PhonePe | Logo
Company
  • About Us
  • Careers
  • Press
  • Blog
Our Solutions
For Businesses
For Consumers

Offline Merchant Solutions

menu
Offline Payments
menu
Offline Partner Program
See All →

Online Merchant Solutions

menu
Payment Gateway
menu
Payment Gateway Partner
menu
Payment Aggregator
menu
Payment Links
See All →

More Solutions

menu
Merchant Lending
menu
PhonePe Ads
menu
PhonePe Appstore
See All →

Consumer Payments

menu
All Payment Instruments
menu
PhonePe Wallet
menu
NRI Payments by PhonePe

Co-Branded Credit Cards

menu
PhonePe SBI Card
Credit Cards
menu
Wish Credit Card
menu
PhonePe HDFC Bank
Credit Cards

More Solutions

menu
PhonePe Invest
menu
PhonePe Appstore
menu
Mutual Funds
menu
Gold
menu
Silver
menu
Insurance
menu
Travel & Commute

Lending

menu
Consumer Lending
menu
Secured Lending
Investor Relations
Contact Us
Trust & Safety
PhonePe | Hamburger Menu
✕
Home
Company
  • About Us
  • Careers
  • Press
  • Blog
Our Solutions
For Businessesarrow
Offline Merchant Solutionsarrow
icon
Offline Payments
icon
Offline Partner Program
Online Merchant Solutionsarrow
icon
Payment Gateway
icon
Payment Gateway Partner
icon
Payment Aggregator
icon
Payment Links
More Solutionsarrow
icon
Merchant Lending
icon
PhonePe Ads
icon
PhonePe Appstore
See All
For Consumersarrow
Consumer Paymentsarrow
icon
All Payment Instruments
icon
PhonePe Wallet
icon
NRI Payments by PhonePe
Co-Branded Credit Cardsarrow
icon
PhonePe SBI Card
Credit Cards
icon
Wish Credit Card
icon
PhonePe HDFC Bank
Credit Cards
More Solutionsarrow
icon
PhonePe Invest
icon
PhonePe Appstore
icon
Mutual Funds
icon
Gold
icon
Silver
icon
Insurance
icon
Travel & Commute
Lendingarrow
icon
Consumer Lending
icon
Secured Lending
Investor Relations
Contact Us
Trust & Safety
Privacy Policy

नॅशनल पेन्शन स्कीम – अटी आणि शर्ती 

Englishગુજરાતીதமிழ்తెలుగుमराठीമലയാളംঅসমীয়াಕನ್ನಡ
< Back

या नॅशनल पेन्शन स्कीमच्या अटी आणि शर्ती (“NPS अटी आणि शर्ती”) म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्यातील वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 आणि त्यातील वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांमधील नियम 3 नुसार प्रकाशित करण्यात आलेला, संगणकाद्वारे तयार केलेला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. त्यावर प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नाही.

या दस्तऐवजातील  सर्व संज्ञांचे अर्थ खालील विभाग B (व्याख्या) मध्ये दिल्याप्रमाणे असतील.

A. प्रस्तावना

  1. या NPS अटी आणि शर्ती PhonePe प्लॅटफॉर्मवर PhonePe लिमिटेड (पूर्वी ‘PhonePe प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ओळखली जाणारी) (“PhonePe”) यांच्याकडून प्रदान करण्यात येणाऱ्या सेवांचा तुम्हाला मिळणारा ॲक्सेस आणि त्या सेवांचा तुम्ही करत असलेला वापर यांना लागू आहेत.
  1. NPS सेवांचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी या NPS अटी आणि शर्तींमधील प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचा. कारण, यामध्ये तुमचे कायदेशीर अधिकार, उपलब्ध कायदेशीर उपाय आणि जबाबदाऱ्या यांसंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. या अटी आणि शर्ती म्हणजे तुम्ही (“तुम्ही”) आणि PhonePe यांच्यातील कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करार आहे.
  1. पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) उपलब्ध करून दिलेल्या NPS नोंदणी प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मवरील NPS सेवांचा ॲक्सेस घेतल्यास, त्यामधील विविध विभाग पाहिल्यास किंवा या सेवांचा वापर सुरू केल्यास, तुम्ही या NPS अटी आणि शर्तींचे पालन करण्यास सहमती देता. त्याचबरोबर PFRDA आणि/किंवा NPSमधील कोणत्याही सहभागी संस्थेने वेळोवेळी निर्धारित केलेले लागू नियमही तुम्हाला बंधनकारक असतील.
  1. NPS सेवांचा लाभ घेण्यासाठी PhonePe प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस घेतल्यास किंवा NPS सेवांचा लाभ घेण्यासाठी PhonePe प्लॅटफॉर्मवर तुमची माहिती नोंदवल्यास, तुम्ही या NPS अटी आणि शर्तींसोबतच PhonePeच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती (“सर्वसाधारण अटी आणि शर्ती”) यांचेही पालन करण्यास सहमती देता. या NPS अटी आणि शर्ती आणि सर्वसाधारण अटी आणि शर्ती यांमध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास, त्या विसंगतीच्या मर्यादेपर्यंत आणि केवळ या दस्तऐवजात समाविष्ट असलेल्या सेवांच्या संदर्भात या NPS अटी आणि शर्ती लागू राहतील.
  1. PhonePe प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही याद्वारे PhonePeच्या गोपनीयता धोरणात नमूद केल्यानुसार तुमच्या माहितीचा वापर करण्यास संमती देता. तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस घेता, तेव्हा PhonePe तुमच्या वैयक्तिक माहितीची हाताळणी कशा प्रकारे करते, हे या गोपनीयता धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

B. व्याख्या

  1. “API” म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस;
  2. “API गेटवे” म्हणजे NBSLच्या मालकीची आणि NBSLकडून चालवली जाणारी तांत्रिक पायाभूत सुविधा किंवा माहितीच्या प्रसारणाचा आणि विविध सिस्टिम्स एकमेकांशी जोडण्याचा स्तर. NPSमधील सहभागी संस्थांदरम्यान प्रमाणित API-आधारित जोडण्यांच्या माध्यमातून डेटाची सुरक्षित देवाणघेवाण करणे आणि मुख्यतः विनंत्या व प्रतिसादांच्या स्वरूपातील माहिती योग्य ठिकाणी पाठवणे सुलभ करण्यासाठी या सुविधेचा वापर करण्यात येतो;
  3. “NBSL” म्हणजे NPCI BHIM Services Limited
  4. “NPS” म्हणजे PFRDA कायद्यांतर्गत व्याख्या करण्यात आलेली नॅशनल पेन्शन सिस्टिम;
  5. “NPSमधील सहभागी संस्था” म्हणजे पेन्शन एजंट म्हणून PhonePe, PoP आणि API गेटवे;
  6. “NPS सेवा” म्हणजे PFRDAने परवानगी दिल्यानुसार PhonePeकडून प्रदान करण्यात येणाऱ्या NPS नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यासंबंधीच्या सेवा;
  7. “पेन्शन एजंट” म्हणजे PFRDAकडून वेळोवेळी निर्धारित करण्यात आलेली आणि PoPकडून कराराच्या आधारे नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती. NPSसाठी सदस्यांची नोंदणी सुलभ करण्यासह NPSचे वितरण सुलभ करण्याचे काम ही व्यक्ती करते;
  8. “PFRDA” म्हणजे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण; 
  9. “PFRDA कायदा” म्हणजे पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा, 2013 आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा;
  10. “PhonePe प्लॅटफॉर्म” म्हणजे PhonePe आणि/किंवा तिच्या संलग्न कंपन्यांनी विकसित केलेले, त्यांच्या मालकीचे आणि/किंवा त्यांच्याकडून चालवले जाणारे सॉफ्टवेअर/सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन/प्लॅटफॉर्म/वेबसाइट;
  11. “पॉइंट ऑफ प्रेझेन्स” / “PoP” म्हणजे PFRDA कायद्यांतर्गत पॉइंट ऑफ प्रेझेन्स म्हणून PFRDAकडे नोंदणीकृत असलेली मध्यस्थ संस्था. या संस्थेकडे CRAशी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संपर्क साधण्याची सुविधा असते. या सुविधेचा वापर इतर बाबींबरोबरच निधी आणि सूचना प्राप्त करणे व पाठवणे तसेच सदस्यांना निधीचे पेमेंट करणे यांसाठी करण्यात येतो. या NPS अटी आणि शर्तींच्या उद्देशासाठी PoPमध्ये Axis बँक लिमिटेड, HDFC बँक लिमिटेड, ICICI बँक लिमिटेड आणि State Bank of India यांचा समावेश असेल;

C. अटी आणि शर्ती

  1. NPS सेवांचा ॲक्सेस घेण्याचा पर्याय निवडून तुम्ही समजता आणि सहमती देता की, लागू कायद्यांनुसार NPSचे नियमन PFRDAकडून करण्यात येते. तसेच PhonePe ही PFRDAच्या नियमांनुसार मध्यस्थ संस्था, पेन्शन वितरक किंवा नियमनाच्या अधीन असलेली संस्था नाही. PhonePe केवळ PFRDAच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित PoPच्या अंतर्गत पेन्शन एजंट म्हणून काम करते. PFRDAने परवानगी दिलेल्या नोंदणीसंबंधी सेवा सुलभ करण्यापुरतीच PhonePeची भूमिका मर्यादित आहे.
  1. तुम्ही समजता, मान्य करता आणि सहमती देता की, PhonePe ही PFRDAच्या नियमांनुसार संबंधित PoPच्या अधिकाराखाली आणि देखरेखीखाली तसेच संबंधित PoPच्या निर्देशांनुसार आणि परवानगीनेच काम करते. NPSमधील इतर सहभागी संस्थांदरम्यान होणाऱ्या व्यवहारांवर PhonePeचे कोणतेही नियंत्रण नसते. तसेच या व्यवहारांची पूर्तता, कायदेशीर वैधता किंवा ते पूर्ण होणे यांसाठी PhonePe जबाबदार नसते. PhonePeची भूमिका सदस्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा प्रदान करणे, सदस्यांची माहिती संकलित करून ती PoPकडे पाठवणे आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान सदस्यांना थेट वापरता येणाऱ्या इंटरफेसच्या माध्यमातून मदत करणे यापुरतीच मर्यादित आहे.
  1. NPSअंतर्गत सदस्यांची नोंदणी, ग्राहकांची यथायोग्य तपासणी आणि सदस्यांना सेवा प्रदान करण्याची जबाबदारी असलेली PoP ही प्रमुख नियमनाधीन मध्यस्थ संस्था आहे. NPSसाठी आलेला कोणताही अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय PhonePe स्वतःच्या विवेकाधिकाराने घेत नाही. PhonePe ग्राहकांची ओळख पटवणे, KYC नियमांचे पालन करणे, ग्राहकांची यथायोग्य तपासणी करणे, जोखमीचे मूल्यांकन करणे, PRAN तयार करणे, निधी हाताळणे किंवा व्यवहारांचे सेटलमेंट करणे ही कामे करत नाही.
  1. PhonePeतर्फे API गेटवेच्या माध्यमातून NPSमधील सहभागी संस्थांच्या सहकार्याने NPS सेवा प्रदान करण्यात येतात. तुम्ही समजता, मान्य करता आणि सहमती देता की, PhonePeकडून प्रदान करण्यात येणाऱ्या NPS सेवांमध्ये NPSमधील सहभागी संस्थांच्या अनेक बाह्य सिस्टिम्सशी जोडणी करण्यात आलेली असते. त्यामुळे PhonePeच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या अशा बाह्य सिस्टिम्स किंवा तांत्रिक पायाभूत सुविधांमधील तांत्रिक किंवा कार्यपद्धतीशी संबंधित समस्यांमुळे कोणताही विलंब झाल्यास, सेवा अयशस्वी झाल्यास, सेवेत व्यत्यय आल्यास किंवा नोंदणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण न झाल्यास त्यासाठी PhonePe जबाबदार असणार नाही.
  1. NPSशी संबंधित कोणत्याही सेवेची पूर्तता करण्याची जबाबदारी PhonePeची असणार नाही. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. मात्र, ही यादी केवळ या बाबींपुरती मर्यादित नाही : (a) API गेटवेची उपलब्धता आणि/किंवा कार्यक्षमता; (b) संबंधित PoPकडून प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही माहितीची अचूकता आणि/किंवा पूर्णता; (c) PRAN यशस्वीरीत्या तयार होणे आणि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणे;  (d) PhonePeकडून सुलभ करण्यात येणाऱ्या नोंदणीसंबंधी सेवांव्यतिरिक्त NPSशी संबंधित इतर कोणत्याही ग्राहक सपोर्ट सेवा;  (e) संबंधित कोणत्याही PoPकडून कोणत्याही कारणास्तव किंवा कोणतेही कारण नसताना कोणतीही सेवा रद्द करण्यात येणे.
  1. NPS नोंदणी प्रक्रियेत ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय ॲक्सेस करता यावा, यासाठी PhonePeची भूमिका केवळ तांत्रिक सुविधा प्रदान करणारी संस्था आणि ग्राहकांना थेट वापरता येणारा इंटरफेस उपलब्ध करून देणारी संस्था इतकीच आहे. PhonePe पॉइंट ऑफ प्रेझेन्स, केंद्रीय नोंद व्यवस्थापन संस्था किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत नाही.
  1. PhonePe प्लॅटफॉर्मवरील NPS सेवांचा वापर करण्यासाठी तुम्ही पुढील बाबींची खात्री देता आणि हमी देता :
  1. तुम्ही भारतात वास्तव्यास असलेली व्यक्ती आहात;
  2. खाते सुरू करताना तुमचे वय 18 ते 85 वर्षांच्या दरम्यान आहे;
  3. NPSमध्ये सहभागी असलेल्या बँक-PoPमध्ये तुमचे KYCच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करणारे बचत खाते आहे; आणि
  4. भारतीय संविदा अधिनियम, 1872 अंतर्गत कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करार करण्यास तुम्ही पात्र आहात.
  1. PhonePe प्लॅटफॉर्मवर NPS नोंदणीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवून तुम्ही PhonePeला तुमचा मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान दिलेली इतर माहिती API गेटवेच्या माध्यमातून संबंधित PoPकडे सुरक्षितपणे पाठवण्यास संमती देता. संबंधित PoPच्या कोअर बँकिंग सिस्टिममधून (“CBS”) पात्र असलेली आणि बँकेकडून KYC पडताळणी पूर्ण झालेली खाती शोधण्यासाठी ही माहिती पाठवण्यात येते.
  1. PhonePe प्लॅटफॉर्मवर NPSसंबंधी उपलब्ध असलेली माहिती संबंधित PoPकडून प्रदान करण्यात येते आणि PhonePe ही माहिती केवळ ‘जशी आहे तशी’ दाखवते. संबंधित PoPकडून वेळोवेळी प्रदान करण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे PhonePe प्लॅटफॉर्मवरील NPSसंबंधी कोणत्याही माहितीत PhonePe तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करू शकते. PhonePe प्लॅटफॉर्मवर NPSसंबंधी उपलब्ध असलेल्या कोणत्याही माहितीवर अवलंबून राहण्याचा पर्याय निवडून तुम्ही समजता, सहमती देता आणि मान्य करता की, अशा माहितीवर अवलंबून राहिल्यामुळे PhonePeविरुद्ध तुम्हाला उपलब्ध असलेले सर्व दावे, कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आणि/किंवा कायद्यांतर्गत किंवा अन्य प्रकारे उपलब्ध असलेले उपाय तुम्ही स्पष्टपणे सोडून देता. NPSसंबंधी कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता किंवा वापरण्यायोग्यता यांमुळे किंवा त्यांच्याशी संबंधित कोणतेही परिणाम उद्भवल्यास PhonePe त्याबाबतची कोणतीही जबाबदारी स्पष्टपणे नाकारते आणि अशा परिणामांसाठी कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही. वरील तरतुदी काहीही असल्या तरी, PhonePe प्लॅटफॉर्मवर मागील काळातील कामगिरीसंदर्भात दाखवण्यात येणारी कोणतीही माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने उपलब्ध करून दिलेली असते आणि ती आर्थिक, गुंतवणुकीसंबंधी किंवा कायदेशीर सल्ला मानण्यात येणार नाही.
  1. तुम्ही समजता, मान्य करता आणि सहमती देता की, PRAN तयार करणे तसेच नोंदणी शुल्क, सुरुवातीचे योगदान आणि/किंवा त्यानंतरचे योगदान भरणे हे तुमच्या आणि संबंधित PoP यांच्यातील स्वतंत्र व्यवहार आहेत. PRAN तयार करणे आणि NPS सेवांशी संबंधित इतर कोणत्याही प्रक्रियांसाठी PhonePe जबाबदार नाही. नोंदणी शुल्क आणि सुरुवातीचे योगदान म्हणून भरलेली कोणतीही रक्कम थेट संबंधित PoPच्या निर्धारित खात्यात पाठवण्यात येते. PhonePe कोणत्याही टप्प्यावर तुमचा निधी स्वतःकडे ठेवत नाही किंवा त्या निधीच्या क्लिअरिंग किंवा सेटलमेंटची प्रक्रिया करत नाही.
  1. PRAN तयार करणे, खात्याची देखभाल, KYC पडताळणी, निधीचे व्यवस्थापन किंवा योजनेची कामगिरी यांसंबंधीच्या तक्रारी PFRDAच्या नियमांनुसार कायद्याने निर्धारित केलेल्या NPS तक्रार निवारण यंत्रणेकडे किंवा थेट संबंधित PoP आणि/किंवा CRAकडे नोंदवणे आवश्यक आहे. NPS सेवांचा लाभ घेताना PhonePe प्लॅटफॉर्मच्या युजर इंटरफेसशी संबंधित कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवल्यास तुम्ही PhonePeच्या ग्राहक सपोर्टशी संपर्क साधू शकता.
  1. लागू कायद्यानुसार परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत, NPS सेवा, त्यासंबंधीचे अपडेट्स, माहिती/प्रमोशनल ईमेल्स आणि/किंवा प्रॉडक्टसंबंधी घोषणा यांविषयी PhonePe किंवा तिचे थर्ड-पार्टी व्हेंडर्स/व्यावसायिक भागीदार/मार्केटिंगशी संबंधित संलग्न कंपन्यांकडून ईमेल, टेलिफोन आणि/किंवा SMSच्या माध्यमातून संदेश प्राप्त करण्यास तुम्ही सहमती देता. लागू कायद्यानुसार परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत, तुम्ही दिलेला मोबाइल नंबर दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (“TRAI”) तयार केलेल्या नियम आणि नियमनांसह लागू कायद्यांतर्गत डू नॉट डिस्टर्ब (“DND”) / नॅशनल कस्टमर प्रेफरन्स रजिस्टर (“NCPR”) यादीमध्ये नोंदणीकृत असला तरीही, त्या मोबाइल नंबरवर सर्व संदेश प्राप्त करण्यास तुम्ही सहमती आणि संमती देता. या उद्देशासाठी तुम्ही PhonePeला तुमची माहिती तिच्या समूह कंपन्या, PhonePeचे थर्ड-पार्टी सेवा प्रदाते किंवा कोणत्याही अधिकृत एजंट्ससोबत शेअर करण्याची/उघड करण्याची परवानगीही देता.
  1. सर्व संदेश योग्य प्रकारे पाठवले जातील याची खात्री करण्यासाठी PhonePeकडून वाजवी उपाययोजना करण्यात येतात. मात्र, संपर्काच्या माहितीवरील कोणतेही निर्बंध, फोन नंबर DND यादीमध्ये नोंदणीकृत असणे, ईमेलमधील डेटा साठवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे, दूरसंचार सेवा प्रदात्यांकडून होणाऱ्या त्रुटी इत्यादी कारणांमुळे संदेश पाठवण्यात अडथळे येऊ शकतात किंवा संदेश पाठवणे अयशस्वी होऊ शकते. वरील बाबी विचारात घेता, कोणताही संदेश प्राप्त न झाल्यास त्यासाठी PhonePeला जबाबदार धरता येणार नाही किंवा त्याबाबत PhonePeवर कोणतेही उत्तरदायित्व असणार नाही.
  1. तुम्ही मान्य करता आणि सहमती देता की, PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवांवरील सर्व कायदेशीर अधिकार, मालकी हक्क आणि हितसंबंध PhonePeकडे आहेत. यामध्ये PhonePe प्लॅटफॉर्म आणि NPS सेवांशी संबंधित सर्व बौद्धिक संपदा अधिकारांचाही समावेश आहे (हे अधिकार नोंदणीकृत असोत किंवा नसोत). तुम्ही पुढे हेही मान्य करता की, NPS सेवांमध्ये PhonePeने गोपनीय म्हणून निर्धारित केलेल्या माहितीचा समावेश असू शकतो आणि PhonePeची पूर्व लेखी संमती घेतल्याशिवाय तुम्ही अशी माहिती उघड करणार नाही. PhonePe प्लॅटफॉर्मवरील मजकूर आणि इतर घटक, यामध्ये त्याचे दृश्य स्वरूप आणि वापराचा अनुभव (“लूक अँड फील”) (उदा. मजकूर, ग्राफिक्स, प्रतिमा, लोगो आणि बटणांचे आयकॉन्स), छायाचित्रे, संपादकीय मजकूर, सूचना, सॉफ्टवेअर आणि इतर साहित्य यांचा समावेश आहे. हे सर्व घटक संबंधित परिस्थितीनुसार PhonePe आणि/किंवा तिचे थर्ड-पार्टी सेवा प्रदाते/त्यांना परवाना देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्या मालकीचे आहेत किंवा त्यांचा वापर करण्याचा परवाना PhonePeला देण्यात आला आहे. तसेच लागू कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि इतर कायद्यांनुसार संबंधित मालकांकडून या घटकांना योग्य संरक्षण देण्यात आले आहे. PhonePe याद्वारे तुम्हाला PhonePe प्लॅटफॉर्म आणि सेवांचा ॲक्सेस घेण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी मर्यादित परवाना प्रदान करते. या परवान्यामध्ये इतर कोणत्याही व्यक्तीच्या, व्हेंडरच्या किंवा अन्य कोणत्याही थर्ड पार्टीच्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती डाउनलोड करणे किंवा कॉपी करणे, मूळ सामग्रीच्या आधारे नवीन सामग्री तयार करणे, त्यामध्ये बदल करणे, रिव्हर्स इंजिनिअरिंग करणे, रिव्हर्स असेंबलिंग करणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे सोर्स कोड शोधण्याचा प्रयत्न करणे, तसेच NPS सेवांमधील कोणताही अधिकार विकणे, दुसऱ्याच्या नावे हस्तांतरित करणे, उपपरवाना देणे, त्यावर तारण हक्क निर्माण करणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करणे यांचा समावेश नाही. तुम्ही कोणताही अनधिकृत वापर केल्यास तुम्हाला देण्यात आलेली परवानगी किंवा परवाना समाप्त होईल.
  1. PhonePe प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही पुढील गोष्टी न करण्यास सहमती देता : (i) PhonePe प्लॅटफॉर्म किंवा त्यावरील मजकुराचा कोणत्याही व्यावसायिक उद्देशासाठी वापर करणे; (ii) अंदाजाच्या आधारे, खोटा किंवा फसवणुकीचा कोणताही व्यवहार करणे किंवा भविष्यात मागणी निर्माण होईल या अपेक्षेने कोणताही व्यवहार करणे; (iii) PhonePeची स्पष्ट लेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही उद्देशासाठी रोबोट, स्पायडर, स्क्रॅपर किंवा इतर स्वयंचलित साधने किंवा कोणतीही मॅन्युअल प्रक्रिया वापरून PhonePe प्लॅटफॉर्मवरील कोणताही मजकूर किंवा माहितीचा ॲक्सेस घेणे, त्यावर देखरेख ठेवणे किंवा त्याची कॉपी करणे; (iv) PhonePe प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही एक्स्क्लुजन हेडर्समध्ये नमूद केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणे किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवरील ॲक्सेस रोखण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या इतर उपाययोजना टाळणे, त्यावर निर्बंध आणणे किंवा त्यांना बगल देणे; (v) PhonePeच्या निर्णयानुसार तिच्या तांत्रिक पायाभूत सुविधांवर अवाजवी किंवा प्रमाणाबाहेर मोठा ताण पडेल किंवा पडू शकेल अशी कोणतीही कृती करणे; (vi) PhonePeची स्पष्ट लेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही उद्देशासाठी PhonePe प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही भागाशी थेट डीप-लिंक करणे (यामध्ये कोणत्याही प्रॉडक्ट/सेवेच्या खरेदी प्रक्रियेशी संबंधित पेजचाही समावेश आहे. मात्र, हे केवळ त्यापुरते मर्यादित नाही); किंवा (vii) PhonePeची पूर्व लेखी परवानगी घेतल्याशिवाय PhonePe प्लॅटफॉर्मचा कोणताही भाग “फ्रेम” करणे, “मिरर” करणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे दुसऱ्या वेबसाइटमध्ये समाविष्ट करणे; किंवा (viii) कोणतेही फसवे अर्ज सादर करणे किंवा PhonePe/संबंधित PoP किंवा कोणत्याही थर्ड पार्टीची फसवणूक करण्यासाठी PhonePe प्लॅटफॉर्मचा वापर करणे; आणि (ix) PhonePe आणि/किंवा संबंधित PoPला कोणतीही चुकीची, अपूर्ण किंवा खोटी माहिती/डेटा प्रदान करणे.
  1. NPS सेवा “जशा आहेत तशा” आणि “जशा उपलब्ध आहेत तशा” या तत्त्वावर प्रदान करण्यात येतात. सिस्टिम सतत कार्यरत राहणे, सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय उपलब्ध राहणे किंवा माहितीचे प्रसारण कोणत्याही त्रुटीशिवाय होणे याबाबत PhonePe कोणतीही स्पष्ट किंवा गर्भित हमी देत नाही.
  1. NPS सेवांचा वापर केल्यामुळे किंवा त्या सेवांचा वापर करता न आल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अप्रत्यक्ष, परिणामी, आनुषंगिक, विशेष किंवा दंडात्मक स्वरूपाच्या नुकसानीसाठी PhonePe कोणत्याही परिस्थितीत जबाबदार असणार नाही. यामध्ये नफा किंवा महसुलाचे नुकसान, व्यवसायात व्यत्यय येणे, व्यावसायिक संधी गमावणे, डेटा गमावणे किंवा इतर आर्थिक हितसंबंधांचे नुकसान यांमुळे झालेल्या नुकसानीचाही समावेश आहे. मात्र, नुकसानीचे प्रकार केवळ यापुरते मर्यादित नाहीत. असे नुकसान कोणत्याही कारणामुळे झालेले असो किंवा ते करार, निष्काळजीपणा, अपकृत्य किंवा अन्य कोणत्याही कारणाशी संबंधित असो, तसेच ते करार, अपकृत्य, निष्काळजीपणा, हमी किंवा अन्य कोणत्याही आधारावर उद्भवलेले असो, त्यासाठी PhonePe जबाबदार असणार नाही. कोणत्याही परिस्थितीत PhonePeवर काही उत्तरदायित्व असल्यास ते पन्नास रुपये (रु.50) यापेक्षा अधिक असणार नाही.
  1. वर नमूद केलेली माहिती, आवश्यक वैयक्तिक माहितीसह, NPSमधील सहभागी संस्थांसोबत शेअर केल्यामुळे आणि/किंवा उघड केल्यामुळे किंवा तुम्ही या NPS अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे उद्भवणाऱ्या किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही आणि सर्व दावे, उत्तरदायित्व, मागण्या, नुकसान, खर्च, व्यय (यामध्ये वकिलांच्या वाजवी शुल्काचाही समावेश आहे), नियामक कारवाया, दंड, दंडात्मक कारवाया किंवा नुकसानभरपाई यांमुळे PhonePe, तिच्या संलग्न कंपन्या तसेच PhonePe आणि/किंवा तिच्या संलग्न कंपन्यांचे संबंधित संचालक, भागधारक, अधिकारी, कर्मचारी आणि एजंट्स यांना कोणतेही नुकसान सहन करावे लागल्यास, खर्च करावा लागल्यास किंवा कोणत्याही उत्तरदायित्वाला सामोरे जावे लागल्यास, त्यांना नुकसानभरपाई देऊन अशा सर्व बाबींपासून सुरक्षित ठेवण्यास तुम्ही कोणत्याही अटीशिवाय आणि निःसंदिग्धपणे सहमती देता.
  1. या NPS अटी आणि शर्तींना PFRDA कायदा आणि/किंवा त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांसह भारतीय कायदे लागू असतील आणि या कायद्यांनुसारच त्यांचा अर्थ लावण्यात येईल. या NPS अटी आणि शर्तींमधून उद्भवणारा किंवा त्यांच्याशी संबंधित कोणताही कायदेशीर दावा, कारवाई किंवा कार्यवाही यांवर कर्नाटकातील बेंगळुरू येथील सक्षम न्यायालयांचेच विशेष अधिकारक्षेत्र असेल.
  1. कायद्यातील सुधारणा, PFRDAचे निर्देश किंवा कामकाजातील सुधारणा यांच्याशी सुसंगत राहण्यासाठी या NPS अटी आणि शर्तींमध्ये कोणत्याही वेळी बदल करणे, दुरुस्ती करणे किंवा त्या अपडेट करण्याचा अधिकार PhonePe राखून ठेवते. अशा कोणत्याही अपडेटनंतर तुम्ही NPS सेवांचा वापर सुरू ठेवल्यास, तुम्ही सुधारित अटी आणि शर्ती स्वीकारल्या आहेत आणि त्या तुमच्यावर बंधनकारक आहेत, असे मानण्यात येईल.
  1. तुम्ही समजता, सहमती देता आणि मान्य करता की, या अटी आणि शर्तींमधील कोणतीही तरतूद लागू कायद्यांचे उल्लंघन करणारी, बेकायदेशीर, अवैध किंवा अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याचे आढळल्यास, अशा उल्लंघनामुळे, बेकायदेशीरपणामुळे, अवैधतेमुळे किंवा अंमलबजावणी करता येत नसल्यामुळे संपूर्ण अटी आणि शर्ती अवैध ठरणार नाहीत. संबंधित तरतूद वैध, कायदेशीर आणि अंमलबजावणी करण्यायोग्य ठरण्यासाठी आवश्यक त्या मर्यादेपर्यंत तिच्यात बदल करण्यात आला आहे, असे मानण्यात येईल. अशा प्रकारे बदल करूनही ती तरतूद वैध, कायदेशीर आणि अंमलबजावणी करण्यायोग्य ठरू शकत नसल्यास, अवैध ठरवण्यात आलेली तरतूद या अटी आणि शर्तींमध्ये समाविष्टच नाही, असे मानून त्यांचा अर्थ लावण्यात येईल. त्यामुळे या अटी आणि शर्तींमधील इतर तरतुदी किंवा करारातील वचनांची वैधता, कायदेशीरपणा आणि अंमलबजावणीयोग्यता यांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि त्यानुसार संबंधित पक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या यांचा अर्थ लावण्यात येईल व त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.
  1. हा करार (या करारातील सर्व अधिकार, मालकी हक्क, लाभ, हितसंबंध, उत्तरदायित्वे आणि कर्तव्ये यांसह) किंवा त्याचा कोणताही भाग आपल्या कोणत्याही संलग्न कंपनीकडे किंवा आपल्या हितसंबंधांचा उत्तराधिकारी असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार PhonePeला असेल. या करारांतर्गत PhonePeचे काही अधिकार आणि जबाबदाऱ्या स्वतंत्र कंत्राटदारांकडे किंवा इतर थर्ड पार्टींकडे सोपवण्यात येऊ शकतात. आमची पूर्व लेखी संमती घेतल्याशिवाय तुम्ही हा करार पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे हस्तांतरित करू शकत नाही. अशी संमती द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार आमच्याकडे असेल.
  1. तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंद करण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार PhonePe राखून ठेवते. NPS सेवांमध्ये कोणताही बदल करण्यात आल्यास किंवा त्या बंद करण्यात आल्यास, त्यासाठी PhonePe कोणत्याही प्रकारे तुमच्याप्रती जबाबदार असणार नाही, याला तुम्ही सहमती देता.
PhonePe Logo

