोफाइलमधील बाहेर पडा आणि रिपोर्ट करा या पर्यायांवर क्लिक करू शकता.
  • PhonePe ॲप: मदत  सेक्शनमध्ये जा आणि तक्रार नोंदवा.
  • PhonePe कस्टमर केअर: 80-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
  • सोशल मीडिया रिपोर्टिंग:
  • तक्रार निवारण : PhonePe तक्रार निवारण पोर्टल वर तक्रार दाखल करा..

अधिकारऱ्यांकडे तक्रार करणे:

  • सायबर क्राईम सेल: सायबर क्राईम सेल पोर्टल वर ऑनलाइन तक्रार दाखल करा किंवा 1930 वर कॉल करा.
  • दूरसंचार विभाग : संशयास्पद मेसेजेस, कॉल्स किंवा WhatsApp/टेलीग्राम  फसवणुकीची तक्रार संचार साथी पोर्टल वरील चक्षू सुविधे द्वारे करा.

महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील मागत नाही. जर तुम्हाला PhonePe कडून असल्याचे सांगणारे ईमेल्स आले आणि ते phonepe.com डोमेनवरून आले नसतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading