हा दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत विविध कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज किंवा नोंदींसंदर्भातील सुधारित तरतुदींनुसार तयार झालेल्या इलेक्ट्रॉनिक कराराच्या स्वरूपातील एक इलेक्ट्रॉनिक नोंद आहे. हा दस्तऐवज PhonePe च्या सामान्य अटी आणि शर्तींच्या (“अटी”) सोबतीने वाचला जावा, ज्यामध्ये PhonePeचे गोपनीयता धोरण (“गोपनीयता धोरण”) आणि PhonePe प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी उपलब्ध करून दिलेली इतर धोरणे/अटी व शर्ती यांचा समावेश असून तेवढ्यावर मर्यादित नाहीत, ज्यात वेळोवेळी सुधारणा केली जाऊ शकते. येथे वापरलेले परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचे अर्थ अटींमध्ये (अटी) दिलेल्या अर्थांनुसार असतील.
परिचय
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (“UPI”) हा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित केलेले एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे जो इतर गोष्टींबरोबरच कोणत्याही दोन पक्षांच्या बँक खात्यांदरम्यान/पेमेंट खात्यांदरम्यान (खाली परिभाषित केल्यानुसार) त्वरित ऑनलाइन पेमेंटची सुविधा देतो. हे ऑनलाइन पेमेंट सुलभ करण्यासाठी UPI एक आर्किटेक्चर आणि मानक API वैशिष्ट्यांचा संच प्रदान करते. इंटरऑपरेबिलिटी आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासोबतच सर्व NPCI सिस्टममध्ये एक इंटरफेस प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
PhonePe UPI वापरण्याच्या या अटी आणि शर्ती (“UPI ToU”) NPCI द्वारे विकसित केलेल्या पेमेंट सेवा प्लॅटफॉर्म UPI अंतर्गत होणाऱ्या पेमेंटचे नियमन करतात; NPCI ही 2008 मध्ये स्थापन झालेली एक छत्री संस्था (umbrella organisation) आहे जी UPI सेवांसाठी सेटलमेंट/क्लिअरिंग हाऊस/नियामक संस्था म्हणून काम करते. PhonePe ॲप (खाली परिभाषित केल्यानुसार) हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे जे UPI शी कनेक्ट होते आणि जे कंपनी कायदा 1956 अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या PhonePe लिमिटेड (पूर्वी PhonePe प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) (“PhonePe/ आम्ही/ आपण/आमचे”) या कंपनीतर्फे, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ऑफिस 2, पाचवा मजला, विंग A, ब्लॉक A, सालारपुरिया सॉफ्टझोन, बेलंदूर व्हिलेज, वर्थुर होबली, आउटर रिंग रोड, बेंगळुरू दक्षिण, बेंगळुरू, कर्नाटक, भारत, 560103 येथे आहे, अधिसूचित पेमेंट सेवा प्रदाते/ PSP/ PSP बँका (खाली परिभाषित केल्यानुसार) यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. UPI सेवा “PhonePe” ब्रँड अंतर्गत प्रदान केल्या जात आहेत (“PhonePe UPI”).
PhonePe ही NPCI द्वारे मान्यताप्राप्त TPAP (खाली परिभाषित केल्यानुसार) आहे जी स्पॉन्सर PSP बँका म्हणजेच: YES बँक लिमिटेड , Axis बँक लिमिटेड आणि ICICI बँक लिमिटेड यांच्या माध्यमातून पेमेंटची सुविधा देते. PhonePe ही UPI पेमेंट इकोसिस्टममधील एक सेवा प्रदाता आहे आणि आम्ही PSP बँकांच्या माध्यमातून UPI मध्ये सहभागी होतो.
सामान्य अटी आणि शर्ती (Terms) आणि या UPI ToU मध्ये कोणताही विसंगती असल्यास, विसंगतीच्या मर्यादेपुरत्या या UPI ToU प्राधान्याने लागू राहतील. आम्ही PhonePe च्या वेबसाइटवर आणि/किंवा PhonePe ॲपवर सुधारित आवृत्ती पोस्ट करून कोणत्याही वेळी UPI ToU मध्ये सुधारणा करू शकतो. या UPI ToU ची सुधारित आवृत्ती पोस्ट केल्यावर त्वरित लागू होईल. PhonePe UPI सेवा वापरण्यासाठी या UPI ToU तपासणे आणि त्यामधील अद्यतने वेळोवेळी पाहणे ही तुमची जबाबदारी आहे. “तुम्ही”, “तुमचे”, “स्वतः”, “एंड युजर”, “ग्राहक”, “युजर” म्हणजे अशी व्यक्ती जी पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी PhonePe ॲपद्वारे PhonePe UPI चा वापर करते.
व्याख्या
“लागू कायदा” म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, 1999(“FEMA”), NPCI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (“RBI”) किंवा इतर कोणत्याही नियामकाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांसह सर्व लागू कायदे, नियम, नियमन, मार्गदर्शक तत्त्वे, वैधानिक किंवा सरकारी अधिसूचना, जे UPI सेवा प्रदान करण्यासाठी पेमेंट सिस्टम सहभागींना लागू होतात, तसेच पेमेंट सिस्टम सहभागींनी जारी केलेले लागू नियम आणि नियमन यांचाही समावेश होतो.
“बँक खाते / पेमेंट खाते” म्हणजे कोणत्याही नियमनाधीन घटकाने देऊ केलेले कोणतेही बँक खाते किंवा इतर कोणतेही पेमेंट इन्स्ट्रुमेंट जिथे निधी ठेवला जाऊ शकतो आणि/किंवा जिथून निधी डेबिट किंवा क्रेडिट केला जाऊ शकतो. PhonePe UPI वापरून व्यवहार करण्यासाठी ही खाती आवश्यक आहेत.
“बायोमेट्रिक क्रेडेन्शियल” म्हणजे तुमच्या बोटांचे ठसे किंवा चेहऱ्याचे वैशिष्ट्य यांसारखी तुमची अनन्य शारीरिक वैशिष्ट्ये, जी PhonePe ॲपद्वारे PhonePe UPI वापरून पेमेंट अधिकृत करण्यासाठी तुमची ओळख सत्यापित करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. ही बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्स तुमच्या डिव्हाइसवर तुमच्याद्वारे स्टोअर केलेली माहिती आहे.
“जारीकर्ता(र्ते)” म्हणजे RBI द्वारे नियमन केलेल्या बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या आणि इतर वित्तीय संस्था ज्या युजरचे बँक खाते किंवा पेमेंट खाते PhonePe UPI वापरण्यासाठी जारी करतात, देऊ करतात, सक्षम करतात किंवा त्यांचे व्यवस्थापन करतात.
“NPCI” म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी एक RBI अधिकृत पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहे. NPCIकडे UPI पेमेंट सिस्टिमचे मालकी हक्क आहेत आणि ती त्याचे संचालन करते.
“पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर/ PSP/ PSP बँक” म्हणजे UPI फ्रेमवर्क अंतर्गत पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करण्यास अधिकृत असलेली बँकिंग कंपनी. एंड युजरना UPI सेवा प्रदान करण्यासाठी PSPतर्फे TPAPची नियुक्ती करण्यात येते.
“PhonePe अकाउंट” म्हणजे ते अकाउंट जे तुम्ही PhonePe वर साइन-अप/नोंदणी करताना तयार करता. हे खाते तुम्हाला PhonePe प्लॅटफॉर्म ॲक्सेस करण्यास, PhonePe सेवा ब्राउझ करण्यास, PhonePe UPI वापरून पेमेंट करण्यास आणि PhonePe ॲपवर आमच्याद्वारे सक्षम केलेली इतर वैशिष्ट्ये वापरण्यास अनुमती देते.
“PhonePe ॲप” म्हणजे व्यापारी आणि सेवा प्रदात्यांसह युजरना PhonePe सेवा प्रदान करण्यासाठी PhonePe/PhonePe संस्थांद्वारे होस्ट केलेले मोबाइल ॲप्लिकेशन.
“PhonePe प्लॅटफॉर्म” म्हणजे PhonePe लिमिटेड (पूर्वीची PhonePe प्रायव्हेट लिमिटेड) किंवा इतर कोणत्याही PhonePe संस्थेच्या मालकीचा/सबस्क्राइब केलेला/वापरलेला कोणताही प्लॅटफॉर्म, ज्यामध्ये वेबसाइट्स, मोबाइल ॲप्लिकेशन्स, डिव्हाइसेस, URL/लिंक्स, नोटिफिकेशन्स, चॅटबॉट किंवा युजरना PhonePe सेवा देण्यासाठी वापरलेले इतर कोणतेही संप्रेषण माध्यम समाविष्ट आहे परंतु इतकेच मर्यादित नाही.
“PhonePe सेवां”मध्ये प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (“PPIs”), गिफ्ट कार्ड्स, पेमेंट ॲग्रिगेशन/गेटवे, रिचार्ज आणि बिल पेमेंट्स, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड इत्यादींसह PhonePe आणि/किंवा PhonePe संस्थांद्वारे विस्तारित/विस्तारित केल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा समावेश असेल.
“TPAP” म्हणजे थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर, एंड युजर्सना UPI आधारित पेमेंट व्यवहार सुलभ करण्यासाठी UPI सुसंगत ॲप प्रदान करणारी संस्था आहे.
“UPI पिन” म्हणजे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असून युजर आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट करण्यासाठी जारीकर्त्याला अधिकृत करण्यासाठी अधिप्रमाणन क्रेडेन्शियल्स म्हणून सेट करतो. हा केवळ 4 ते 6 अंकी अंकात्मक पिन असेल.
“UPI नंबर” म्हणजे कोणताही UPI हँडल (@PSP) नसलेला 8-10 अंकी क्रमांक, जो तुम्ही निवडू शकता आणि जो तुमच्या VPAचा (खाली परिभाषित) प्रॉक्सी म्हणून काम करेल. डीफॉल्ट स्वरुपात, तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर PhonePe द्वारे तुमचा UPI नंबर म्हणून कॉन्फिगर केला जाऊ शकतो किंवा तुमच्याद्वारे निवडलेला इतर कोणताही 8-10 अंकी क्रमांक वापरता येऊ शकतो.
“VPA” म्हणजे NPCI कडे नोंदणीकृत असलेला एक अनन्य व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस जो तुमच्या बँक खात्याशी लिंक केला जाऊ शकतो.
नोंदणी
PhonePe UPI हे PhonePe ॲपद्वारे अशा नोंदणीकृत युजरना दिले जाते ज्यांचे PhonePe अकाउंट आहे. PhonePe UPI नोंदणी आणि वापरण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय मोबाइल नंबरशी जोडलेले स्वतःचे बँक खाते/पेमेंट खाते असणे आवश्यक आहे.
नोंदणी प्रक्रिया ही एक मानक प्रक्रिया आहे जी NPCI द्वारे UPI मार्गदर्शक तत्त्वांतर्गत परिभाषित आणि व्यवस्थापित केली जाते आणि ती वेळोवेळी बदलू शकते. PhonePe, TPAP म्हणून वेळोवेळी NPCI द्वारे अधिसूचित केलेली प्रक्रिया राबवण्यासाठी जबाबदार आहे. तुम्ही हे समजता की नोंदणी प्रक्रिया करताना तुमचे मोबाइल नेटवर्क ॲक्सेस करणे आणि UPI वर तुमचे बँक खाते सत्यापित, प्रमाणित, नोंदणी आणि लिंक करण्यासाठी आणि VPA तयार करण्यासाठी तुमच्या फोनचा वापर करून एक अनन्य SMS पाठवणे समाविष्ट असू शकते.
लागू कायद्यांतर्गत परवानगी असल्याशिवाय, PhonePe तुमच्या VPA शी लिंक केलेला बँक खाते/पेमेंट खाते क्रमांक स्टोअर करत नाही. पुढे, VPAचा वापर करून तुम्ही खालीलप्रमाणे पेमेंट करू शकता:
- तुमच्या PhonePe ॲपच्या माध्यमातून QR कोड वापरून व्यापाऱ्यांच्या ठिकाणी पेमेंट करणे.
- व्यापाऱ्यांच्या वेबसाइट्स किंवा ॲप्सवर ऑनलाइन पेमेंट करणे.
- PhonePe सेवा वापरण्यासाठी पेमेंट करणे.
UPI नोंदणी प्रक्रियेचा भाग म्हणून तुमच्याद्वारे प्रदान केलेला तपशील, ज्यात तुमचे नाव, मोबाइल नंबर आणि बँकिंग संदर्भातील माहिती समाविष्ट आहे, जी PSP बँका आणि NPCI च्या सुरक्षित लायब्ररीमध्ये शेअर आणि जतन करण्यात येईल आणि तुम्ही अशा प्रकारे माहिती शेअर करण्यास संमती देत आहात आणि PhonePe, PSP बँका आणि NPCI यांना लागू कायद्यानुसार ही माहिती स्टोअर, वापर आणि जतन करण्याचे अधिकार देत आहात.
एकापेक्षा जास्त VPA आणि बँक खाती:
PhonePe ॲपचा नोंदणीकृत युजर म्हणून, तुम्हाला PhonePe ॲपवर एकापेक्षा जास्त बँक खाती/पेमेंट खाती लिंक करण्याचा आणि प्रत्येक बँक खात्यासाठी VPA सक्षम करण्याचा पर्याय असेल. तुम्ही एकाच बँक खात्याला एकापेक्षा जास्त VPA शी लिंक करू शकता. व्यवहार प्रक्रियेसाठी प्राथमिक VPA निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे, तथापि, प्राथमिक VPA सर्व्हरमध्ये काही समस्या असल्यास अखंड अनुभवासाठी PhonePe द्वारे प्रदान केलेले दुय्यम VPA वापरले जाऊ शकतात. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट बँक खाते निश्चित करण्याचा आणि बदलण्याचा पर्याय देखील आहे, ज्यामध्ये प्राप्त झालेला निधी जमा केला जाईल.
NRE/NRO बँक खाते लिंक केलेले UPI
अनिवासी भारतीय (“NRI”) युजर त्यांच्या भारतातील बँकांमध्ये असलेल्या नॉन-रेसिडेंट एक्सटर्नल (“NRE”) / नॉन-रेसिडेंट ऑर्डिनरी (“NRO”) बँक खात्याशी जोडलेल्या त्यांच्या गैर-भारतीय मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करून PhonePe ॲप वापरू/ॲक्सेस करू शकतात. NRI युजरनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांची भारतीय NRE/NRO बँक खाती लागू कायद्यानुसार ऑपरेट केली जात आहेत आणि त्यांचे KYC नेहमी अद्ययावत ठेवावे. वैयक्तिक आणि पेमेंट डेटासह NRI युजरचा सर्व डेटा/माहिती लागू कायद्यानुसार जतन, ॲक्सेस आणि त्यावर प्रक्रिया केली जाईल.
युजर जबाबदारी आणि कर्तव्ये
जेव्हा तुम्ही PhonePe UPI वर नोंदणी करता, त्याचा वापर करता आणि/किंवा व्यवहार करता, तेव्हा तुम्हाला खालील गोष्टी सुनिश्चित करणे आवश्यक आहे:
- तुमचे अचूक बँक खाते/पेमेंट खाते लिंक करण्यासाठी तुम्ही पूर्णतः जबाबदार आहात.
- तुमचा मोबाइल नंबर प्राथमिक ओळख म्हणून वापरला जात असल्याने, त्यात काही बदल झाल्यास तुम्हाला PhonePe ॲपशी लिंक केलेल्या बँक खाते/पेमेंट खात्याच्या माहितीमध्ये तुमचा मोबाइल नंबर अद्ययावत करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही तुमच्या PhonePe अकाउंटशी नोंदणीकृत असलेला मोबाइल नंबर बदलला तर तुम्हाला PhonePe वर तुमचा नवीन मोबाइल नंबर पुन्हा नोंदणीकृत करावा लागेल. सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जारीकर्त्याकडे देखील तुमचा नवीन मोबाइल नंबर नोंदणीकृत करावा लागेल.
- तुमचा OTP, UPI पिन आणि बँक खाते/पेमेंट खात्याशी संबंधित तपशील गुप्त ठेवणे ही फक्त तुमची जबाबदारी आहे. इतरांसोबत ही माहिती शेअर केल्यामुळे अनधिकृत वापर होऊ शकतो, ज्यासाठी PhonePe जबाबदार असणार नाही.
- बँक खाते/पेमेंट खाते आणि PhonePe ॲपवर दिलेला इतर तपशील, तसेच PhonePe UPI द्वारे तुम्ही केलेली आणि/किंवा अधिकृत केलेली कोणतीही पेमेंट विनंती आणि PhonePe ॲपच्या कोणत्याही वापरासाठी तुम्ही पूर्ण जबाबदारी स्वीकाराल, ज्यामध्ये लाभार्थी जोडणे, VPA टाइप करणे व पुनरावलोकन करणे आणि इच्छित प्राप्तकर्त्यांची पडताळणी करणे समाविष्ट आहे; आणि तुम्ही PhonePe ॲपमध्ये जी माहिती प्रविष्ट करता त्याची अचूकता आम्ही तपासत नाही.
- तुम्ही मान्य करता की जर तुम्ही अशी कोणतीही माहिती प्रदान केली जी असत्य, चुकीची, अद्ययावत नसलेली किंवा अपूर्ण आहे, किंवा आमच्याकडे संशय घेण्याचे रास्त कारण असेल की कोणतीही माहिती असत्य, चुकीची, अद्ययावत नसल्याचा किंवा अपूर्ण आहे, किंवा या UPI ToU किंवा सामान्य अटी आणि शर्तींशी (Terms) सुसंगत नाही, तर तुमचे PhonePe खाते अनिश्चित काळासाठी निलंबित किंवा बंद करण्याचा किंवा ॲक्सेस ब्लॉक करण्याचा किंवा आवश्यकतेनुसार इतर कोणतीही कारवाई करण्याचा आम्हाला अधिकार असेल.
- आम्ही हे सुनिश्चित करू की तुमच्या व्यवहाराशी संबंधित सर्व गोपनीय माहिती, बँक खाते/पेमेंट खात्याचे तपशील आणि आमच्याकडे उपलब्ध असलेली इतर सर्व संवेदनशील वैयक्तिक माहिती सर्वोत्तम उपलब्ध सुरक्षा मानकांचा वापर करून सुरक्षित आणि गुप्त ठेवली जाईल. या UPI ToU व्यतिरिक्त, तुमच्याद्वारे शेअर केलेला सर्व डेटा/माहिती आमच्या गोपनीयता धोरणाद्वारे (गोपनीयता धोरण) देखील संचलित केली जाईल.
- तुम्ही मान्य करता की फंड ट्रान्सफर/UPI व्यवहार पूर्ण करण्यास कोणताही विलंब झाल्यास किंवा तुमच्याकडून झालेल्या फंड ट्रान्सफरच्या चुकीमुळे कोणत्याही नुकसानासाठी PhonePe, PSP बँक किंवा UPI पेमेंट सिस्टीममधील इतर कोणतीही सहभागी सिस्टीम जबाबदार असणार नाही.
- व्यवहार नाकारले जाणे आणि आणि जारीकर्त्याद्वारे आकारण्यात येऊ शकणारे शुल्क टाळण्यासाठी तुमच्या बँक खात्यात/पेमेंट खात्यात पुरेसा निधी असल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
- तुम्ही हे मान्य करता आणि समजता की, NPCIच्या आवश्यकतेनुसार आणि NPCIतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकांनुसार, यामध्ये Numeric UPI ID मॅपर संदर्भातील परिपत्रकाचाही समावेश आहे, PhonePeतर्फे तुम्हाला NPCIद्वारे चालविण्यात येणाऱ्या केंद्रीकृत मॅपरवर ऑनबोर्ड करण्यात येईल, जेणेकरून निश्चित केलेल्या UPI Numberच्या माध्यमातून तुम्हाला निधी प्राप्त करता येईल. PhonePe ॲपवर तुम्ही दिलेल्या स्पष्ट संमतीनुसार, NPCIने निर्धारित व परवानगी दिलेल्या संरचनेत, तुमचे NPCIद्वारे चालविण्यात येणाऱ्या केंद्रीकृत मॅपरवर ऑनबोर्डिंग PhonePeतर्फे तुमच्या वतीने करण्यात येईल, यास तुम्ही सहमती देता आणि अधिकृत करता. ही प्रक्रिया NPCIच्या निर्देशांनुसार करण्यात येईल, ज्यामध्ये UPIसंबंधित सेवा प्रदान करण्यासाठी PhonePeतर्फे संकलित व जतन करण्यात आलेली तुमचा UPI तपशील NPCIसोबत शेअर करणे तसेच PhonePe ॲपवर नियुक्त करण्यात आलेले तुमचे प्राथमिक बँक खाते किंवा VPA तुमच्या UPI Numberशी लिंक करणे यांचा समावेश असेल. यामुळे तुमच्या UPI नंबरच्या आधारे तुम्हाला पेमेंट स्वीकारणे शक्य होईल. PhonePe ॲपवर प्रक्रिया करण्यात आलेल्या तुमच्या UPI Numberच्या मॅपिंगला डी लिंक करण्याचा पर्याय PhonePeतर्फे तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. पुढे, इतर UPI युजर्सकडून निधी प्राप्त करण्यास तुम्ही सहमती देता आणि PhonePeतर्फे त्याच्या भागीदार PSP बँकांच्या माध्यमातून अशा निधी हस्तांतरण व्यवहारांना तुमच्या लिंक केलेल्या प्राथमिक बँक खात्यात सुलभ करण्यात येईल, यासही तुम्ही संमती देता.
- विशिष्ट ग्राहकांच्या बाबतीत, जर तुमचा UPI नंबर PhonePe व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँक/थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडरद्वारे जारी केलेल्या VPAशी (“थर्ड पार्टी VPA”) NPCI संचलित सेंट्रलाइज्ड मॅपरमध्ये लिंक/स्टोअर असेल, तर PhonePe त्या थर्ड पार्टी VPAशी लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करेल. त्यानुसार, जर तुमच्या UPI नंबरवर कोणतेही फंड ट्रान्सफर केले गेले जे थर्ड पार्टी VPA शी जोडलेले आहे, तर ती रक्कम थर्ड पार्टी VPAशी लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होईल.
- तुम्ही पुढे मान्य करता आणि समजता की तुम्ही तुमचा UPI नंबर थर्ड पार्टी VPA वरून PhonePe ॲपवर दिलेल्या VPA वर पोर्ट करू शकाल आणि PhonePe ॲपमध्ये कोणत्याही वेळी तुमची स्पष्ट संमती देऊन NPCI सेंट्रल मॅपरमध्ये तो बदलू शकाल.
- तुम्ही हे समजता आणि मान्य करता की बॅलन्स चौकशी इत्यादीसारख्या बिगर-आर्थिक कारणांसाठी तुमच्या UPI वापराबाबत NPCI मर्यादा निश्चित करू शकते. तुम्ही NPCI द्वारे निर्धारित अशा मर्यादांचे पालन करण्यास सहमती देता.
- लागू कायद्याच्या अधीन राहून, PhonePe UPI द्वारे प्रक्रिया केलेले सर्व व्यवहार PhonePe च्या वतीने नॉन-रिफंडेबल (परतावा न मिळणारे) आहेत आणि PhonePe UPIच्या माध्यमातून ते व्यवहार तुम्हाला रिव्हर्स करता येणार नाहीत.
PHONEPE UPI द्वारे पेमेंट
PhonePe UPI चा वापर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी किंवा ऑफलाइन किंवा ऑनलाइन व्यापाऱ्यांकडून वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. PhonePe UPI च्या माध्यमातून पेमेंट अधिकृत करण्यासाठी, PhonePeतर्फे अन्यथा परवानगी दिली नसल्यास, तुमच्या मोबाइल/डिव्हाइसवर तुमचा UPI PIN प्रविष्ट करणे आवश्यक आहे. अन्य कोणत्याही प्रकारे सक्षम केलेले नसल्यास, कोणताही व्यवहार करताना तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट असल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तथापि, PhonePe सर्व व्यवहारांसाठी ही सुविधा देऊ शकणार नाही.
PhonePe प्लॅटफॉर्मवर PhonePe सेवांसाठी पेमेंट करताना तुम्ही PhonePe UPI वापरून पेमेंट करू शकता.
जिथे व्यापारी पेमेंटसाठी पेमेंट पर्याय म्हणून PhonePe UPI उपलब्ध असते, तिथे PhonePe UPI वापरून खरेदी केलेल्या वस्तू/सेवांची आम्ही कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि त्यासाठीची कोणतीही जबाबदारी स्पष्टपणे नाकारली जात आहे.
UPI व्यवहार हे व्यवहाराच्या मर्यादेच्या अधीन असतात ज्या PhonePe, युजर, जारीकर्ता, पेमेंट सहभागी किंवा लागू कायद्याच्या तरतुदींनुसार निर्धारित केल्या जाऊ शकतात. शिवाय, PhonePe, जारीकर्ता, PSP बँक किंवा इतर पेमेंट सहभागी त्यांच्या संबंधित धोरणांच्या आणि मूल्यांकनाच्या आधारे व्यवहार (पूर्णतः किंवा अंशतः) नाकारू/निलंबित करू शकतात.
आम्ही PhonePe ॲपच्या इतिहास विभागात तुमच्या व्यवहाराचे तपशील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सर्व व्यवहारांचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला कोणतीही चूक किंवा अनधिकृत व्यवहार आढळल्यास, तुम्ही त्वरित इतिहास विभागातून संबंधित व्यवहार निवडून किंवा PhonePe च्या तक्रार निवारण धोरणात नमूद केलेल्या तक्रार निवारण यंत्रणेनुसार PhonePe कस्टमर सपोर्टला कळवावे. कृपया लक्षात ठेवा की तुमच्या वापरलेल्या बँक खात्याच्या/पेमेंट खात्याच्या आधारे तुमचे व्यवहार तुमच्या जारीकर्त्याकडे नोंदवले जातील आणि अशा बँक खात्याच्या/पेमेंट खात्याच्या माध्यमातून केलेल्या UPI व्यवहाराशी संबंधित कोणत्याही माहिती/नोंद/स्टेटमेंटसाठी तुम्हाला तुमच्या जारीकर्त्याशी संपर्क साधावा लागेल.
UPI – OS नेटिव्ह बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन
UPI- OS नेटिव्ह बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वैशिष्ट्य युजरना बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्स वापरून व्यवहार अधिकृत करून UPI पेमेंट करण्यास सक्षम करेल. पेमेंट प्रवाह सामान्य UPI व्यवहाराप्रमाणेच आहे, परंतु येथे अधिप्रमाणनासाठी UPI पिन ऐवजी बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्स वापरले जातात. हे वैशिष्ट्य केवळ निवडक जारीकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे आणि जर तुमच्या जारीकर्त्याने हे सक्षम केले असेल तरच तुम्हाला PhonePe ॲपमध्ये हा पर्याय दिसेल. या वैशिष्ट्याचा तुमचा वापर लागू कायद्यासह तुमच्या जारीकर्त्याच्या अटी व शर्ती आणि या UPI ToU च्या अधीन असेल.
हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुम्हाला PhonePe ॲपच्या संबंधित विभागात तुमचा UPI पिन वापरून बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्स सक्रिय करावी लागतील. हे वैशिष्ट्य सक्रिय झाल्यानंतर, लागू कायद्यांनुसार निर्धारित केलेल्या मर्यादांच्या अधीन राहून, तुम्ही तुमच्या बायोमेट्रिक क्रेडेन्शिअल्सचा वापर करून UPI पेमेंट्स अधिकृत करू शकता.
तुम्ही पुढे हे समजता की तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेले कोणतीही बायोमेट्रिक क्रेडेंशियल UPI व्यवहार अधिकृत करण्यासाठी वापरली जाऊ शकतात आणि तुमच्या बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्सचा वापर व्यवस्थापित करण्यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार असाल. तुमच्याकडून वापरण्यात येणारे बायोमेट्रिक क्रेडेन्शिअल्स PhonePe, PSP बँक, NPCI किंवा कोणत्याही तृतीय पक्षाला ॲक्सेस करता येत नाहीत. हे बायोमेट्रिक क्रेडेन्शिअल्स केवळ अधिप्रमाणनाच्या उद्देशासाठी वापरण्यात येते आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया तुमच्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टिमद्वारेच करण्यात येते.
तुम्ही PhonePe ॲपमध्ये नमूद केलेल्या स्टेप्स/प्रक्रिया फॉलो करून कोणत्याही वेळी हे वैशिष्ट्य निष्क्रिय करू शकता. जर तुम्ही तुमचे डिव्हाइस बदलले किंवा तुमच्या डिव्हाइसवर नोंदणीकृत बायोमेट्रिक क्रेडेंशियल बदलले, तर हे वैशिष्ट्य आपोआप निष्क्रिय होईल. अशा निष्क्रियतेनंतर तुम्ही PhonePe ॲपद्वारे पुन्हा UPI- OS नेटिव्ह बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वैशिष्ट्य सक्रिय करू शकता.
UPI इंटरनॅशनल
जिथे शक्य असेल आणि निवडक ठिकाणी, UPI इंटरनॅशनल वैशिष्ट्य परदेशात प्रवास करणाऱ्या युजरना त्या देशांतील व्यापाऱ्यांना UPI वापरून पेमेंट करण्यास सक्षम करेल. पेमेंट प्रवाह सामान्य UPI मर्चंट व्यवहाराप्रमाणेच आहे, जिथे युजर एक QR (प्रसंगानुसार UPI ग्लोबल QR, स्थानिक QR, स्टॅटिक किंवा डायनॅमिक QR) स्कॅन करतो, रक्कम प्रविष्ट करतो आणि UPI पिनने अधिप्रमाणित करतो.
हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी युजरना त्यांचा UPI पिन वापरून आंतरराष्ट्रीय पेमेंट सक्रिय करावे लागेल. सक्रियीकरण कोणत्याही ठिकाणाहून केले जाऊ शकते, म्हणजेच भारतातून किंवा भारताबाहेरून. युजरनी सक्रियीकरण करण्यापूर्वी जर कोणताही आंतरराष्ट्रीय QR स्कॅन केला, तर त्यांना प्रथम UPI इंटरनॅशनल सक्रिय करण्यास सांगितले जाईल आणि त्यानंतर पेमेंट पूर्ण करण्यास सांगितले जाईल. युजरच्या विनंतीनुसार PhonePe ती बँक खाती सक्रिय करेल जी युजरने UPI इंटरनॅशनल व्यवहारांसाठी निवडली आहेत. एकदा सक्रिय केल्यानंतर UPI इंटरनॅशनल केवळ 3 महिन्यांसाठी सक्रिय राहील, म्हणजेच 3 महिने संपल्यावर सक्रियकरण डीफॉल्टनुसार निष्क्रिय होईल. वापरकर्ते 3 महिने संपण्यापूर्वीच PhonePe ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन UPI पिन अधिप्रमाणन प्रक्रियेद्वारे हे वैशिष्ट्य निष्क्रिय करू शकतात. अशा निष्क्रियतेनंतर वापरकर्ते कोणत्याही वेळी पुन्हा UPI इंटरनॅशनल वैशिष्ट्य सक्रिय करू शकतात.
सर्व UPI इंटरनॅशनल व्यवहारांसाठी ज्या देशात व्यवहार होत आहे त्या देशाच्या स्थानिक चलनात रक्कम प्रविष्ट केली जाईल. रिअल टाइममध्ये फॉरेक्स रेट आणि मार्क अपच्या आधारे रक्कम भारतीय रुपयांत देखील दर्शविली जाईल. PhonePe ॲपच्या व्यवहार इतिहासात प्रत्येक व्यवहाराच्या पेमेंट तपशीलांसह UPI इंटरनॅशनल पेमेंटचा एक आयडेंटिफायर असेल. तुम्ही UPI इंटरनॅशनल व्यवहारांसाठी लागू असलेल्या सर्व चार्जेसबाबत संमती देत आहात, ज्यामध्ये तुमच्या जारीकर्त्याद्वारे आकारले जाणारी प्रोसेसिंग फी समाविष्ट आहे.
UPI फॉरेन इनवर्ड रेमिटन्स
UPI फॉरेन इनवर्ड रेमिटन्स वैशिष्ट्य निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला त्या देशांत असलेल्या रक्कम प्रदात्यांकडून त्यांचे स्वतःचे मोबाइल ॲप्लिकेशन वापरून पेमेंट प्राप्त करण्यास सक्षम करेल. तुम्हाला PhonePe ॲपच्या “परवानग्या” विभागांतर्गत हे वैशिष्ट्य सक्षम करावे लागेल. हे वैशिष्ट्य सक्षम करून तुम्ही तुमच्या PhonePe ॲपद्वारे क्रॉस-बॉर्डर पेमेंट प्राप्त करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती जसे की VPA, खाते क्रमांक, बँकेतील नाव, IFSC कोड इत्यादी आंतरराष्ट्रीय पेमेंट/रेमिटन्स पार्टनर्ससोबत शेअर करण्यासाठी PhonePe च्या PSP बँकांना संमती देत आहात. तुम्ही तुमच्या PhonePe ॲपच्या “परवानग्या” विभागाद्वारे कोणत्याही वेळी तुमची संमती मागे घेऊ शकता.
तुम्ही पुढे हे समजता आणि मान्य करता की फॉरेन इनवर्ड रेमिटन्स संबंधित RBI च्या कायद्यासह सर्व लागू कायद्यांचे पालन करण्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असाल.
UPI फॉरेन इनवर्ड रेमिटन्स संबंधित अस्वीकार आणि अतिरिक्त अटी:
- सर्व फॉरेन इनवर्ड व्यवहार इतिहास केवळ तुमच्या बँक खात्यातच दिसेल.फॉरेन इनवर्ड व्यवहार इतिहास तुमच्या PhonePe ॲपमध्ये दिसणार नाही. कोणत्याही व्यवहाराच्या यश किंवा अपयशाबाबत कोणतीही पुष्टी, संदेश किंवा ट्रान्झॅक्शन अलर्ट प्रदान करण्यासाठी PhonePe जबाबदार नाही. अशा कोणत्याही शंका किंवा तक्रारींसाठी कृपया तुमच्या जारीकर्त्याशी संपर्क साधा.
- तुम्ही मनी लाँड्रिंग विरोधी आणि दहशतवादाला वित्तपुरवठा विरोधी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कराल.
- परदेशातून येणाऱ्या इनवर्ड व्यवहारांअंतर्गत होणारे कोणतेही व्यवहार किंवा रक्कम प्रदाते यांची PhonePeतर्फे कोणत्याही प्रकारे पडताळणी, तपासणी किंवा त्यांचे निरीक्षण करण्यात येत नाही.
सर्व फॉरेन इनवर्ड ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत रक्कम प्रदाता त्यांच्या स्थानिक चलनात पैसे देईल आणि तुम्ही (रक्कम प्राप्तकर्ता म्हणून) ते केवळ भारतीय चलनात प्राप्त कराल. व्यवहाराचे मूल्य तुमच्या प्राप्तकर्त्या बँक खात्याच्या/जारीकर्त्याच्या लागू चलन विनिमय दरांद्वारे निर्धारित केले जाईल आणि PhonePe कोणत्याही प्रकारे या चलन रूपांतरणाशी संबंधित नाही. या संदर्भातील कोणत्याही शंका/समस्यांसाठी कृपया तुमच्या जारीकर्त्याशी संपर्क साधा.
UPI Lite
आम्ही RBI आणि/किंवा NPCI द्वारे वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांसह लागू कायद्याच्या अधीन राहून तुम्हाला PhonePe ॲपवर ‘UPI Lite’ वापरण्याची सुविधा देऊ शकतो. UPI Lite हे कमी मूल्याच्या व्यवहारांसाठी NPCI द्वारे सक्षम केलेले एक ‘ऑन-डिव्हाइस वॉलेट’ आहे. सर्व जारीकर्ते UPI Lite ला समर्थन किंवा सक्षम करू शकत नाहीत. तुम्ही PhonePe ॲपमध्ये लिंक केलेल्या तुमच्या बँक खात्यांपैकी केवळ एकालाच UPI Lite साठी सक्षम करू शकाल (यानंतर हे “UPI Lite सुविधा” म्हणून उल्लेखित आहे). तुम्ही हे समजता आणि मान्य करता की UPI Lite सुविधा घेणे आणि/किंवा वापरणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला PhonePe ला तुमच्या PhonePe ॲपमध्ये ॲप्लिकेशन लॉक सुविधा सक्षम करण्याची परवानगी द्यावी लागेल. त्यानुसार, जर हे निष्क्रिय असेल, तर UPI Lite सुविधा वापरण्यासाठी किंवा वापरणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला त्वरित तुमच्या फोन सेटिंगमध्ये PhonePe ला PhonePe ॲप लॉक करण्याची परवानगी द्यावी लागेल. एकदा सक्षम झाल्यानंतर तुमच्या पसंतीचा मोड जसे की फेस आयडी, बायोमेट्रिक्स किंवा तुमचा तयार केलेला पासकोड वापरून PhonePe ॲप अनलॉक केले जाऊ शकते.
UPI Lite सुविधा सक्षम करण्यासाठी तुम्हाला PhonePe ॲपच्या विशिष्ट विभागावर क्लिक/टॅप करावे लागेल आणि UPI Lite सुविधेत रक्कम ॲड करावी लागेल. PhonePe ॲपच्या विशिष्ट विभागावर क्लिक/टॅप करून तुम्ही UPI Lite सुविधा सक्षम करण्यासाठी तुमची संमती देत आहात. तुमच्या UPI पिनचा वापर करून केवळ PhonePe ॲपमध्ये UPI Lite शी लिंक केलेल्या बँक खात्याच्या माध्यमातून रक्कम ॲड केली जाऊ शकते. तुम्ही PhonePe ॲपमध्ये UPI Lite सुविधेच्या प्रत्येक व्यवहाराची स्थिती ट्रॅक करू शकाल. तुम्ही कोणत्याही वेळी तुमच्या UPI Lite मधून न वापरलेला बॅलन्स तुमच्या PhonePe ॲपमध्ये लिंक केलेल्या मूळ बँक खात्यात परत घेऊ शकता. UPI Lite मध्ये ॲड केलेल्या कोणत्याही रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. UPI Lite सुविधा केवळ डेबिट व्यवहारांसाठी वापरली जाऊ शकते. UPI Liteमध्ये होणारे सर्व क्रेडिट व्यवहार (रिफंड्स इ. समाविष्ट करून) युजरच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने केले जातील. UPI Lite सुविधेद्वारे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला UPI पिन प्रविष्ट करावा लागणार नाही. तथापि UPI Lite सुविधेच्या व्यवहारांसाठी काही मर्यादा लागू असतील. लागू व्यवहारांची मर्यादा खालीलप्रमाणे असेल, किंवा NPCI द्वारे वेळोवेळी निर्धारित केलेली इतर कोणतीही मर्यादा:
- UPI Lite सुविधा वापरून प्रत्येक व्यवहाराची कमाल मर्यादा 1,000/- रुपये.
- एका दिवसात UPI Lite सुविधा वापरून सर्व व्यवहारांचे एकूण मूल्य कमाल 10,000/- रुपये असू शकेल.
- कोणत्याही वेळी UPI Lite मध्ये कमाल 5,000/- रुपये बॅलन्स ठेवता येईल.
वरील व्यवहारांच्या मर्यादा कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय बदलल्या जाऊ शकतात.
PhonePe ॲपमध्ये नमूद केलेल्या स्टेप्स/प्रक्रिया फॉलो करून कोणत्याही वेळी तुमची UPI Lite सुविधा निष्क्रिय करण्याचा तुम्हाला अधिकार असेल. एकदा UPI Lite सुविधा निष्क्रिय झाल्यावर बॅलन्स असलेली रक्कम आपोआप तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होईल.
तुमचे मोबाइल डिव्हाइस एका ऑपरेटिंग सिस्टीमवरून दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (जसे की अँड्रॉइड वरून आयओएस किंवा याच्या उलट) बदलण्यापूर्वी तुम्हाला PhonePe ॲपमध्ये नमूद केलेल्या स्टेप्सनुसार त्या मोबाइल डिव्हाइसवरून UPI Lite सुविधा निष्क्रिय करावी लागेल. जर तुम्ही तुमचे मोबाइल डिव्हाइस पूर्वीच्या डिव्हाइसप्रमाणेच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बदलली तर या स्टेपची आवश्यकता नाही. जर तुम्ही तुमच्या जुन्या मोबाइल डिव्हाइसवरून UPI Lite सुविधा निष्क्रिय केली नाही, तर तुम्ही तुमच्या नवीन मोबाइल डिव्हाइसवर UPI Lite बॅलन्स वापरू शकणार नाही आणि तुमचा UPI Lite सुविधेचा बॅलन्स लिंक केलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जारीकर्त्याशी संपर्क साधावा लागेल. या बाबतीत PhonePe जबाबदार राहणार नाही.
UPI – ATM – इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल
आम्ही तुम्हाला या अटींच्या आधारे निवडक ऑटोमेटेड टेलर मशीन्समधून (“ATM(s)”) कार्डशिवाय रोख रक्कम काढण्याची सुविधा निवडण्यास सक्षम करू शकतो (“सुविधा”). ही सुविधा घेण्यासाठी तुम्हाला लागू कायदा आणि/किंवा जारीकर्त्याने निर्धारित केलेले काही निकष पूर्ण करावे लागतील, जसे की (i) UPI-ATM सुविधेसाठी सक्षम असलेल्या पात्र बँकेचे ग्राहक असणे, (ii) या सुविधेसाठी सक्षम असलेले ATM वापरणे; (iii) PhonePe UPI वर नोंदणी करणे (या सुविधेसाठी पेमेंट पर्याय म्हणून UPI वापरण्यासाठी); आणि/किंवा (iv) NPCI किंवा RBI किंवा जारीकर्त्याद्वारे परिभाषित केलेले इतर कोणतेही निकष.
जर वरील निकष पूर्ण झाले आणि तुम्ही रोख काढण्यासाठी अशा पात्र ATM मध्ये उपस्थित असाल, तर तुमच्याकडे त्या ATM मध्ये “UPI कॅश विथड्रॉवल” पर्याय निवडण्याची आणि विथड्रॉ करण्याची रक्कम प्रविष्ट करण्याचा सुविधा असेल. आवश्यक रक्कम प्रविष्ट केल्यानंतर ATM स्क्रीनवर एकदाच वापरण्यायोग्य एक डायनॅमिक QR कोड प्रदर्शित होईल. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत VPA द्वारे PhonePe ॲप वापरून QR कोड स्कॅन करावा लागेल आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढायचे आहेत ते निवडावे लागेल.
वरील निवडीनंतर तुमच्या PhonePe ॲपमध्ये तुमच्या UPI पिनचा वापर करून व्यवहार अधिकृत करण्यास सांगितले जाईल. यशस्वी अधिप्रमाणनानंतर तुमच्या PhonePe ॲप आणि ATM मशीनवर एक कन्फर्मेशनचा संदेश येईल. ATM मधून रोख रक्कम बाहेर येईल आणि तुम्हाला ATM स्क्रीनवर रोख रक्कम घेण्यासाठी सूचना देण्यात येईल (आणि तुमच्या जारीकर्त्याद्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे कपात केल्याबद्दल कळवले जाईल).
जर तुमच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले परंतु काही कारणास्तव व्यवहार यशस्वी झाला नाही, तर समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि/किंवा कापलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जारीकर्त्याशी संपर्क साधावा लागेल. PhonePe या बाबतीत जबाबदार किंवा उत्तरदायी राहणार नाही.
कृपया लक्षात ठेवा रोख रक्कम बाहेर येईपर्यंत आणि तुम्ही ती ताब्यात घेईपर्यंत तुम्ही ATM सोडून जाऊ शकत नाही. रोख रक्कम काढण्याच्या बाबतीत तुम्ही NPCI/RBI किंवा तुमच्या जारीकर्त्याद्वारे निर्धारित केलेल्या व्यवहाराच्या मर्यादेच्या अधीन असाल (जी कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय वेळोवेळी बदलू शकते). तुम्ही या सुविधेद्वारे केलेले व्यवहार तुमच्या PhonePe ॲपच्या इतिहास विभाग आणि तुमच्या बँक खाते स्टेटमेंटमध्ये पाहू शकता.
तुम्ही मान्य करता की: (i) PhonePe केवळ त्याच्या PhonePe ॲपद्वारे ही सुविधा सक्षम करत आहे आणि या सुविधेसाठी पात्र ATM बद्दल PhonePe ला कोणतीही उपलब्ध नसेल. ATM या सुविधेसाठी सक्षम आहे की नाही हे तपासणे तुमची जबाबदारी आहे; (ii) कन्फर्मेशन मिळाल्यानंतर (यशस्वी अधिप्रमाणनानंतर तुमच्या PhonePe ॲप आणि ATM मशीनद्वारे) रोख रक्कम घेण्याची जबाबदारी तुमची असेल आणि प्राप्त झालेल्या नोटा (क) खराब, फाटलेल्या किंवा बनावट आहेत की नाही आणि (ख) तुम्ही जी रक्कम काढू इच्छित होता तीच रक्कम आहे की नाही हे तपासून पहावे. PhonePe या बाबतीत जबाबदार राहणार नाही. कृपया या सुविधेचा वापर आणि रोख रक्कम काढण्याबाबत कोणतीही समस्या थेट तुमच्या जारीकर्त्याकडे मांडा.
PHONEPE UPI द्वारे क्रेडिट लाइन
जर तुमच्या जारीकर्त्याने तुम्हाला क्रेडिट लाइन मंजूर किंवा विस्तारित केली असेल (“क्रेडिट लाइन”), तर आम्ही या अटींनुसार ती क्रेडिट लाइन PhonePe UPIशी लिंक करण्यास तुम्हाला सक्षम करू शकतो. PhonePe UPIशी क्रेडिट लाइन लिंक करण्यासाठी तुम्हाला PhonePe ॲपमध्ये आवश्यक काही स्टेप्स पूर्ण कराव्या लागतील. तुमची क्रेडिट लाइन यशस्वीरित्या PhonePe UPIशी लिंक केल्यानंतर तुम्ही अशा निवडक व्यापाऱ्यांना पेमेंट करू शकाल जे क्रेडिट लाइनद्वारे पेमेंट स्वीकारतात. कृपया लक्षात ठेवा की तुम्ही केवळ तीच क्रेडिट लाइन तुमच्या PhonePe UPI मध्ये लिंक करू शकता जी तुमच्या PhonePe खात्याशी जोडलेल्या मोबाइल नंबरशी संबंधित आहे.
PhonePe ॲपच्या संबंधित विभागात तुम्ही अशा जारीकर्त्यांची यादी पाहू शकता जे PhonePeच्या या सुविधेसाठी सक्षम आहेत. ज्या जारीकर्त्याने तुम्हाला क्रेडिट लाइन प्रदान केली आहे तो निवडल्यास PhonePe तुमच्या क्रेडिट लाइनचा तपशील गोळा करेल. या उद्देशासाठी तुम्ही मान्य करता की तुमच्या क्रेडिट लाइनशी संबंधित तपशील सत्यापित करण्यासाठी तुमचे मोबाइल नेटवर्क तुमच्या फोनचा वापर करून एक SMS पाठवू शकते आणि यासाठी मानक SMS शुल्क लागू होऊ शकते. आवश्यक स्टेप्स पूर्ण झाल्यावर त्या क्रेडिट लाइनवर एक अनन्य VPA तयार होईल आणि क्रेडिट लाइन तुमच्या PhonePe ॲपशी लिंक होईल. तुमच्याकडे तुमच्या जारीकर्त्याद्वारे मंजूर केलेल्या एकापेक्षा जास्त क्रेडिट लाइन्स वरील पद्धतीने PhonePe ॲपमध्ये जोडण्याची सुविधा असेल.
VPA तयार झाल्यानंतर, PhonePe ॲपशी लिंक केलेल्या तुमच्या क्रेडिट लाइनसाठी UPI पिन सेट करण्यासाठी, PhonePeतर्फे सक्षम करण्यात आलेल्या कोणत्याही मोडमधून तुम्ही निवड करू शकता. PhonePe ॲपवर लिंक केलेल्या क्रेडिट लाइनसाठी UPI पिन सेट करण्यासाठी निवडलेल्या मोडनुसार, PhonePeतर्फे पुढे तुम्हाला क्रेडिट लाइनशी संबंधित तपशील व्हेरिफाय करण्यास सांगितले जाऊ शकते, यामध्ये, परंतु तेवढ्यापुरते मर्यादित नसून, तुमच्या बँक खात्याचा तपशील, डेबिट कार्डचा तपशील इत्यादींचा समावेश होतो, आणि त्यानंतर PhonePe ॲपशी लिंक केलेल्या तुमच्या क्रेडिट लाइनसाठी UPI पिन सेट करण्यात येईल.
जे निवडक व्यापारी PhonePe UPI वापरून क्रेडिट लाइन पेमेंट स्वीकारतात, त्यांना पेमेंट करण्यासाठी तुम्हाला तुमचा UPI पिन प्रविष्ट करून किंवा तुमच्या बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्सचा वापर करून ते पेमेंट अधिप्रमाणित करावे लागेल. तुम्ही मान्य करता की PhonePe UPIशी लिंक केलेली तुमची क्रेडिट लाइन केवळ सक्षम केलेल्या व्यापाऱ्यांना पेमेंट करण्यासाठी वापरली जाऊ शकते आणि इतर कोणत्याही पेमेंटसाठी (ज्यामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर, बँक खाते ट्रान्सफर/रोख रक्कम काढणे समाविष्ट आहे परंतु एवढ्यापुरतेच मर्यादित नाही) वापरली जाऊ शकत नाही.
शिवाय तुम्ही मान्य करता की तुम्ही: (i) तुमच्या जारीकर्त्याद्वारे निर्धारित क्रेडिट लाइनची मर्यादा, (ii) UPI व्यवहारांसाठी लागू असलेली कोणतीही व्यवहाराची मर्यादा; आणि (iii) तुमच्या क्रेडिट लाइन वापराबाबत लागू असलेल्या इतर कोणत्याही अटी व शर्ती/जारीकर्त्याच्या अटींच्या अधीन असाल.
या व्यतिरिक्त तुमच्याकडे PhonePe ॲपद्वारे लिंक केलेल्या क्रेडिट लाइनचा ‘उपलब्ध क्रेडिट लाइन बॅलन्स’ तपासण्याची सुविधा असेल. तुम्ही हे समजता की या सुविधेअंतर्गत आम्ही तुमच्या जारीकर्त्याद्वारे प्रदान केलेला ‘उपलब्ध क्रेडिट लाइन बॅलन्स’ ‘जसा आहे’ तसा प्रदर्शित करू आणि याच्याशी संबंधित कोणतीही विसंगती, त्रुटी किंवा चुकीच्या माहितीसाठी आमची कोणतीही जबाबदारी किंवा कर्तव्य असणार नाही. तुम्ही PhonePe ॲपच्या ‘इतिहास’ विभागाअंतर्गत PhonePe UPI मध्ये लिंक केलेल्या क्रेडिट लाइनद्वारे केलेल्या पेमेंटचा इतिहास देखील पाहू शकता.
तुम्ही यास सहमती देता की:
- क्रेडिट लाइन तुमच्या आणि जारीकर्त्यामधील मान्य कराराच्या अटींवर आधारित तुमच्या जारीकर्त्याद्वारे सक्षम केली गेली आहे. तुमची पात्रता किंवा क्रेडिट लाइनच्या पात्रतेचे निकष ठरवण्यात किंवा क्रेडिट लाइनची मर्यादा ठरवण्यात आणि/किंवा याच्याशी संबंधित कोणत्याही जोखमीमध्ये PhonePeची कोणतीही भूमिका नाही. PhonePe केवळ तुम्हाला PhonePe ॲपद्वारे तुमची क्रेडिट लाइन PhonePe UPIमध्ये लिंक करण्यास सक्षम करत आहे आणि तुमच्या आणि तुमच्या जारीकर्त्यामधील मान्य कराराच्या अटी सत्यापित किंवा ठरवण्यात किंवा या क्रेडिट लाइनच्या कोणत्याही पैलूशी संबंधित कोणत्याही जोखमीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही
- या सुविधेअंतर्गत PhonePe UPIमध्ये लिंक केलेली क्रेडिट लाइन वापरून तुमच्याद्वारे खर्च केलेली कोणतीही रक्कम संबंधित सक्षम व्यापाऱ्याला पेमेंट म्हणून मानली जाईल. जारीकर्त्याद्वारे जारी केलेल्या बिलात नमूद केलेल्या देय तारखेच्या आत आणि तुमच्या जारीकर्त्याद्वारे निर्देशित मोड/अटींनुसार तुम्हाला क्रेडिट लाइन संबंधित थकबाकी भरणे आवश्यक आहे. PhonePe याच्याशी संबंधित नाही.
PhonePe ॲपमध्ये PhonePe UPIच्या माध्यमातून तुमच्या क्रेडिट लाइनचा वापर करून अधिप्रमाणित केलेल्या व्यवहाराशी संबंधित कोणताही विवाद UPI ToU मधील तक्रार निवारण विभागात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आणि UPI व्यवहाराबाबत NPCIद्वारे (वेळोवेळी) निर्धारित केलेल्या इतर कोणत्याही प्रक्रियेनुसार हाताळण्यात येईल. कोणताही रिफंड/रिव्हर्सल UPI व्यवहारासाठी लागू असलेल्या कालमर्यादेनुसार आणि/किंवा व्यापारी धोरण/अटींनुसार असेल. PhonePe ॲपद्वारे क्रेडिट लाइन वापरून तुमच्याकडून केलेल्या कोणत्याही आगाऊ पेमेंटच्या रिफंडच्या बाबतीत तुमच्या आणि तुमच्या जारीकर्त्यामधील मान्य कराराच्या अटींनुसार तो क्रेडिट लाइनमध्ये जमा/समायोजित केला जाईल.
UPI सर्कल
NPCI आणि/किंवा RBI द्वारे वेळोवेळी जारी केलेल्या लागू मार्गदर्शक तत्त्वांच्या आणि या अटींच्या अधीन राहून PhonePe तुम्हाला PhonePe ॲपवर ‘UPI Circle’ वैशिष्ट्य वापरण्याची सुविधा देऊ शकते.
UPI सर्कलच्या माध्यमातून एक प्राथमिक युजर (खाली परिभाषित) त्याचा UPI आयडी एका दुय्यम युजरच्या (खाली परिभाषित) UPI आयडीशी लिंक करू शकतो, ज्यामुळे तो दुय्यम युजर प्राथमिक युजरच्या वतीने UPI पेमेंट/व्यवहार करण्यास सक्षम होईल.
प्राथमिक युजर आणि दुय्यम युजर यांच्यातील हे लिंकिंग PhonePe ॲपमध्ये उपलब्ध पूर्ण अधिकार सोपवणे किंवा अंशतः अधिकार सोपवणे तत्त्वावर असू शकते.
खालील शब्दांचे अर्थ खालीलप्रमाणे असतील जर दुसरा कोणताही संदर्भ दिलेला नसेल:
- “पूर्ण अधिकार सोपवणे” म्हणजे असा मोड ज्याद्वारे प्राथमिक युजर दुय्यम युजरला प्रत्येक व्यवहारासाठी प्राथमिक युजरच्या अधिप्रमाणनाशिवाय UPI व्यवहार सुरू आणि पूर्ण करण्याची परवानगी देऊ शकतो. पूर्ण अधिकार सोपवण्याच्या बाबतीत प्राथमिक युजर दुय्यम युजरला पूर्ण अधिकार सोपवण्यासाठी NPCI द्वारे निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत UPI व्यवहार पूर्ण करण्याची परवानगी देऊ शकतो.
- “अंशतः अधिकार सोपवणे” म्हणजे असा मोड ज्याद्वारे प्राथमिक युजर दुय्यम युजरला UPI व्यवहार सुरू करण्याची परवानगी देऊ शकतो आणि प्राथमिक युजर त्याचा UPI पिन प्रविष्ट करून अशा प्रत्येक व्यवहाराला अधिप्रमाणित करतो. अंशतः सोपवणुकीच्या बाबतीत प्राथमिक युजर दुय्यम युजरला विद्यमान UPI मर्यादेपर्यंत UPI व्यवहार पूर्ण करण्याची परवानगी देऊ शकतो.
- “प्राथमिक युजर” म्हणजे अशी व्यक्ती जी UPI आधारित सेवा/सुविधा मिळवण्यासाठी PhonePe ॲप वापरते आणि जी PhonePe ॲपमध्ये उपलब्ध UPI सर्कल वैशिष्ट्याद्वारे प्राथमिक युजरचे बँक खाते वापरून UPI पेमेंट करण्यासाठी दुय्यम युजरला अधिकार देते.
- “दुय्यम युजर” म्हणजे अशी व्यक्ती जी प्राथमिक युजरच्या बँक खात्यातून UPI सर्कल व्यवहार करण्यासाठी प्राथमिक युजरद्वारे किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरणाऱ्या प्राथमिक युजरद्वारे अधिकृत आहे.
तुम्ही हे समजता आणि मान्य करता की:
जर तुम्ही प्राथमिक युजर असाल :
तुमचा UPI आयडी हा दुय्यम वापरकर्त्याच्या UPI आयडीशी लिंक करण्यापूर्वी, तसेच तुमच्या संपर्क यादीतून संबंधित दुय्यम वापरकर्त्याचा संपर्क क्रमांक निवडताना, योग्य व्यक्तीलाच दुय्यम वापरकर्ता म्हणून अधिकृत केले जात आहे याची खात्री करण्यासाठी, त्या दुय्यम वापरकर्त्याच्या QR कोड किंवा UPI आयडीची पडताळणी आणि वैधता तपासण्याची संपूर्ण जबाबदारी केवळ तुमचीच असेल.
तुम्ही घोषित करता की तुम्हाला दुय्यम युजरची ओळख पटलेली आहे आणि तुम्ही हे सुनिश्चित कराल की UPI सर्कल वापरताना तुम्ही आणि तुम्ही अधिकृत केलेला दुय्यम युजर भारताच्या लागू कायद्यांचे पालन कराल.
पूर्ण अधिकार सोपवणे किंवा अंशतः अधिकार सोपवणे काहीही असो, तुमच्या UPI आयडीशी लिंक केलेल्या बँक खात्यातून UPI व्यवहार करण्यासाठी दुय्यम युजरला अधिकार देण्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असाल. त्यानुसार, दुय्यम युजर PhonePe ॲपवर किंवा इतर कोणत्याही UPI ॲपवर UPI सर्कल वापरत असला तरीही तुमच्याद्वारे जोडलेल्या/अधिकृत केलेल्या दुय्यम युजरने केलेल्या सर्व व्यवहारांसाठी आणि कृतींसाठी तुम्ही पूर्णतः जबाबदार असाल.
पूर्ण अधिकार सोपवण्याच्या आधारावर दुय्यम युजरचा UPI आयडी लिंक करण्यासाठी:
- तुमचे आणि दुय्यम युजर यांच्यामधील नाते म्हणजेच तो कुटुंबातील सदस्य (मुले/पालक/पती किंवा पत्नी/भाऊ-बहीण/कुटुंबातील इतर सदस्य) किंवा घरगुती किंवा लहान व्यवसायाचा कर्मचारी आहे, हे अचूकपणे निश्चित जबाबदारी तुमची आहे;
- तुम्ही हे समजता, मान्य करता आणि सहमत आहात की पूर्ण अधिकार सोपवण्याच्या आधारावर कोणत्याही लिंकिंगपूर्वी तुम्हाला दुय्यम युजरचा तपशील (जसे की दस्तऐवजाचा प्रकार आणि अधिकृत वैध दस्तऐवजाचा विशिष्ट ओळख क्रमांक जो त्या दुय्यम युजरची ओळख प्रस्थापित करतो) प्रदान करावा लागेल;
- तुम्ही कन्फर्म करता की या अटींनुसार आवश्यक कृती करण्यासाठी आणि दुय्यम युजरची माहिती शेअर करण्यासाठी तुम्ही त्या दुय्यम युजरकडून आवश्यक संमती आणि अधिकार घेतले आहेत;
- तुम्ही कन्फर्म करता की तुमच्याद्वारे प्रदान करण्यात आलेला दुय्यम युजरचा तपशील अचूक आणि खरा आहेत.
- तुम्ही पुढे मान्य करता आणि सहमत आहात की दुय्यम युजरशी संबंधित तुमच्याद्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही दस्तऐवजाच्या आणि/किंवा माहितीच्या सत्यतेसाठी, अचूकतेसाठी आणि वैधतेसाठी तुम्ही पूर्णतः जबाबदार असाल;
- तुम्ही हे समजता, मान्य करता आणि सहमत आहात की पूर्ण अधिकार सोपवण्याचे लिंकिंग दुय्यम युजरच्या संमतीच्या अधीन आहे : (i) तुमच्याद्वारे शेअर केलेले दुय्यम युजरचा तपशील कन्फर्म करणे; आणि (ii) पूर्ण अधिकार सोपवण्याचे लिंकिंग स्वीकारणे;
- UPI सर्कल वैशिष्ट्याशी संबंधित कोणत्याही त्रयस्थ पक्षाचा वैयक्तिक डेटा किंवा माहिती तुमच्याद्वारे शेअर केल्यामुळे किंवा त्या संदर्भात उद्भवलेल्या कोणत्याही आणि सर्व नुकसानासाठी (त्रयस्थ पक्षाच्या दाव्यांसह) तुम्ही PhonePe ला नुकसानभरपाई द्याल आणि सुरक्षित ठेवाल.
एक प्राथमिक युजर जास्तीत जास्त 5 दुय्यम युजरना अधिकार सोपवू शकतो, तथापि, एक दुय्यम युजर केवळ एका प्राथमिक युजरकडून अधिकार स्वीकारू शकतो.
तुम्ही UPI सर्कलसाठी दुय्यम युजरला दिलेले अधिकार कधीही बदलू किंवा रद्द करू शकता. PhonePe ॲप आणि तुमच्या बँक खाते स्टेटमेंटद्वारे UPI सर्कल अंतर्गत दुय्यम युजरने केलेले सर्व व्यवहार पाहण्याची आणि ॲक्सेस करण्याची संधी तुम्हाला असेल.
तुमच्या ॲड केलेल्या/अधिकृत केलेल्या दुय्यम युजरद्वारे UPI सर्कल वैशिष्ट्य वापरून केलेल्या कोणत्याही अनधिकृत व्यवहारासाठी तुम्ही NPCI किंवा PhonePe ला जबाबदार धरणार नाही. UPI सर्कल वापरून दुय्यम युजरने केलेले व्यवहार PhonePe सत्यापित, तपासणी करत नाही किंवा त्यावर लक्ष ठेवत नाही आणि तुम्ही दिलेल्या अधिकारानुसार व्यवहार सुलभ/प्रक्रिया करेल.
लागू कायदा किंवा UPI आणि UPI सर्कलच्या बाबतीत लागू असलेल्या कोणत्याही अटींचे पालन करण्याबाबत तुमची किंवा दुय्यम युजरची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची कोणतीही कृती किंवा त्रुटी यामुळे उद्भवलेल्या कोणत्याही नुकसानासाठी किंवा दायत्वाची PhonePeला तुमच्याप्रती, कोणत्याही दुय्यम युजरप्रती किंवा इतर कोणत्याही व्यक्तीप्रती जबाबदार धरण्यात येणार नाही. तुम्ही हे समजता की तुम्ही जोडलेला/अधिकृत दुय्यम युजर PhonePe ॲपमध्ये किंवा इतर कोणत्याही UPI ॲपमध्ये UPI सर्कल वापरत असला तरीही त्या दुय्यम युजरने खरेदी केलेल्या/प्राप्त केलेल्या वस्तू/सेवांची कोणतीही जबाबदारी PhonePe घेत नाही आणि याच्याशी संबंधित सर्व जबाबदारी स्पष्टपणे नाकारली जात आहे.
PhonePeतर्फे वेळोवेळी निर्धारित करण्यात येणाऱ्या कालावधीसाठी, PhonePe ॲपच्या माध्यमातून UPI सर्कल वापरून कोणतेही व्यवहार करण्यात आले नसल्यास, कोणत्याही दुय्यम युजरला दिलेली अधिकृतता निलंबित करण्याचा किंवा समाप्त करण्याचा अधिकार PhonePeकडे राखून ठेवण्यात येत आहे.
जर तुम्ही दुय्यम युजर असाल:
तुम्ही घोषित करता की UPI सर्कल वापरताना तुम्ही भारताचे लागू कायदे आणि UPI व UPI सर्कलच्या बाबतीत लागू असलेल्या अटींचे पालन कराल
या अटी PhonePe ॲप वापरणाऱ्या कोणत्याही दुय्यम युजरला लागू होतील, मग तो प्राथमिक युजरद्वारे किंवा इतर कोणत्याही UPI ॲपच्या प्राथमिक युजरद्वारे ऑनबोर्ड झाला असला तरीही.
UPI सर्कल अंतर्गत प्राथमिक युजरच्या (ज्याने तुम्हाला जोडले/अधिकृत केले आहे) UPI आयडीशी तुमचा UPI आयडी लिंक करण्याची विनंती स्वीकारून तुम्ही तुमचे नाव, फोन नंबर, UPI आयडी आणि व्यवहाराचे तपशील त्या प्राथमिक युजरसोबत आणि UPI सर्कल व्यवहार प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतर तिसऱ्या पक्षांसोबत शेअर करण्यास संमती देत आहात.
तुम्ही पुष्टी करता आणि मान्य करता की संबंधित प्राथमिक युजरद्वारे प्रदान केलेली तुमची माहिती आणि/किंवा दस्तऐवज अचूक आणि खरे आहेत.
तुम्ही PhonePe ॲपमध्ये कोणत्याही वेळी प्राथमिक युजरकडून (ज्याने तुम्हाला जोडले/अधिकृत केले आहे) तुमचा UPI आयडी डी-लिंक करू शकता.
दुय्यम युजर म्हणून PhonePe ॲप वापरून तुमच्याद्वारे केलेल्या UPI व्यवहारातून किंवा त्या संदर्भात उद्भवलेल्या कोणत्याही आणि सर्व नुकसानासाठी (त्रयस्थ पक्षाच्या दाव्यांसह) तुम्ही PhonePe ला नुकसानभरपाई द्याल आणि सुरक्षित ठेवाल.
UPI सर्कल संबंधित इतर अटी:
पूर्ण अधिकार सोपवण्याअंतर्गत UPI सर्कलद्वारे व्यवहारांच्या बाबतीत कोणत्याही वेळी दरमहा कमाल 15,000/- (पंधरा हजार) रुपये आणि प्रति व्यवहार कमाल 5,000/- (पाच हजार) रुपये मर्यादा मंजूर आहे.
पूर्ण अधिकार सोपवण्याअंतर्गत दुय्यम युजरचा UPI आयडी प्राथमिक युजरच्या UPI आयडीशी कमाल 5 (पाच) वर्षे आणि किमान 1 (एक) महिना कालावधीसाठी लिंक केला जाऊ शकतो.
वरील व्यवहारांच्या मर्यादा आणि कालावधी NPCI आणि/किंवा RBI द्वारे कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वेळोवेळी बदलण्यात येऊ शकतो.
प्राथमिक युजरसोबत दुय्यम युजरचा UPI आयडी यशस्वीरित्या अधिकृत आणि लिंक केल्यानंतर 30 (तीस) मिनिटांचा कूलिंग पिरियड असेल ज्या दरम्यान कोणताही व्यवहार सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही.या व्यतिरिक्त, प्राथमिक युजरसोबत दुय्यम युजरचा UPI आयडी लिंक केल्यानंतर पहिल्या 24 तासांसाठी 5,000/- रुपये व्यवहाराची मर्यादा प्रभावी राहील. अंशतः अधिकार सोपवण्याअंतर्गत विद्यमान UPI मर्यादा लागू होतील.
अंशतः अधिकार सोपवण्याअंतर्गत विद्यमान UPI मर्यादा लागू होतील.
तुम्ही हे समजता आणि मान्य करता की UPI सर्कल या वैशिष्ट्याचा लाभ घेणे आणि/किंवा वापरणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला PhonePeला तुमच्या PhonePe ॲपमध्ये ॲप्लिकेशन लॉक सुविधा सक्षम करण्याची परवानगी द्यावी लागेल. त्यानुसार, जर हे निष्क्रिय असेल, तर UPI सर्कल वैशिष्ट्य वापरण्यासाठी किंवा वापरणे सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला त्वरित तुमच्या फोन सेटिंगमध्ये PhonePe ला PhonePe ॲप लॉक करण्याची परवानगी द्यावी लागेल. एकदा सक्षम झाल्यानंतर तुमच्या पसंतीचा मोड जसे की फेस आयडी, बायोमेट्रिक्स किंवा ॲप कोड वापरून PhonePe ॲप अनलॉक केले जाऊ शकते.