Business Solutions

  • Payment Gateway
  • E-commerce PG
  • UPI Payment Gateway
  • Express Checkout
  • Offline Merchant
  • Offline Payment Partner
  • Advertise on PhonePe
  • SmartSpeaker
  • POS Machine
  • Payment Links
  • Travel and Commute

Insurance

  • Motor Insurance
  • Bike Insurance
  • Car Insurance
  • Health Insurance
  • Life Insurance
  • Term Life Insurance
  • Personal Accident Insurance
  • Travel Insurance
  • International Travel Insurance

Investments

  • 24K Gold
  • Mutual Funds

Lending

  • Consumer Lending
  • Merchant Lending
  • Secured Loans

General

  • About Us
  • Careers
  • Investors Relations
  • Contact Us
  • Press
  • Ethics
  • Report Vulnerability
  • Merchant Partners
  • Blog
  • Tech Blog
  • PhonePe Pulse
  • Merchant Onboarding Guidelines

Legal

  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Grievance Policy
  • How to Pay
  • E-Waste Policy
  • Trust & Safety
  • Global Anti-Corruption Policy
  • PhonePe Account Aggregator Notice

See All Apps

Download PhonePe App Button Icon

PhonePe Group

  • PhonePe Appstoreexternal link icon
  • PhonePe Investexternal link icon

Credit Cards

  • PhonePe HDFC Bank Co-Branded Credit Cards
  • PhonePe SBI Card Co-Branded Credit Cards
  • Wish Credit Card

Certification

Sisa Logoexternal link icon
LinkedIn Logo
Twitter Logo
Fb Logo
YT Logo

* Numbers are accurate and relevant as of September 2026

© 2026, All rights reserved
PhonePe Logo

Business Solutions

arrow icon
  • Payment Gateway
  • E-commerce PG
  • UPI Payment Gateway
  • Express Checkout
  • Offline Merchant
  • Offline Payment Partner
  • Advertise on PhonePe
  • SmartSpeaker
  • POS Machine
  • Payment Links
  • Travel and Commute

Insurance

arrow icon
  • Motor Insurance
  • Bike Insurance
  • Car Insurance
  • Health Insurance
  • Life Insurance
  • Term Life Insurance
  • Personal Accident Insurance
  • Travel Insurance
  • International Travel Insurance

Investments

arrow icon
  • 24K Gold
  • Mutual Funds

Lending

arrow icon
  • Consumer Lending
  • Merchant Lending
  • Secured Loans

General

arrow icon
  • About Us
  • Careers
  • Investors Relations
  • Contact Us
  • Press
  • Ethics
  • Report Vulnerability
  • Merchant Partners
  • Blog
  • Tech Blog
  • PhonePe Pulse
  • Merchant Onboarding Guidelines

Legal

arrow icon
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Grievance Policy
  • How to Pay
  • E-Waste Policy
  • Trust & Safety
  • Global Anti-Corruption Policy
  • PhonePe Account Aggregator Notice

PhonePe Group

arrow icon
  • PhonePe Appstoreexternal link icon
  • PhonePe Investexternal link icon

Credit Cards

arrow icon
  • PhonePe HDFC Bank Co-Branded Credit Cards
  • PhonePe SBI Card Co-Branded Credit Cards
  • Wish Credit Card

Certification

Sisa Logo

See All Apps

Download PhonePe App Button Icon
LinkedIn Logo
Twitter Logo
Fb Logo
YT Logo

* Numbers are accurate and relevant as of September 2026

© 2026, All rights reserved