या विभागामध्ये याच्या विरुद्ध काहीही नमूद केलेले असले तरीही, PhonePe आपल्या स्वेच्छाधिकारात आणि तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही वेळी UPI सर्कल सेवांचा तुमचा ॲक्सेस निलंबित करण्याचा किंवा समाप्त करण्याचा, किंवा तुम्हाला तुमचा PhonePe ॲप पासवर्ड किंवा UPI पिन बदलण्यास सांगू शकते.
वर नमूद केलेल्या गोष्टींशिवाय PhonePe UPIच्या बाबतीत लागू असलेल्या सर्व अटी UPI सर्कलच्या बाबतीतही लागू होतील. या विभागाच्या अटी म्हणजेच UPI सर्कल आणि PhonePe UPI वापरण्याच्या अटी (UPI सर्कल सेक्शन वगळून) यामध्ये कोणताही विरोध झाल्यास या विभागाच्या अटी प्रभावी ठरतील. UPI सर्कल वापरून अधिकृत केलेल्या व्यवहाराशी संबंधित कोणताही विवाद PhonePe UPI साठी लागू असलेल्या प्रक्रियेनुसार हाताळला जाईल.
UPI ऑटो-पे आणि रिझर्व्ह पे
या वैशिष्ट्यांद्वारे युजर त्याच्या बँक खात्यातील भविष्यातील डेबिट आधीच अधिकृत करू शकतो. या वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार माहिती https://www.phonepe.com/terms-conditions/autopay/ येथे उपलब्ध आहे.
सामान्य माहिती: UPI सहभागींच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या
NPCI:
- NPCI ही UPI प्लॅटफॉर्मची मालक असून तिचे संचालन करते.
- NPCIतर्फे UPI संबंधित सहभागींसाठी नियम, नियमन, मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित भूमिका, जबाबदाऱ्या व उत्तरदायित्व निश्चित करण्यात येतात. यामध्ये व्यवहार प्रक्रिया आणि सेटलमेंट, विवाद व्यवस्थापन आणि सेटलमेंटसाठी क्लिअरिंग कट-ऑफचा देखील समावेश आहे.
- NPCI, UPI मध्ये जारीकर्ते, PSP बँक, TPAP, PPI जारीकर्ते आणि इतर सहभागींच्या सहभागाला मान्यता देते.
- NPCI एक सुरक्षित आणि कार्यक्षम UPI सिस्टम आणि नेटवर्क प्रदान करते.
- NPCI, UPI मध्ये सहभागी असलेल्या सदस्यांना ऑनलाइन व्यवहार राउटिंग, प्रक्रिया आणि सेटलमेंट सेवा प्रदान करते.
- NPCI थेट किंवा कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या माध्यमातून UPI सहभागींचे ऑडिट करू शकते आणि UPI मधील त्यांच्या सहभागाबाबत डेटा, माहिती आणि रेकॉर्ड मागू शकते.
- NPCIतर्फे UPI मध्ये सहभागी बँकांना/संस्थांना अशा सिस्टम ॲक्सेस करण्याची सुविधा देण्यात येते जिथून ते रिपोर्ट्स डाउनलोड करू शकतात, चार्ज बॅक आकारू शकतात, UPI व्यवहाराची स्थिती अपडेट करू शकतात इत्यादी.
PSP बँक:
- PSP बँक ही UPIची एक सदस्य आहे आणि UPI पेमेंट सुविधा वापरण्यासाठी UPI शी जोडलेली असते आणि TPAP ला हीच सुविधा प्रदान करते, ज्यामुळे एंड युजर/ग्राहक/व्यापारी UPI पेमेंट करण्यास व प्राप्त करण्यास सक्षम होतात.
- PSP बँक स्वतःच्या ॲपद्वारे किंवा TPAP च्या ॲपद्वारे एंड युजर/ग्राहकांना UPIवर ऑनबोर्ड आणि नोंदणीकृत करते आणि त्यांच्या बँक खात्यांना त्यांच्या संबंधित UPI क्रमांकाशी लिंक करते.
- PSP बँक स्वतःच्या ॲपद्वारे किंवा TPAPच्या ॲपद्वारे अशा एंड युजरची नोंदणी करताना त्या एंड युजरचे अधिप्रमाणन करण्यास जबाबदार असते.
- PSP बँक एंड युजर/ग्राहकांसाठी TPAP चे UPI ॲप उपलब्ध करून देण्यासाठी TPAPची नियुक्ती आणि ऑनबोर्डिंग करते.
- TPAP आणि त्याची सिस्टीम UPI मध्ये काम करण्यासाठी पुरेशी सुरक्षित आहे, हे PSP बँकेला हे सुनिश्चित करावे लागेल.
- एंड युजर/ग्राहकाचा डेटा आणि माहितीची सुरक्षा व अखंडता राखण्यासाठी (ज्यामध्ये UPI व्यवहार डेटा आणि ॲपच्या सुरक्षेचा समावेश आहे) TPAPचे UPI ॲप आणि सिस्टीम ऑडिट केली जाईल हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी PSP बँकेची आहे.
- UPI व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशाने संकलित केलेल्या UPI व्यवहार डेटासह सर्व पेमेंट डेटा PSP बँकेला केवळ भारतातच स्टोअर करावा लागेल.
- ग्राहकाच्या UPI नंबरशी लिंक करण्यासाठी UPI मध्ये उपलब्ध बँका/खाते/इन्स्ट्रुमेंट्सच्या यादीतून कोणतेही बँक खाते निवडण्याची संधी सर्व ग्राहकांना देण्याची जबाबदारी PSP बँकेची आहे.
- एंड युजर/ग्राहकांनी उपस्थित केलेल्या तक्रारी आणि विवादांचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याची जबाबदारी PSP बँकेची आहे.
PhonePe (TPAP):
- PhonePe एक सेवा प्रदाता आहे आणि ते TPAP म्हणून PSP बँकेच्या माध्यमातून UPI मध्ये सहभागी होते.
- UPI मध्ये TPAP च्या सहभागाबाबत PSP बँक आणि NPCI द्वारे निर्धारित सर्व आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारी PhonePe ची आहे.
- PhonePeची सिस्टीम UPI मध्ये काम करण्यासाठी पुरेशी सुरक्षित आहे हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी PhonePe ची आहे.
- UPI आणि UPI मध्ये PhonePe च्या सहभागाबाबत कोणत्याही वैधानिक किंवा नियामक प्राधिकरणाद्वारे निर्धारित सर्व लागू कायदे, ज्यामध्ये NPCI द्वारे जारी केलेली सर्व परिपत्रके आणि मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे, त्यांचे पालन करण्याची जबाबदारी PhonePe ची आहे.
- UPI व्यवहार सुलभ करण्याच्या उद्देशाने संकलित केलेला UPI व्यवहार डेटासह सर्व पेमेंट डेटा PhonePeला केवळ भारतातच स्टोअर करावा लागेल.
- RBI, NPCI आणि RBI/NPCI द्वारे नियुक्त इतर संस्थांना PhonePe च्या UPI संबंधित डेटा, माहिती, सिस्टीम ॲक्सेस करण्याची आणि आवश्यकतेनुसार PhonePe चे ऑडिट करण्याची सुविधा प्रदान करण्यास PhonePe बांधील आहे.
- PhonePe ॲप किंवा वेबसाइट आणि PhonePeला योग्य वाटणारी इतर माध्यमे जसे की ईमेल, मेसेजिंग प्लॅटफॉर्म, IVR इत्यादींद्वारे उपलब्ध असलेल्या PhonePeच्या तक्रार निवारण सुविधेच्या मदतीने PhonePe एंड युजर/ग्राहकांना तक्रारी मांडण्याची सुविधा प्रदान करेल.
शुल्क
PhonePeकडून अकाउंट तयार करण्यासाठी PhonePe त्याच्या युजरकडून कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही; तथापि लागू कायद्याच्या अधीन राहून वेळोवेळी शुल्काबाबतचे धोरण बदलण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आम्ही कोणत्याही नवीन सेवेसाठी शुल्क (लागू करासह) सुरू करू शकतो किंवा विद्यमान सेवेसाठी शुल्क सुधारित/सुरू करू शकतो. शुल्कातील बदल तुम्हाला PhonePe ॲप/वेबसाइट/PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे दाखवले जातील आणि असे बदल पोस्ट केल्यावर आपोआप प्रभावी होतील. अन्य कोणताही उल्लेख नसल्यास आणि UPI इंटरनॅशनल वगळता सर्व शुल्क भारतीय रुपयांत असतील. काही विशिष्ट UPI व्यवहारांसाठी तुमचा जारीकर्ता नाममात्र व्यवहार शुल्क आकारू शकतो – कृपया अशा कोणत्याही शुल्कांसाठी तुमच्या जारीकर्त्याशी संपर्क साधा.
व्यवहारावर लक्ष ठेवणे
जोखमयुक्त व्यवहार ओळखण्यासाठी PhonePe तुमच्या ॲक्टिव्हिटीचे आणि व्यवहारांचे पुनरावलोकन करू शकते. या प्रयत्नात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तिसऱ्या पक्ष प्रदात्यांची नियुक्ती करू शकतो. तुमच्याद्वारे प्रक्रिया केलेला कोणताही व्यवहार संशयास्पद किंवा नेहमीपेक्षा वेगळा असल्यास किंवा आम्हाला संशयास्पद किंवा नेहमीपेक्षा वेगळी दुसरी कोणतीही ॲक्टिव्हिटी आढळल्यास आम्ही PhonePe UPI/PhonePe ॲपवर तुमचा ॲक्सेस तात्पुरता किंवा कायमस्वरूपी निलंबित करू शकतो किंवा आम्हाला योग्य वाटणारी दुसरी कोणतीही कारवाई करू शकतो.
तुमचा व्यवहार खालील कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो, ज्यामध्ये एवढ्यापुरतेच मर्यादित नसून जोखीम व्यवस्थापन, फसवणुकीची शंका, बेकायदेशीर व्यवहार, प्रतिबंधित वस्तूंची खरेदी किंवा विक्री, तडजोड झालेली किंवा ब्लॅकलिस्ट केलेली कार्डे, UPI किंवा बँक खाती यांचा वापर, चार्जबॅक किंवा तक्रारी, किंवा लागू कायद्यांनुसार निर्धारित इतर कोणतीही कारणे यांचा समावेश होतो, तसेच आम्ही किंवा जारीकर्ता किंवा NPCI किंवा RBI यांना योग्य वाटेल अशा इतर कोणत्याही कारणांमुळेही तुमचा व्यवहार नाकारला जाऊ शकतो. या शिवाय आम्ही पुढील तपास करू शकतो आणि तुमचे PhonePe खाते निलंबित किंवा समाप्त करू शकतो किंवा आम्हाला योग्य वाटेल अशी कोणतीही अन्य कारवाई करू शकतो. तसेच, लागू कायद्यांनुसार किंवा कायद्याने सूचित केल्याप्रमाणे, संबंधित प्राधिकरणांना, यामध्ये कायदा अंमलबजावणी संस्था किंवा इतर नियामक प्राधिकरणांचा समावेश असून तो एवढ्यापुरता मर्यादित नाही, त्या व्यवहाराची तसेच तुमच्या तपशीलांची माहिती देऊ शकतो.
तक्रार निवारण
स्पॉन्सर PSP बँक आणि NPCIसोबत PhonePeचा त्रिपक्षीय करार आहे आणि आम्ही PhonePe ॲपद्वारे ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यास आणि सोडवण्यास मदत करण्यास बांधील आहोत.
आमच्याद्वारे ऑनबोर्ड केलेल्या ग्राहकांसाठी सर्व UPI संबंधित तक्रारींच्या बाबतीत आम्हीच प्रथम संपर्काचे ठिकाण असू. जर आम्ही तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकलो नाही, तर तक्रारीची पुढची पायरी PSP बँक असेल, त्यानंतर तुमचा जारीकर्ता (जिथे तुमचे बँक खाते आहे) आणि त्यानंतर NPCI (या क्रमानुसार). हे पर्याय वापरल्यानंतरही जर तुमच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर तुम्ही बँकिंग लोकायुक्त आणि/किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन लोकायुक्तांकडे (परिस्थितीनुसार) दाद मागू शकता.
वरील तक्रार निवारण यंत्रणेसाठी कृपया खालील संपर्क तपशील पहा :
a) तक्रार निवारण यंत्रणा:
- PhonePe ॲपमध्ये तुम्ही संबंधित UPI व्यवहार निवडू शकता आणि त्याबद्दल तक्रार मांडू शकता
- UPI व्यवहार PhonePe ॲपद्वारे केला गेला असेल, तर तुम्ही सर्व UPI संबंधित तक्रारी PhonePe कडे करू शकता.
- एकदा PhonePe ॲपवर तक्रार केल्यावर तुम्ही ॲपमध्येच तुमच्या तक्रारीची स्थिती तपासू शकता, किंवा PhonePe तुमच्यासाठी उपलब्ध दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून कळवू शकते. जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही TPAP ॲपद्वारे UPI व्यवहार केला असेल, तर कृपया त्या TPAP ॲपद्वारे तक्रार करा.
b) PSP बँकेकडे तक्रार कळवा :
- जर तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर तक्रार करण्याची पुढची पायरी संबंधित PSP बँक असेल. खाली दिलेल्या संपर्क तपशीलांवर तुम्ही PSP बँकेशी संपर्क साधू शकता:
- Yes बँक लिमिटेड : https://www.yesbank.in/contact-us
- Axis बँक लिमिटेड : https://www.axisbank.com/contact-us
- ICICI बँक लिमिटेड : https://www.icicibank.com/complaints/complaints.page
c) तुमच्या जारीकर्त्याकडे तक्रार करा :
- जर PSP बँक देखील तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकली नाही, तर निराकरणासाठी तुम्ही तुमच्या जारीकर्त्याशी (जिथे तुमचे बँक खाते/पेमेंट खाते आहे) संपर्क साधू शकता. तुम्हाला तुमच्या बँकेच्या संबंधित वेबसाइट/ॲपवर त्यांचे संपर्क तपशील मिळतील.
d) NPCI कडे तक्रार कळवा:
- जर तुमचा जारीकर्त्या देखील तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकला नाही, तर तुम्ही NPCI शी संपर्क साधू शकता. NPCI चे संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत :
e) लोकायुक्त चॅनेलवर तक्रार कळवा:
हे पर्याय वापरल्यानंतर जर 30 दिवसांच्या आत मागील टप्प्यांवर तक्रारीचे समाधानकारक निराकरण झाले नाही, तर ग्राहक खालील पत्त्यावर RBI ओम्बड्समनशी संपर्क साधू शकतात:
- लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचे पोर्टल : https://cms.rbi.org.in/
- टोल-फ्री नंबर : 14448
- ईमेल आयडी : [email protected]
- पत्ता – केंद्रीकृत प्राप्ती व प्रक्रिया केंद्र, भारतीय रिझर्व्ह बँक, चौथा मजला, सेक्टर 17, चंदीगड – 160017
भारतीय रिझर्व्ह बँक – एकात्मिक लोकपाल योजना, 2021 संदर्भातील अधिक माहितीसाठी, योजनेची प्रत तसेच योजनेची ठळक वैशिष्ट्ये पाहण्यासाठी RBI एकात्मिक लोकायुक्त योजना आणि ठळक वैशिष्ट्ये पाहा.
नुकसानभरपाई आणि जबाबदारी
कोणत्याही परिस्थितीत PhonePe कोणत्याही अप्रत्यक्ष, परिणामी, अनुषंगिक, विशेष किंवा दंडात्मक स्वरूपाच्या हानी किंवा जबाबदारीस (कायदेशीर जबाबदारीसह) उत्तरदायी असणार नाही. यामध्ये, एवढ्यापुरतेच मर्यादित नसून, नफ्याची किंवा उत्पन्नाची हानी, व्यवसायात खंड पडणे, व्यवसायाच्या संधी गमावणे, डेटाची हानी किंवा इतर कोणत्याही आर्थिक हितसंबंधांची हानी यांचा समावेश होतो, मग ती करारातून, निष्काळजीपणातून, अपकृत्यातून किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे उद्भवलेली असो, आणि ती PhonePe UPI, PhonePe सेवा, PhonePe प्लॅटफॉर्म आणि किंवा PhonePe ॲपच्या वापरातून किंवा वापर करण्यात असमर्थतेमुळे उद्भवलेली असो. कोणत्याही परिस्थितीत, उद्भवणारी जबाबदारी असल्यास ती संबंधित कारण निर्माण करणाऱ्या वैध व्यवहाराच्या रकमेपेक्षा किंवा शंभर रुपये (रु.100) यांपैकी जी कमी असेल, त्यापेक्षा अधिक असणार नाही.
PhonePe UPI/PhonePe प्लॅटफॉर्म/PhonePe ॲप/PhonePe सेवा तुमचा वापर यातून किंवा तुमच्याद्वारे या UPI ToU, गोपनीयता धोरण (Privacy Policy), सामान्य अटी (Terms) आणि इतर धोरणांच्या उल्लंघनातून किंवा तुमच्याद्वारे कोणत्याही लागू कायद्याचे किंवा कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या अधिकाराचे (बौद्धिक संपदा अधिकारांच्या उल्लंघनासह) उल्लंघन केल्यामुळे कोणत्याही तिसऱ्या पक्षाद्वारे उपस्थित केलेला कोणताही दावा, मागणी किंवा कारवाई (ज्यामध्ये वकीलांची वाजवी फी समाविष्ट आहे) किंवा आकारलेल्या दंडाविरुद्ध तुम्ही PhonePe, PhonePe संस्था, त्याचे मालक, परवानाधारक आणि त्यांचे संबंधित अधिकारी, संचालक, प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई द्याल आणि सुरक्षित ठेवाल.
समाप्ती आणि इतर व्यवस्था
तुम्ही मान्य करता की PhonePe त्याच्या स्वतःच्या निर्णयानुसार कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तुमचे PhonePe खाते बंद किंवा निलंबित करू शकते, आणि/किंवा PhonePe ॲप/PhonePe प्लॅटफॉर्म/PhonePe सेवा किंवा त्याच्या कोणत्याही भागात किंवा PhonePe UPIच्या कोणत्याही भागात तुमचा ॲक्सेस मर्यादित किंवा प्रतिबंधित करू शकते किंवा आम्हाला योग्य वाटणारी दुसरी कोणतीही कारवाई करू शकते, जर आम्ही असे ठरवले की तुम्ही कोणत्याही लागू कायद्याचे उल्लंघन केले आहे किंवा कोणत्याही UPI ToU/सामान्य अटी किंवा PhonePe ॲपमध्ये तुम्हाला लागू असलेल्या इतर कोणत्याही अटींचा भंग केला आहे किंवा जर आम्हाला कोणत्याही नियामक/सरकारी किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने तसे करण्याचे निर्देश दिले असतील किंवा PhonePe ला इतर कोणत्याही कारणास्तव जे योग्य वाटेल त्या कारणास्तव.
तुम्ही पुढे संमती देता की तुमच्या कोणत्याही कृतीमुळे किंवा त्रुटीमुळे PhonePe चे नुकसान (केवळ आर्थिक नुकसानापर्यंत मर्यादित नाही) झाल्यास आम्ही अशा परिस्थितीत आवश्यक मनाई सवलत घेऊ शकतो.
तुमची सर्व माहिती किंवा डेटा गोपनीयता धोरणातील अटी तसेच लागू कायद्यांनुसार हाताळण्यात येईल. तसेच, तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक, VPA, तसेच व्यवहारासंबंधी किंवा इतर कोणतीही माहिती, जी आम्हाला लागू कायद्यांनुसार किंवा NPCI कडून वेळोवेळी सूचित केल्यानुसार किंवा आमच्या धोरणांनुसार ठरविण्यात आलेल्या कालावधीसाठी जतन करणे आवश्यक आहे, ती PhonePe सोबतचा तुमचा करार समाप्त झाल्यानंतरही PhonePe कडून जतन करण्यात येऊ शकते.
नियामक कायदा आणि न्यायक्षेत्र
ही UPI ToU तसेच त्याअंतर्गत येणारे हक्क व कर्तव्ये, पक्षकारांमधील परस्परसंबंध आणि या UPI ToU अंतर्गत किंवा त्यासंदर्भात उद्भवणाऱ्या सर्व बाबी, यामध्ये त्याची मांडणी, वैधता, अंमलबजावणी किंवा समाप्ती यांचा समावेश असून तो एवढ्यापुरता मर्यादित नाही, हे सर्व भारत प्रजासत्ताकाच्या कायद्यांनुसार नियंत्रित व स्पष्ट करण्यात येतील. या UPI ToUशी संबंधित सर्व बाबींवर कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील न्यायालयांच्या अखत्यारीत असेल.
अस्वीकृती
तुम्ही समजता की PhonePe ॲप डाउनलोड करणे किंवा वापरल्यामुळे तुम्हाला स्वयंचलितपणे PhonePe UPIसाठी पात्र होत नाही.
UPI, PhonePe UPI तसेच PhonePe प्लॅटफॉर्मची गुणवत्ता व उपलब्धता याबाबत आम्ही कोणतेही स्पष्ट किंवा सूचित प्रतिपादन किंवा हमी देत नाही. यामध्ये व्यापारी वापरयोग्यता, विशिष्ट उद्देशासाठी योग्यता किंवा तृतीय पक्षाच्या बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन न होणे यासंबंधीच्या कोणत्याही हमीचा समावेश असून तो एवढ्यापुरता मर्यादित नाही. PhonePe UPI ही सेवा “जशी आहे”, “जशी उपलब्ध आहे” आणि सर्व त्रुटींसह प्रदान करण्यात येते.
PhonePe केवळ व्यवहाराचा एक सहाय्यक आहे आणि व्यवहाराचा कोणताही पक्ष नाही. आम्ही निर्धारित प्रक्रियेनुसार व्यवहार पूर्ण करण्याचा आणि त्याची प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करतो, तथापि, PhonePe, UPI आणि PhonePe UPI संबंधित सर्व जबाबदाऱ्या नाकारते, ज्यामध्ये मर्यादेशिवाय व्यवहार अपयशी ठरणे, UPI किंवा PhonePe UPI किंवा PhonePe प्लॅटफॉर्मची अनुपलब्धता, कोणताही प्रतिसाद न मिळणे, विलंब, सिस्टमचे अपयश आणि/किंवा व्यवहाराच्या वैधतेतून उद्भवलेल्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे; PhonePe कोणत्याही त्रुटी, अपयश, व्यत्यय किंवा UPI, PhonePe UPI, PhonePe प्लॅटफॉर्म, PhonePe सेवा, व्यवहार इत्यादींच्या अनुपलब्धतेसाठी देखील जबाबदार असणार नाही. कोणत्याही व्यवहारातून उद्भवलेल्या कोणत्याही समस्येसाठी कृपया तुमच्या जारीकर्त्याशी संपर्क साधा. सर्व व्यवहार केवळ रक्कम घेणारा आणि रक्कम देणारा यांच्या दरम्यान मर्यादित आहेत, ज्यामध्ये PhonePeची कोणतीही जबाबदारी असणार नाही.
आमच्याकडे जतन करण्यात आलेल्या तुमच्या व्यवहार नोंदी आणि इतर लॉग्स हे व्यवहाराचा तसेच UPI/ PhonePe UPI च्या तुमच्या वापराचा अंतिम व बंधनकारक पुरावा म्हणून मान्य केले जातील.